लेकीने घरी रंगवलेल्या पणत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2020 - 16:45

गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले Happy

लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.

माझा स्वतःचा कलरींग वा एकूणच चित्रकलेबाबत बाबत आनंदी आनंद असल्याने मला या कलेचे विशेष कौतुक वाटते,
बालमजूरी गुन्हा नसता तर पणत्यांचे दुकानच टाकायचा विचार मनात आलेला Happy

असो, फराळाआधी पणत्या रंगल्या, दिवाळीची सुरुवात आमच्याघरी लेकीनेच केली.
सर्वांना शुभ दिपावली Happy

1605128688786.jpg
.
1604691778092.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल संध्याकाळी लेकीने बाल्कनीत रांगोळी काढली. त्यावर रात्री मी तिने रंगवलेल्या पणत्या ठेवल्या Happy

मधली पणती विकतची आहे. ती तिने स्वत: ठेवली. पणतीची रांगोळी काढून त्यावर पणती ठेवायची हा तिचा मूळ प्लान होता. या धाग्यावर झालेली फोटोची मागणी आणि तिची एकूण कलाकुसर एकाच फोटोत यावी म्हणून तिच्या चार मी ठेवल्या.

1605469109386.jpg
..

1605469152795.jpg

तो आतला पणतीचा छाप असावा. काही त्या चाळणीने काढते काही हाताने. एवढे कोरीवकामाची अजून प्रॅक्टीस नाही. रंगसंगती मात्र छान करते. आवड आहे हे विशेष. तिचे ती करते.

हि नवरात्रीच्या वेळची रांगोळी.
Happy Devi's Day Happy
तेव्हा छापे वगैरे नव्हते.

1605484158805.jpg
.
1605484183703.jpg

Pages