शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. चाकरी करणारा (३, रे) ......कामारे

२. बंदुकीचा भडिमार (४)
३. वागणूक (५, स)

४. उबदार कापड (४).........सकलाद
५. माफ करा हो (५, र)
६. आता दिवे लावायची वेळ झाली (५)

७. गावाकडील घर (४, ल)....... खपरेल

८. त्याचा ‘अहं’ तो किती असावा ! (६) ---- लब्धप्रतिष्ठीत
९. संबंध (३, क्र १ चे पहिले)............तटका

6 रजनीमुख होय !
......................
२. बंदुकीचा भडिमार (४) – रे * * *

३. वागणूक (५, स)

५. माफ करा हो (५, र) दर * दर

दरगुदर (फारसी उ)
छान.
.....................
२. बंदुकीचा भडिमार (४) – रे * * *

३. वागणूक (५, स)

३. वागणूक (५, स) --- नम्रसालस सभ्यसालस रूक्षनीरस शुष्कनीरस
धुसफुस, भसभस अशा कृती हव्यात?

झालाय? .... मग आठवत का नाही?

२. बंदुकीचा भडिमार (४) – रे * * * रेलछर्रा
रेल - पुष्कळ (रेलचेलपैकी) + छर्रा -- छोटी गोळी

Happy रेलछर्रा असेच वॉर्निंग बेल झाल्यावरचे खरडणे ..... नसणार याचा अंदाज होता.
हे मशीनगन स्टेनगन मॅगेझिन एन्काउंटर --- यापैकी कशाचा मराठी शब्द आहे का?

२. बंदुकीचा भडिमार (४) – रे * * * रेकमारा रेकमारी
रेक (अतिरेकमधला)
स्त्री. चंगळ; विपुलता; रेट; रेलचेल.
दाते शब्दकोश

रे * * री असे हवे.
पण ** मारी नाहीये?
मग रे?खोरी // रे?फैरी // रे?गिरी // रे?करी // रे?जिरी

रेन्दा?री आहे का?
रेन्दा = चिखल गढूळ ( इथे रक्तमांसाचा)

२. बंदुकीचा भडिमार (४) – रेजगिरी
३. वागणूक (५, स) …..रीतरवेस
...............................
सर्वांचे छान प्रयत्न.
धन्यवाद !

तुमच्यामुळे कोश चाळायची सवय लागली त्याबद्दल धन्यवाद. खपरेल त्यात पाहिला होता पण का सांगितला नाही ते आठवत नाही.
बरेचसे शब्द पहिल्यांदाच ऐकलेले असतात इथे.

सर्वांच्या सक्रिय सहभागाने मजा आली.
पुनश्च धन्यवाद.
सियोना,
तुमच्या सदस्य नावाचा काही विशेष अर्थ आहे का ? कुतूहल आहे.

Pages