फुटाण्याच्या डाळ्या ची चटणी

Submitted by अमुपरी on 4 March, 2021 - 05:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फुटाण्याची डाळ पाव किलो
सुक्के खोबरे 150 grm
मिरी 15 मिरी चे दाणे
तिखट 4 चमचे मीडियम आकाराचा पोहे खायचा चमचा
हिंग 2 चमचे
तुप पाव वाटी
गुळ 1 छोट्या लिंबाच्या आकाराचा खडा
चिंच गुळ प्रमाणापेक्षा थोडी कमी
मिठ चवी प्रमाणे साधारण 1 चमचा

क्रमवार पाककृती: 

प्रथम फुटाण्या ची डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटुन पुड करुन घ्यावी.
2 चमचे तुप तव्या वर घेउन त्या वर मिरी भाजावी.
नंतर मिरी काढून तुपावर सुक्या खोबर्याच्या कातळ्या करुन खरपूस सोनेरी रंग येई पर्यंत भाजाव्यात.
म gas फ्लेम बंद करुन त्याच तापलेल्या तुपा वर हिंग भाजावा म थोडा तवा गार झाल्यावर त्यावरच म तिखट टाकावे आणी परतावे.
त्यानंतर खोबरे, मिरी, हिंग ,तिखट ,गुळ चिंच,मिठ मिक्सर ला वाटुन घ्यावे.
व हे मिश्रण डाळीच्या पुडी मध्ये टाकावे.
म नंतर हे दोन्ही एकत्र करुन परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
त्यानंतर हे सगळे एका भांड्यात काढून त्यामध्ये उरलेले तुप हाताने मिक्स करावे.

अधिक टिपा: 

ब्रेड भाजुन त्याचा टोस्ट करुन त्यावर ही चटणी लावुन वरुन थोडे तुप घालुन त्याच्या वर बारीक चिरलेला कांदा घालुन मस्त लागते.
चपाती वर ही लावुन रोल करुन खायला छान लागते.
गरम गरम भात तुप आणी ही चटणी मिक्स करुन ही भारी लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

वाळलेला कढीपत्ताही डाळीबरोबर मिस्करमध्ये फिरवावे

Photo द्या म्हणजे सर्वांना समजेल

ओह अस्सं.. भाजक्या चण्याची डाळ म्हणजे फुटाणे.. छान वाटली रेसिपी.. करुन ठेवुन वापरायला मस्तय.. Happy

धन्यवाद BLACKCAT.. Happy
मी चांगला फोटो टाकेन डाळ्याचा लवकर.
तुमचे ही suggestion चांगले आहे मी नेक्स्ट टाईम कढीपत्ता घालुन करुन बघेन.

20210304_184923.jpg

<<<कराडच्या वर्ल्ड फेमस बॉम्बे रेस्टॉरंटमध्ये आंबोळी बरोबर देतात ही चटणी.... त्यात थोडा लसूणही असतो परतून! >>>
काय आठवण करून दिलीत हो..
आत्ताच पळत पळत जावेसे वाटते आहे.

चटणी नक्की करून बघणार आहे. मस्त रेसिपी

मी तिकडे कधी आंबोळी नाही खाली. पण ही चटणी आम्ही पण साधा डोसा,लोणी डोसा वर वरती बटर लावुन त्याच्यावर टाकतो. मस्त लागते.
धन्यवाद धनवन्ती नक्की करुन बघा.

छान पाकृ, मी पण नेहमी करते पण थोडी वेगळी. मिरे, हिंग न घालता लसूण घेते आणि गूळ ऐवजी साखर, आता अशी करून बघेन.

कराडच्या बॉम्बे रेस्टॉरंटमध्ये आंबोळी बरोबर देतात ही चटणी >>> मला पण असच वाटायचं पण इथेच कुठेतरी मागे वाचलेलं की ते वेस्वार असतं.
आठवण झाली त्या आंबोळीची.

धन्यवाद अमूपरी आणि सामो. मी त्यात सुहानाची बॅडगी मिरची पावडर घातली आहे. रंग छान येतो आणि जास्त तिखट नसते.

आंध्रा मध्ये गन पावडर म्हणतात ती हीच का? फार भारी असते. सोपी पण आहे. ही एक चमचा दही किंवा एक चमचा तूप मध्ये भिजवून पण छान लागते. ताजी इडली केल्यावर अगदी गरम असतानाच ही चटणी भुरभुरायची आणी वरून एक चमचा साजूक तूप घालायचे. एकदम अप्रतिम लागते. आणी तिन्ही बाबी घरीच बनवून खा. बाहेरची तशी छान लागत नाही.
मुलांना बटन इडली पण बनवता येइल.

नाही अमा ही गन पावडर नाही. गन पावडर मध्ये चणा डाळ आणी उडीद डाळ वापरतात.
यामध्ये फक्त फुटाण्या चे डाळे वापरतात. म्हणजे
roasted चणा डाळ जी आपण नुसती ही तशीच खाऊ शकतो. एकदम खुसखुशीत असते ती.
ही चटणी इडली डोश्या बरोबर मस्त लागते.
ही गन पावडर ची बहिण भाऊ असावी.

मस्तच रेसिपी.

कढीलिंबाची वाळलेल्या पानांची सुकी चटणी करायला मी हेच डाळं वापरते.

फुटाणे म्हणजे साखरफुटाणे असं माहीती असल्याने बरेच जण कन्फ्युजड झाले असतील. आम्ही डाळं म्हणतो.

धनवंती मस्त फोटो. अमुपरी ब्रेडवर लावलेला फोटोही मस्त.

Pages