सोपा -झटपट बरबन बिस्कीट केक...

Submitted by MSL on 7 October, 2020 - 12:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 बर्बन बिस्कीट पुढे (३०/-) , अर्धा चमचा इनो, 1/२ वाटी दूध, decoration साठी काजू बदाम वेगेरे

क्रमवार पाककृती: 

1: सर्व बिस्कीट मिक्सरवर बारीक चुरा करून घ्यावी
2: थोडे थोडे दूध घालत ढवळावे, इडली बॅटर प्रमाणे consistency यायला हवी...
3: ईनो अर्धा चमचा घालून पुन्हा एकदा ढवळायच...
4: ज्या भांड्यात केक करणार त्याला तुपाचा हात लावून घ्यावा, आणि बॅटर ओतावे त्यात...जरासे हलवून मग बेकिंग la ठेवावं..
5: मध्यम गॅस वर सुमारे 40 मिनिटे ठेवून केक तयार..
6: पूर्ण शिजला हे बघून मग गॅस बंद करावा..10 मिनिटे तसाच ठेवून, नंतर काढून घ्यावा..
7: आवडते decoration करा
8: मी कढई 10 मिनिटे प्रेहीट करून त्यात डबा ठेऊन दिला..

वाढणी/प्रमाण: 
4-5
अधिक टिपा: 

*इनों एवजी बेकिंग पवडर चालू शकेल..
*व्हॅनिला इसेन्स घालू शकतो आवडीनुसार...

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि बहिणी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या प्रतिसादाशी संपादनात क्लिक करा.
फोटोची लिंक तीनदा आली असेल. त्यातल्या दोन डिलीट करा.
फायनल फोटो हेडरमध्येच घ्या.

मायबोलीवर सोपा बिस्किट केक वर्ल्ड फेमस आहे.
तुम्ही केलेला छान दिसतोय.

केक मस्त आहे.
कढईत केला म्हणून जायंट ईडली सारखा आकार आला का?
बरबॉन च्या इतर रेसिपीज मध्ये क्रिम वेगळं काढून मग बिस्किट चुरा करायला सांगतात. तुम्ही क्रिम ठेवून केल्याने केक मॉईस्ट झाला का?
(मागे एकदा बरबॉन केक केला होता म्हणून उगीच हे सर्व प्रश्न पडले. केक मस्तच आहे.)

सोप्पा केक म्हणुन आहे इथे मायबोलीवर, असाच आहे. मी करते बर्‍याच वेळा. मी अवनमध्ये करते, छान मॉईस्ट होतो. मायक्रोवेवमध्ये कडक होतो काहीवेळाने. गॅसवर अजून केला नाही. फोटो मस्तच आहेत केकचे.

मी कढईत गोलाकार स्टीलची पातेली ठेवून केला होता, त्याच्याच शेप आला आहे
बिस्किटे क्रीम सहित मिक्सरला लावली होती..
छान स्पोंजी आणि मस्त झाला होता moist...