शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचे कोडे
हा स्त्रीशिक्षणाविषयी एका पुस्तकातील उतारा रोचक वाटल्याने इथे देत आहे. थोडे बदल केलेले आहेत. या तारांकित जागेतील शब्दाचे तिसरे अक्षर खाली सरमिसळ करून दिलेले आहे. काही नवीन शब्द आहेत. काही नेहमीचे.

या *******( ७) काळात स्त्रियांना शिकण्याची पद्धत आणि ****(४) होती. ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे ***(३) अनेक ठिकाणी आढळतात.

****(४) शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ऋषिका आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना *****(५) म्हटले जायचे. ****(४) अशा स्त्रियांची नावेच दिलेली आहेत - रोमासा , लोपामुद्रा, अपला, कद्रु, घोष,जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी,जरिता, श्रद्धा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, अशी तेवीस नावं दिलेली आहेत.

पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या ******(६) लिहून ठेवलयं. मुलींकरिता *****(५) होती. त्यासाठी पाणिनीने ****(४) हा शब्द वापरलायं. *****(५) काळात गार्गी आणि मैत्रेयी या ****(४) उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या ****(४) स्त्रीशिक्षणाचे प्रमाण चांगले होते. 

शिक्षकांची व गुरूंची मोठी परंपरा होती, जी *******(७) चालत आलेली होती. आचार्य/****(४)/***(३)/गुरू/ यौजनासातिका/शिक्षक अशा वेगवेगळ्या ***(३) गुरूंसाठी होत्या.

******(६) शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचा मोठा ***(३) असायचा. ****(४) सोहळ्याला ******(६) आणि सत्र समापन सोहळ्याला *** (३) म्हटले जायचे. उपाधी ***(३) सोहळ्याला समवर्तना म्हणायचे. सुट्ट्यांसाठी ****(४) शब्द वापरला जायचा. ते सुट्ट्यांचे प्रमुख दिवस म्हणजे महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.

र्हस्व दीर्घ व अक्षर संख्या योग्य व पुरेशी आहे. प्रत्येक अक्षर एकदाच वापरावे. अक्षरसंख्या तीच ठेवून योग्य व्याकरणासाठी काही ठिकाणी ( यात/त्यात/मुळे/पूर्वी)वापरावे लागेल.

क ध्या पी
व रं क
र्ग न ध्या
म प ख
भि वा दा
णा ति शा
नि षीं ता
का ध्या

चुभूद्याघ्या.

सखे अस्मिते,हे काय बरे योजिले आहेस तू! नूतन varsharambhee असे क्लिष्ट कोडे घातलेस की मी तर बाई येथून निघून जावे की काय असा विचार करीत आहे.

नाही गं जाऊ नको , किल्ली माग देईन. कारवी यांनी सोमवार पर्यंत चालेल असे हवे म्हटल्याने मी वहावत गेले वाटतं Happy
स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका मंडळी !

या बया ! ..... मी अशिक्षित आहे असे जाहीर करू काय?
पण मजा येईल सोडवायला आणि मूळ उतारा वाचायला....
नावे मस्त आहेत........नावे सुचवा धाग्यांवर लिहायला झकास आहेत.

सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, वागंभ्रिनी अशी नावे सुचवली तिथे तर लोक कोपऱ्यापासून नमस्कार करणारी इमोजी टाकतील.

या शालिवाहनपूर्व ( ७) काळात स्त्रियांना शिकण्याची पद्धत आणि परंपरा (४) होती. ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे आयाम (३) अनेक ठिकाणी आढळतात.

अष्टाध्यायी (४) शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ऋषिका आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ब्रह्मवादिनी (५) म्हटले जायचे. दार्शनिक (४) अशा स्त्रियांची नावेच दिलेली आहेत - रोमासा , लोपामुद्रा, अपला, कद्रु, घोष,जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी,जरिता, श्रद्धा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, अशी तेवीस नावं दिलेली आहेत.

पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणाबाबत (६) लिहून ठेवलयं. मुलींकरिता वसतिगृहे (५) होती. त्यासाठी पाणिनीने पाठशाला (४) हा शब्द वापरलायं. वैदिकपूर्व (५) काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदु षींचा (४) उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात (४) स्त्रीशिक्षणाचे प्रमाण चांगले होते. शिक्षकांची व गुरूंची मोठी परंपरा होती, जी शतकानुशतके(७) चालत आलेली होती. आचार्य/विद्यादाता (४)/शिक्षक(३)/गुरू/ यौजनासातिका/शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाध्या (३) गुरूंसाठी होत्या.

**** वासी (६) शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचा मोठा उत्सव ३) असायचा. प्रारंभिक (४) सोहळ्याला ***पूजन (६) आणि सत्र समापन सोहळ्याला सांगता (३) म्हटले जायचे. उपाधी प्रदान(३) सोहळ्याला समवर्तना म्हणायचे.

सुट्ट्यांसाठी अनध्याय(४) शब्द वापरला जायचा. ते सुट्ट्यांचे प्रमुख दिवस म्हणजे महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.

खूप छान जमलयं कुमारसर.
अनध्याय आणि ब्रह्मवादिनी तर सिक्सर !
(पाठशाला जरा फसवा आहे, शाला आहे पण पाठ नाही. )

अनध्याय >>>
खूप गोड शब्द आहे. आवडला !

या # यज्ञमखप्रचुर/यज्ञमखबहुल (श्रुतिशास्त्रसंपन्न /मौखिक-परंपरा) ( ७) काळात स्त्रियांना शिकण्याची पद्धत आणि परंपरा (४) होती. ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख (३) अनेक ठिकाणी आढळतात.

प्रारंभिक (४) शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ऋषिका आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ब्रह्मवादिनी (५) म्हटले जायचे. ऋग्वेदात (४) अशा स्त्रियांची नावेच दिलेली आहेत - रोमासा , लोपामुद्रा, अपला, कद्रु, घोष,जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी,जरिता, श्रद्धा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, अशी तेवीस नावं दिलेली आहेत.

पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणाविषयी (६) लिहून ठेवलयं. मुलींकरिता वसतिगृहे (निवासीशाळा / आश्रमशाळा?) (५) होती. त्यासाठी पाणिनीने छत्रीशाला (४) हा शब्द वापरलायं. उपनिषद (५) काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा (४) उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात (४) स्त्रीशिक्षणाचे प्रमाण चांगले होते.

शिक्षकांची व गुरूंची मोठी परंपरा होती, जी शतकानुशतके (७) चालत आलेली होती. आचार्य/उपाध्याय(४)/ ऋत्विक(३)/गुरू/ यौजनासातिका/शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाधी (३) गुरूंसाठी होत्या.

# ज्ञानपीठांमध्ये (गुरूकुलांमध्ये / वेदशालांमध्ये) (६) शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचा मोठा उत्सव (३) असायचा. सत्रारंभ (४) सोहळ्याला उपाकर्मविधी ( #उपाकरणम) (६) आणि सत्र समापन सोहळ्याला #विसर्ग (३) म्हटले जायचे. उपाधी प्रदान (३) सोहळ्याला समवर्तना म्हणायचे. सुट्ट्यांसाठी अनध्याय (४) शब्द वापरला जायचा. ते सुट्ट्यांचे प्रमुख दिवस म्हणजे महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.

सगळी अक्षरे मारूनमुटकून का होईना, जुळली
क ध्या पी व रं क
र्ग न ध्या म प ख
भि वा दा णा ति शा
नि षीं ता का ध्या

# इथे शेंड्या लावल्यात, खात्री नाही --
यज्ञमखप्रचुर/यज्ञमखबहुल ---- ऋग्वेदाचा काळ म्हणून + म संपवण्यासाठी घेतले
ज्ञानपीठांमध्ये ---- पी जुळवण्यासाठी
उपाकरणम --- उपाकरण इतकाच शब्द आहे, जबरदस्तीने ६अक्षरी केलाय
विसर्ग --- बॅचला / मुलांना मोठ्या संख्येने घरी सोडणे या अर्थी ( धरणतून पाण्याचा विसर्ग वाचलेय)

@ अस्मिता, छान होते कोडे. कठीणही. कोश वापरावा लागला. काही शब्द तिसरे अक्षर दिल्यानेच आले, नाहीतर नसते आले.

कारवी,
छान !
यज्ञमखप्रचुर/यज्ञमखबहुल >>> भारी

स्वागत, रानभुली....... या, कोडे सोडवा अस्मितांचे. त्या उत्तर लिहीतील सायंकाळी / रात्री.
आणि येत जा वेळ मिळेल तेव्हा.

या *******( ७) काळात स्त्रियांना शिकण्याची पद्धत आणि ****(४) होती. ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख(३) अनेक ठिकाणी आढळतात.

प्राथमिक्/प्रारंभिक(४) शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ऋषिका आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना *****(५) म्हटले जायचे. पुराणात(४) अशा स्त्रियांची नावेच दिलेली आहेत - रोमासा , लोपामुद्रा, अपला, कद्रु, घोष,जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी,जरिता, श्रद्धा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, अशी तेवीस नावं दिलेली आहेत.

पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या ******(६) लिहून ठेवलयं. मुलींकरिता *****(५) होती. त्यासाठी पाणिनीने ****(४) हा शब्द वापरलायं. *****(५) काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा(४) उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या समाजात (४) स्त्रीशिक्षणाचे प्रमाण चांगले होते.

शिक्षकांची व गुरूंची मोठी परंपरा होती, जी आनुवंशिकरित्या/परंपरागत(७)चालत आलेली होती. आचार्य/****(४)/***(३)/गुरू/ यौजनासातिका/शिक्षक अशा वेगवेगळ्या पदव्या(३) गुरूंसाठी होत्या.

******(६) शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचा मोठा सोहळा(३) असायचा. ****(४) सोहळ्याला ******(६) आणि सत्र समापन सोहळ्याला *** (३) म्हटले जायचे. उपाधीप्रदान(३) सोहळ्याला समवर्तना म्हणायचे. सुट्ट्यांसाठी ****(४) शब्द वापरला जायचा. ते सुट्ट्यांचे प्रमुख दिवस म्हणजे महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.

कारवी सुंदर सोडवलेत. बरेच शब्द बरोबर आहेत.
देवकी खूप छान.
देऊन टाकू का मूळ उतारा ?? .
कोणी राहिलयं का...

*** भारतीय ज्ञानाचा खजिना , लेखक प्रशांत पोळ *****

या आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांना शिकण्याची पद्धत आणि परंपरा होती. ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.

प्रारंभिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ऋषिका' आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ब्रह्मवादिनी' म्हटले जायचे. ऋग्वेदात अशा स्त्रियांची नावेच दिलेली आहेत - रोमासा , लोपामुद्रा, अपला, कद्रु, घोष,जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी,जरिता, श्रद्धा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना, अशी तेवीस नावं दिलेली आहेत.

पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणासंबंधी लिहून ठेवलयं. मुलींकरिता वसतिगृह होती. त्यासाठी पाणिनीने 'छत्रीशाळा' हा शब्द वापरलायं. उपनिषद काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण चांगले होते. 

शिक्षकांची व गुरूंची मोठी परंपरा होती, जी शतकानुशतकं चालत आलेली होती. आचार्य/उपाध्याय/चरक/गुरू/ यौजनासातिका/शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाध्या गुरूंसाठी होत्या.

विद्यापीठांमध्ये शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचा मोठा उत्सव असायचा. सत्रारंभ सोहळ्याला 'उपकर्णमन' आणि सत्र समापन सोहळ्याला 'उत्सर्ग' म्हटले जायचे. उपाधी प्रदान सोहळ्याला 'समवर्तना' म्हणायचे. सुट्ट्यांसाठी 'अनध्याय' शब्द वापरला जायचा. ते सुट्ट्यांचे प्रमुख दिवस म्हणजे महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.

---------
सर्वांचे आभार.

छान, मजा आली.
काही प्राचीन शब्द समजले.

ऋत्विक म्हणजे सुद्धा शिक्षक का , कारवी . मुळ उताऱ्यात चरक आहे.

#उपाकर्णमन - उपाकरणम

शेंडी खूप जवळपास गेली Happy

या पुस्तकात वराहमिहिरांनी लिहिलेल्या ब्रुहतसंहितेवर एक रोचक उतारा आहे तो पुढच्यावेळी देईन.
(जमिनीतील पाणी शोधणे विषयीची निरिक्षणे. )

@अस्मिता --- Happy तुम्ही किती साध्या आहात हो. पुस्तकाचा + उतार्‍याचा नावपत्ता काय देता? नेटवर असेल तर ctrlF करून उत्तरे नाही का दिसणार? तुम्हाला मुलांच्या नावडत्या भाज्या तरी लपवून घालता येतात का?

ऋत्विक म्हणजे सुद्धा शिक्षक का >>>>>
माहिती नाही, म्हणजे तसा संदर्भ नाही मिळाला.
मी उतार्‍यातल्या पाणिनी, ऋग्वेद, स्त्रीशिक्षण या तीन क्ल्यूवरून गेले.
काही शब्द माहिती होते. काही शोधले. ३र्‍या अक्षरावरून पक्के केले.

ऋग्वेद हा मुख्यत्वे यज्ञ हवन याच्याशी निगडीत आहे. यज्ञात ४ मुख्य ब्राह्मण असतात, ४ वेदांचे प्रतिनिधी. होतृ, अध्वर्यु, उद्गाता वगैरे. त्यांचे प्रत्येकी ३ असिस्टंट. असे एकूण १६ पदे / डेसिग्नेशन्सची नावे आहेत. त्यांची एकत्र umbrella term ऋत्विज/क.
मंत्र ऋचा शिकण्याबरोबरच यज्ञ साहित्य, हवन कृती, त्या कृतींचा क्रम, अर्थ शिकवणारे कोणी असतीलच ना. आताचे ट्यूटर, लॅब असिस्टंट असतात तसे.... म्हणून ऋत्विक लिहीले. तेव्हा क, म अशी एकदोनच अक्षरे शिल्लक होती.

याज्ञिक, याजक असेही शब्द सापडले. पण ते साहित्य जमा करणारे, प्रत्यक्ष बसून हवन फक्त execute करणारे -- याअर्थी होते. ते या क्षेत्रातील ज्येष्ठ माहितगार, अधिकारी / ज्ञानदान करण्यास सक्षम = highest authority in the field असे नसणार. म्हणून ऋत्विक फायनल केले.
चरक काय आहे ते बघावे लागेल. यौजनासातिकाही नाही सापडले.

उपाकरण, उपाकर्म = वेदाध्ययनाचा आरंभ करतानाचे कर्म -- हे कोशात आहे.
उपाकरणचे जुने संस्कृत रूप उपाकरणम् असू शकेल.
किंवा उपाकर्णनम् ( वर्णन करणे क्रियेचे नाम वर्णनम् असते तसे) असेल. उपाकर्णमन त्याचा अपभ्रंश / टायपो.

पण मजा आली, एकूण. कोडे कमी वाचले जास्त.

ऋत्विक म्हणजे सुद्धा शिक्षक का ,......... देवांचे महागुरू/ गुरू म्हणजे ऋत्विक!
सिंहगडावर एका आजोबांनी सांगितलेला अर्थ!

हे नेटवर नसेल असं वाटलेलं Happy . सगळचं असत नं , जाऊ दे पुढील वेळी .
पुस्तकाचा + उतार्‍याचा नावपत्ता काय देता? >>>
असंही खेळून झाले होते. कुणाला आवडलं तर घेऊन वाचता येईल म्हणून दिला. लोकांनी खरीखुरी (इ बुक नाही) मराठी पुस्तक वाचावीत असं उगाच वाटतं. Happy

वराहमिहिराचा मात्र घात झाला गडबडीत....

तुम्हाला मुलांच्या नावडत्या भाज्या तरी लपवून घालता येतात का?....>>> सांगून पराठे करते. Lol
********
ऋत्विक म्हणजे सुद्धा शिक्षक का ,......... देवांचे महागुरू/ गुरू म्हणजे ऋत्विक!
सिंहगडावर एका आजोबांनी सांगितलेला अर्थ!...>>>
मस्तच , रोचक प्रतिसाद.
आभार देवकी. Happy

Pages