भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कॉफी व स्पॉटीला मैत्रीण म्हणून आमच्या घरी साया आली. मुलीची फारा दिवसांची इच्छा होती की पूर्ण काळी व हिरवे डोळे असलेली मांजर घरी असावी. ती या निमित्ते पूर्ण झाली. साया एक दीड महिन्याचे पिल्लू होते तेव्हा आमच्या गावातील घरात अचानक आले, बहुतेक तिची आई पिल्ले हलवताना तिला विसरून गेली. घरच्यांनी फोन करून हवे तसे मांजर आयते घरात आलेय, घेऊन जा सांगितल्यावर मुलीने लगेच जाऊन तिला आणले. पिल्लाची प्रचंड आबाळ झाली होती, डोळे घाणीने भरलेले आणि अंगावर किडेच किडे. तिला आधी डेटॉलने अंघोळ घातली आणि ड्रायरने वाळवून सगळे किडे घालवले.

स्पॉटी व कोफी तिला कसे स्वीकारतील ही भीती होती पण तिघांची लगेच गट्टी जमली. हा कॉफीसोबत खेळतानाचा व्हिडिओ.

https://youtu.be/d-9B72S34iM

आणि हा स्पॉटीसोबत.

https://youtu.be/WxEDLkLJcKk

दुर्दैवाने कॉफी गेल्या आठवड्यात गेला. त्याने दोन दिवस अन्न सोडले व तिसऱ्या दिवशी तो शेजारच्या प्लॉटमध्ये जाऊन झाडाखाली कायमचा झोपला. आम्हाला वाटले की आजूबाजूच्या घरातील कोणी त्यांच्या बागेत रॅट किल वगैरे टाकले ते ह्याने खाल्ले. पण तो गेल्यावर दोन दिवसात स्पॉटी आजारी झाली. आणि तिच्या आजारपणातील advanced स्टेज बघितल्यावर कॉफीचेही हेच झाले हे लक्षात आले. गावात कोणी व्हेट नाही. नशिबाने माबोकर स्वप्नाने डॉक्टरचा नंबर दिला, त्यांनी फोनवरून consult करून, केमिस्टशीही बोलून औषध दिले. आज चार दिवसांनी स्पॉटी दूध प्यायली, अजून डॉग फूड खात नाहीये. पण खाईल. पाच सहा दिवसांनी आज प्रथम ती हाक मारल्यावर धावत आली, इतके दिवस तिला मानही उचलून बघणे कठीण झाले होते. तिला अजूनही इन्फेक्शन आहे पण ते होईल बरे. ती एकदम फायटर आहे, छोडेंगे नहीं जी कॅटेगरी.

ह्या दोघांनाही पारवोव्हायरस हा आजार झाला जो खूप कॉमन आहे व घातक आहे. एका कुत्र्यापासून दुसऱ्याला अशी लागण होते व दोन तीन दिवसात कुत्रा जाऊ शकतो, जसे आमचा कॉफी गेला. पण यावर लसीकरण हा सोपा उपाय आहे.

आपण विकत आणलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या कुत्र्यांचे लसीकरण करून घेतोच. मी याआधी घरच्या कुत्र्या मांजराचे लसीकरण करून घेतले होते पण तेव्हा मी मुंबईत होते, तिथे हे सगळे करणे सोप्पे होते. तेव्हा मला लसीकरण किती महत्वाचे आहे याचा अंदाज नव्हता. केवळ डॉक्टरांनी सांगितले म्हणून मी केलेले. स्पॉटी, कॉफी व सायाचे लसीकरण केलेले नाही. आता इथे शोधाशोध करून स्पॉटी व सायाचे करावे लागणार. हे प्राणी इतका जीव लावतात की आपल्याला ते जाताना पाहवत नाही. मी रोज स्पॉटीला 'तू कुठेही जाणार नाहीयेस आम्हाला सोडून' हे ऐकवत होते. दोन दिवसांपूर्वी तिला इतका त्रास व्हायला लागलेला की शेवटी मुलगी म्हणाली 'तिला जाऊदे, तू जाऊ देत नाहीयेस म्हणून ती अडकलीय'. पण आमची फायटर गेली नाहीच...

खूपच वाईट वाटले वाचून. ..

पण बरे झाले की तुम्ही लिहिलेत. आता खूप दिवस रेंगाळलेले स्नोई चे लसीकरण करून घेते. तो बाहेर खूपच फिरतो आता.
मांजराच्या लसींचा कोणी अनुभव / माहिती देईल का?
मी व्हेटकडे जाईनच. ईथे वाचले की जास्त connect होते.

बापरे ऐकूनच कसं तरी झाले
पावरो व्हायरस बद्दल माहिती होते त्यामुळे ओडीन च्या व्हक्सीनेशन शेड्युल मध्ये ती आहे ना याची खात्री करून घेतलेली
तो भयंकर आहे हे माहिती होतं पण असं दोन दिवसात जातात हे नाही
काय अवस्था झाली असेल तुमची विचारही करवत नाही

धनवंती, लसीकरण किती गरजेचे आहे हे समजावे म्हणून हा दुःखद प्रसंग मी लिहिला. घरच्या कुत्र्यामांजराचे करणे गरजेचे आहे, भटकी जातात ते कोणाला कळतही नाही.

आशुचॅम्प, कॉफीच्या बाबतीत आम्हाला कळलेच नाही की तो आजारी आहे. जेवण सोडले होते पण बाकी काहीच लक्षणे नव्हती. स्पॉटी तशीही खूप डोमीनेट करायची त्याला त्यामुळे तो कायम मागे मागे, गप्प असाच असायचा. तो गेला तेही कळले नाही. दोन दिवस आम्ही शोधत होतो त्याला. स्पॉटी शेजारच्या प्लॉटमध्ये सतत का जातेय हे बघायला तिच्या मागून गेलो तर झाडीमध्ये हा झोपलेला सापडला. Thatwas a big shock to me, i wanted him to come back, hoping to find him somewhere around us... that's why I was not ready to let Spot go... Thank God she survived...

Maitreyee, या दिवसात गावी खूप जण घराशेजारी भाजीपाला लावतात. कुत्री त्यात फिरून भाजी झोपवतात आणि सगळ्या मेहनतीवर पाणी ओततात. म्हणून काही लोक पावात विष घालून कुत्री मारतात. ऐकायला भयंकर वाटते पण इथे असे केलेले आहे खूप जणांनी. त्यामुळे कॉफी गेल्यावर आम्हाला वाटले त्याने असेच काही खाल्ले असावे. पण तसे नव्हते झालेले.

कॉफी बद्दल वाचुन वाईट वाटले. पण स्पॉटी ला योग्य वेळी औषध मिळाले ते चांगले झाले. आपल्या जवळ असलेल्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे खुप महत्वाचे आहे. पण गावाकडे बर्याच सुविधा नसतात प्राण्यांसाठी.

बाप रे! भयंकर वाटले वाचून. कॉफी ची बातमी वाचल्यापासून फार हळहळतेय.
खरंच तू आणि घरच्यांच्या दु:खाची कल्पना करता येत नाही.
स्पोटी आणि सायाला उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो >>> +१११

आईग्गं खरंच हे निरागस मुके जीव Sad वाईट वाटतं खरंच असं काही ऐकलं की. पण हे प्राण्यांच्या बाबतीत दुसर्‍यांदा ऐकलं जसं काही त्यांना काही कळतं की आपला शेवट जवळ आलाय. माझ्या मैत्रीणीने पण सेम असंच सांगितलं होतं की त्यांच्या पेट ने पण १-२ दिवस काही खाल्लं नाही आणि बाहेर झाडाखाली जाऊन गेला.

मांजराच्या लसींचा कोणी अनुभव / माहिती देईल का?>>>>>> इथे पेटस्मार्ट मधे रजिस्टर केले की ते डॉ. च वेळोवेळी रिमाईंडर देऊन बोलावतात इंजेक्शनस द्यायाला. किटन्स असताना जास्त वॅक्सिन होते पण नावं माहित नाहीत मला कोणती कोणती दिलीते

माझ्याकडे मांजर आणि भू भू दोघेही मस्त एकत्र राहतात, फ्कत खाताना भांडतात, यथावकाश फोटो टाकेल

MilkyBokiTan ह्य नावाचे कोरियन व्हिडिओज आहेत.एकदम मस्त काळजी घेतो तो माणूस आपल्या कुत्रामांजरांची! खूप छान आहे.मला त्या माणसाचे कौतुक वाटते.तो गातो,चित्र काढतो,घर पेट्ससाठी स्वच्छ ठेवतो(ऑफिसचे काय करतो देव जाणे) अगदी मायेने त्या मुलांकडे पहातो.

माझ्या इथे एक भटकी मांजर यायची मग मी तिला खायला घालायचो तर ती आता इथेच परसबागेत तिचे पिल्ले घेऊन बसते दिवसभर. ती पिल्ले दोनेक महिन्याची असून सगळी घाण करून ठेवतात आणि मांजरीने शिकार करून आणलेले खरकटे तसेच असते इकडे तिकडे. मला आता वैताग आलाय आणि माझा स्टाफ कानकुस करतोय ते साफ करायला. पिल्ले घेऊन जाणारी एखादी संस्था आहे का पुण्यात ? पैसे पण देईल मी जे काय असतील ते.

जिद्दु, सगळी फॅमिली पकडा, पोत्यात घाला आणि मच्छी मार्केटात सोडून या. झोपतात तेव्हा पकडा, नैतर नाही लागणार हाती. मी हा उद्योग खूप वेळा केलाय... आमच्या इथल्या सगळ्या भटक्या मांजरांना आपोआप कळते की यांच्याकडे आव जाव घर तुम्हारा है, हक्क असल्यासारख्या पोरे घेऊन येतात आणि घरभर पसरून बसतात. आमच्या घरात आम्हाला सोफे व खुर्च्यांवर बसणे कठीण होते, मांजरी आणि पिल्ले अडवून बसतात सोफा व खुर्च्या...

साधना, तो जरा जालीम आणि शेवटचा उपाय झाला. सगळीकडे भटकी कुत्री असतात आणि ती पिल्ले सोडून आल्यावर मन खात राहील मला काय झालं असेल त्यांचे हा विचार करत. पाहतो काही इलाज भेटला तर नाहीतरी जुनमध्ये बदली झाल्यावर मलाच इथून हलायचं आहे.

अहो काहीही जालीम नाहीये, मच्छी मार्केटात लगेच रमतात. आम्ही तर नंतर भेटायला पण गेलो होतो, एका पिल्लाने ओळख दाखवली व जवळ आले, बाकीच्यांनी आमच्याकडे तू क टाकले.

>> अहो काहीही जालीम नाहीये, मच्छी मार्केटात लगेच रमतात. आम्ही तर नंतर भेटायला पण गेलो होतो, एका पिल्लाने ओळख दाखवली व जवळ आले, बाकीच्यांनी आमच्याकडे तू क टाकले.>> Rofl

साधना, कॉफीबद्दल वाचून वाईट वाटले.
माझ्या मुलीने आणि तिच्या दोन रुममेट्सने एक मांजर आणली आहे शेल्टरमधून. आता फोनवर तिचंच कौतुक असतं. आल्यानंतर एकाच आठवड्यात तिच्या पायाला कसंल्सं इन्फेक्शन होऊन सर्जरीही करावी लागली.

मुलाने आज ओडीन ची मजा केली भारी
तो आणि ओडीन घरी असताना एकटे त्याने गुगल वर माझ्या फोन ची रिंगटोन शोधली आणि ती वाजवली
ती ऐकताच ओडीन ला वाटलं मी आलो घरी
आणि लगेच सगळीकडे शोधायला लागला खोल्यात
त्यांनी किती गोष्टी आपल्याशी लिंक करून डोकयात ठेवलेल्या असतात याची गंमत वाटली

कॉफी Sad

इतर बाळांबद्दल वाचून खुप मजा आली.

बाकी या चतुष्पाद बाळांना बाबा आणि दादा लोक जास्तच आवडतात का ? आमच्या घरी स्नोई चे खाणे, पिणे, स्वच्छता, रात्रीची जागरण, आजारपण, युद्धातल्या जखमा इ. इ. मी निस्तरायचे...
आणि हा हिरो लाडात जाऊन बसतो माझ्या नवर्‍याच्या मांडीवर किंवा मुलाच्या कुशीत. .. मी आणि मुलीने किती लाडाने जवळ घेतले तर जोरदार निषेध व्यक्त करतो. .

कोतबो धागा काढू काय? ?? विचारात पडलेली बाहुली Happy

कुत्री मांजरे लळा लावतात हे अनुभवाने कळले होते पण इतर भावनाही त्यांना असतात हे इथले वरचे अनुभव वाचून व घरचे अनुभवून कळले.

आमची स्पॉटी आधीपासूनच डोमीनेट करणारी आणी कॉफी सहन करणारा. स्पॉटीचा स्वभाव एकदम जळकट. इतरांना जवळ करू नका, मलाच बघा हा आग्रह. मी बाहेरून आल्यावर आधी तिचे लाड करायला हवे हा तिचा आग्रह असायचा. कॉफीने मला आधी बघितले व मी कॉफीचे लाड केले तर ती पुढे सरून त्याला दूर ढकलून माझे लाड कर म्हणून माझ्या मागे लागायची. मी दुर्लक्ष केले तर कॉफीला खाली पाडून चावायची पण अशावेळी नजर मात्र माझ्याकडे असायची. जणू मला सांगायची, बघ तुझ्यामुळे मला याला मारावे लागतेय.

आता कॉफी नाही तर तिने सायाकडे लक्ष वळवलेय.
तेव्हा कॉफीचे लाड करायला दयायची नाही, आता सायाचे लाड केले की हिचे डोके फिरते.
साया घरात फिरते तर हिचाही हट्ट की मी घरात बसणार, सोफ्यावर झोपणार. काल दिवसभर माझ्या मांडीवर चढून बसत होती. शेवटी माझ्या अंगाला तिचा वास यायला लागला. Sad तिला दुरही लोटवत नाही आणि दिवसभर घरात बसू देणेही जमत नाही. बाहेर जा म्हटले की सरळ जमिनीवर लोळण घेणार. जबरदस्ती बाहेर घालवले की असे करुण डोळे करून बघते की ये बाई आत ये म्हणावे लागते.

बाहेर गाई म्हशी आल्या की स्वतःचे डोके फिरवून घेते. आज दुपारी शेजारच्या प्लॉटमध्ये म्हशी चरत होत्या तर हिने भुंकून घर डोक्यावर घेतले. नंतर गेटवर जाऊन भुंकत राहिली. राजकुमार रावच्या स्त्री मध्ये जसे ओ स्त्री कल आणा लिहिलेले असते तसे हि गेटवर उभे राहून ओ भैन्स, फिर मत आना कोकलत होती असेच मला वाटायला लागले.

Pages