केरला स्टाईल टोमॅटो करी

Submitted by Shreya_11 on 28 December, 2020 - 12:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ ते ४ टोमॅटो , मध्यम आकाराचा कांदा , १ चमचा धने जिरे पूड , १ चमचा लाल तिखट , २ हिरव्या मिरच्या , कडीपत्ता ,कोथिंबीर , लसूण , १ वाटी ओले खोबरे , जिरे , मोहरी ,तेल , गूळ (मला या भाजीत गूळ आवडतो म्हणून घातला आहे , नाही घातला तरी चालेल ) .

क्रमवार पाककृती: 

एका केरळी मैत्रिणीकडे खाल्ली होती .. खूपच आवडली , अगदी झटपट होणारी आहे .

पहिल्यांदा ओले खोबरे आणि १ चमचा जिरे एकत्र करून बारीक वाटण करून घ्या . टोमॅटो च्या थोड्या मोठया फोडी करा . कांदा चौकोनी चिरून घ्या पण तोही खूप बारीक नको . मिरची , लसूण एकत्र बारीक ठेचून घेतला तरी चालेल किंवा कापून घ्या .

फोडणीसाठी ४ चमचे तेल घ्या . गरम झाले कि त्यात जिरे ,मोहरी ,लसूण , कडीपत्ता घाला . चांगलं भाजलं कि कांदा घाला . तोही लालसर भाजला कि त्यात धने जिरे पूड , लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा . चिरलेले टोमॅटो घाला . टोमॅटो चांगला परतून घ्या . वाटीभर पाणी घालून झाकून ठेवा . २ ते ३ मिनिटे चांगले शिजल्यावर खोबऱ्याचे वाटण घालून चवीप्रमाणे मीठ घाला आणि गूळ टाका. घट्ट वाटत असेल तर अजून थोडे पाणी घाला . चांगली उकळी काढा . कोथिंबीर टाका . गरमागरम करी पोळी , भात दोन्ही सोबत खूपच मस्त लागते .

image_50770177.JPGimage_72192707 (2).JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

शक्यतो काश्मिरी लाल मिरची पावडर वापरा , खोबऱ्याच्या वाटणामुळे भाजीला पांढरट कलर येतो .

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान रेसिपी! करून पहाणार. ही बेसिक करी तशीच ठेवून यात कदाचित इतर भाज्या घालून पण छान लागेल असे वाटते.

धन्यवाद तेजो , Amupari , maitreyee , मनिम्याऊ

@ maitreyee .. मीही बाकी भाज्या घालून केली आहे छानच लागतात . पण टोमॅटो जसा एकजीव होतो तश्या बाकी भाज्या नाहीत होत .

मस्त रेसिपी. काल वाचली आणि आज केली. ( असे दुर्मीळ प्रसंग असतात पण ही रेसिपी खरंच सोपी आहे)
घडीच्या पोळीबरोबर आणि गरम भाताबरोबर मस्त लागली. एकच व्हेरीएशन म्हणजे थोडा टेक्श्चर साठी नारळ घातला पण उरलेलं नारळाचं दुध घातलं ( उघडलेला बॉक्स 4 दिवसात संपवायला हवा होता म्हणुन फक्त)

मी माबो फक्त मोबाईल फोनवर वाचते. इथुन मला अजूनही फोटो टाकता येत नाहीत. Insert option नाहीच आहे. माझ्या भाजीचा रंग फारच टेम्पटिंग होता ( नंदुरबारची 'रसगुल्ला' मिर्ची पावडर. तिखट नसते, पण रंग मात्र फारच मस्त येतो)

Thank you मंजूताई , जाई , वावे , मीरा

@ मीरा .. अरे वा हे नारळाच्या दुधाचं व्हेरीएशन छान वाटतंय .. मी पण बघेन करून . मी हि मोबाईल वरून टाकते कधी कधी .. मला दिसतोय इन्सर्ट चा ऑपशन

image_6487327.JPG

मी हि मोबाईल वरून टाकते कधी कधी .. मला दिसतोय इन्सर्ट चा ऑपशन >>> श्रेया, मला फक्त अपलोड, थम्बनेल्स आणि डिलीट हेच तीन ऑप्शन दिसतात. पुढचा इन्सर्ट फाईल ऑप्शन नाहीच.

धन्यवाद मृणाल !

मीरा तुम्ही लॅपटॉप किंवा ipad वर ट्राय केलेत का ?