व्हिसल ब्लोअर-५

Submitted by मोहिनी१२३ on 16 November, 2020 - 03:56

भाग १- https://www.maayboli.com/node/77210
भाग २-https://www.maayboli.com/node/77219
भाग ३-https://www.maayboli.com/node/77224
भाग ४-https://www.maayboli.com/node/77249

दुसर्या दिवशी नेहाचे अंग दुखत होते, किंचीत कणकण जाणवत होती. आज सुटी टाकावी , किमानपक्षी घरून काम करावे असा विचार तिच्या मनात डोकावत होता.अचानक तिचा मोबाईल वाजू लागला.

तिच्या मॅनेजर आदितीचे नाव बघून तिला आश्चर्य वाटले. त्यांच्या कंपनीत असं सकाळीसकाळी कोणी फोन करत नसत. ॲाफिसला किती वाजताही या,तोपर्यंत कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. मात्र ॲाफिसमध्ये आल्यावर काम संपेपर्यंत किंवा दिवस संपेपर्यंत तुम्ही कंपनीचे असा तिथला खाक्या होता.

तिने जरा विचार करितच फोन घेतला. तेवढ्यात आदितीने “तू मेल बघितलेली दिसत नाहीयस , ती बघ” असं घाईघाईने बोलून फोन बंद केला.

अरे खरचं की ,असं पुटपुटतच तिने लॅपटॅाप चालू केला. तिने वेळावेळी व्यत्यय नको म्हणून मोबाईलवर अजून ॲाफिस मेल कॅान्फ्युगर केला नव्हता.

तिने मेल उघडली तर त्यात रिड रिसिप्ट मागितली होती. तिला आदितीच्या मेलसाठी हे सवयीचे होते त्यामुळे त्यात काही फार वेगळे वाटले नाही. त्या मेलप्रमाणे त्या दिवसापासूनचे नेहाचे २ आठवड्याचे वर्क फ्रॅाम होम मंजूर झाले होते. ती जरा बुचकळ्यातच पडली. तिला बर्याच दिवसांपासून सलग एका महिन्याचे वर्क फ्रॅाम होम तब्येतीच्या कारणासाठी हवे होते ही गोष्ट खरी होती.तिने आदितीशी बोलता-बोलता तशी १-२ दा विनंतीही केली होती. पण अधिकृतपणे काही नेहाने तशी मेल केली नव्हती. १ महिन्याचे वर्क फ्रॅाम हवे असताना केवळ २ आठवड्याचेच संमत झाले म्हणून ती जरा खट्टू झाली. पण अपेक्षा नसताना चोर ना चोराची लंगोटी म्हणत हे तरी मिळाले म्हणून तिने स्वत:ची समजूत काढली.

तिने तक्रार केल्यावर असं झाल्यामुळे यात काही काळंबेरं नाहीना ही शंका तिच्या मनाला चाटून गेली. पण पुढचे १५ दिवस ॲाफिसकाम,घरकाम आणि तिच्या आरोग्याच्या तक्रारी सोडवण्यात इतके भुर्कन गेले की त्या शंकेला डोकं वर काढायला वावच मिळाला नाही.

१५ दिवसांनी नेहा फ्रेश होऊन प्रसन्न मनाने, नवीन उत्साहाने ॲाफिसमध्ये गेली.डेस्कवर गेली तर तिच्या मित्रमैत्रिणींचा तिच्या भोवती गराडा पडला. त्यांचे हालहवाल विचारीत ती जरा स्थिरस्थावर झाली. तेवढ्यात तिला तिच्या नावाची तिच्याच कंपनीच्या सीलची न उघडलेली ३ -४ पत्रं दिसली. तिला आश्चर्य वाटलं. तिने त्वरित सर्वात वरचं यूएस ॲाफिसमधून आलेले पत्र उघडले. त्यात “तुम्ही कल्पनाच्या चौकशीत कोणतेही सहकार्य न केल्याने ही चौकशी थांबवण्यात आली आहे” असं लिहीलं होतं. ती चक्रावून गेली. घाईघाईत तिने सर्व पत्रं उघडली. बाकी सर्व पत्रं पुणे एचआर कडूनच होती. वेगवेगळ्या तारखांची, तिने चौकशीला प्रत्यक्ष उपस्थित राहावं हे कळवणारी ती पत्रं होती. तसेच या बाबतीत कोणत्याही वेगळ्या मार्गाने संपर्क साधला जाणार नाही अशी बारिक तळटीप प्रत्येक पत्रात होती.

नेहाने हे सर्व वाचलं. आपण किती हतबल आहोत, आपल्याला भयंकर षडयंत्र रचून या चौकशीपासून दूर ठेवण्यात आलं आहे या विचाराने तिला रडू कोसळले.

https://www.maayboli.com/node/77292

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मृणाली. पुढचा भाग लवकरच लिहीन. तोपर्यंत तुम्हाला तुमचा अंदाज बांधायचा, लिहायचा असेल तर स्वागतच आहे.

धन्यवाद शब्दसखी.
पुढचा भाग शनिवारपर्यॅत लिहीन आणि जरा मोठा लिहीन.

इथेच बैठक समपवतो आजची...
फार फार तर मी ह्या टाइप च्या कथा लोकमतच्या OXYGEN मध्ये वाचल्या असतील एक किंवा दोनदा.
पण त्याला बरेच महीने झाले आता तोच Oxygen दोन पानांचा तुटपुंजा झालाय!
बरयापैकी आवडली Happy
पुलेशु(belated)