पुदीना चटणी

Submitted by अश्विनि-काजरेकर on 21 April, 2015 - 07:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
१/२ कप पुदीना पाने
१/२ कप कोथिंबीर
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
२ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून साखर

क्रमवार पाककृती: 

सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास २ ते ३ टेस्पून पाणी घालून वाटून घ्यावे.

हि चविष्ट चटणी व्हेज. सॅंडविच, मटार खस्ता कचोरी, सोया कटलेट्स, मेथीच्या देठाची भजी, ब्रेड रोल, मटार बटाटा करंजी, पट्टी समोसा, ढोकळा आणि इतर मधल्या वेळच्या पदार्थांसोबत छानच लागते.

अधिक टिपा: 

टीप:
१) आंबट चवीकरीता लिंबाऐवजी आपण अनारदाना किंवा चिंचेचे पाणी वापरू शकतो, पण लिंबाची चव जास्त चांगली लागते तसेच लिंबू दैनंदिन वापरासाठी बहुतेकवेळा स्वयंपाकघरात असतेच.
२) कांदा घातल्याने चटणीला छान स्वाद येतोच तसेच चटणीला दाटपणा येतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users