तंदूरी गोभी

Submitted by तृप्ती आवटी on 5 May, 2021 - 18:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवरचा एक गड्डा
२ चमचे बेसन
२ चमचे घट्ट दही
१ चमचा तेल
१ चमचा कसुरी मेथी बssssरीक चुरून
२ मसाल्याचे चमचे तंदुरी चिकन मसाला
१ मसाल्याचा चमचा प्रत्येकी धणे पूड, जिरे पूड, हळद आणि तिखट
१ छोटा चमचा प्रत्येकी आले आणि लसूण पेस्ट
चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

फ्लावरचे तुरे काढून नीट धुवून, निथळून ठेवावेत. बेसन कोरडंच भाजून त्यात मीठ वगळता इतर सर्व जिन्नस घालून नीट फेटून घ्यावं. फ्लावरचे तुरे त्यात घालून ते मिश्रण सगळ्या बाजूनं लागेल असं हलवून घ्यावं. झाकण घालून फ्रिजमध्ये ठेवावं. तासाभरानं मीठ घालून पुन्हा मिसळून मग तेलाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ते तुरे ठेवून हाय ब्रॉइलवर ग्रिल करावेत. ७-८ मिन. एका-एका बाजूनं असे १५-१६ मिनिटांमध्ये झाले.

इथे भारतीय रेस्टॉरन्टमध्ये सिझलर पॅनमध्ये पनीर टिक्का आणि इतर ग्रिल्ड भाज्या मिळतात अगदी तशी चव येते.

वाढणी/प्रमाण: 
Appetizer म्हणून असेल तर २-३ जणांमध्ये पुरेल
अधिक टिपा: 

हेच मॅरिनेशन वापरून पनीर, चिकन, *ब्याडवर्ड*टाटे, मिक्स व्हेजी ग्रिल करता येतील. ग्रिलिंगचा वेळ कमी-जास्त होइल मात्र.

माहितीचा स्रोत: 
फ्रेन्ड
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका फ्रेन्डकडे याच पद्धतीनं केलेल्या चिकनची सगळ्यांनी फारच तारीफ केली म्हणून मी हा शाकाहारी प्रकार ट्राय केला. कालच केले होते, आता पुन्हा केल्यावर फोटो टाकेन.

छान रेसिपी. सोपी वाटतेयं. फ्लावरचं काही नवीन मिळाले तर हवेच असतं.

७-८ मिन. एका-एका बाजूनं असे १५-१६ मिनिटांमध्ये झाले. तुकडे किती मोठे आहेत त्याप्रमाणे थोडा कमी-जास्त होइल वेळ.

://www.maayboli.com/node/50982 >>>> अर्र काल रेसिपी लिहिली तेव्हा शोधाशोध न करताच लिहिली. फोटो छान आलाय फ्लावरचा.

ब्लॅककॅट, तुमची ती मुस्सलमची रेसिपी भारी आहे एकदम.

मसाला शान किंवा नॅशनल कुठलाही चालेल.

डिजे, योकु - करा नक्की. योकोबा, लोखंडाच्या कढईत करू नकोस Wink

छान आहे फ्लावर मागवले आहे त बिग बास्केट वर. आजकाल आमी डाएट प्लॅन वर असल्याने रोज एक भाजी बन्वावी लागते त्यात हे अ‍ॅड करेन प्लस ब्रॉकोली व मशरूम्स ला पण असे बनवत येइल ना.

हा आवडता प्रकार, यात बेसनाबरोबर मी थोडं तांदूळाचं पीठ घालते.
फ्लॉवर, ब्रोकोली वापरून एअर फ्रायर मध्ये पण छान क्रिस्पी होतो. कोरडा अ‍ॅपेटायझर म्हणून किंवा थोडा सॉस करुन त्यात हे तंदूर प्रकार परतून पोळी/नान बरोबर भारी लागतो Happy

एअर फ्रायर मध्ये मागे केलेले तंदूरी गोभी आणि खरपूस तंदूरी ब्रोकोली .

१>
Tandoori_gobhi.jpg

२>
Brokoli_tandoori.jpeg

तृप्ती, मस्त आणी सोपी पाकृ. आवडली. Happy आता एअर फ्रायर बाहेर काढला पाहीजे. आधी मीपूणेकर ने टाकलेला फोटो पाहुन मला वाटले की अरारा यांनीच ते करुन फोटो टाकलाय. मग खाली पाहीले तर मीपूणेकर. Happy

चटपटीत रेसिपी दिसतेय. करून बघणार.
पुणेकर, फोटोतुन छान दिसतेय, फोटो बघून करावीशी वाटली.
म्हणून रेसिपीत फोटू हवाच.

छान पाकृ !!

मिपू, एएरफ्रायर मध्ये किती वेळ ठेवायचं ?

मीपुणेकर, दोन्ही फोटो फारच भारी आहेत.

स्वाती२, करून लगेच फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद Happy

आम्ही आज याच रेसिपीनं पनीर ग्रिल केलं होतं. पनीर एका बाजूनं ५ मिन. असं एकूण १० मिनिटांत झालं.