(अतिशय झटपट होणारी)--केशर-ड्रायफ्रूट मलई कुल्फी

Submitted by क्रिशा on 27 October, 2020 - 13:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

-हेवी व्हिपिंग क्रीम 16 oz
-१ कॅन स्वीटंड कंडेन्सड मिल्क, 14 oz
-१ कॅन एवापोरेटेड मिल्क, 12 oz
-बदाम पिस्ते काप (आवडीप्रमाणे)
-७-८ केशराच्या काड्या
-पाऊण चमचा घरी केलेली फ्रेश वेलदोडा पावडर

क्रमवार पाककृती: 

कृती :
-वरील सर्व साहित्य चमच्याने किंवा मोठ्या डावाने मिक्सिन्ग बोल मध्ये छान मिक्स करून ,कुल्फी मोल्ड मध्ये भरून फ्रिझर मध्ये रात्रभर किंवा ५-६ तास ठेवणे.
-दुसऱ्या दिवशी मस्त क्रिमी कुल्फी तयार

वाढणी/प्रमाण: 
साधारण १० कुल्फ्या (कुल्फी मोल्ड च्या साईझ वर डिपेंड आहे )
अधिक टिपा: 

-हे साहित्य मिक्स करायला ५ मिनिट्स देखील लागत नाहीत. खूप झटपट कुल्फी होते ही. (फ्रिझर चा वेळ अर्थातच धरला नाहीये)
-पार्टी / पॉटलक मध्ये ही कुल्फी एकदम हिट होते.
-कुल्फी मोल्ड्स नसतील तर पोपसिकल मोल्ड पण वापरू शकता.
-लहान मुलांना पण तुमच्या मदतीने ही कुल्फी करता येईल आणि ती एन्जॉय करतील..
-हि कुल्फी माझ्या छोट्या मुलीने केली आहे ..(under my supervision)

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटो जबरदस्त आहे!
चवही छानच असणार!
एवापोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर का?

मस्त फोटो.
वावे, एव्हएपोरेटेड मिल्क म्हणजे अनस्विटन्ड कंडेस्ड मिल्क. मिल्कमेड विथ नो शुगर अ‍ॅडेड. थोडक्यात आटवलेलं दूध.
भारतात कॅन्ड मिळतं का माहित नाही.

एव्हएपोरेटेड मिल्क म्हणजे अनस्विटन्ड कंडेस्ड मिल्क.> ओह ओके.
हो , हे कधी बघितल्याचं आठवत नाही. मग याला पर्याय काय? मिल्क पावडर का?

मस्त फोटो. मी पूर्वी सेम पद्धत वापरत असे. आता इवॅपोरेटेड मिल्क नाही वापरत. हेवी विपिंग क्रिम फेटून घेते , सॉफ्ट पिक्स पेक्षा जरा जास्त आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क फोल्ड करते.

थँक्यू ऑल.

धनि : मी व्हिपिंग क्रिम व्हिप नाही करत. मार्केट मधून आणलेलं डायरेक्ट तसेच वापरते.

वावे : अमितव ने सांगितल्याप्रमाणे एव्हएपोरेटेड मिल्क म्हणजे अनस्विटन्ड कंडेस्ड मिल्क.
घरी देखील करता येते एव्हएपोरेटेड मिल्क....YouTube वर बघा. खूप रेसिपीज मिळतील.

हा लागणाऱ्या जिन्नसांचा फोटो.
WhatsApp Image 2020-10-27 at 9.50.35 AM.jpeg

ही मी नेहमी करते... मस्त आणि सोपी आहे पाककृती.
दिसते पण छान क्रिशा. Happy
https://www.google.com/amp/s/www.thekitchn.com/what-s-the-difference-bet...
Evaporated milk is different than unsweetened condensed milk in texture. कारण त्याचा पोत बिनसाखरेच्या बासुंदीसारखा असतो आणि condensed चा अगदी गोड घट्ट रबडीसारखा असतो. फक्त evaporated वापरले तर पातळ होईल आणि खडे रहातील. तर दोन्ही लागेल.
ही रेसिपी मला मटका कुल्फीची आठवण करून देते.

फोटो टेम्प्टिंग आहे.

>>एव्हएपोरेटेड मिल्क म्हणजे अनस्विटन्ड कंडेस्ड मिल्क.
नाही. अजिबातच नाही. आटवलेले दूध म्हणून खपवायचं तर चालेल. कालच मुलाने घरातल्या हेवी विपिंग क्रिमला साखरेत सजवले आणि खातायत मस्त पैकी. त्यांना ही कुल्फी आवडू शकेल. Happy

काय अमेझिंग दिसत आहे कुल्फी, एकदम प्रो फोटो!
चव पण अफलातून भारी असते, मी खाल्ली आहे क्रिशाने केलेली कुल्फी. Happy

भारतात ईव्हॅपोरेटेड मिल्क तयार करण्यासाठी, दूध आटवा; कोजागिरीचं दूध असतं तसं आणि बासुंदीच्या मध्ये, साखर न घालता.
तसही या कुल्फी प्रकारात अमितव म्हणतोय तसे अनस्विटन्ड कंडेंस्ड मिल्क टेक्चर व्हॅपोरेटेड मिल्क ऐवजी वापरले तरी चव एकदम रिच भारीच लागेल कि ! त्याचा कशाला एवढा बाऊ करायचा Wink

भारी.
मी १ कॅन इव्हॅपोरेटेड मिल्क आणि अर्ध्याहून थोडा(च) जास्त कन्डेन्स्ड मिल्कच्या कॅनमधला ऐवज - असं एकत्र करून कुल्फी करते. व्हिपिंग क्रीम घालत नाही.

>>आऊन्स पौंड

किलो मध्ये लिहा प्लिज>>
ब्लॅक कॅट,
क्रिम साठी १६ औस म्हणजे साधरण ४७५ मिली लि. , देशात असाल तर अर्धा लिटर अमूल क्रिम वापरु शकता. १४ औस कंडेन्स्ड मिल्क म्हणजे साधारण ४०० ग्रॅम. माझ्या आठवणीत देशात मिल्कमेड मिळायचे , तो कॅन साधारण तेवढाच असे. तशी ही पाकृ बिघडायला अजिबात वाव नाही. अधिक गोडवा हवा म्हणून फार तर १/४ कप वाढीव साखर. मी यात १ टे. स्पून इंस्टंट कॉफी(नेसकॉफी) पावडर घातल्यास किंवा चॉकलेट चिप्स वितळवून घातल्यास १/४ साखर घालते.

फारएण्ड : स्वीटंड कंडेन्सड मिल्क मध्ये भरपूर साखर असते ऑलरेडी ..त्यामुळे वरून साखर घालण्याची गरज नाही.

किशोर मुंढे : फळांचे रस घातले तर कुल्फी मध्ये अधून मधून बर्फ लागेल. पण तुम्ही करून बघू शकता.

स्वाती २ : मिलीमीटर , ग्रॅम मध्ये प्रमाण दिल्याबद्दल धन्यवाद .

थँक्यू ऑल.

झटपट कृती आहे. छान.

मी दूध आटवून करते. थोडे खडे झाले तरी आवडते कारण फुसफुस सोफ्टीपेक्षा चांगली चव येते. उद्या कोजागिरी त्यानिमित्ताने होईलच.

फोटो भारी आहे.