चूक तर माझीच आहे

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:32

प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*

*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची

*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे

*चूक तर माझीच आहे*
तुझ्या आयुष्यात येण्याची
तेव्हाच समजूत घातली असती मनाची
तर हि वेळच आली नसती
तुझ्या आठवणीत तडफडून मरण्याची

*चूक तर माझीच आहे*
उधळले ते रंग प्रेमाचे
माहित नव्हतं हे रंग
नंतर बेरंग होतील जीवनाचे

कवी-विनोद इखणकर
(शब्दप्रेम)7350970201

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या कविता वाचतोय. प्रयत्न चांगले आहेत. फक्त अजून थोडा विस्कळीतपणा जाणवतोय. अर्थात सवयीने सफाई येत जाईल. शक्यतो छंदोबद्ध रचना करा. पुलेशु !