कुत्रा नैसर्गिकरीत्या शाकाहारी. मांसाहारी की मिश्राहारी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 September, 2020 - 11:32

शाकाहारी मांसाहारी जोडप्यांच्या धाग्यावर विषय निघाला. कुत्रे हे नैसर्गिकरीत्या मांसाहारी असतात तर माणसे नैसर्गिकरीत्या शाकाहारी. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेने तो धागा भरकटू नये शाकाहार-मांसाहार एकाच घरात करत सुखाने नांदत असलेल्या जोडप्यांमध्ये वादाची ठिणगी पडू नये म्हणून हा स्वतंत्र धागा.

सिंह हा शुद्ध मांसाहारी समजला जातो कारण तो फक्त आणि फक्त मांस खातो. घासफूस खात नाही.

गाय बकरी या शुद्ध शाकाहारी समजल्या जातात कारण त्या फक्त चरतात. मांसाहार कुठल्याही स्वरुपातला करत नाहीत.

माणूस हा शाकाहार मांसाहार दोन्ही करतो म्हणून मिश्राहारी समजला जातो. अर्थात काही लोकांच्या मते माणूस मांस शिजवून खातो म्हणून तो नकली मांसाहारी असल्याने त्याला मिश्राहारी म्हणू शकत नाही.
आता माणूस भाज्याही शिजवूनच खातो ती गोष्ट वेगळी. आणि काही लोकं अंडे कच्चेही खातात ती गोष्ट वेगळी.
पण एकूणातच माणूस नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा वाद आजही कायम आहे. सायन्स आजही याचे उत्तर शोधतेय.

कुत्र्याबाबत देखील तो नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा नवीन प्रश्न उद्भवलाय. वर्षानुवर्षे त्याला माणसांनी पाळलेलाच पाहिले आहे. बरेचदा जे मालक खातो तेच त्याला दिले जाते. मग मालक शाकाहारी तर कुत्रा शाकाहारी, मालक मांसाहारी वा मिश्राहारी तर कुत्र्याच्या नशिबी तेच खाणे. अगदी कुत्र्याला बिस्कीटेही खाऊ घालतो आपण. आमचे जुने शेजारी टमाटर कुस्करून खाऊ घालायचे.

निसर्गाने मूलत: कुत्र्याला काय खायला बनवले आहे हा प्रश्न पडावा ईतका गोंधळ आज लोकांमध्ये बघायला मिळतो.

म्हणजे समजा माणसे कुत्र्यांना पाळतच नसते तर त्यांनी आपले अन्न कसे मिळवले असते आणि काय खाल्ले असते? कधी केलाय असा विचार?
आज करून बघा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.त्याला बिस्कीट दिले तर त्याने अत्यंत तुच्छतेने भू करून निघून गेला....

असाच अनुभव बेंगलोर बस स्टँडवर आला होता... मुलाने आख्खा बिस्कीट पुडा टाकला होता कुत्र्यासमोर..न बघता निघून गेला कुत्रा...तिथे कुणी सांगितले पण नाही कि त्यांना काय आवडते..(तिथे बरेच कुत्रे होते)

गुरुवार नव्हता हो Happy
कुत्र्यांचे वारांचे कॅलेंडर वेगळे असेल तर माहित नाही.

आमचं भुभु आधी मस्त सगळं व्हेज खायचा
पण चिकन सुरू केल्यापासून बाकी कशाला तोंड लावत नाही
कुकर ला चिकन लावलं की वासाने अक्षरशः लाळ टपकवत समोर बसून राहतो
त्याची मजा करायला म्हणून एकदा चिकन च्या पाण्यात भाज्या आणि भात कुस्करून दिला
बिचारा असला गोंधळला होता, वास तर चिकन चा येतोय पण बाउल संपत आला तरी एकही पीस नाही हाड नाही ही काय भानगड आहे
त्याचा तो विचारी चेहरा आठवून अजून हसू येतंय

निम्म्याहून जास्त मायबोलीकर मांसाहारी निघतील अशाने Happy
खुंखार कट्टर अस्सल मांसाहारी म्हणायचय कां तुम्हाला ??????

ते द्यावं लागतच त्याला पण चिकन व्यतिरिक्त सुद्धा खाल्लं पाहिजे अधून मधून ही सवय लावावी लागली
सध्या आठवड्यातून एक दिवस पूर्ण शाकाहारी ठेवतो
अशाने त्यांच्या पचनसंस्थेला पण आराम मिळतो आणि त्याही पेक्षा चिकन नाही तर जेवणारच नाही हा नखरा पण कमी होतो
त्याला दहीभात पण आवडतो खूप, ताक पितो आवडीने
गाजर, काकडी, उकडलेला बटाटा, केळी, बिट अधून मधून चरत असतो
त्याला तर लाडू पण आवडतात, कुठलाही
दोन तीन वेळा आमचे नैवेद्याचे लाडू गायब झाल्यामुळे कळलं
आधी पोरगा खातोय असं वाटत होतं पण एकदा मुद्देमलासक्त चोर सापडला Happy

खुंखार कट्टर अस्सल मांसाहारी म्हणायचय कां तुम्हाला>>>>>

नरभक्षक च म्हणायचं होतं पण त्याला कायदयाने बंदी आहे Happy

सर्व प्रतिसाद वाचले नाहीत, पण मुळात प्रश्नच चुकीचा आहे. कुत्रा नैसर्गिकरित्या काय खातो ह्या आधी हा विचार करायला हवा की कुत्रा स्वतः नैसर्गिक आहे का! चर्चा तरी निदान पाळीव कुत्रांच्या बाबतीत आहे आणि पाळीव कुत्रा हे जनावर नैसर्गिक नाही. ह्या कुत्र्यांचा कोणताही अपाळीव पूर्वज (असा कुणी असल्यास) सध्या अस्तित्वात नाही असे विकी काका सांगतात. मग ते मुळातच नैसर्गिक नसल्यामुळे ते नैसर्गिकरित्या काय खाण्यासाठी बनले आहेत हा प्रश्नच बाद होतो.

फळे हंगामी असली तरी वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी फळे असतात.
पण नुसत्या फळांवर तो रहात नसावा, शिकार + रानमेवा दोन्ही असावेत. शिकार नाही मिळाली तर अनेक दिवस उपास घडायचा असे काही म्हणतात. पण रानमेव्याशी त्याचे काही वावडे नसावे. नाही शिकार तर रानमेवा.

हिमयुगात मात्र रानमेवाही दुर्मिळ झाला असेल.

मानव हा मिश्रहारी आहे आणि तसेच अनेक प्राणी सुद्धा
उदा अस्वल, उंदीर, कावळा आणि आपल्या सर्वात जवळचा पूर्वज चिम्पाझी
ते तर टोळी करून शिकार करून मांस खातात
तीच पद्धत आदिमानवाने उचलली असेल

पुन्हा मिश्रहारी मध्ये अनेक प्रकार आहेत
अस्वलात पोलर अस्वल पूर्णपणे मासांहारी आहे
तर अन्य कपी जसे की गोरिला हे कट्टर शाकाहारी

कट्टर आपण माणसात म्हणतो पण खरे कट्टर उपासमारीने खंगून मेले तरी विरुद्ध आहार करणार नाहीत
म्हणजे हत्ती, गवा वगैरे भुकेने मरण पत्करतात पण मांसाचा गोळा मटकवत नाहीत
तसेच वाघ सिंह गवत किंवा पाला खाणार नाहीत

आम्हाला पाळलेल्या एका मांजराला चिरमुरे भयंकर आवडायचे.
Submitted by नानबा on 24 September, 2020 - 11:24

इथे आम्हाला ऐवजी आम्ही असे संपादित कराल का?

मला वाटतं मांजराच्या बाबतीत ते आपल्याला पाळतात हे खरे असावे
कुत्रा दिल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो
पण मांजर त्याला आपण खाऊ पिऊ घालतोय हे आपलं कर्तव्य आहे आणि लाड करून घेणे हा हक्क आहे या थाटात वावरत असते
Happy

भावाच्या कुत्रीला शेव,पिठले आणि कच्चा कांदा भयंकर आवडायचे.तेही खायचे mhanje तळव्यात धरून तिला खाऊ घालायचे.भांड्यात टाकले तर खायची नाही.
अल्पेनलीबे चॉकलेट्स साठी वेडी व्हायची.

कांदा आणि चॉकलेट दोन्ही कुत्र्यांसाठी हानिकारक आहेत
अजून एक भयानक किस्सा ऐकलं होतं की एका घरात कुत्र्याला लोणचं पोळी खायला घालत कारण तो ती आवडीने खायचा
म्हणलं कर्म माझ

ऐकावे ते नवल Lol
महत्त्वपूर्ण माहिती मिळतीए या धाग्यावर.
धागाकर्त्याचे आभार Proud

इथे आम्हाला ऐवजी आम्ही असे संपादित कराल का?
>>
अहो आम्ही नव्हती पाळली तिला , तिने आम्हाला पाळलेले .
चांगली तीन चार कुटुंब पाळून होती ती .
हवे तिथे -हवे ते खावे, मुक्त फिरावे, वाटल्यास पायावर अंग घासावे , वाटल्यास लोकांच्या अंगावर गुरकवावे!
आता सांगा कोणी कोणाला पाळल!
Lol

अस्वलात पोलर अस्वल पूर्णपणे मासांहारी आहे
आशुचॅप...काय त्या गरीब बिचार्‍या केविलवाण्या पोलर अस्वलावर आरोप लावत आहात. तो बिचारा परिस्थितीने गांजलेला एक मांसाहारी आहे.
त्याला शाकाहार मिळत नसेल. "पोल"वाल्यांनी भाज्या रस्त्यावर ओतल्या असतील तर....

मांसाहारी शरीर लक्षणे

टोकदार सुळे असणे

आतडे लहान लांबीचे असणे ( शाकाहारीत आतडे लांब असते)

आपले लहान आतडे असते ते मोठे असते आणि मोठे आतडे लहान असते.
पूर्ण पोट रिकामे झाल्यावर १ किलो भात खा आणि परसाकडे जाऊन यायला किती तास लागतात ते मोजा.
वेळ * वेग = अंतर
सामान्य माण्साचा पोटात भात सरकण्याचा सरासरी वेग तासाला २ फूट असा आहे, तुम्हाला बद्धकोष्ठ वगैरे नाही असे गृहीत धरले आणि तुम्ही दहा तासांनी परसाकडे गेलात तर साधारणतः २० फूट लांबीचे तुमचे लहान आतडे आहे असे समजून घ्या!

ओ त्याला असली अवघड गणिते घालू नका
त्याच्या शाळेत फक्त सत्य अहिंसा असलं काहीतरी शिकवलंय म्हणे
आणि पुन्हा त्याचे अजब फंडे की आमच्याकडे हे असं आहे
त्यामुळे तो परसाकडे जाण्याचं वेगळं गणित मांडतोय का नाही बघा

२० फूट लांबीचे तुमचे लहान आतडे आहे असे समजून घ्या!
>>>

माझी ऊंची जवळपास सहा फूट आहे तिथे आतडे २० फूट कसे असेल? फिरकीला मांजा गुंडाळावे तसे बरगड्यांभोवती गुंडाळलेले असते की लालबागच्या राजाला झिगझॅग लाईन लागते तसे रचलेले असते?

आणि जर आतडे लांब असेल तर मांसाहार खायला काय प्रॉब्लेम आहे. लांब आतड्याचा आणि शाकाहाराचा काय संबंध?
आणि एखाद्याची आतड्याची लांबी किती असल्यास तो शाकाहारी वा मांसाहारी ठरतो?
प्रश्न सिरीअस आहेत. विचारायच्या टोनवर जाऊ नका प्लीज...

Pages