रसमलई केक

Submitted by वर्णिता on 11 May, 2021 - 06:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

2 कप मैदा
1 कप मिल्क पावडर
1 कप पिठीसाखर
1 टीस्पून बेकिंग पावडर
अर्धा टीस्पून खायचा सोडा
4 टेबलस्पून तेल
3 टेबलस्पून बटर
1 कप दूध
इसेन्स

किंवा

सव्वा कप मैदा
2 अंडी
3/४ कप पिठीसाखर
१/२ कप तेल
१/४ कप दूध
१ टे स्पून बेकिंग पावडर
१/४ चमचा सोडा
इसेन्स

किंवा चांगल्या ब्रॅंडचे केक प्रीमिक्स.
1 कप प्रीमिक्स
अर्धा कप दूध
1 टेबलस्पून तेल

रसमलाई अर्धा किलो
जेल कलर (लेमन यलो)
व्हीप क्रीम

क्रमवार पाककृती: 

जर प्रीमिक्स न वापरता केक चा बेस करणार असाल तर ---
बटर आणि तेल एक प्लास्टिक कुंड्यात चांगले फेटून घ्यावी. पिठीसाखर आणि मिल्कपावडर मिसळून घ्यावी. दुसरीकडे एका कागदावर मैदा, सोडा, बेकिंग पावडर 3 वेळा चालून घेऊन ठेवावे. हे चाळलेले मिश्रण थोडे थोडे करत कुंड्यात घालून फेटावे. दूध, व इसेन्स घालावा. सतत फेट त रहावे. फुप्रो त छान फेटले जाते.

यापेक्षा अंड घातलेला केक किंवा प्रीमिक्स वापरून केलेला केक जास्त हलका होतो.

अंड घातलेल्या केकसाठी बॅटर करताना , मैदा, सोडा ,बे पावडर 2,3 वेळा चाळून घ्यावी. फु प्रोत हे चाळलेले मिश्रण घालून त्यात बाकीचे सगळे जिन्नस घालून फेटून घ्यावे.

हे करण्यापुर्वी एक पातेले/कुकर -- त्यात थोडी वाळू पसरून त्यावर स्टॅंड ठेवावा आणि बारीक गॅसवर झाकण घालून प्रिहिट करत ठेवावे.

आता फेटलेले बॅटर केक पॅन मध्ये तुपाचे बोट लावून त्यावर मैदा भुरभुरून ,तो सगळा झटकून घेऊन त्यात ओतावे. पॅन हलकासा आपटून घ्यावा. हवा राहू नये यासाठी. पातेल्यात / कुकरमध्ये ठेवून झाकण लावावे. हे पॅन बॅटर घातल्यावर साधारण अर्धे भरले पाहिजे. जास्त नको.
35 ते 40 मिनिटात बेक होते. गॅस बारीक हुन थोडा जास्त.
साधारण 35 मिनिटांनी झाकण काढून स्टिक केकमध्ये घालून बघावी. चिकटला नाही म्हणजे ओके.

जर प्रीमिक्स वापणार असाल तर
प्रीमिक्स, दूध, तेल घालून फेटावे , ह्याला फुप्रो ची गरज नाही. लगेच फेटले जाते.
पॅन मध्ये ठेवून (वरीलप्रमाणे) 15 मिनिटे बेक करावा.
हा लवकर होतो.

केक बेस तयार झाला की पॅन गार होत आला की पॅनच्या कडेने सूरी फिरवून ,केक बेस ताटलीत काढून घ्यावा. केक पूर्ण थंड होऊ दयावा. मग सुरीने अर्धा भाग हलकासा गोल फिरवत कापून घ्यावा. दोऱ्याने व्यवस्थित कापला जातो. हवे असले तर 3 भाग करावेत (आवडीनुसार).

20210511_155026.jpg

आता खालचा भाग आधी घेऊन त्यावर रसमालाईचे दूध चमच्याने पसरून घ्यावे. रसमालाईचे गोळे हाताने स्मॅश करून या लेअर वर पसरावे. क्रीमचा एक लेअर द्यावा.
केकचा कट केलेला दुसरा भाग त्यावर ठेवावा- - वरची प्रोसेस दूध आणि गोळे ठेवण्याची रिपीट करावी.

कुंड्यात क्रीम फेटून घ्यावे, कलर घालावा. व पूर्ण केकला कोटिंग करून घ्यावे. सुरवातीला क्रीम फासताना वेळ लागतो . क्रीम पातळ होऊ द्यायचे नाही. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे.
20210511_155111.jpg

नोजल वापरून हवे तसे डिझाइन करावे.

20210422_201719.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तितका
अधिक टिपा: 

बटर, दूध रूम टेंपरेचर ला असलेले घ्यावे.
बेकिंग पावडर, सोडा फार जुना वापरू नये.
गॅस वर पातेले प्रिहिट करताना गॅस मोठा ठेवून 5/7 मिनिटे करावे.
मावेत ही केक होतो, स्पॉंजी सुद्धा होतो पण कडेने खरपूस / ब्राउन होत नाही. ओव्हन/ ओटीजी मध्ये होईल. मी केलेला नाही. मावेत केलेल्यापेक्षा मला गॅसवरचा आवडला.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर दिसतोय
आज इथे इतके केक पाहून मला उगीच एखादी पेस्ट्री ऑर्डर करावी वाटतेय.
बघू रमजान च्या सुट्टीच्या दिवशी करेन. किंवा मग किमान शीरखुर्मा.

आली का रेसिपी... सुपर्ब दिसतोय केक.
मला तर असे डेकोरिटव आईटम जमतच नाहीत
तुझे कौतुक.
खायलाच बोलव कधीतरी Wink

मस्त मस्त!

खायलाच बोलव कधीतरी>>>>>+११११११११११

मस्तच दिसतोय. माझ्या माहितीत इथे दोघीजणी आहेत ज्या इंडियन चवीचे केक्स, कपकेक्स आणि डोनट्स करतात. म्हणजे गुलाबजाम, रसमलाई, गाजर हलवा, तिरामिसू थंडाई, केशर पिस्ता इत्यादी. खूप डिमांड आहे इथे.

वा !! भारी दिसतोय केक. आत्तापर्यंत रासमलाई केक, गुलाबजाम केक, मॅगो केक ह्यांचे इतके फोटो पाहिले आहेत पण एकदाही खाल्ला नाहीये... मी फोटो पाहिला त्यावर रासमलाईचे गोळे वर लावले होते.

भारी झालाय केक.
मी पण केलेला आता रिसेंटली.. almond इसेन्स वापरला मी केक करताना.. परफेक्ट रेसिपी !! डिझाईन पण छान जमलंय.

वाह, जबरदस्त टेम्पटिंग फोटो आहे. केक फारच छान झाला आहे. बेस केक पासुन जमणार नाही, पण कायनीचा केक आणला तर त्यावर आयसिंग आणि रसमलाईचे संस्कार केले तर थोडक्यात घरीच बनवायला जमेल.

केक मस्त.

कायनीचा केक आणला तर त्यावर आयसिंग आणि रसमलाईचे संस्कार केले तर थोडक्यात घरीच बनवायला जमेल >> नका हो असे काही करु. तो कयानीचा खवट बावा चडफडेल Happy

Pages