कुत्रा नैसर्गिकरीत्या शाकाहारी. मांसाहारी की मिश्राहारी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 September, 2020 - 11:32

शाकाहारी मांसाहारी जोडप्यांच्या धाग्यावर विषय निघाला. कुत्रे हे नैसर्गिकरीत्या मांसाहारी असतात तर माणसे नैसर्गिकरीत्या शाकाहारी. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेने तो धागा भरकटू नये शाकाहार-मांसाहार एकाच घरात करत सुखाने नांदत असलेल्या जोडप्यांमध्ये वादाची ठिणगी पडू नये म्हणून हा स्वतंत्र धागा.

सिंह हा शुद्ध मांसाहारी समजला जातो कारण तो फक्त आणि फक्त मांस खातो. घासफूस खात नाही.

गाय बकरी या शुद्ध शाकाहारी समजल्या जातात कारण त्या फक्त चरतात. मांसाहार कुठल्याही स्वरुपातला करत नाहीत.

माणूस हा शाकाहार मांसाहार दोन्ही करतो म्हणून मिश्राहारी समजला जातो. अर्थात काही लोकांच्या मते माणूस मांस शिजवून खातो म्हणून तो नकली मांसाहारी असल्याने त्याला मिश्राहारी म्हणू शकत नाही.
आता माणूस भाज्याही शिजवूनच खातो ती गोष्ट वेगळी. आणि काही लोकं अंडे कच्चेही खातात ती गोष्ट वेगळी.
पण एकूणातच माणूस नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा वाद आजही कायम आहे. सायन्स आजही याचे उत्तर शोधतेय.

कुत्र्याबाबत देखील तो नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा नवीन प्रश्न उद्भवलाय. वर्षानुवर्षे त्याला माणसांनी पाळलेलाच पाहिले आहे. बरेचदा जे मालक खातो तेच त्याला दिले जाते. मग मालक शाकाहारी तर कुत्रा शाकाहारी, मालक मांसाहारी वा मिश्राहारी तर कुत्र्याच्या नशिबी तेच खाणे. अगदी कुत्र्याला बिस्कीटेही खाऊ घालतो आपण. आमचे जुने शेजारी टमाटर कुस्करून खाऊ घालायचे.

निसर्गाने मूलत: कुत्र्याला काय खायला बनवले आहे हा प्रश्न पडावा ईतका गोंधळ आज लोकांमध्ये बघायला मिळतो.

म्हणजे समजा माणसे कुत्र्यांना पाळतच नसते तर त्यांनी आपले अन्न कसे मिळवले असते आणि काय खाल्ले असते? कधी केलाय असा विचार?
आज करून बघा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ आशूचॅम्प
मोठी माणसं शाळेत शिकवताना शिक्षकांकडे लक्ष पण देतात ... ¶ ∆£€$¶.. पण का? मोठी माणसे शाळेत का जातात?

म्हाळसा,
आपल्या उदाहरणात काय झालेय बघा. त्या कुत्र्याला बहुधा मांसाहाराची चटक लागली असावी. आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपण बिस्कीटे दिली. झाले तो चिडला. पिसाळला. जे दिसेल त्याला चावू फाडू लागला. मग आपण त्याला मांसाहार पुरवलात. तो शांत झाला.
हे एखाद्या नैसर्गिक मद्यप्रेमीला मद्य न मिळाल्यासारखे आहे. दारू मिळत नाही तेव्हा थयथय्याट. चार घोट गळ्यात जाताच ब्रह्मानंदी टाळी Happy

Pages