बाप आहेच अंतरी

Submitted by पुरंदरे शशांक on 7 December, 2020 - 03:33

बाप आहेच अंतरी
आठवावे काय रुप
चाले विठ्ठलाचे नाम
असोनिया तो अरुप

श्वासी विठ्ठल विठ्ठल
रोमरोमी तोचि एक
देहाबाहेर अंतरी
नित्य वैकुंठनायक

नेत्र पाहती विठ्ठल
कर्णी विठ्ठलाचे नाम
मुखी जप नसे तरी
तोच घेई त्याचे नाम

हाती लिहवितो तोचि
अभंगात ठाकलासे
किर्तनात रंगूनिया
नाम थोर गर्जतसे

कळेचिना जनलोका
तुका समोर तो दिसे
क्षणामाजी पालटून
वैकुंठात भासलासे

देह दिसेना तरीही
ह्रदी बैसला अढळ
भाविकासी निश्चयाने
त्याच्या विश्वासाचे बळ

..........................................................................

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचरणी सप्रेम दंडवत

...................................................................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! फार सुंदर रचना!!!

तुमच्या ह्या काव्यांजलीने सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर तो नककीच त्या विठुरायाला!!!
त्याच्या परम-प्रिय भक्त बद्दल असे कौतुकोद्गार काढलेले देवाला का नाही आवडणार! देव भक्ताभिमानी असतो असे म्हणतात!

"कस्तुरीच्या सुगंधाला, हार इवल्या कळ्यांचा"
आज हरखला विठू, दव भरल्या डोळ्यांचा"

पुंडलीक वरदे, हरी विठ्ठल, बोला ज्ञानदेव, तुकाराम,
पंढरीनाथ महाराज कि जय!!!