नजर उतरवणे हा प्रकार नक्की काय असतो?

Submitted by अनिळजी on 25 October, 2020 - 00:50

मला नजर उतरवणे या प्रकाराबद्दल माहिती हवी आहे. काही दिवसांपूर्वी माझा लहान मुलगा खूप जोरात रडायला लागला. लहान मुलं रडतात त्यातला हा प्रकार असेल म्हणून आम्ही जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या दिवसापासून त्याची चिडचिड आणि रडणं हे वाढतच गेलं. मुलात अचानक झालेला बदल पाहून आम्ही जरा गोंधळून गेलो. आमच्या शेजारचे होते त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी बाई कामाला येते त्या नजर काढतात त्यांच्याकडून नजर काढून घ्या. आमचा दोघांचा या गोष्टीवर विश्वास नाही तरीसुद्धा मनाची समजूत म्हणून आम्ही त्या बाईकडून नजर काढून घ्यायची ठरवलं. ती बाई कामाला आलेली असताना आम्ही तिला बोललो नजर उतरवून द्या. यावर त्या बाईने काहीतरी कारणं देऊन वेळ मारून नेली. पुढील दोन तीन दिवस ती बाई अशीच इकडची तिकडची कारणं देऊन नजर उतरवण्यासाठी टाळाटाळ करू लागली. शेवटी तो विषय आम्ही सोडून दिला. नन्तर काही दिवसांनी हीने जेव्हा बिल्डिंगमधल्या एका मैत्रिणीसोबत बोलताना हा विषय काढला तेव्हा आम्हाला समजलं की त्या कामवाली बाईला मुलाचं हसणं खेळणं बघवायचं नाही. तिचीच नजर त्याला लागली असण्याची शक्यता होती. जर तिने नजर उतरवली असती तर ती तिच्यावर उलटली असती म्हणून ती नजर काढण्यास टाळाटाळ करत होती. या बाबतीत नक्की किती तथ्य आहे?

Group content visibility: 
Use group defaults

काहीही तथ्य नाही.

एव्हढे बोलून मी माझे भाषन संपवतो,
जय हिंद जय महाराष्ट्र

<< काहीही तथ्य नाही. >>

--- सहमत....
कसलाही आधार नसलेल्या अनेक खुळ्या कल्पना आहेत, त्यापैकी एक. काहीच तथ्य नाही.

नजर के सामने जिगर के पास
मध्ये अनु अगरवाल आणि राहुल रॉय यांची एकमेकांना नजर लागली आणि दोघांची करियर बुडली Happy

नजर उतरवणे म्हणजे वर बघून मग हळूहळू खाली बघत येणे. तुम्ही शीर्षकामध्ये नजर उतरवणे म्हणजे काय हे विचारले आहे आणि खाली नजर 'काढणे' लिहिले आहे. नक्की काय पाहिजे आहे?

नजर उतरवणे म्हणजे डोळ्यावरील चश्मा / कॉन्टेक्ट लेन्स काढून सुरक्षित पेटीमध्ये ठेवणे.
दुसऱ्या दिवशी कामावर जाताना नजर चढ़वावी लागते

नजर काढायला कामवाली बाई कश्याला हवी?
आपणही घरच्या घरी काढू शकतो.
लाल मिरच्या आणि चवीपुरते मीठे घेऊन तीन वेळा मुलाच्या वरखाली फिरवावे आणि गरम तव्यावर जाळावे.
धूर नाही आला तर समजावे नजर लागलीय आणि ती घातक आहे. मग एक्स्पर्ट ॲडवाईज घ्यावा. माण्त्रिक तांत्रिक वगैरे.

मीठ जाडे हवे
आणि मूल लहान असल्यास त्याला जो उचलून घेईल ती व्यक्ती आई, बाबा किंवा मावशी असावी.

अनिळजी आणखी एक टीपी धागा...
त्या काल्पनिक कामवालीचा पगार वाढवा.. म्हणजे तुमच्या काल्पनिक मुलाला नजर लागणार नाही...

एक वर्षापर्यंतच्या काल्पनिक मुलाची काल्पनिक नजर आईने काढू नये असा खरा संकेत आहे. घरात इतर काल्पनिक स्त्री नसल्यास (थँक्यूच बाबा!!), बाबाने नजर काढली तरी चालते. पण बाळाला घेवून आईने टेबलावर बसावे. कारण बाबालोक नीट वाकून नजर काढत नाहीत हा माझ्या आसपासच्या सव्वादोन घरातील अनुभव आहे आणि त्यावरून ते मायबोलीवर ठासून लिहीता येईल असे शाश्वत सत्य आहे. काल्पनिक नजर काढण्यासाठी खर्‍याखुर्‍या मीठ-मोहर्‍या घ्याव्या. चार ओळींचा मंत्र म्हणत त्या बाळावरून उतरून पाण्यात वाहून द्याव्या. मंत्र इथे तिथे उपलब्ध नसतो. पब्लिक फोरम वर लिहायचा नसतो. आजी सहसा नातीला देते. खर्‍या आजीला मंत्राबद्दल विचारू नये, ती तुमची* नजर काढेल...
(*तुमची= विनोदबुद्धी जागृत असलेल्या कुणाचीही!!)

शेजारच्या घरी येणाऱ्या कामवालीचा पगार हे कसे वाढवतील. >> म्हणूनच वाढवायचा... आपल्याला थोडी द्यायचाय.... Biggrin

>>शेजारच्या घरी येणाऱ्या कामवालीचा पगार हे कसे वाढवतील.

वाढीव पैसे स्वतःच्या खिशातून देऊन Happy

तुम्ही कधी "किसीं नजर को तेरा इंताजार आज भी है" हे गाणे कानावर येत असताना मुलाला मांडीवर घेऊन बसला होता का? आठवा. आता कदाचित आठवणार नाही तुम्हाला, पण हे गाणं कानावर येत असताना जर मुलांना आपण मांडीवर घेतले असेल तर त्यांना कुणाची तरी नजर हमखास लागतेच.
अशा वेळेस मुलांना पटकन बाजूला बसवावे किंवा ते शक्य नसल्यास त्यांचे तोंड तरी झाकावे.
असो.

आता गावा बाहेरील एखादा पडका बंगला कुणाच्या नावाचा आहे याचा शोध घ्या.
पौर्णिमेच्या रात्री त्या बंगला मालकाच्या नावाचे स्मरण करत "नजर लागे राजा तोरे बंगले पर" या गाण्याची चार पाच पारायणे करावीत.
असे केल्याने आपल्या कुटुंबियांना लागलेली नजर त्या बंगल्याकडे निघून जाते आणि एवीतेवी तो पडका बंगला असल्याने कुणाचे नुकसानही होत नाही. हा उपाय हमखास काम करतो, जर पूर्ण श्रद्धेने केल्यास.
तुमचा विश्वास नसेल तर राहु द्या.

आणि कोणा बिल्डर ला तो पाडून तिथे अपार्टमेंट उभी करायची असेल तर त्याला आधीच कल्पना द्यावी आणि बदल्यात काही अर्थार्जनही करावे
मिळालेले पैसे घराच्या अग्नेयोत्तर कोपऱ्यात खड्डा खणून पुरून ठेवावेत
आणि वास्तुदेवतेचे स्मरण करावे

Biggrin
दोन मुले असतील तर मानवदादांचा उपाय झाल्यावर एकमेकांना "नजर ने नजर से क्या कहां?..." असे विचारोन पडताळा घ्या... तुमचा विश्वास नसेल तर आमचा घेऊन जा... उपद्व्यापीच आहे!!!

अनिळजी मी वर उत्तर दिले आहे. ते वाचा आणि तसे करा.
आता लोकं उगाच टीपी करणार. दुर्लक्ष करा.

नजर लागणे वगैरे काही नसते हे बोलणे खूप सोपे असते
पण आपल्याला मूल झाले आणि ते उगाचच रडू लागले की सारेच नजर काढतात असा माझा अनुभव आहे.

जादू 'तेरी नजर..म्हणा कामवालीला..दुसऱ्याच दिवसापासून नजर ने नजर से क्या कहा.. किस्सा सुरु होईल..

नजरोसे से कह दो प्यार मे मिलने का मौसम आ गया.. अनिलजी कामवालीच भूत तुमच्या प्रेमात पडलंय.. म्हणून नजर लागली तुम्हाला..

बिल्डिंगमधल्या एका मैत्रिणीसोबत बोलताना हा विषय काढला >> ही मैत्रीण खरी आहे की काल्पनिक. हिची नजर लागलेली दिसते तुम्हाला.

Pages