मला नजर उतरवणे या प्रकाराबद्दल माहिती हवी आहे. काही दिवसांपूर्वी माझा लहान मुलगा खूप जोरात रडायला लागला. लहान मुलं रडतात त्यातला हा प्रकार असेल म्हणून आम्ही जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या दिवसापासून त्याची चिडचिड आणि रडणं हे वाढतच गेलं. मुलात अचानक झालेला बदल पाहून आम्ही जरा गोंधळून गेलो. आमच्या शेजारचे होते त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी बाई कामाला येते त्या नजर काढतात त्यांच्याकडून नजर काढून घ्या. आमचा दोघांचा या गोष्टीवर विश्वास नाही तरीसुद्धा मनाची समजूत म्हणून आम्ही त्या बाईकडून नजर काढून घ्यायची ठरवलं. ती बाई कामाला आलेली असताना आम्ही तिला बोललो नजर उतरवून द्या. यावर त्या बाईने काहीतरी कारणं देऊन वेळ मारून नेली. पुढील दोन तीन दिवस ती बाई अशीच इकडची तिकडची कारणं देऊन नजर उतरवण्यासाठी टाळाटाळ करू लागली. शेवटी तो विषय आम्ही सोडून दिला. नन्तर काही दिवसांनी हीने जेव्हा बिल्डिंगमधल्या एका मैत्रिणीसोबत बोलताना हा विषय काढला तेव्हा आम्हाला समजलं की त्या कामवाली बाईला मुलाचं हसणं खेळणं बघवायचं नाही. तिचीच नजर त्याला लागली असण्याची शक्यता होती. जर तिने नजर उतरवली असती तर ती तिच्यावर उलटली असती म्हणून ती नजर काढण्यास टाळाटाळ करत होती. या बाबतीत नक्की किती तथ्य आहे?
नजर उतरवणे हा प्रकार नक्की काय असतो?
Submitted by अनिळजी on 25 October, 2020 - 00:50
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इथे काल्पनिक काय काय आणि कोण
इथे काल्पनिक काय काय आणि कोण कोण आहे
तुम्ही सगळे खरे आहात की
तुम्ही सगळे खरे आहात की काल्पनिक आहात? मला वाटतंय माझी अवस्था युट्युबवर असलेल्या द डॉलमेकर शॉर्टफिल्म सारखी झाले. मी एकटाच खरा आहे बाकी सगळे काल्पनिक आहेत.
तुमचं काही खरं दिसत नाही.
तुमचं काही खरं दिसत नाही. सांभाळुन रहा. वाटल्यास बाहेर जाताना खिशाला लिंबु मिरच्या टाचुन घेत जा.
अटेंशन सीकिंग जास्त एंटरटेन
अटेंशन सीकिंग जास्त एंटरटेन केल्यास रोग बळावू शकतो.
हळूहळू माबोकर प्रामाणिकपणे विचारलेल्या प्रश्नासही उत्तर देईनासे होतील. 'लांडगा आला रे आला' टाइप्स.
मी माझ्या मुलाच्या नावाचा
मी माझ्या मुलाच्या नावाचा आयडी घेतल्यास त्या आयडीला मिळणारे शिव्याशाप मला भोगावे लागतील (जो मूळ कृती करतो) की माझ्या मुलाला (ज्याच्या नावाने लोक शिव्याशाप देतात)?
आमच्या इथे एकजण होता. त्याला
आमच्या इथे एकजण होता. त्याला कोणाचीतरी नजर लागली होती. त्याच्या शरीरावर एका वाईट शक्तीने कब्जा केला होता. घरच्यांनी एका मांत्रिकाला बोलावलं. मांत्रिक आला तसा ती दुष्ट शक्ती घाबरली आणि पछाडलेल्या व्यक्तीला काहीच झालं नाही हे दाखवायला ती व्यक्ती हसू खेळू लागली. जी व्यक्ती काही मिनिटांपूर्वी दुसऱ्यांना शिव्या शाप देत होती ती सगळ्यांसोबत अचानक गोड वागू लागली. मांत्रिकाला त्या दुष्ट शक्तीचा डाव समजला आणि जादुई झाडूने त्या शक्तीला कैद केलं.
कशात कैद केले???
कशात कैद केले???
मी पण अशीच एक घटना पाहिली होती.त्यात मांत्रिकाने वाईट शक्तीला हॉट बॉक्स (casserole) मधे कैद केले होते.
एका काचेच्या बाटलीत.
एका काचेच्या बाटलीत.
कैदेतुन सुटका हवी म्हणून त्या
कैदेतुन सुटका हवी म्हणून त्या दुष्ट शक्तिने अटकपूर्व जामिन घेतलेला असेल तर ?
मी एकटाच खरा आहे बाकी सगळे
मी एकटाच खरा आहे बाकी सगळे काल्पनिक आहेत >> अनिळजी, यू आर द वन. द मॅट्रिक्स इझ आफ्टर यू!
:).
:).
द मॅट्रिक्स इझ आफ्टर यू!>>
द मॅट्रिक्स इझ आफ्टर यू!>> एजंट स्मिथ आय प्रिज्युम.
हा आमच्या हॉस्पिटलात घडलेला
हा आमच्या हॉस्पिटलात घडलेला खरा प्रसंग
बर्डे ला आम्ही केक आणतो , गेली 7 वर्षे अगदी धार्मिक वातावरण , सगळे सण , दिवे , आरती आणि बर्टडे केक सुरू आहे
एक जण नवा आला , दुसऱ्या एकाच्या बर्डेला बोलला , मी केक आणतो
तो गेला , आता त्या दोघांचे काहीतरी भांडण होते / असावे , तर त्याने केकवर लिहून आणले happy birthday Dian डायन !
ही घटना फेब्रुवारी 2020 ची
मी त्याला जोरदार झापला , काय केलेस हे मुर्ख
त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा चशमा मोडला , तो दुरुस्तीला टाकावा तर दुसर्याचीही काच मोडली , मग दोन्ही दुरुस्त केले, 1800 रु बुडाले , माझा पूर्वीचा एक चशमा हिरवा होता , आता दोन्ही काळे आहेत
एक जण गाडीवरून पडला
दुसर्याच्या घरी काहीतरी झाले
त्यानंतर करोना आला
अर्ध्या staff वर 4 महिने काम केले
4,5 जण स्वतः आजारी पडले , त्यात मीही
इन्क्रीमेंट बुडाले , म्हणजे अजून आले नाही
ज्याने डायन ला बोलावले , त्याची करोना काळात दुसरीकडे ट्रान्सफर झाली , त्याच्या शिवाय आणि त्याचा रिप्लेस मेंट न येता आम्ही 3,4 महिने एक्स्ट्रा काम केले
आणि सध्या सगळ्यांचे बर्डे बंद पडले आहेत
म्हणजे कोरोनाच्या महामारीला
म्हणजे कोरोनाच्या महामारीला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही सगळे उगीचच त्या चीनवर खापर फोडत होतो. काय एकेक आंदोलनं, बहिष्कार विचारु नका.
>> आमच्या इथे एकजण होता.
>> आमच्या इथे एकजण होता. त्याला कोणाचीतरी नजर लागली होती. त्याच्या शरीरावर एका वाईट शक्तीने कब्जा केला होता. >> आणि तो असले येडपट धागे काढत सुटला!
नजर लागू नये म्हणून काळाच
नजर लागू नये म्हणून काळाच टिक्का का लावतात यामागचे कारण कोणाला माहीत आहे का? काय असते त्या काळ्या रंगात? काही सामर्थ्य असते की त्या गोष्टीच्या सौंदर्याला एखादा डाग लावावा असा हेतू असतो?
प्र का का न का टा आ
प्र का का न का टा आ
Pages