मराठीत ऑफलाईन टंकलेखन

Submitted by shantanuo on 11 September, 2018 - 09:51

गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/

पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx

यात स्पेल चेक / एटो करेक्ट नाही. तशी अपेक्षाही नाही कारण हे फक्त इनपुट टूल आहे. हा मजकूर मी याच टूलाचा वापरा करूंन वर्डमध्ये लिहिला आहे. मजकूर सेव्ह होण्यात काही अडचण (सध्या तरी) आलेली नाही. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या मंडळीनी वापरून बघायला हवे असे. ऑफलाईन टंकलेखन कारण्याकरता अजून काय मार्ग आहेत?

Group content visibility: 
Use group defaults

या पायथॉन स्क्रीप्टच्या साहाय्याने केलेल्या विश्लेषणात असे दिसते आहे की मराठीत "इडागमा”चा वापर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात होतो. अशी रूपे तयार करण्यासाठी Q टॅगमध्ये O टॅग वाढविण्यात येईल.

सध्याची नोंदः
SFX Q Y 1
SFX Q णे वणे/P णे

प्रस्तावित बदलः
SFX Q Y 1
SFX Q णे वणे/OP णे

शब्दाच्या नोंदीत काहीही बदल होणार नाही. म्हणजे सध्या "बसणे” हा शब्द असा दिसत असेल तर तो तसाच राहील.

बसणे/NPQ

Q टॅगमध्येच O टॅग वापरून इडागमाची रूपे तयार होतील. म्हणजे 'बसणे', 'बसवणे', 'बसविणे' ही मूळ क्रियापदे आणि त्यांची रूपे NP ने तयार होणारी सर्व मिळून ७०० च्या वर जात आहेत त्यातील सुमारे ४०० वापरात नाहीत. 'बसणे' या संदर्भात वापर नसला तरी इतर क्रियापदांत वापरली जात असतील असे समजून ही रुपे काढता येत नाहीत. पण भविष्यात याचा पुनर्विचार होईल. डिक्शनरीचा आकार लहान हवा असे मला वाटते.

पुढील आवृत्तीसाठी अजून एक काम म्हणजे खाली दिलेली रूपे तयार होत आहेत की नाही ते तपासावे लागेल. नसतील तर नवीन रूल्स लिहावे लागतील असे दिसते.

बसल्ये
बसत्ये
बसत्येस
बसस
बसायचात
बसायचास
बसायचीस

यातील पहिले चार शब्द बोली भाषेतच दिसतात. प्रमाण भाषेत दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे नक्की काय करायचे हे जाणकारांना विचारून पाहीन.

हंस्पेलच्या सध्याच्या आवृत्तीत दोनपेक्षा अधिक टॅग नेस्ट करता येत नाहीत. ही त्रुटी गंभीर असून मी त्याचा पाठपुरावा केला आहे.

https://github.com/hunspell/hunspell/issues/497

उदाहरण म्हणून बसणे हा शब्द कसा चालतो ते पाहूः

बसणे/NPQ

खाली दिलेल्या Q टॅगमुळे 'बसवणे' आणि त्यातच असलेल्या O टॅगमुळे इडागमयुक्त 'बसविणे' ही दोन क्रियापदे तयार झाली.

SFX Q Y 1
SFX Q णे वणे/OP णे

बसविणे या इडागमाला नवीन क्रियापद समजून परत टॅग जोडला. पण हंस्पेलच्या वरील मर्यादेमुळे तो प्रयत्न वाया जाणार. म्हणजेच 'बसणे' या मूळ क्रियापदावरून 'बसविल्या' हा शब्द मिळेल पण 'बसविल्याचा' हा शब्द तयार होणार नाही.

SFX O Y 40
SFX O णे ितो णे
SFX O णे िल्या/Aacd णे

यावर उपाय म्हणजे इडागमाचे क्रियापद हे मूळ क्रियापदाबरोबर तयार करावे लागेल. म्हणजे सध्याची बसणे/NPQ या नोंदीत बदल करून बसणे/NP O Q करावी. पण तसे केले तर 'बसितो’, 'बसिल्या' अशी जुन्या मराठी सारखी भाषा तयार होईल. ते टाळण्याकरता O टॅग असा बदलून लिहावा लागेल.

SFX O Y 40
SFX O णे वितो णे
SFX O णे विल्या/Aacd णे

हंस्पेलमध्ये २ ऐवजी तीन लेव्हल जोडता येत असत्या तर हे काम खूप सोपे झाले असते! आता थोडा जास्त वेळ जाईल असे दिसते.

१) खाली दिलेल्या शब्दांचे टॅग चुकले होते. ते सुधारले.

अंघोळी/g
अंघोळ/g

अंमलदारीण/g
अंमलदारीणी/acd
अंमलदारीणीं/bcd

अंमलदारिण/Fg
अंमलदारिणी/acd
अंमलदारिणीं/bcd

अंमलदारण/Fg
अंमलदारणी/acd
अंमलदारणीं/bcd

अखंडता/hi
अखंडते/AFacd

अक्कलदाढ/i
अक्कलदाढे/acd

अक्कलदाढा/h
अक्कलदाढां/bcd

२) हा शब्द काढून टाकला.
अक्काबाया/h

३) सर्व शब्दांसाठी १० ग्रुप बनविले. प्रत्येक ग्रुपमध्ये किमान १ ते कमाल ६ टॅग दिसत आहेत.
f,41,"['अंध', 'अंकुरण', 'अंकगणित']"
e,13,"['अंगाराधुपारा', 'अंकलिपी', 'अंडे']"
acd,1,['अखेर']
bcd, 1, [‘अक्कलदाढां’, ‘अंमलदारणीं’]
Aacd,12,"['अंबोशी', 'अंगयष्टि', 'अंतःप्रेरणे']"
AFacd,29,"['अंधारा', 'अंधश्रद्धे', 'आग्यापिछ्या']"
Aacdh,2,"['अगरबत्त्या', 'अकादमी']"
AFacdh,1,['अखेरी']
Abcd,3,"['अंगुल्यां', 'अंगायां', 'अंगठ्यां']"
AFbcd,12,"['अंबोळ्यां', 'अंबोश्यां', 'अंकलिप्यां']"

४) सर्व क्रियापदांसाठी १० ग्रुप बनविले. प्रत्येक ग्रुपमध्ये किमान १ ते कमाल ५ टॅग आहेत.

NP,974,"['रोडावणे', 'रुंदावणे', 'उल्लेखणे']"
P,71,"['भिणे', 'मुळमुळणे', 'तुडतुडणे']"
PQ,33,"['फुलणे', 'हुकणे', 'लुटणे']"
NPR,21,"['पटकवणे', 'तळतळणे', 'मागसणे']"
FNP,10,"['म्हणाणे', 'सांगितणे', 'मिळाणे']"
FT,9,"['धुतणे', 'ल्यायणे', 'मेणे']"
MNPQ,384,"['बसणे', 'तंगडणे', 'तोषणे']"
MNPQR,17,"['छमकणे', 'परतणे', 'फटकणे']"
NOP,8,"['कल्पणे', 'अपेक्षणे', 'अर्पणे']"
NOPQ,4,"['लिहणे', 'पाहणे', 'राहणे']"

उदाहरण म्हणून मायबोलीवर नियमित लिहिणाऱ्याचा हा ब्लॉग स्पेल चेक एक्स्टेंशनद्वारे तपासून पाहिला.

http://pashanbhed.blogspot.com/2020/01/blog-post.html

विनाकारण / विचारले नसता चुका काढल्याबद्दल त्यांची क्षमा मागतो! पण हा ब्लॉग निवडण्याचे कारण हे की वर वर पाहता शुद्धलेखनाचे सर्व नियम पाळून केलेले लिखाण आहे असे आपल्याला वाटले तरी त्यातही बऱ्याच चुका असू शकतात.

खाली दिलेले सर्व शब्द ऱ्हस्व पाहिजे होते. लिबर ऑफिसच्या स्पेल चेक एक्स्टींशनमध्येच ऍटोकरेक्ट असल्यामुळे हे शब्द टाईप करता करताच आपोआप बदलले गेले असते.

अधीक प्रामाणीक सामाजीक सार्वजनीक कार्तीक धार्मीक जॉगींग चकीत प्रचलीत मर्यादीत मिश्रीत निश्चीत प्रकाशीत महत्व दूधाने अमेरीका नायीका अनूभव

खाली दिलेले इतर शब्द देखील आपोआप सुधारले गेले असते, नाहीतर त्याखाली लाल रेघ येऊन त्यातील चुकांकडे लक्ष तरी वेधले गेले असते.

किलोमिटर पुर्वज परिपुर्ण पाहूण्यांची कुटूंबाची निरर्गरम्य कर्त्यव्य

हैदराबादच्या कृष्णा अग्रवाल यांच्या सहकार्याने मराठी स्पेल चेकचा ए-पी-आय आता उपलब्ध करून देत आहोत. खाली दिलेल्या साईटवर जाऊन आपल्या ब्लॉगची लिंक तेथील इनपुट बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा. पुढील पानावर चुकीचा शब्द आणि त्याला सुचवलेल्या शब्दांची यादीच पहायला मिळेल.

http://shantanuoak.com:5000/

सोर्स कोड मुक्त स्रोत लायसंसखाली येथे उपलब्ध आहे.

https://github.com/KriAga/Spell-Checker

आपल्यापैकी कोणी संगणक तज्ज्ञ असतील ते ही कमांड वापरून हा ए-पी-आय स्वतःच्या साईटवर उपलब्ध करून देऊ शकतील.

docker run -p 5000:5000 -d shantanuo/flaskspell

मी माझ्या साईटवर ही सुविधा शक्य तितके दिवस पुरवीनच.

उदाहरण म्हणून शासनाच्या साईटवरील हे पान तपासून पाहिले.

https://www.maharashtra.gov.in/1081/Disclaimer-and-Policies

यात खाली दिलेले १०/१२ शब्द चुकीचे निघाले.

विश्र्वसनीयता
स्थळांव्दारे
पोर्टलव्दारे
शासनच्या
संबंधीत
शहानीशा
दुष्पपरिणाम
स्वयंचलितरित्या
किवा
गतीविधीवर
यईल

सुमारे ३०० शब्दात १२ चुकीचे शब्द म्हणजे ४% हा ल.सा.वि. समजायला हरकत नाही. "स्वरुपात" हा शब्द "स्वरूपात" असा हवा होता, पण तो हंस्पेलमध्ये आधीच कुणीतरी (चुकीने) जमा केला असल्याने शुद्धीचिकित्सकातून निसटला आहे. हा शब्द पुढील आवृत्तीतून काढावा म्हणून विकीवर लिहून ठेवला.

https://tinyurl.com/swarupat

हंस्पेल व्यतिरिक्त नादसाधर्म्य (soundex) आणि अक्षरांतर (edit distance) या दोन विचारधारा शुद्धिचिकित्सकात प्रभावशाली आहेत. या दोन्हींचा विचार करून हॅप्टिक या कंपनीने "स्पेलो" हे पायथॉन मॉड्युल उपलब्ध करून दिले आहे. यात हिंदीचाही अंतर्भाव आहे. म्हणजे "सही मातरा में पानी मिलाएं” असे लिहीले तर "सही मात्रा में पानी मिलाएं” असे सुचविले जाते. त्यासाठी हा चार ओळींचा कोड लिहावा लागतो.

from spello.model import SpellCorrectionModel
sp = SpellCorrectionModel(language="hi")
sp.load("hi_large.pkl")
sp.spell_correct("सही मातरा में पानी मिलाएं")

मराठीसाठी असे काही करण्याची इच्छा असणाऱ्यांनी खाली दिलेल्या पानावरून डेटा डाऊनलोड करून या पानावर दाखविल्याप्रमाणे ट्रेन करून मराठी मॉड्युल बनवावे लागेल.

https://wortschatz.uni-leipzig.de/en/download/

ऍटो-करेक्टमध्ये चुकीचे शब्द बदलून त्यांना बरोबर करण्याची सोय आहे. त्यातील चुकीचे आणि बरोबर शब्द वेगळे काढून डिक्शनरीतल्या शब्दांशी त्यांची तुलना करून पाहिली. त्यासाठी ही पायथॉन स्क्रिप्ट वापरली.

https://github.com/shantanuo/spell_check/blob/master/stack_auto_correct_...

यात ९,७९२ शब्द चूक आणि बरोबर अशा दोन्ही लिस्टमध्ये मिळाले. 

ही संख्या अपेक्षेपेक्षा बरीच जास्त असल्यामुळे ऍटोकरेक्टमध्ये काहीतरी झोल झाला असल्याची शंका आली. पण त्याचे स्पष्टीकरण असे की जोडाक्षरे सुधारताना नवीन शब्द शुद्ध असेलच असे नाही. म्हणजे दीरघायूषय असे टाईप करून स्पेस दिली तर दीर्घायूष्य अशी सुधारणा होईल खरी, पण तो शब्द देखील अशुद्धच आहे! त्याखाली लाल रेघ येईल, राईट क्लिकवर दीर्घायुष्य असा शुद्ध शब्द दिसेल तो स्वीकारा, किंवा बॅक स्पेस वापरून परत स्पेस दिली तर ऍटोकरेक्टद्वारे देखील तो सुधारला जाईल. ऍटो-करेक्टमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे नोंद केली तर थेट शुद्ध शब्दच बदलून मिळेल.
दीरघायूषय => दीर्घायुष्य
पण असे करण्याचे मी टाळत आहे. कारण तसे करणे म्हणजे बिल्ट-इन अल्गोरिदममध्ये हस्तक्षेप करण्यासारखे होईल.
सुमारे १००० शब्द ऍटो-करेक्टच्या चुकीच्या लिस्टमध्ये व डिक्शनरीच्या लिस्टमध्ये असे दोन्हीकडे दिसत आहेत. ते मात्र पुन्हा तपासावे लागतील.

आजच्या लोकसत्तेतील ही बातमी या विषयाशी संबंधित आहे म्हणून येथे नोंद घेतली.

https://www.loksatta.com/maharashtra-news/first-may-maharshtra-day-marat...

बृहद्कोश ही फार चांगली कल्पना असून काही निरीक्षणे नोंदवून ठेवत आहे. अशी निरीक्षणे मी गूगल सारख्या मोठ्या मंडळींविषयी देखील नोंदवली आहेत. त्यात काही प्रमाणात टीका आढळली तरी ती हलकेच घेतली जाते याची मला कल्पना आहे!

धरणे हा शब्द शोधला तर त्याला गळा आणि गळेपडू असे शब्द मिळाले. गळा धरणे या अर्थाने गळा शब्द समजला पण गळेपडू आणि धरणे याचा संबंध काय ते समजले नाही. मग साक्षात्कार झाल्यासारखा धरणें शब्द शोधला तर त्याला खूप रिजल्ट मिळाले. हें असें अनुनासिक अनुस्वार बाद होऊन त्याला किती बरें वर्षें झालीं? निदान दोन पिढ्या झाल्यां. मग मी शोध घेतानां धरणें का लिहावें? त्याचें कारण हे कोश ज्या काळात लिहिलें गेले त्या काळीं असेंच लिहिलें जात असें.

याचाच दुसरा अर्थ गेल्या दोन पिढ्यात कोश अद्ययावत करण्याचे काहीही प्रयत्न झालेले नाहीत! या कोशात दाखविल्याप्रमाणे आता कोणीही बोलत नाही. त्यातील निदान ५०% भाग कालबाह्य झाला आहे.

मोल्सवर्थ आणि वझे डिक्शनरी Digital Dictionaries of south Asia या पानावर गेल्या कित्येक वर्षांपासून उपलब्ध आहेत. दाते-कर्वे शब्दकोश हा खप्रे कुटुंबियांच्या साईटवर फार पूर्वीपासून उपलब्ध आहे. धरणें हा शब्द पाहण्यासाठी तीन वेगवेगळ्या साईटवर जाण्याऐवजी एकाच ठिकाणी जाता येते ही एक उपलब्धी म्हणता येईल. वेबसाईटवरील 'आमच्याविषयी' या पानावर तसा स्पष्ट उल्लेखही आहे.

https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?qs=%E0%A4%A7%E...

https://dsalsrv04.uchicago.edu/cgi-bin/app/vaze_query.py?qs=%E0%A4%A7%E0...

https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a...

दुसरी चांगली गोष्ट म्हणजे कॉपी - पेस्ट करायला बृहदकोश साईट त्या मानाने सोपी आहे. अशा दोन / तीन गोष्टी दिल्याबद्दल त्यांचे नक्कीच आभार मानले पाहिजे. पण त्यात 'फोडिले भांडार धन्याचा हा माल' यात अभिप्रेत असलेली क्रांती वगैरे काही झालेली नाही.

सहाय्य हा शब्द शोधला तर संबंधित शब्दांच्या यादीत सोनें हा शब्द पहिला तर त्याखाली पालव, धोंड, पापणीपूजक असे सगळेच असंबद्ध शब्द येतात. योगदान हा त्यातल्या त्यात समानार्थी शब्द त्यानंतर दिसतो. वास्तविक योगदान (आणि उजरी / विरजीक) हे शब्द सगळ्यात वर हवे कारण त्यांचा अर्थच मुळी सहाय्य असा दिला आहे. शब्दशोधाच्या बाबतीत गूगलशी स्पर्धा शक्य नाही याची मला कल्पना आहे. पण फ्री आणि ओपन सोर्स लायसंस खाली इलास्टिक सारखे शंभर नंबरी नाणे उपलब्ध आहे.

https://www.elastic.co/

यात प्रत्येक शब्द त्याच्या वजनानुसार इंडेक्स होतो. हे वजन काढण्यासाठी इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेंसी हे सूत्र वापरले जाते.

https://en.wikipedia.org/wiki/Tf%E2%80%93idf

डिक्शनरीसाठी कोणता डेटाबेस वापरला आहे ते माहीत नाही. पण इलास्टिक वापरला असता तर शोध नक्कीच उजवा ठरला असता असे मला वाटते.

http://bruhadkosh.org/

'बृहद्कोश' प्रकल्पाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा! अगदी गूगलसारखा नाही तरी त्याच्या आसपास जावू शकेल असा सर्च दिला तर प्रकल्पाचे भविष्य उज्ज्वल असेल.

इलास्टीक या डेटाबेसमध्ये हा शोध कसा काम करेल ते मी येथे दाखविले आहे.

https://gist.github.com/shantanuo/57976612efdc326c5d9c85965a86bb11

यातील पहिल्या भागात आपण एक टेबल तयार केले. त्यात सध्या एकच कॉलम ठेवला आहे. आवश्यकतेनुसार कॉलमची संख्या वाढवता येईल. दुसऱ्या भागात कोशातील ४ नोंदी जमा केल्या. यातील तीन नोंदींमध्ये सहाय्य हा शब्द मुद्दाम घेतला आहे. तिसऱ्या भागात शोध घेण्यासाठी क्वेरी लिहिली. यात सहाय्य या शब्दाच्या अनुक्रमांकाला २ ने भागून त्याच्या लॉगरिदमिक संख्येने सॉर्ट करून अपेक्षित नोंद वर काढली. याचा अर्थ सहाय्य हा शब्द जितका डावीकडे (म्हणजे  नोंदीच्या सुरवातीला) असेल तितका तो सर्च मध्ये वर दिसेल.  त्यामुळे योगदान, पापणीपूजक आणि सोने या क्रमाने ३ शब्द दिसतील.

समानार्थी शब्दांची यादी मी इथे तयार करत आहे.

http://mr.shoutwiki.com/wiki/Similar_words

ज्यांना वेळ आणि इच्छा असेल त्यांनी त्यात भर घालावी. हे शब्द लिबर ऑफिसमध्ये राईट क्लिकवर हे असे दिसतील.

पहिले ७/ ८ शब्दच राईट क्लिकवर दिसत आहेत. अधिक शब्दांसाठी thesaurus वर टिचकी मारा. मग सर्व शब्द हे असे दिसतील.

गरीब शब्दाला अकांचन असा पहिलाच पर्याय दिसत आहे. तो तितकासा योग्य वाटत नाही. त्यात बदल करायचा असेल तर वर दिलेल्या विकीवरील मूळ स्रोतात बदल करावा लागेल.

अकिंचन, अकांचन, निष्कांचन, निर्धन, द्रव्यहीन, कंगाल, कफल्लक, रंक, खंक, खल्लक, दरिद्री, दळिद्री, जन्मदरिद्री, गरीब, फकीर, नंगा, भिकारडा, भणंग, भिकारी, नष्टैश्वर्य, फटिंग, फाकेकंगाल, भुकेकंगाल, अन्नान्नगत, नादार, दिवाळखोर, अभाव

ही नोंद बदलून अशी करावी लागेल.

अकिंचन, दरिद्री, निर्धन, दिवाळखोर, भिकारी, गरीब, कंगाल, कफल्लक, भणंग, निष्कांचन, द्रव्यहीन, रंक, खंक, खल्लक, दळिद्री, जन्मदरिद्री, अकांचन, फकीर, नंगा, भिकारडा, नष्टैश्वर्य, फटिंग, फाकेकंगाल, भुकेकंगाल, अन्नान्नगत, नादार, अभाव

असे केले की 'गरीब' या शब्दाला 'दरिद्री' हा शब्द सगळ्यात पहिला दिसेल तसेच 'नादार' या शब्दाला देखील २ ते ८ क्रमांकाचे शब्द म्हणजे दरिद्री, निर्धन, दिवाळखोर, भिकारी, गरीब, कंगाल, कफल्लक हे लगेचच राईट क्लिकवर दिसू शकतील तर इतर सर्व शब्द थिसॉरसच्या बॉक्समध्ये पहावे लागतील.

थोडक्यात समान अर्थाचे संबंधित शब्द एका ओळीवर स्वल्पविराम वापरून लिहायचे आहेत. आणि त्यातील पहिले ७ / ८ शब्द नेहमीच्या वापरातले असतील याची काळजी घ्यायची आहे.

दुसरा मोठा प्रश्न असा आहे की विशेष वापरात नसलेले शब्द काढावे का? उदा. ही नोंद पहा...

अंकुर, कोंब, कोंभ, मोड, डिरी, धुमारा, तुरा, फुटवा, फूट, फाटा, बोखा, पल्लव, पासंबा, पोंगा, पोटरी, रुजवण

डिरी, बोखा, पासंबा, पोंगा, पोटरी हे शब्द हल्ली फार कमी वापरले जातात. डिक्शनरीत यांना स्थान नाही हे नक्की. पण इथे थिसॉरसमध्ये सध्यातरी हे शब्द ठेवले आहेत. कारण वापरात नाहीत म्हणून माहीत नाहीत आणि माहीत नाहीत म्हणून वापरात नाहीत या चक्रातून बाहेर पडता आले तर पाहूया. पण शब्दांचा क्रम मात्र नक्कीच बदलावा लागेल. वापरात असलेले शब्द आधी, आणि मग इतर शब्द...

अंकुर, कोंब, कोंभ, मोड, धुमारा, तुरा, फुटवा, फूट, फाटा, पल्लव, रुजवण, डिरी, बोखा, पासंबा, पोंगा, पोटरी

निराधार हा शब्द दोन ग्रुपमध्ये दिसत आहे. तो अगतिक या अर्थाने जास्त वापरला जातो तर अधांतरी या अर्थाने फारच कमी.

'अगतिक', 'निरुपाय', 'असहाय', 'निराधार', 'दीन', 'लाचार', 'शरणागत', 'दिङ्मूढ', 'हतबल'

'अधांतरी', 'निराधार', 'अंतराळी', 'वर', 'मधेच'

म्हणून आपण तो अधांतरी या नोंदीतून काढून टाकणार आहोत. एकच शब्द एकापेक्षा अधिक ठिकाणी येऊ शकत नाही याला कारण म्हणजे थिसॉरसमध्ये त्याला समानार्थी शब्द दाखवताना दोन्ही नोंदीतील शब्द दाखवावे लागतील. असे सर्व १२ (किंवा त्याहून अधिक) शब्द राईट क्लिकवर दाखवता येणार नाहीत. दुसरी मोठी समस्या अशी आहे की निराधार या शब्दाच्या सामायिक नोंदीमुळे दोन्ही ग्रुप जोडले जातील आणि अगतिक या शब्दाला अंतराळी असा (हास्यास्पद) समानार्थी शब्द दिसेल. हे व्हायला नको असेल तर दोन्ही नोंदी पूर्णपणे वेगळ्या ठेवाव्या लागतील. त्यासाठी निराधार या शब्दाची अधांतरी या शब्दातील नोंद काढून टाकावी लागेल. हंस्पेलच्या नियमात सामायिक नोंदीचे ग्रुप जोडून घ्या असे काहीही बंधन नाही. एखादा शब्द दोन / तीन ग्रुपमध्ये असेल तर त्यापैकी कोणत्याही एका ग्रुपमधील शब्द राईट क्लिकवर दाखविले जातात. त्याबाबतीत हंस्पेल इंजीन खरोखर उत्तम आहे. पण प्रुफींग टूल्स जीयुआय (Proofing tools GUI) या सॉफ्टवेअरमध्ये मात्र दोन्ही ग्रुप जोडण्याचे काम आपोआप होत आहे. सध्यातरी हंस्पेलसाठी प्रुफींग़ टूल्स हे (माझ्या माहितीतील) एकमेव अवजार आहे. प्रुफींग टूल्समधील काही भागही मी लिहिला आहे. भविष्यात प्रुफींग टूल्सचा वापर टाळून थेट पायथॉनमध्ये प्रोग्रॅम लिहून डिक्शनरी लिहिण्याचा विचार आहे. पण सध्यातरी प्रूफींग टूल्सच्या मर्यादेतच मला काम करायचे आहे. एकापेक्षा जास्त ग्रुपमध्ये येणारे शब्द शोधण्यासाठी ही पायथॉन स्क्रिप्ट लिहिली. त्याचा आधार घेऊन ड्युप्लिकेट शब्द काढून टाकले जातील.

समानार्थी शब्दांच्या यादीत नवीन ५००० शब्दांची भर घालून ही आवृत्ती (२.५) येथे उपलब्ध करून दिली आहे.

https://extensions.libreoffice.org/extensions/marathi-spellchecker

यात एकच बदल केला आहे तो म्हणजे समानार्थी शब्दांच्या यादीत एक/ दोन इंग्लिश शब्द देखील घेतले आहेत. त्याचा उपयोग करून मराठी शब्द इंग्लिशमध्ये भाषांतरित करून मिळेल. उदाहरण म्हणून 'सेतान' असा चुकीचा शब्द टाईप केला तर त्याखाली लाल रेघ येईल. राईट क्लिकवर सैतान असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केली की सेतान बदलून सैतान होईल.

आता आपण सैतान या शब्दावर उजवी क्लिक केली तर राक्षस, असुर, दस्यु असे समानार्थी शब्द मिळतील. त्याच बरोबर devil असा शब्द मिळेल. त्या शब्दावर क्लिक केली की सैतान शब्द बदलून devil होईल.

आता devil शब्दावर उजवी क्लिक केली की Lucifer, Beelzebub अशी सैतानाची नवीन नावे कळतील!

इंग्रजी शब्द घ्यावेत की नाही हा प्रश्न पडला होता. पण मोल्सवर्थ डिक्शनरीत मराठी बरोबरच इंग्रजी अर्थ देखील दिला आहे. तेव्हा यात काही फार आक्षेपार्ह कृत्य केले आहे असे मला वाटत नाही. हा प्रोजेक्ट सुरू करताना भाषा (मराठी किंवा इंग्रजी) शिकवणे हा याचा उद्देश कधीच नव्हता. पण फार काही न करता जर नुसत्या राईट क्लिकवर भाषा शिकवता येत असेल तर काय हरकत आहे? अर्थात कोणाला काही सुधारणा करायची असेल तर खाली दिलेल्या विकीच्या पानावर बदल करू शकता.

http://mr.shoutwiki.com/wiki/Similar_words

आपल्या सूचना पुढील आवृत्तीत सामावून घेतल्या जातील.

समानार्थी शब्दांच्या यादीत काही शब्दांची भर घालून सुमारे ३०,००० शब्दांची नवीन आवृत्ती प्रकाशित केली. याचा उपयोग भाषा शिकण्याबरोबरच टंकलेखन करताना देखील करता येऊ शकतो. 'तज्ज्ञ' , 'ऋग्वेद’, 'श्रावण' असे शब्द टाईप करणे पुष्कळांना कठीण जाते. अशा वेळी त्या शब्दांशी संबंधित शब्द टाईप करून राईट क्लिकवरील synonym या पर्यायात आपल्याला हवा तो शब्द मिळतो का ते पाहता येईल. मी "जाणकार”, “सामवेद” आणि "आषाढ” असे तीन सोपे शब्द टाईप करून हवे असलेले 'तज्ज्ञ' , 'ऋग्वेद’ आणि 'श्रावण' हे शब्द मिळवले. इतकेच नव्हे तर "मालकंस” या रागाचे नाव टाईप केल्यावर सिनॉनिम मध्ये इतर रागांची नावे उदा. “धनाश्री”, "गौडसारंग” दिसत आहेत.

रागांची पूर्ण यादी thesaurus या लिंकवर क्लिक करून मिळवता येईल.

कुणाला जर आणखी असे शब्द सुचवायचे असतील तर या धाग्यात पुढे लिहू शकता. यादी मोठी असेल तर युजर गेस्टबुक (विचारपूस) मध्ये लिहता येतील किंवा ई-मेलने देखील पाठवू शकता.

आपल्या कुटुंबियांची नावे अथवा कंपनीतील कर्मचाऱ्यांची नावे जर सिनॉनिममध्ये टाकायची असतील तर त्यासाठी तुम्हाला सोर्स कोडमध्ये बदल करावा लागेल. प्रुफींग टूल्स जी.यु.आय. या सॉफ्टवेअरच्या मदतीने हा बदल कसा करता येईल ते मी याच धाग्यात आधी सांगितले आहे.

वा! हे जे केलंय ते तांत्रिक दृष्ट्या उत्तमच! परंतु एका रागाला समानार्थी म्हणून इतर वेगळ्या रागांची नावं का घ्यायची हे समजलं नाही. ते काही समानार्थ नाहीत.

"ऋग्वेद", “आषाढ", “मालकंस" अशा शब्दांना समानार्थी शब्द कोणते आहेत ते आपण सुचवू शकाल का? योग्य समानार्थी शब्द नसतील तर त्या शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत देण्याचा देखील पर्याय आहे. म्हणजे…

"ऋग्वेद" – हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ
“आषाढ" – पावसाळी महिन्याचे मराठी नाव
“मालकंस" – शास्त्रीय संगीतातील एक राग

पण असे करण्याचे मी टाळले आहे. त्याला ३ कारणे आहेत.

१) वर दिलेल्या स्क्रीन-शॉट मध्ये आपण पाहू शकता की सिनॉनिम या खुणेत ६ ते ७ पर्याय देण्याइतकी जागा आहे. पण आडवी जागा मात्र पुरेशी नाही. त्यामुळे एक किंवा फार तर दोन शब्दांमध्ये अर्थ सांगावा लागेल नाहीतर काही शब्द स्क्रीनच्या बाहेर जातील. तसेच उरलेल्या ५ पर्यायांची जागा तशीच रिकामी राहील. हे सर्व वेगवेगळ्या रिझोलिशन्सच्या संगणकांवर कसे दिसेल ते सांगणे कठीण आहे.

२) दुसरी गोष्ट म्हणजे हा स्पेल-चेकर लेखकांसाठी आहे. वाचकांसाठी नाही. जेव्हा लेखक लिखाण करताना आषाढ असा शब्द लिहतो तो त्याला त्याचा अर्थ माहीत असतो तेव्हाच. मग त्याला त्या शब्दाचा अर्थ सांगण्यात काय मतलब आहे?

३) तिसरा मुद्दा थोडा टेक्निकल आहे. प्रुफिंग टूल्स जी. यु. आय. या सॉफ्टवेअरमध्ये एकदा का "आषाढ" शब्दाला श्रावण, भाद्रपद, चैत्र असे पर्याय दिले की त्या, त्या शब्दांना देखील हे सर्व शब्द समानार्थी म्हणून आपोआप मिळतात. म्हणजे मी आत्ताच पाहिले की "चैत्र" शब्दाच्या सिनॉनिममध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पर्याय दिसत आहेत. हा असा फायदा शब्दाचा पूर्ण अर्थ दिला तर मिळणार नाही. एखाद्याने " हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ” हे पाच शब्द टाईप करून योग्य प्रकारे सिलेक्ट केले तर त्याला "ऋग्वेद" हा शब्द राईट क्लिकवर दिसेल पण तसे कोणी करण्याची शक्यता फार कमी आहे. कारण किती शब्द सिलेक्ट करायचे हे वापरकर्त्याला माहीत नसेल. त्यामुळे समानार्थी शब्दासाठी एकाच शब्दाचे ६ ते ७ पर्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आपण हा स्पेलचेकर प्रत्यक्ष वापरून पाहिला आहे का? नुसते स्र्कीन शॉट पाहून सूचना देण्यापेक्षा प्रत्यक्ष वापर केल्यावर त्यामागील अपरिहार्यता लगेच लक्षात येऊ शकेल. "सिनॉनिमचा गैरवापर" असे न म्हणता "सिनॉनिमचा अभिनव वापर" असे फार तर म्हणता येईल. मी पाहिलेल्या काही पुस्तकात देखील "आषाढ" शब्दाला श्रावण, भाद्रपद, चैत्र असे पर्यायी शब्द दिलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी यात काही बदल होणार नाही. लिब्रे ऑफिसच्या स्पेलचेकची लिंक या धाग्यात अनेक वेळा दिली गेली असली तरी पुन्हा एकदा…

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/marathi-spellchecker

अर्थात हे एक्स्टेंशन वापरण्यासाठी लिब्रे ऑफिस इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.

“न” म्हटला की "बाणातला ण" की "नळातला न" असा प्रश्न पडायला नको. लिबर ऑफिसच्या रायटरमध्ये कसेही टाईप करा. ऍटो-करेक्टद्वारे ते आपोआप सुधारले जाईल! उदाहरण म्हणून हे शब्द टाईप करा.

आचरनात
आनन्याचा
प्रस्तावणा
जानकार

स्पेस दिल्यावर ते आपोआप बदलून मिळेल.

आचरणात
आणण्याचा
प्रस्तावना
जाणकार

ज्या ज्या शब्दात 'न' किंवा 'ण' आहे असे शब्द शोधून त्यांना बदलून चुकीचे केले, आणि मग त्याला शुद्ध शब्दाचा पर्याय दिला. अशा नोंदी जुन्या ऍटो-करेक्ट फाईलमध्ये जमा केल्या. त्यासाठी ही पायथॉन स्क्रिप्ट वापरली.

https://github.com/shantanuo/spell_check/blob/master/autocorrect_update....

अखंडता या शब्दाचे सामान्यरूप अखंडते- (अखंडतेला, अखंडतेची) असे होते. या व अशाच इतर आकारान्त (आकारांत नव्हे!) शब्दांची सोय लावण्यासाठी एक नवीन टॅग बनविला. अफिक्स फाईलमधील नोंद अशी दिसेल...

SFX j Y 1
SFX j ा े/AFacd ा

तर डिक्शनरी फाईलमध्ये टॅग लावलेला शब्द असा दिसेल.

अखंडता/jh

j हा टॅग एकवचनी २७१ शब्द तर h टॅग बहुवचनी २७३ शब्द तयार करेल. एकूण ५४४ शब्द प्रुफींग टूल्स या सॉफ्टवेअरमधून बनविल्यावर असे दिसत आहेत.

https://raw.githubusercontent.com/shantanuo/spell_check/master/akhandata...

ह्यात आणखी काही शब्द हवे असले तर अवश्य सुचवा. मुळात इतके शब्द बनवून त्याचे करायचेय काय? असा प्रश्न कोणी केला तर तो देखील बरोबर आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा असाही एक उपयोग!

अठ्ठावीस या शब्दापासून हंस्पेलद्वारे ५५ शब्द तयार होत आहेत. यात आणखीन काही शब्द कोणी सुचवू शकेल का? जर काही प्रतिसाद आला नाही तर खाली दिलेला नियम बरोबर आहे असे समजता येईल.

SFX q Y 7
SFX q ीस िसा/Facd ीस
SFX q ीस िसां/Fbcd ीस
SFX q ीस िशी/acd ीस
SFX q ीस िसावा ीस
SFX q ीस िसावी ीस
SFX q ीस िसावे ीस
SFX q ीस िसाव्या/acd ीस

डिक्शनरी फाईलमध्ये ही अशी नोंद होईल.

अठ्ठावीस/acq

आणि हे शब्द स्पेल-चेकच्या सुचवणीमध्ये देखील दिसू लागतील. "अठ्ठाविसाव्यापर्यंतचा" यासारखे शब्द घ्यायचे असतील तर acd या टॅगला A हा टॅग जोडता येईल. तसे केले की एकहजारपेक्षा जास्त शब्द तयार होत आहेत. ५५ ते ११०० यामधील सुवर्णमध्य काढावा लागेल असे वाटते.

अठ्ठाविसावा
अठ्ठाविसावी
अठ्ठाविसावे
अठ्ठाविसाव्या
अठ्ठाविसाव्याने
अठ्ठाविसाव्याला
अठ्ठाविसाव्याशी
अठ्ठाविसाव्याचा
अठ्ठाविसाव्याची
अठ्ठाविसाव्याचे
अठ्ठाविसाव्याच्या
अठ्ठाविसाव्यास
अठ्ठाविसाव्यात
अठ्ठाविसाव्याहून
अठ्ठावीस
अठ्ठावीसने
अठ्ठावीसला
अठ्ठावीसशी
अठ्ठावीसचा
अठ्ठावीसची
अठ्ठावीसचे
अठ्ठावीसच्या
अठ्ठाविसाने
अठ्ठाविसाला
अठ्ठाविसाशी
अठ्ठाविसाचा
अठ्ठाविसाची
अठ्ठाविसाचे
अठ्ठाविसाच्या
अठ्ठाविसास
अठ्ठाविसात
अठ्ठाविसाहून
अठ्ठाविसांना
अठ्ठाविसांनो
अठ्ठाविसांनी
अठ्ठाविसांला
अठ्ठाविसांशी
अठ्ठाविसांचा
अठ्ठाविसांची
अठ्ठाविसांचे
अठ्ठाविसांच्या
अठ्ठाविसांस
अठ्ठाविसांत
अठ्ठाविसांहून
अठ्ठाविशी
अठ्ठाविशीने
अठ्ठाविशीला
अठ्ठाविशीशी
अठ्ठाविशीचा
अठ्ठाविशीची
अठ्ठाविशीचे
अठ्ठाविशीच्या
अठ्ठाविशीस
अठ्ठाविशीत
अठ्ठाविशीहून

इंग्रजीसारख्या सुलभीकरणाचा आग्रह धरणारे सरळ "वीसआठ" म्हणतील. प्रश्न मिटला. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होईल.

विशेषणांना विभक्ती प्रत्यय थेट जोडता येत नाही. म्हणजे "अनिवार्य" या शब्दापासून "अनिवार्यचे" असा शब्द बनत नाही. पण "ता” हे अक्षर जोडल्यानंतर जो स्त्रीलिंगी शब्द बनतो त्याला मात्र विभक्ती प्रत्यय लावता येतात. उदाहरणार्थ "अनिवार्यतेचे" असा शब्द बनू शकतो आणि गूगलमध्ये पाहिले तर असे शब्द भरपूर वापरात आहेत असे दिसते. हंस्पेलमध्ये "ता” जोडण्याचा नियम लिहिणे अगदी सोपे आहे.

SFX w Y 3
SFX w 0 ता .
SFX w 0 ते/FAacd .
SFX w 0 तां/FAbcd .

पण मुळात व्याकरणाच्या दृष्टीने हा "ता” काय प्रकार आहे? सर्वच विशेषणांना नाही पण पुष्कळशा विशेषणांना जोडता येणाऱ्या या "ता” विषयी अधिक माहिती मिळाली तर हंस्पेल नियम अधिक व्यापक बनविता येईल. नाहीतर वर दिलेला नियम बरोबर म्हणता येईल.

तुमचा कामाचा प्रचंड आवाका वाखाणण्याजोगा आहे.

“न” म्हटला की "बाणातला ण" की "नळातला न" असा प्रश्न पडायला नको. लिबर ऑफिसच्या रायटरमध्ये कसेही टाईप करा. ऍटो-करेक्टद्वारे ते आपोआप सुधारले जाईल! >> पण मला स्थानिक भाषेतले संवाद असे लिहायचे असतील तर - 'कोन व्हता काय म्हाईत', तर काय करायचे? आपोआप सुधारणा नको असेल तर ती बंद करता येईल का?

"कोन व्हता काय म्हाईत" या वाक्यात काहीही सुधारणा (आपोआप) होणार नाही. कारण कोन हा शब्द योग्य आहे. (त्रिकोणाचा कोन या अर्थाने). 'व्हता चे होता' किंवा 'म्हाईत चे माहीत' हे देखील आपोआप बदलणार नाही. कारण तशी नोंद ऍटोकरेक्टमध्ये केलेली नाही. व्हता आणि म्हाईत या दोन शब्दांखाली लाल रेघ येईल. पण राईट क्लिकवर 'नव्हता, व्हावा' किंवा 'म्हणता, म्हाडा' असे असंबद्ध शब्द दिसतील. हा स्पेलचेक प्रमाण भाषेत लिखाण करणाऱ्यांसाठी आहे. ग्रामीण / वैदर्भीय / कोकणी अशा शब्दांसाठी स्वतंत्र स्पेलचेकर बनवावा लागेल. कारण ते शब्द यात घेतले तर प्रमाण भाषेतील चुकांना ग्रामीण शब्दांचा पर्याय राईट क्लिकवर दिसू लागेल आणि मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होईल.

ग्रामीण बोलीत "पन बगतो आनि परयतन कर्तो " असे लिहायला जाल तर "पन चे पण", “आनि चे आणि” शिवाय "परयतन चे प्रयत्न” असे तीन शब्द आपोआप बदलले जातील आणि "पण बगतो आणि प्रयत्न कर्तो” असे धेडगुजरी वाक्य तयार होईल. बगतो ला राईट क्लिकवर कदाचित बघतो असा पर्याय मिळेलही पण मुळात हे सर्व शुद्धीकरण कसे टाळावे हा आपला प्रश्न आहे त्याचे उत्तर देतो.

'पन' हा शब्द बदलून 'पण' असा झाला की लगेच "अन्डु” (undo) या बटणावर क्लिक करा. किंवा कंट्रोल + Z या कीबोर्ड शॉर्टकटचा वापर करा. बरेच शब्द ग्रामीण पद्धतीने लिहायचे असतील तर टूल्स – ऍटोकरेक्ट – टापपिंग हा पर्याय वापरा. या पर्यायाने ऍटोकरेक्टची आगाऊगिरी पूर्णपणे थांबेल. ऍटोकरेक्ट पुन्हा सुरू करायचे असेल तेव्हा तोच पर्याय परत वापरा. या पर्यायासमोर बरोबरची खूण दिसली की ऍटोकरेक्ट चालू आहे असे समजावे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भाषेत लिखाण करताना बऱ्याच शब्दांखाली लाल रेघ येईल. हे नको असेल तर टूल्स मध्ये ऍटोमॅटिक स्पेल चेकिंग (Shift + F7) असा पर्याय आहे तो वापरा. लिखाण करताना काही वेळा या लाल रेघांचा खरोखरच त्रास होतो. ऍटोमॅटिक स्पेल चेकिंग सरळ डिसेबल करून टाईप करा आणि शेवटी F7 या कीबोर्ड शॉर्टकटचा वापर करून एक एक शब्द तपासून घ्या.

जर अख्खं पुस्तकच ग्रामीण भाषेत लिहायचा विचार असेल तर मात्र टूल्स – एक्स्टिंशन मॅनेजर या ऑप्शनमध्ये जाऊन हे ऍड-ऑनच काढून टाका! ना रहेगा बांस, न बजेगी बांसुरी

ऍटोकरेक्टमधील काही नोंदी नको असतील किंवा काही नोंदी वाढवायच्या असतील तर मात्र थोडा त्रास घ्यावा लागेल. प्रुफींग टूल्स जी.यु.आय. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्यात या ऍड ऑनचा सोर्स कोड बदलावा लागेल.

https://proofingtoolgui.org/

ते कसे करायचे हे मी याच धाग्यात आधी सांगितले आहे. नवीन माणसाला थोडे कठीण असले तरी अशक्य अजिबात नाही.

सविस्तर उत्तराबद्दल अत्यंत आभारी आहे. ऑटोकरेक्ट तात्पुरते बंद करता येईल हे लक्षात नव्हते आले. हा सोपा पर्याय आहे.

हरचंदसाहेब आपण दिलेल्या २-३ प्रतिसादांवरून आपण हा स्पेल-चेक प्रत्यक्षात वापरत आहात असे दिसते. डिक्शनरीत नसलेले पण वापरात असलेले शब्द तुम्ही फायरफॉक्स किंवा लिब्रे ऑफिसमध्ये "Add to Dictionary” हा पर्याय वापरून जमा केले असतील. ते शब्द जर तुम्ही माझ्याकडे पाठवले तर मी त्यांचा अभ्यास करून निवडक शब्द डिक्शनरीच्या पुढील आवृत्तीत उपलब्ध करून देऊ शकेन. त्याचा तुम्हाला असा फायदा होईल की तुम्ही हे ऍड-ऑन इतर कोणत्याही संगणकावरून वापरले तरी तुमचे शब्द परत परत "Add to Dictionary” करावे लागणार नाहीत. हे आवाहन मी सात-आठ वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवरून केले होते पण दोन-तीनच प्रतिसाद मिळाले आहेत. मला कोणती फाईल हवी आहे त्याची माहिती येथे मिळेल.

http://shabdasampada.blogspot.com/2012/12/blog-post_19.html

थोडक्यातः
१) start – run च्या डायलॉगबॉक्स मध्ये %APPDATA% असे टाईप करा
२) \LibreOffice\4\user\wordbook या फोल्डरमध्ये दिसणारी standard.txt फाईल पाठवा.

लोकशाहीच्या विकासात "लोकसहभाग" जितका महत्त्वाचा असतो तितकाच तो ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या विकासातही असतो. इतर काही नाही पण "अपव्होट”, “स्टार”, "लाईक” अशा माध्यमातूनही आपण आपले योगदान देऊ शकतो.

नाही हो, मी जर वापरायला सुरुवात केली तर काय अडचण येईल या आगाऊ कल्पनेनेच मी तो प्रश्न विचारला. मी लिब्रे ऑफिस वापरतो. त्यात मराठी लेखन तुम्ही म्हणता तसे केल्यास नक्कीच तुम्हाला ते शब्द मी पाठवीन.

मी सध्या लाटेक मध्ये मराठी लेखन करतो आहे. त्या दृष्टीने काही उपयोगी वाचायला मिळते का म्हणून बऱ्याचदा तुमचे लेख उघडून बघत असतो.

माझ्या शंका कुठे विचाराव्यात हे कळत नव्हतं. म्हणून इथे विचारते आहे.

मी मध्यंतरी बरहाच्या साईटवरून Baraha IME विकत घेतलं. त्याबद्दलची माझी काही निरिक्षणं आणि प्रश्न :

- वर्ड फाईलमध्ये देवनागरी टायपिंगसाठी ते व्यवस्थित चालतं. काहीही प्रश्न उद्भवत नाही. ब्राऊझरच्या सर्च बारमध्येही व्यवस्थित देवनागरी टाइप करता येतं.

- मात्र ते वापरून फेसबूकवर काहीही टाईप करता येत नाही. असं का? त्यासाठी मला माझ्या डेस्कटॉपच्या लँग्वेज सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील का?

- मी अनेकदा whatsapp web वापरते. तिथे मला देवनागरी टाईप करायचं असल्यास, आधी बरहा-आयएमईचं सेटिंग 'इंग्लिश' करून एखादं इंग्रजी अक्षर टाइप करावं लागतं, मग सेटिंग 'मराठी' करून पुढे मी मला हवं ते देवनागरी टेक्स्ट टाईप करू शकते. नाहीतर तिथे देवनागरी टेक्स्ट टाईप होत नाही. एकाच चॅट विंडोमध्ये असले तरी प्रत्येक नवा मेसेज टाईप करताना हे करावं लागतं. यासाठी काय सेटिंग करावं लागेल?

- Dropbox file sharing मध्येही देवनागरी कमेंट्स लिहिताना कधीकधी whatsapp web सारखा प्रॉब्लेम येतो. कधीकधी h सहितची अक्षरं, जोडाक्षरं टाईप करताना प्रॉब्लेम येतो. (म्हणजे ती अक्षरं टाईपच होत नाहीत.) इतर जोडाक्षरं टाईप होतात. पण टायपिंगच्या ओघात एखादं h सहित जोडाक्षर टाईप केलं गेलं तर पुढे कुठल्याच की-स्ट्रोकला काहीच अक्षरं उमटत नाहीत. हे कशामुळे? यावर उपाय काय?

या सगळ्या गोष्टी डेस्कटॉपवरून टाईप करतानाच्या आहेत.

-------------------------

मी बरहाला हे कळवलं होतं. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आलं नाही.

कार्यक्षम या शब्दाला w टॅग लावून "कार्यक्षमतेची", "कार्यक्षमतेपेक्षा" असे ६४६ शब्द तयार होत आहेत.
SFX w Y 3
SFX w 0 ता .
SFX w 0 ते/FAacd .
SFX w 0 तां/FAbcd .

त्या सर्व शब्दांना "अ" हा उपसर्ग लावून "अकार्यक्षमतेची", "अकार्यक्षमतेपेक्षा" असे आणखी ६४६ शब्द तयार केले. (एकूण शब्दसंख्या १२९२)
PFX u Y 1
PFX u 0 अ .

डिक्शनरीतील नोंद अशी दिसेल.
कार्यक्षम/wu

एकाच शब्दाला सफिक्स आणि प्रिफिक्स असे दोन्ही टॅग लावून यापूर्वी शब्द तयार केले नव्हते. म्हणून इथे नोंद घेतली.

हिंदी भाषेतील स्पेल चेकर आता उपलब्ध आहे. श्रीमती श्रीदेवी कुमार यांनी अफिक्स रूल्स बनविले तसेच डिक्शनरीतील शब्द टॅग करून दिले. जी.पी.एल. लायसन्सखाली आपली बौद्धीक संपदा खुली करून दिल्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच.

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/1979

मराठी लोकांना याचा थेट उपयोग नसला तरी आपल्या ओळखीतल्या लोकांना आपण याची माहिती करून देऊ शकतो. तसे पाहिले तर फायरफॉक्समध्ये हिंदी स्पेल चेक खाली दिलेल्या लिंकवर फार पूर्वीपासून उपलब्ध आहे.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/hindi-spell-checker/

पण तो अफिक्स / सफिक्स रूल वापरून लिहिलेला नाही. त्यामुळे तो फार उपयोगी नाही. हंस्पेल इंजिनचा पुरेपूर उपयोग करून बनविलेला हा स्पेल चेक हिंदी लोक वापरून पाहतील अशी अपेक्षा आहे.

नमस्कार शंतनु.
कृपया, बांटु, सेनुटो, Pama–Nyungan, Wardaman या भाषांतील स्पेल चेकर उपलब्ध करुन देऊ शकाल का? त्याबद्दल तुमच्या बौद्धीक संपदेचे आम्ही नक्की आभारी राहू.

मराठी लोकांना याचा थेट उपयोग नसला तरी आपल्या ओळखीतल्या आफ्रिकन व ऑस्ट्रेलियन लोकांना आपण याची माहिती करून देऊ शकतो, नै का?

हंस्पेल इंजिनचा पुरेपूर उपयोग करून बनविलेला हा स्पेल चेक माबोवरील आफ्रिकन व ऑस्ट्रेलियन लोक वापरून पाहतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

@शंतनु,
तुम्ही करत असलेल्या कष्टांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.

@अभिनव,
हे सर्व मुक्तस्रोत आहे, त्यामुळे तुम्ही हव्या त्या भाषेत स्पेल चेकर लिहून हातभार लावावा. _/\_

नव्यानेच इथे आलेले दिसता उपाशी बोका?
मागच्या एका पानावर मी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे ते वाचलेत का?
तेव्हा उगाच शहाणपणा करु नका. हे सर्व मुक्तस्त्रोत असेल ही , पण मराठी साईटवर मराठी प्रकल्पाची माहिती देण्याच्या धाग्यावर, काही कारण नसताना मधेच संबंध नसलेल्या भाषेच्या प्रकल्पाची माहिती घुसडण्याईतकी माझी बौद्धीक संपदा नाही, त्यामुळे नाईलाजाने तुमची विनंती नाकारावी लागत आहे. तुमची तेवढी असेल संपदा तर तुम्हीच का नाही करत असा एखादा मुक्तस्त्रोत प्रकल्प?

मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात, इतपत तरी संबंध आहे. तुम्ही संस्कृत बद्दल काही बोलला असतात, तर एक वेळ समजले असते, पण मुद्दाम तिरकसपणे बांटु, सेनुटो, Pama–Nyungan, Wardaman या भाषांबद्दल बोलायची गरज न्हवती, असे माझे मत आहे. म्हणून तुम्हाला विनंती केली आहे, आग्रह नाही.

<< तुम्हीच का नाही करत असा एखादा मुक्तस्त्रोत प्रकल्प? >>
प्रयत्नशील आहे. प्रोग्रामिंग शिकतोय अजून. सध्या फक्त आर्थिक मदत देतो.

मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात, इतपत तरी संबंध आहे
>>
इंग्लिश आणि ईटालियन या दोन्ही भाषा लॅटिन स्क्रिप्ट वापरतात. मग तुम्हाला इंल्गिश येत असेल तर ईटालियनही आपोआप येत असेलच ना? कारण दोन्ही भाषा एकच लिपी वापरतात! खालील ईटालियन वाक्याचा अर्थ, कोणतेही ट्रान्स्लेटर न वापरता सांगा:
sta 'zitto

लिपी एक आहे म्हणुन भाषा एक किंवा समान होत नाहीत हे तुम्हाला कळलेच असेल.

तुम्ही संस्कृत बद्दल काही बोलला असतात, तर एक वेळ समजले असते,
>>
काय समजले असते? मी संस्कॄत भाषेविरोधी काही का बोलेन?
हिंदी ऐवजी संस्कृतविरोधी बोलने तुमच्यामते कसे काय बरोबर आहे?

संस्कृत येत नाही म्हणुन महाराष्टरतल्या बॅ़ंका, रेल्वे, विमानतळ व केंद्रिय संस्था इथे माझे काहीही अडत नाही व कोणी मला देशद्रोही म्हणत नाही व कोणी अपमान करत नाही. पण महाराष्ट्राशी काही संबंध नसलेली हिंदी येत नसेल तर हे सगळे होते. मग मी हिंदी ऐवजी संस्कॄतचा विरोध का करेन?

पण मुद्दाम तिरकसपणे बांटु, सेनुटो, Pama–Nyungan, Wardaman या भाषांबद्दल बोलायची गरज न्हवती,
>>
त्यांनी मुद्दाम तिरकसपणे मराठी व महाराष्ट्राशी संबंधित नसलेल्या एका भाषेबद्दल बोलले, ते तुम्हाला खटकले नाही? पण मी त्यांचीच री पुढे ओढुन तेवढ्याच असंबद्ध भाषांबद्दल बोललो तर तुम्हाला लगेच खटकले? हा भेदभाव का?

या ठिकाणी एकच घाईत चुकीची टाईप झालेली स्पेलिंग वाचुन दुसरी बरोबर असलेली स्पेलिंग दुर्लक्षीत केल्याबद्दल व मूळ मुद्द्यावर बोलण्याऐवजी केवळ ट्रोलींग केल्याबद्दल हरचंद यांचा निषेध करण्यात येत आहे.

@अभि_नव
तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? कळले नाही. हिंदी स्पेल चेकर बद्दल शंतनू यांनी लिहिले, हा प्रॉब्लेम आहे का?

<< महाराष्ट्राशी संबंधित नसलेल्या एका भाषेबद्दल बोलले, >>
माझ्या अल्पमतीनुसार हिंदी भाषा महाराष्ट्राशी संबंधित आहे. पण ते असो, ते महत्त्वाचे नाही.

जाताजाता: मला संस्कृत येत नाही, पण इटालियन येते. Happy

तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? कळले नाही
>>
मराठी साईटवर मराठी प्रकल्पाची माहिती देण्याच्या धाग्यावर, काही कारण नसताना मधेच मराठीशी संबंध नसलेल्या भाषेच्या प्रकल्पाची माहिती देणे व असे करताना सर्व मराठी वाचकांना ही भलतीच भाषा माहितीच असेल असे गृहीत धरुन ते उत्पादन वापरुन बघायला सांगणे व ती भाषा लादणे.

अगदी हेच मी केले तर तुम्हाला राग आला व तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलात. पण माझ्या ज्या मुद्या मुळे तुम्हाला राग आला - भलत्याच आफ्रिकन व ऑस्ट्रेलियन भाषांचा उल्लेख करणे - ज्यांचा मराठीशी संबंध नाही - मग तसाच राग एक मराठी वाचक म्हणुन हिंदीचा उल्लेख केल्यावर मलाही येऊ शकतो हे माझे स्वातंत्र्य तुम्ही नाकारत आहत.

समजा, त्यांचा हा वरचा प्रतिसाद येण्या आधी, एक वाचक म्हणुन मला आवडलेल्या मराठीशी संबंध नसलेल्या आफ्रिकेतील बांटु भाषेतील भलत्याच प्रकल्पाची माहिती मी इथे दिली असती, तर इथले अनेक जण निषेध नोंदवत आले असते व मराठीशी कुठलाच संबंध नसलेल्या प्रकल्पची माहिती इथे देण्याबद्दल माझी "बौद्धीक संपदा" काढली असती.

माझ्या अल्पमतीनुसार हिंदी भाषा महाराष्ट्राशी संबंधित आहे. पण ते असो, ते महत्त्वाचे नाही
>>
तुमच्या अल्पमतीपेक्षा, historical verifiable peer reviewed fact based statistics दिलेत तर ते जास्त शास्त्रीय असेल.

मला संस्कृत येत नाही, पण इटालियन येते
>>
मला थोडी शंका आलीच होती की तुम्हाला कदाचीत इटालियन येत असेल. आता चांगलेच झाले की, मराठी व ईटालियन दोन्ही भाषेत तुम्हाला कळले मी काय म्हणतोय ते! Wink
अजुन ब-याच भाषा लॅटीन लिपी वापरतात. त्यापैकी तुम्हाला येत नसलेली कोणतीही भाषा तिथे कल्पना करुन घ्या व उत्तर द्या.

संगणकावर मराठी भाषा आणण्यासाठी जे लोक मेहनत करत आहेत, त्यांचे अनेक प्रयत्न हे हिंदी संगणकीय भाषेत आधी झालेल्या प्रयत्नांवर आधारलेले आहेत. ह्याचे कारण लिपी सारखीच असल्यामुळे संगणकाला अक्षर ओळखणे व त्यावरून शब्दाकडे जाणे सारखे आहे. शिवाय हिंदी वापरकर्ते आणि संगणकीय कार्यकर्ते दोन्ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उपयोग करून घेतल्यास चांगलेच आहे. चाकाचा शोध परत कशाला लावा? फक्त हे करताना मराठीस अनुरूप बदल कटाक्षाने केले गेले पाहिजेत, जे काही जण करत नाहीत. उदा. गुगल इनपुट कळफलक पाहिला तर त्यात मराठीत पूर्णविरामाऐवजी हिंदीप्रमाणे दंड आहे, जे चुकीचे आहे. आक्षेप हा अश्या गोष्टींवर नक्कीच नोंदवावा. पण त्यांनी काय केले आहे पहा आणि त्यातून चांगले ते घ्याहे सांगण्यात काही वावगे नसावे. आता मुळात स्पेल चेकर ही संकल्पनाच संगणकीय इंग्रजीवरून आली आहे. इतर भाषांवरून प्रेरणा घेणे हे असे चालायचेच. जर बहुसंख्य मराठी माणसांना हिब्रूवरून प्रेरणा घ्यावीशी वाटली तर ते तीही घेतीलच की! ज्यांना हिब्रू कळत नाही, त्यांनी ती घेऊ नका आणि पुढे जा.

हरचंद,
अतिशयच असंबद्ध प्रतिसाद देण्याचे खास शिक्षण घेतले आहे का?

इतर भाषांवरून प्रेरणा घेणे हे असे चालायचेच. जर बहुसंख्य मराठी माणसांना हिब्रूवरून प्रेरणा घ्यावीशी वाटली तर ते तीही घेतीलच की! ज्यांना हिब्रू कळत नाही, त्यांनी ती घेऊ नका आणि पुढे जा
>>
मराठी माणसांनी दुस-या भाषेतील प्रकल्पावरुन अजिबातच प्रेरणा घेऊन काही करु नये असे मी नक्की कुठे म्हटले आहे?

पण त्यांनी काय केले आहे पहा आणि त्यातून चांगले ते घ्याहे सांगण्यात काही वावगे नसावे.
>>
त्यांनी मराठी प्रकल्पावर जे काम केले त्याबद्दल मी त्यांना चांगले बोललो आहे मागच्या पानावर. पण त्याचा उल्लेख केला तर तुम्हाला असंबद्ध प्रतिसाद देऊन भलतेच आरोप करण्याचे सुख कसे मिळणार?

संगणकावर मराठी भाषा आणण्यासाठी जे लोक मेहनत करत आहेत, त्यांचे अनेक प्रयत्न हे हिंदी संगणकीय भाषेत आधी झालेल्या प्रयत्नांवर आधारलेले आहेत
>>
Please share commits, PRs and code. without that your claim is invalid.

ह्याचे कारण लिपी सारखीच असल्यामुळे संगणकाला अक्षर ओळखणे व त्यावरून शब्दाकडे जाणे सारखे आहे
>>
in other words you are claiming that the words and their meanings are also same. do you understand what are you saying?

शिवाय हिंदी वापरकर्ते आणि संगणकीय कार्यकर्ते दोन्ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उपयोग करून घेतल्यास चांगलेच आहे चाकाचा शोध परत कशाला लावा
>>
असे करु नये असे मी कुठे म्हटले?

आता मुळात स्पेल चेकर ही संकल्पनाच संगणकीय इंग्रजीवरून आली आहे.
>>
काय भारी शोध लावलाय तुम्ही. म्हणजे संगणक येण्याच्या आधी मराठीत कुणीही स्पेलिंग चेक करतच नव्हते का? तरीच तुम्ही खरे नाव लपवुन फिरताय ते?
---
आता तुम्ही मला सांगा की, "या प्रकल्पाकडे बघुन प्रेरणा घ्या" किंवा "या प्रकल्पातील या फाईल मधील हे मॉड्युल/कोड वापरुन मराठी लोकांनी अमुक एक प्रकल्प करा/सुधरा" असे त्यांनी कुठे सांगीतले? ते दाखवा. चॅलेंज तुम्हाला. ज्यावर आधारीत तुम्ही हा मोठा बिनबुडाचे आरोप करणारा विनोदी प्रतिसाद खरडला, ते शंतनु यांनी नक्की कुठे म्हटले. उलट त्यांनी तर , "मराठी लोकांना याचा थेट उपयोग नसला तरी" असे म्हणुन जाहीर कबुल केले आहे की त्यांनी काहीही संबंध नसलेला प्रतिसाद खरडलेला आहे व भाषा लदली आहे.

तसे तयांनी काहीच म्हटलेले नाही. त्यांनी भाषा लादली. आम्हाला संबंध नसलेली भाषा येतच असेल असे गृहीत धरले. ते उत्पादन वापरुन बघा असा फतवा काढला. आम्ही का वापरायचे? आमचा काय संबंध? ते उत्पादन वापरुन बघण्याईतकी आम्हाला कशी कळणार अशी कुठलीही भलती भाषा? मग तेच मी बांटूसाठी केले तर काय चुकले?

त्यांणी मराठी साईटवर मराठी प्रकल्पाच्या धाग्यावर काहीच संबंध नसलेल्या भाषेची माहिती, मराठी लोकांना त्याचा काहीही उपयोग नसताना दिली. हे सगळे त्यांनी हिंदीसाट्।ई करणे व मी बांटुसाठी करणे यात नक्की काय फरक आहे? हिंदी चालते तर बांटु पण चालवुन घ्या. मला एकट्याला कशाला बोलता? आधी सुरुवात त्यांनी केली. त्यांना आधी बोला.

हिंदी से इतनी नफरत क्यू???
शेवटी हिंदी मधलेच शब्द घेऊन मराठी बनलीय ना...हिंदी महाराष्ट्राशी संबंधित नाही हे पहिल्यांदा ऐकले...
उपाशी बोका +1

मराठी लोकांना एवढे गृहीत धरणे का???
द्वेष हिंदीचा नाही. हिंदी भाषीकांचाही नाही. विरोध सर्व २२ भाषांना समान दर्जा नसण्याला आहे.
विरोध हिंदी जबरदस्तीचा आहे. हिंदी येते की नाही यावरुन नागरीकता व देशप्रेम ठरवण्याचा आहे,
मराठीत सेवा नाकारुन महाराष्ट्रात फक्त हिंदीतच बोलणार याचा आहे,
सर्व देशभरातुन सर्व भाषीकांनी भरलेला कर फक्त हिंदी या एका भाषेवर खर्च करण्याला आहे,
दुतावासा मार्फक्त फक्त हिंदी ही भारताची भाषा हा समज पसरवण्याला आहे,
हिंदीतुनच केंद्रीय कामकाज करण्यावर आहे, व हिंदी लादण्याचा आहे.
केंद्रीय स्पर्धा परीक्षा फक्त हिंदी व इंग्लिशमधुअन घेण्याला आहे. अहिंदी राज्यात, सरकारी नोकरीसाठी हिंदी सक्ती करण्याला विरोध आहे.
हे सगळे तुम्हाला समजत नाही का?

शेवटी हिंदी मधलेच शब्द घेऊन मराठी बनलीय ना
>>
काहीतरीच. जपानीजमधले शब्द घेऊन मराठी बनलीय. नीट अभ्यास करा. /s

हिंदी महाराष्ट्राशी संबंधित नाही हे पहिल्यांदा ऐकले..
>>
I asked for proof of this from Upashi Boka too. You just picked the half part without offering any proofs? why do people like you fear so much to share any proof?

हिंदी चालते तर बांटु पण चालवुन घ्या >> हो, चालेल की. चिडता कशाला? जर वाचकांना तुमचे बांटु लेखन आवडले तर तुम्हाला प्रोत्साहनच देतील.

पण त्यांनी काय केले आहे पहा आणि त्यातून चांगले ते घ्याहे सांगण्यात काही वावगे नसावे.
>>
त्यांनी मराठी प्रकल्पावर जे काम केले त्याबद्दल मी त्यांना चांगले बोललो आहे मागच्या पानावर. पण त्याचा उल्लेख केला तर तुम्हाला असंबद्ध प्रतिसाद देऊन भलतेच आरोप करण्याचे सुख कसे मिळणार?
>>>> ह्यात कोणताही आरोप नाही हो. 'त्यांनी' म्हणजे शंतनू ह्यांनी नाही काही, इतर भाषिकांनी. ते वाक्य माझ्या आधीच्या वाक्याशी संबंधित आहे. कदाचित तुम्ही ह्या अर्थाने ते न घेतल्याने तुम्हाला असंबद्ध वाटले असेल. Happy

या पायथॉन स्क्रिप्ट नुसार सुमारे १२,००० (बारा हजार) शब्द दोन्ही भाषांच्या डिक्शनरीत दिसत आहेत. दोन्ही डिक्शनरी ह्या स्वयंसेवकांनी बनविलेल्या आहेत . जर दोन्ही भाषांतील तज्ज्ञांनी या डिक्शनरी बनवल्या तर दोन्हीत सारख्याच दिसणार्‍या आणि सारख्याच अर्थाने वापरल्या जाणार्‍या शब्दांची संख्या अजून बरीच वाढू शकते. बांटु, सेनुटो या व अशा इतर भाषांमधील शब्दांशी मराठीची तुलना वेळ मिळाल्यास जरूर करेन.

हिंदी भाषेचे महाराष्ट्राशी शेकडो वर्षांचे अतूट नाते आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यासारख्या संतांच्या हिंदी रचना उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळावर तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग वाचता येतील.
http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp

अर्थात आपला त्रागा मी समजू शकतो. हिंदी भाषेत विभक्ती प्रत्यय तोडून लिहितात (उदा: भारत के लिये) म्हणून मराठी लोक देखील "भारता च्या" किंवा "भारत च्या" असे तोडून लिहू लागले आहेत. हे चूक आहे. पण हे आक्रमण नसून स्वेच्छेने स्विकारलेली गुलामी आहे. किंवा अमिताभ बच्चन मराठी साहित्य संमेलनात एखादे मराठी वाक्य फेकून टाळ्या मिळवतो तेव्हा ते देखील मला मानसिक गुलामीचे लक्षण वाटते. पण ते माझे वैयक्तिक मत असते. मी ते कुणावरही लादत नाही. आणि लादायचे म्हटले तरी इतका कच्चा भिडू माझ्या आजुबाजूला तरी दिसत नाही.
_____

आपण ८ ऑगस्ट रोजी दिलेली प्रतिक्रिया "छान. धन्यवाद." आत्ताच वाचली. आपण केलेल्या कौतुकाने धन्य वाटले. हिंदी स्पेल चेकच्या पोस्टने कुणाच्या भावना इतक्या दुखावल्या जातील याची मला कल्पना नव्हती. भविष्यात हिंदी भाषेविषयी काही लिहायचे असेल तेव्हा कच्चा खर्डा आधी आपल्याला दाखवून परवानगी मिळाली तरच पोस्ट करीन. उदार अंतःकरणाने एक वेळ माफ करून हा विषय इथेच थांबवावा ही विनंती.

भविष्यात हिंदी भाषेविषयी काही लिहायचे असेल तेव्हा कच्चा खर्डा आधी आपल्याला दाखवून परवानगी मिळाली तरच पोस्ट करीन
>>
हे असे उलटे बोलुन नक्की काय साध्य करु इच्छीता? इथे मराठी माणसाला उपयोगी नसलेली व काहीही कारण नसताना दिलेली ही वरची पोस्ट मराट्।ई साईटवर मराठी प्रकल्पाची माहिती देण्याचा धाग्यावर लिहिण्याआधी परवानगी घेतली होती का? मग आता कशाला मानभावीपणा करता? तुम्हीच सांगा की त्या प्रकल्पाची माहिती इथे देण्याचा तुमचा उद्देश काय होता? त्याने मराठी माणसाचा नक्की काय फायदा झाला?

उदार अंतःकरणाने एक वेळ माफ करून हा विषय इथेच थांबवावा ही विनंती.
>>
या तुमच्या वरच्या पोस्टमधील खोटे दावे व मानभावीपणावर बोलतो आधी मग थांबतो. चालेल ना?

या पायथॉन स्क्रिप्ट नुसार सुमारे १२,००० (बारा हजार) शब्द दोन्ही भाषांच्या डिक्शनरीत दिसत आहेत
>>
यातुन सिद्ध काय होते? ते सगळे कॉमन शब्द संस्कृतमधुन आलेले कॉमन शब्द असतील. हिंदीतुन मराठीत कसे येतील. मराठी २५००-३००० वर्ष जुनी. हिंदी अलीकडची १००-१५० वर्ष जुनी. तिथुन इथे शब्द कसे येतील? संस्कृत मधुन जे आले, त्यात "पाण्डव" सारखी अनेक नावे असतील. अनेक शब्द स्पेलिंग कॉमन आहे पण त्याचे व्यवहारातले अर्थ वेगळे आहेत. उदा. व्यस्त. हे सगळे कोण बघणार?

बांटु, सेनुटो या व अशा इतर भाषांमधील शब्दांशी मराठीची तुलना वेळ मिळाल्यास जरूर करेन.
>>
का? त्याने मराठी माणसाचा काय फायदा होईल?

हिंदी भाषेचे महाराष्ट्राशी शेकडो वर्षांचे अतूट नाते आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यासारख्या संतांच्या हिंदी रचना उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळावर तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग वाचता येतील
>>
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे असामान्य व्यक्तीमत्व आहेत. त्यांचा विचार ईतर भाषीकांपर्यंत पोहोचावा म्हणुन त्यांनी ईतर भाषेत काव्य केले असेल.
संत नामदेव, संत रामदास हे सुद्धा भारतभर फिरुन कार्य करत होते. त्यामागे विचार प्रसार करणे हा उद्देश होता. याचा अर्थ लगेच महाराष्ट्राचा पंजाबी भाषेशी घनिष्ट संबंध आहे असा होत नाही. शिखांचे एक महत्वाचे देवस्थान नांदेडला आहे. याचा अर्थ पंजाबात मराठी बोलली जात होती असा होत नाही.
एक व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र नव्हे. आज २०२० मधे जर एखाद्या असामान्य कर्तुत्व असलेल्या प्रसिद्ध मराठी माणसाने, बांटु मधे एक कवीता लिहीली, तर आजपासुन ३०० वर्षानी, ज्या अर्थी २०२० मधे ती विशिष्ट प्रसिद्ध व्यक्ती बांटु मधे लिहित होती, त्याअर्थी बांटुचा व महाराष्ट्राचा घनिष्ट संबंध असला पाहिजे, असे त्यावेळचा समाज म्हणु शकेल का?
उत्तर हो की नाही मधे द्या.

अर्थात आपला त्रागा मी समजू शकतो.
>>
तो तुम्हाला समजला असता तर असा उलटा प्रतिसाद दिला नसतात.
मी आधीही स्पष्ट केले होते की विरोध हिंदी व हिंदी भाषीकांचा नाही. विरोध कशाचा त्याची यादी वर दिली आहे. तुम्हाला त्रागा एवढाच समजला आहे तर माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या बँका, रेल्वे, पोस्ट व इतर केंद्रीय संस्था इथे या व परिस्थिती बघा.

हिंदी स्पेल चेकच्या पोस्टने कुणाच्या भावना इतक्या दुखावल्या जातील याची मला कल्पना नव्हती
>>
भावना दुखावलेल्या नाहीत. तसे मी कुठेही म्हटलेले नाही.
केवळ हिंदी प्रकल्पाची माहिती दिली म्हणुन मी विरोध केलेला नाही. विरोध कशाचा केला ते आधीच्या प्रतिसादात स्पष्ट केले आहे.

तुमचा दांभिकपणा उघडकरण्यासाठी, माझा विरोध हिंदी व हिंदी भाषीकांना नसुन वर दिलेल्या यादीतील मुद्यांना आहे, ती यादी इथे परत देतो. यादी परत दिल्यावर तरी तुम्ही त्या समस्येवर एक वाक्यतरी बोलता का ते बघु:
द्वेष हिंदीचा नाही. हिंदी भाषीकांचाही नाही. विरोध सर्व २२ भाषांना समान दर्जा नसण्याला आहे.
विरोध हिंदी जबरदस्तीचा आहे. हिंदी येते की नाही यावरुन नागरीकता व देशप्रेम ठरवण्याचा आहे,
मराठीत सेवा नाकारुन महाराष्ट्रात फक्त हिंदीतच बोलणार याचा आहे,
सर्व देशभरातुन सर्व भाषीकांनी भरलेला कर फक्त हिंदी या एका भाषेवर खर्च करण्याला आहे,
दुतावासा मार्फक्त फक्त हिंदी ही भारताची भाषा हा समज पसरवण्याला आहे,
हिंदीतुनच केंद्रीय कामकाज करण्यावर आहे, व हिंदी लादण्याचा आहे.
केंद्रीय स्पर्धा परीक्षा फक्त हिंदी व इंग्लिशमधुअन घेण्याला आहे. अहिंदी राज्यात, सरकारी नोकरीसाठी हिंदी सक्ती करण्याला विरोध आहे.

तुम्हाला त्रागा समजलाय असे म्हणता तर वरील समस्येवर उपाय करण्यासाठी तुम्ही काय मदत करु शकता ते सांगा?

झांजर असा एक शब्द मराठीत आहे. दाते शब्दकोशाप्रमाणे त्याचा अर्थ "जीर्ण होणे" असा आहे. बृहद्कोशात देखील तो पाहता येईल.

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%...

"झांजर, झांजर झाली रात, एकवीरेची पहात होते वाट" या सुंदर कोळी गीतात तो फिट्ट बसतो. पण हा कोणता भलता शब्द इथे घुसवला? असे म्हणत काही मराठी माणसांनी त्यात "चांदण चांदण झाली रात” असा बदल केला! पण तो विषय नाही. मुद्दा असा आहे - झांजर या शब्दाची ४ सामान्यरूपे होतात झांजरा- झांजरे- झांजरी-, झांजऱ्यां- हंस्पेलमधील ३ टॅग ikl लावले तर हजाराच्या वर शब्द बनत आहेत. पण मुळात हा शब्दच आता वापरात नाही असे दिसत असल्यामुळे तो डिक्शनरीतून काढून टाकता येईल. पण तसे न करता तो शब्द ठेवून ते ३ टॅग मात्र काढून टाकले, डिक्शनरीचा आकार मर्यादित ठेवून स्पेल चेक जलद करण्यासाठी. असे करून काय मोठे दिवे लावणार? अशी काही झणझणीत प्रतिक्रिया आली नाही तर हा निर्णय बरोबर आहे असे समजू.

Pages