लेकीने घरी रंगवलेल्या पणत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2020 - 16:45

गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले Happy

लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.

माझा स्वतःचा कलरींग वा एकूणच चित्रकलेबाबत बाबत आनंदी आनंद असल्याने मला या कलेचे विशेष कौतुक वाटते,
बालमजूरी गुन्हा नसता तर पणत्यांचे दुकानच टाकायचा विचार मनात आलेला Happy

असो, फराळाआधी पणत्या रंगल्या, दिवाळीची सुरुवात आमच्याघरी लेकीनेच केली.
सर्वांना शुभ दिपावली Happy

1605128688786.jpg
.
1604691778092.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान Happy
एकदम क्रिएटिव्ह आहे परी .
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा !!

छान

Nice pari

छान !

छान...
सुंदर रंगविल्या आहेत पणत्या...

खूप छान परी बाळा,मला ती पानाच्या आकारातील पणती आवडली. किती वेगवेगळे रंग वापरले आहेत. शाब्बास!!

आमच्याही दोन्ही मुलांनी रांगोळीचा नुसता पसारा मांडला आहे. 10प्रकारच्या वेगवगळ्या छोट्या छोट्या रांगोळया आणि रंगसंगती.

सुंदर कलात्मक रंगकाम. तेल, वाती घालून पेटविल्यानंतर प्रकाशात आणखीनच सुंदर दिसणार. त्यांचीही छायाचित्रे पाठवावीत.

>>>>>>>>>.मला ती हिरवे सूर्यकिरण टाईप डिझाईन वाली जास्त आवडली>>>>>>>>>>
+१००

सर्वांना खूप खूप थँक्स, आणि परीचे नाव घेत कौतुक केल्याबद्दलही धन्यवाद. या धाग्याबद्दल परीला अजून काही सांगितले नाही. उद्या कॉमेंटसह दाखवेन वाचून. तिला नक्कीच फार आनंद होईल. मागच्या गणेशोत्सव स्पर्धेच्या वेळीही तिला कॉमेंटस म्हणजेच वोटस आणि प्राईज वाटले होते Happy
शेवटी माझी लेक आहे, प्रतिसादांची हाव असणारच Wink

.
मुलीची, चित्रकलेची आवड जोपासा, मूल आपोआपच पुढे जाते मग.
>>>़
@ झंपी, हो. तिच्या सर्वच चांगल्या आवडी अन छंद जोपासतो. त्यांच्याशिवाय पुढे जाण्याला काही अर्थही नसतो Happy

@ हिरवे सूर्यकिरण टाईप डिझाईन वाली >>>> हो मलाही ती सर्वात जास्त आवडली. त्यात भिन्न कलर वापरल्याने ज्या हिरव्या कलरच्या शेड आल्यात त्या पुन्हा ठरवूनही येऊ नयेत तिला अश्या जमल्यात.

@ पानाच्या आकारातील पणती >>>>>> हि दुसरी आवड्ती, कारण रंगसंगती छान जमल्यात. आणि मध्ये तो पानाचा देठ आणि त्यावर ठिपके हा एक्स्ट्रा टच आहे.
बाकी ईतर दोघांत टिकल्या वगैरे चिकटवून गेट अप आलाय.

@ सियोना,
आमच्याही दोन्ही मुलांनी रांगोळीचा नुसता पसारा मांडला आहे.
>>>>>>
हो, आमच्याकडेही नवरात्रीत भली मोठी रांगोळी काढून झालीय. आता दिवाळीतही धुमाकूळ असणातच तो. आजच रांगोळी आणि रंगाचा स्टॉक भरला. त्याशिवाय दिवाळी नाही Happy

@ किशोर,
तेल, वाती घालून पेटविल्यानंतर प्रकाशात आणखीनच सुंदर दिसणार. त्यांचीही छायाचित्रे पाठवावीत. >>>.. हो, नक्कीच Happy

Pages