भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहेर गाई म्हशी आल्या की स्वतःचे डोके फिरवून घेते. >>> Happy तिच्या माल्कीच्या जागेत अतिक्रमण झाले असे वाटत असेल तिला!
बहुतेक हे टेरीटरीचे ऑब्सेशन मेल डॉग्ज्स ना जास्त असते.
असे आमच्याकडे मोठे गीज आणि हरणे येतात रोज. ते दिसले की खिडकीत बसून माउई चा आरडाओरडा सुरु होतो मग.
आमच्याकडे बॅटरीवर चालणारा स्केटबोर्ड आहे जो मुलगा वापरतो. त्याची माउई ला फार भिती वाटायची पूर्वी. स्केटबोर्डिंग करणार्‍या कुत्र्यांचे व्हिडिओ बघून मी पण माव्याला चल बस त्यावर असे बरेचदा आग्रह करून पाहिला Happy पण घाबरून पळून जायचा. आता काल त्याला जबरदस्तीने त्यावर बसवला आणि एका हाताने त्याला धरून दुसर्‍या हाताने तो बोर्ड ढकलला तर मग फायनली त्याला त्यातली गंमत कळली बहुधा Happy मग त्यावर बसून घर भर फिरवले तर झोक्यावर खेळणार्‍या लहान मुलासारखा खूष झाला होता! मजा म्हणजे आज सकाळी त्यानेच त्या बोर्ड कडे मला नेले. मग पुन्हा एक वरात झाली त्याच्यावर Happy

झालं माऊई आता धिंगाणा घालतोय स्केटबोर्ड वर
भुभुना एक गोष्ट आवडली की ते अक्षरशः दगडासारखे त्याला चिकटून बसतात, ते म्हणजे तेच

ओडीन ची सध्या सॉलिड मस्ती सुरू आहे
माझ्या एका मित्राकडे रेनोव्हेशन काढल्याने तो तात्पुरता आमच्या शेजारी भाड्याने रहायला आला आहे. सोबत त्याचा दांडगा डॉबरमन बुलेट आहे. ओडीन आधीपासूनच ओळखतो त्याला त्यामुळे आम्ही गेट लावून घेतो आणि दोघांना मोकळे खेळायला सोडतो पण तो दणादण ओड्याला आपटतो, बुकलतो. पण म्हणून हा गप्प बसत नाही, थोडा वेळ विश्रांती घेऊन नव्या दमाने चालून जातो. आणि त्याला एकदा भुईसपाट केल्याशिवाय सोडत नाही. तोवर तो दमलेला असतो मग तो विश्रांती घेऊन पुन्हा रिंगणात येतो. अक्षरशः तासन्तास खेळ चाललेला असतो. अर्थात आम्ही दोघे सतत लक्ष ठेऊन असतो थोडं जरी जास्त होतंय अस वाटलं की लांब करतो पण दोघांनाही अफाट एनर्जी आहे आणि आम्हाला चुकवून मारामारी करायची असते. तो बाहेर पडला की दारात येतो आणि दारावर पंजे मारून ओड्याला बाहेर बोलावतो किंवा ओडी बाहेर असेल तर तो त्याच्या घरी जातो.
नंतर अक्षरशः धुळमखल्या अंगाने येतो. इतका मार खाऊनही त्याची खुमखुमी काय कमी होत नाही.

अरे वा Happy शेजारीच फ्रेन्ड आला म्हणजे ओड्या ची एकदमच मज्जाच झाली मग आता. दोन भुभु खेळताना ( आपल्याला सवय नसेल तर) बघताना वाटते मारामारीच करतायत, पण त्यांची मस्ती तशीच असते असे नंतर कळले आम्हाला. सोपे म्हणजे शेपट्या बघायच्या ! त्या हलताय्त तोवर मज्जेत चालू असतं Happy

बघताना वाटते मारामारीच करतायत, पण त्यांची मस्ती तशीच असते असे नंतर कळले आम्हाला>>>>

बरोबर, त्यांचे दाखवायचे आणि चावायचे दात वेगवेगळे असतात Lol

साया व स्पॉटी खेळतात तेव्हा स्पॉटी सायाला चावतेय असे वाटते पण ती चावत नसून फक्त तोंडात धरते. आम्हाला भीती वाटते की कधी चुकून सायाचे पोट स्पॉटीच्या तोंडात स्वाहा व्हायचे Happy Happy

ह्या प्राण्यांच्या गंमती पाहात वेळ भर्रकन जातो ...

आता त्याला त्याच्या पायाने ढकलत पुढे न्यायला शिकव म्हणजे तो त्याचा करेल>>>>

हो नं... घरातील आळशी पब्लिक (असेल तर) वस्तू इकडून तिकडे न्यायला मदत घेईल स्केटबोर्डवाल्या माऊइची Lol

हा बघा ज्योई आणि त्याचा मित्र ओरिओ. ओरिओ ज्योईपेक्षा २ आठवड्यांनी लहान आहे आणि आकाराने दहापट मोठा आहे!
WhatsApp Image 2021-03-08 at 6.31.44 PM.jpeg

दोघेही प्रचंड मस्ती आणि पळापळी करतात. तो ज्योईला जॅकेट तोंडात धरून उचलतो. ज्योई त्याच्या तोंडाला अक्षरशः लटकून त्यातला बॉल काढून पळतो !

खूप पळापळी करून झाल्यावर मी ट्रीट काढल्या, तर दोघे अगदी गुडबॉय सारखे समोर येऊन बसले.
WhatsApp Image 2021-03-08 at 6.31.44 PM(1).jpeg

नंतर आम्ही "शेपूट घालणे" ह्या वाक्प्रचाराचं प्रात्यक्षिक बघितलं ! अर्धातास प्रचंड पळापळ केल्यावर ज्योई दमला. ओरिओला तरीही खेळायचच होतं. ज्योईने अचानक शेपूट दुमडून आपल्या दोन पायांच्या मध्ये घातली आणि आमच्या इथे आला. आम्हांला वाटलं ह्यांच्या मारामारीत ह्याची शेपूट तुटली की काय!! आम्ही पॅनिक. नंतर वाचलं की दमल्याचं किंवा एखादी गोष्ट करायची नाही हे सांगण्याचं जेस्चर असतं म्हणे ते ! Happy

<>>खूप पळापळी करून झाल्यावर मी ट्रीट काढल्या, तर दोघे अगदी गुडबॉय सारखे समोर येऊन बसले. >>> एकदम गुणी बाळे हो... Happy

ओडीन जाम खुष असेल मित्रामुळे. .

वा, जोई ला फ्रेन्ड मिळाला का? त्याचे आणि ओरिओ चे फोटो भारीच क्यूट!! गुडबोय फोटो तर फार गोड.
आम्हांला वाटलं ह्यांच्या मारामारीत ह्याची शेपूट तुटली की काय!! आम्ही पॅनिक. >> Lol

जोई आणि ओरीओचे फोटो क्यूट आहेत! शेपटी Lol
माव्याच्या स्केटबोर्ड विडीओ/ फोटो हवा. फार क्युट दिसत असेल ना !

ओरीओ नाव काय पर्फेक्ट आहे!
मित्रांबरोबर मस्ती म्हणजे सगळ्यात भारी मजा असेल त्यांच्यासाठी.
हा धागा वाचून चेहऱ्यावर हसू येतेच येते Happy
मात्र मागच्या पानावर कॉफी विषयी वाचून वाईट वाटले Sad

फारच गोड किस्से आहेत सगळ्यांचे. मांजराची बाळं पण इतकी सुपर-क्युट मस्ती करतात. हहपुवा होते.

ओरिओ आणि ज्योई कसले मस्त आहेत. ओरिओ कुठल्या ब्रीड चा आहे?
गुड बॉय पोझ तर फार भारी
ट्रीट दिसली की सगळे भूभिज एकदम गुड बॉय फेज मध्ये जातात आणि लाडात येतात
ओडीन तर पक्का लाचखाऊ आहे
त्याला ट्रीट दाखवली नाही तर एकही कमांड ऐकत नाही, ऐकूच गेलं नाही असं दाखवतो
ट्रीट दिसली की लगेच मग सीट, डाऊन, रोल, शेक हॅन्ड सगळं

आज त्याने ग्राउंड वर सॉलिड बॉयफ्रेंड ची भूमिका पार पडली
त्याची मैत्रीण बेला खेळता खेळता एक गाईच्या जवळ गेली
तिकडे गाई म्हशी पण चरायला सोडलेल्या असतात आणि भटकी कुत्री पण
त्याच सगळयात आमची बाळं खेळत असतात
तर त्या गाई ला बेला चे इतकं जवळ येणं खपल नाही आणि ती डोके खाली करून, शिंगे उगारत बेलावर धावून गेली
ती पायात शेपटी घालून पळाली
हे बघताच आमच्या हिरोच्या अंगात आलं आणि तो भुंकत गाई वर चालून गेला
मी थांब थांब म्हणत त्याच्या मागे पळायला लागलो
तोवर गाईने बेला चा नाद सोडला आणि ती ओडीन च्या मागे लागली
त्याला असले प्रकार आवडतात आणि मस्त झुकांड्या देत तो पळत राहिला आजूबाजूला
तोवर मग बेलाला कळलं आपल्याला कुमक आली मग ती दुसऱ्या बाजूने गाई च्या मागे
गाय फिरून फिरून आणि शिंगे उगारून पळून पळून पार दमून शेण झाली आणि यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही असा विचार करून चालत निघून गेली.
मग ओड्या मीच कसा शूरवीर आहे असा रुबाब करत हिंडला
मग काय मैत्रिणीकडून पार किसेस वगैरे फुल्ल Happy

फारच गोड किस्से आहेत सगळ्यांचे. >>> + १

ओडीन , शारक्याचा फॅन आहे काय ? काय शायनिंगगिरी मारतोय . सही

नविन किस्से भारी, या सगळ्याचे व्हिडीयो टाकत जा बर!
ज्योई आणि ओरिओ दोघही गुड बॉय पोझ मधे एकदम क्युट दिसतायत.

फारच क्यूट किस्से. ओरीओ ज्योई >>>भलतेच गोंडस प्रकरण आहे
मग त्यावर बसून घर भर फिरवले तर झोक्यावर खेळणार्‍या लहान मुलासारखा खूष झाला होता!>>>>>>>>>>> किती गोड! इंस्टावर टाकलायस का विडीओ?

बेला ओडीन Lol

बर्‍याच दिवसात इथे नविन पोस्टी नाही आल्या.
bday_0.jpgकाल माव्याचा पहिला बड्डे झाला. सकाळी मस्त आंघोळ घातली. मग स्वच्छ् आणि मऊ मऊ झाल्यावर बंडाना, बड्डे कॅप घालून नटवला आणि केक चा कार्यक्रम झाला. माउई ने पँपरिंग भयंकर एंजॉय केलं. केक समोर ठेवल्यवर तर फार खूष झाला. नंतर संध्याकाळी त्याला घेऊन पेट शॉप मधे जाऊन त्याच्या पसंतीने खेळणी घेतली Happy
सगळ्यात मज्जेची गोष्ट पुढेच आहे. काल फोटो सेशन झाल्यावर इन्स्टा वर फोटो अपलोड केले. तेव्हा लक्षात आले की माउई चा एक सर्वात जुनी इन्स्टा फ्रेन्ड 'पीनट' चा पण कालच होता फर्स्ट बड्डे. सेमच ब्रीड ( जे फारसे कॉमन नाहीये). कालच तिचाही बड्डे म्ह्टल्यावर शंका आली म्हणून अजून चौकशी केली तर लक्षात आले की ती चक्क माउई ची सख्खी बहीण आहे!! आम्हीच असले एक्साइट झालो , जवळ नाहीये फार, ३ तास ड्राइव्ह च्या अंतरावर आहे. नाही तर गट्ग केले असते नक्की! पीनट च्या आई ने या दोघांचा अजून पण एक भाऊ 'ऑली' शोधला होता. त्याच्याशीही काल कनेक्ट केले Happy अशा रितीने यादोंकी बारात स्टाइल एकच दिवसात ३ बिछडे हुई भाई बहन सापडले Happy पावर ऑफ सोशल मिडिया!

Pages