आयुष्य भाग १

Submitted by जेसिका on 28 April, 2021 - 07:09
आयुष्य.. भाग १

राणी... मुंबईतल्या एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी. पप्पा , मम्मी, दादा आणि ती. एकदम खुश असणार घर. तिच्या पप्पांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. दादात आणि तिच्यात ७ वर्षांचे अंतर.... बहुतेक म्हणून दोघांचे पटत नव्हत... पण राणी मात्र पप्पांची लाडकी.. खूप लाडकी. पप्पा तिचे सगळे लाड पुरवायचे. ती म्हणेल तसा ड्रेस, खाण, फिरायला जाण, वगैरे सगळच....
राणी खूप हुशार होती अभ्यासात. पण इतर कलाही तिच्या अंगात होत्या - उदा. डान्स, गायन, चित्रकला, रांगोळी, मेहेंदी इ. अगदी सर्वगुण संपन्न अशी होती ती... आणि म्हणूनच पप्पांना खूप गर्व होता तिचा. सगळ्यांना अभिमानाने सांगायचे कि राणी माझी मुलगी आहे.
पण तिच्यात एक अवगुण मात्र होता कि ती अजिबात धाडसी नव्हती. कोणत्याही गोष्टीला घाबरायची, भांडनाना घाबरायची, आपल चुकल तर कुणी आपल्याला काय म्हणेल या गोष्टीचा विचार करून भेदरून जायची. तिला अस वाटायचं कि आपल्यामुळे कुणालाही कसलाच त्रास होता कामा नये.. म्हणून सगळ्यांसोबत हसून-खेळून राहायची ती.
असेच दिवस जात होते. राणी आता मोठी झाली होती. रंगाने गोरी, डोळ्यांना चष्मा असलेली, मध्यम उंचीची, मध्यम तब्येत असणारी....दहावीला गेली होती राणी आता. तिच्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणीनी क्लास लावला होता. पण तिची मात्र जिद्द होती कि क्लास न करता घरीच अभ्यास करून जास्त मार्क मिळवायचे.
पण काय म्हणतात ना कुणाची तरी वाईट दृष्ट लागली आणि सगळेच दिवस पालटायला लागले. मम्मीला गंभीर संधिवात झाला. मम्मीला पाण्याचा ग्लास पण धरता येईना .मम्मीला पहिल्यांदाच इतक आजारी बघून राणी धास्तावली. इथून मागे मम्मीने राणीला किचन मधल काहीच काम करू दिल नव्हत. आणि अचानक ओढवलेल्या परिस्थितीमुळे राणी हताश झाली.रोज दादा आणि राणी कस तरी काम आटोपून आप-आपल्या कामाला निघून जायचे. राणी दिवस शाळा आणि घरातलं काम यात निघून जायचा. पण ती रात्री सगळ आवरून २ वाजेपर्यंत अभ्यास करत बसायची. पप्पा पण जागे राहायचे आपल्या लाडक्या लेकीला सोबत म्हणून... आता राणीची दहावीची तयारी जोरात चालू होती. सराव परीक्षा होणार होत्या. तिने ओढवलेल्या परिस्थितीवर मात करत जोमाने अभ्यासाची तयारी केली. आणि तश्यातच एक दिवस अचानक दादाचा अपघात झाला. दादाचे दोन्ही हात फ्याक्चर झाले. दादा १५ दिवस रुग्णालयात होता. आता तर राणीला आजारी मम्मीला सांभाळून दादाला पण डबा घेवून जावा लागे. १५ दिवसानंतर दादा घरी आला , पण त्याला स्वतःची कामे सुद्धा करता येईना. त्याचे देखील सर्व राणीलाच आवरून द्यावे लागे.
या सगळ्या अडचणीत राणीला पप्पांचा फार मोठा आधार होता. आणि कदाचित त्यामुळेच अशा परिस्थितीवर मात करत तिने दहावीला ७१% मार्क मिळवले. तिचे सगळ कुटुंबालाच तिचा अभिमान वाटू लागला. ३ चुलते, ३ चुलत्या, भावंड अगदी सगळेच.....
पप्पांच एक खूप मोठ स्वप्न होत कि राणीने डॉक्टर बनाव. त्यांनी राणीला सुद्धा हे बाळकडू लहानपणापासुनच पाजल होत. त्यामुळे राणीला पण डॉक्टरच व्हायचं होत. पण नियतीचा खेळ पुन्हा सुरु झाला. राणी ज्या शाळेत होती तिला तिथेच ११ वी सायन्स ला admission घ्यायचं होत. तिला विश्वास होता कि ज्या शाळेला आपण इतकी पारितोषिक मिळवून दिली त्या शाळेत आपल्याला admission मिळणार. पण कट-ऑफ लिस्ट ७५% लाच क्लोज झाली.
मग तिने इतर कॉलेज मध्ये फॉर्म भरले , पण नशिबाने काही साथ दिली नाही. पप्पानी पण त्यांच्या परीने अनेक प्रयत्न केले, पण प्रयत्नांना यश येईना. शेवट पप्पा अचानक कॉमार्सला admission करून आल. राणीच्या नकळत. घरी आल्यावर त्यांनी राणीला धीराने सांगितले कि सायन्स मधूनच करीयर होत अस नाही तर इतर हि अनेक पर्याय आहेत. आता पप्पानी इतके समजावून सांगितले कि राणीला ते मान्य करावच लागल.
आणि राणीची झुंज चालू झाली, अभ्यासाशी, नशिबाशी, मानसिकतेशी आणि घरातील परिस्थितीशी.... बरेच दिवस तर हे समजण्यात निघून गेले कि कॉमर्स म्हणजे काय????
तीच मन हे स्वीकारत नव्हत , पण मन मारून ती लढत होती.... अखंड..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच!
राणीच्या पुढील संघर्षाची उत्सुकता...

छान !
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

वेमा . हद हो गइ !
हे अस कस होउ शकत ?
Anyway नवी अस्मिता स्वागत आहे.

ओह अस्मिता डबल डॉट.
वेमा, हे माझ्या लक्षात आलेच नव्हते.
thanks च्रप्स!