Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डबल रोलचं कारण तर अजिबात कळलं
डबल रोलचं कारण तर अजिबात कळलं नाही.
आपला माणूस ची हवा खूप केली
आपला माणूस ची हवा खूप केली होती त्यावेळेस . नाना पाटेकर तर प्रत्येक रिऍलिटी शो मध्ये गेला होता पिक्चर प्रमोट करायला.
त्यामानाने एवढा खास वाटला नाही.
डबल रोल चे प्रयोजन कळले नाही.
मराठी नाटक काटकोन त्रिकोण ज्यात मोहन आगाशे, केतकी थत्ते आणि अजून कुणीतरी त्यावरून हा सिनेमा काढला आहे असे वाचल्याचे आठवते.
वरची चर्चा वाचून मला पटकन
वरची चर्चा वाचून मला पटकन वाटले मी कोथिंबीर वडीचा डब्बा उघडला की काय
काल एक हॉरर मल्याळम सिनेमा
काल एक हॉरर मल्याळम सिनेमा पाहीला नीली.(हिंदी डब-झी एक्शनला)
कुणी पाहिलाय का? नीट कळला नाही मल
डबल रोलचं कारण तर अजिबात कळलं
डबल रोलचं कारण तर अजिबात कळलं नाही.
>>> अगदी! नाटकात डबल रोल निभावताना एक चॅलेंज असतं. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सर्वांसाठीच. मोहन आगाशेंनी ते फार मस्त केलंय. ते बघायला 'नाटकात' म्हणून छान वाटतं. सिनेमात ते केवळ कॉपी म्हणून केलंय!
नाटकात सासरा एक आणि
नाटकात सासरा एक आणि डिटेकटिव्ह 1 , असे 2 नट घेणे तसेही परवडत नसते
आणि दोन्ही रोल हे , ह्या प्रसंगात हा आहे , त्यात तो आहे , असेच होते
म्हणून जमून गेले
सिनेमात ह्याची गरज नव्हती
नाटकात केतकी थत्ते होती
नाटकात केतकी थत्ते होती तेव्हा बघितले होते, नाटक सुंदरच होते. चित्रपट कळलाच नाही, नक्की काय दाखवायचं आहे आणि शेवटी तो खून असतो की नाही हेही कळलं नाही. मानुस काय आणि भलतंच, खाताना खडा लागल्यासारखं वाटतं ते.
अपघात असतो
अपघात असतो
तोरबाझ पाहिला.
तोरबाझ पाहिला.
संजय दत्त चा अभिनय चांगला. मध्ये मध्ये मुन्नाभाई ची आठवण येतेच,
नर्गिस फाकरी यात नोबडी आहे. स्त्रीपार्ट नसलेले नाटक सिनेमा बघायला लोक जात नाहीत म्हणून नावापुरते टाकल्याप्रमाणे आहे.
कथा खेचली आहे.
खलनायक आणि सर्व लहान मुलं सुंदर अभिनय करतात. त्यांच्यासाठी पिक्चर पहावा लांबला असेल तरी.
कथा पॉवरफुल आहे. नेहमी प्रमाणे बघून प्रचंड वाईट वाटतं.
तोरबाझ मी सुद्धा परवा रात्री
तोरबाझ मी सुद्धा परवा रात्री पाहिला. आधी जरा कंटाळवाणा वाटला. म्हणजे डॉक्युमेंटरी फिल आला. मग थोडा वेळ नेटाने पाहिला तर नंतर बघावासा वाटला. चांगला होता. अजून चांगला बनू शकला असता असेही वाटले. तरी एक (माझ्यासाठी) वेगळ्या विषयावरचा सिनेमा बघितला याचे समाधान लाभले. अजूनही मला त्या अफगाण तालिबान राजकारणाबद्दल फारसे माहीत नाही. पण पिक्चर बघताना सतत अफगाण क्रिकेट संघातले खेळाडू आठवत होते. स्पेशली त्यांचे फिरकी गोलंदाज आज जगात अव्वल समजले जातात याचे खरेच कौतुक वाटायचे ते आणखी वाढले.
https://youtu.be/0MBgd9NiSX8
https://youtu.be/0MBgd9NiSX8
सिम्पल समोसा कार्टून , अगदी करोना सारखी स्टोरी आहे,
पण हे 2018 चे कार्टून आहे
मला असे वाटत होते की Laxmi हा
मला असे वाटत होते की Laxmi हा वर्षातील मी बघितलेला सर्वात वाईट चित्रपट आहे पण coolie no 1 नी माझा हा समज खोटा ठरविला. तो Laxmi पेक्षाही बोरं झाला
नवा कूली नंबर १ पाहण्याचे
नवा कूली नंबर १ पाहण्याचे अतुलनीय धाडस केले हे फारच आहे.
हो कुली नंबर वन बघायला फार
हो कुली नंबर वन बघायला फार धाडस लागते, या चित्रपटाचे संवाद लेखक फरहाद सामजी वर बंदी आणायला पाहिजे. इतके वाह्यात आहेत
Soul (2020)https://www.imdb
Soul (2020)
https://www.imdb.com/title/tt2948372/
मस्त आहे हा सिनेमा. हॉटस्टारवर पाहिला आज.
कूली नं.१ नावाचा आचरटपणा
कूली नं.१ नावाचा आचरटपणा बघण्याचा मूर्खपणा किंवा धाडस जे काही असेल ते मीही केले आहे.
त्याचं एकमेव कारण माझा मुलगा होता त्याला बघायचा होता आणि टी. व्ही. वर लागलाच आहे म्हणून मीही बघितला.
पिक्चर संपायला पाऊण तास बाकी असताना तो आचरटपणा सहन करण्यापलीकडे गेला म्हणून मी सरळ उठून निघून गेले.
हा पिक्चर OTT वर रिलीझ झालाय म्हणून बरेच जण बघत असतील.
थेटरात रिलीझ केला असता तर कोण बघितला असता काय माहिती..
कूली नं.१ नावाचा आचरटपणा
कूली नं.१ नावाचा आचरटपणा बघण्याचा मूर्खपणा किंवा धाडस जे काही असेल ते मीही केले आहे. >>> + १००००००
तद्द्द्द्न फालतु .
नवीन कुली नं १, लक्ष्मी
नवीन कुली नं १, लक्ष्मी अजिबातच आवडले नाहीत. बकवास.
ल्युडो खूप आवडला. क्रिमिनल
ल्युडो खूप आवडला. क्रिमिनल जस्टीस २ पहायला घेतलीय. बीभत्स दृश्य खूप आहेत त्यामुळे पाहून होत नाही.
क्रिमिनल जस्टीस 2 फसला आहे...
क्रिमिनल जस्टीस 2 फसला आहे...
अच्छा. अजून एक स्कॅम ९२ आहे.
अच्छा. अजून एक स्कॅम ९२ आहे. डालो ला टाकली आहे.
Tenet बघते आहे..... बघते आहे.
Tenet बघते आहे..... बघते आहे... समजला कि पुन्हा एकदा पूर्ण बघेन.
क्रिमीनल जस्टीस बघायला सुरू
क्रिमीनल जस्टीस बघायला सुरू केली आहे. माधव मिश्रा आला की बरे वाटते. बाकी टेन्स आहे सगळे. सॉरी चुकून चित्रपट धाग्यावर लिहिले.
AK vs AK : Good !
AK vs AK : Good !
TENET पहिला आवडला
TENET पहिला आवडला
Tenet overrated आहे का?
Tenet overrated आहे का? Entropy आणि टाईम ट्रॅव्हल असा संबंध दाखवला आहे हे खरे का? Science fiction मधे real science असावं ही अपेक्षा फोल आहे का?
स्कॅम चे सहा भाग पाहिले.
स्कॅम चे सहा भाग पाहिले. उत्कंठा वर्धक आहे. बऱ्याच गोष्टी समजल्या. वडलांचा गोतावळा घरी जमा झाला की हा विषय हमखास असायचा.
TENET काहि सम्जलाच नाहि. जरा
TENET काहि सम्जलाच नाहि. जरा कोणि उलगडुन सांगेल का? जाम कन्फुझिन्ग होता.
टेनेट OTT वर आलाय का ?
टेनेट OTT वर आलाय का ?
AK vs AK>> १५-२० मिनिटांचे
AK vs AK>> १५-२० मिनिटांचे स्किट म्हणून चांगला झाला असता.
अभिषेकचे काही सिन सोडले तर ल्युडो धमाल आहे.
Pages