शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेलिगेशनचे वर्गीकरण बघून थक्क झाले. विस्तृत प्रतिक्रिया आवडली.

पण मजा आली, एकूण. कोडे कमी वाचले जास्त. >>>
मलाही Happy
आभार कारवी.

असंही खेळून झाले होते. कुणाला आवडलं तर घेऊन वाचता येईल म्हणून दिला. >>>>
हो ते झालच. मला म्हणायचं होते की जर त्यातलेच अजून कोडे देणार तर नाव इतक्यात नको द्यायला.
हे पुस्तक नवीन असेल तर नेटवर नसेल. द्या तुम्ही वराहमिहीर कोडे. आवडेल पाणी शोधायला.
पोळांचे पुस्तक शोधले गुगलवर. राजकारण्यांनी उद्घाटन केले वाचल्यावर पुढे नाही पाहिले. नंतर पाहीन.

देवांचे महागुरू/ गुरू म्हणजे ऋत्विक! >>>
हो, का? हे नव्हते माहिती. ते आजोबा अभ्यासक असतील. जुन्या लोकांचा खूप व्यासंग असतो.
आमची धाव नेटपर्यंत. असेलही हा अर्थ. एकाच शब्दाचे संदर्भाने अर्थ बदलतात.

शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• पहिली दोन उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
…………………………………………………………
१. चाकरी करणारा (३, रे) ......कामारे

२. बंदुकीचा भडिमार (४)
३. वागणूक (५, स)

४. उबदार कापड (४).........सकलाद
५. माफ करा हो (५, र)
६. आता दिवे लावायची वेळ झाली (५)

७. गावाकडील घर (४, ल)

८. त्याचा ‘अहं’ तो किती असावा ! (६) ---- लब्धप्रतिष्ठीत
९. संबंध (३, क्र १ चे पहिले)............तटका
..............................

सॉरी, मी नेहमी नियम मोडते .... जो सुचलाय तो लिहीते.
८. त्याचा ‘अहं’ तो किती असावा ! (६) ---- लब्धप्रतिष्ठीत

९. संबंध (३, क्र १ चे पहिले) >>>>
उर्दूतील ताल्लूक सुचतोय..... याचे त वरून होणारे काही अपभ्रंश रूप?
नंतर येते...

9 तटका बरोबर !

चला, ८,९ पासून सुरु झाली अंताक्षरी...
आता १ सोपे जावे

४. उबदार कापड (४) --- सणगरशी संबंधित काही आहे का? सणगर धनगर कांबळी वगैरे विणतात.
सणगरे / सणगरी असे काही?

५. माफ करा हो (५, र) ---- कसूरवार / कुसूरवार

क नाही.
अजून एकदा बघा.
मग सांगतो !

सकलाद

देवकी, दोन्ही नाही.

७. ग्रामीण घराशी संबंधित एक प्रसिद्ध सुश्राव्य गीत आहे. त्याची पहिली ओळ आठवल्यास मदत होईल.

५. माफ करा हो (५, र) -- दयासागर >> नाही.
क्षमा, कानाडोळा या अर्थी बघा.

Pages