कुत्रा नैसर्गिकरीत्या शाकाहारी. मांसाहारी की मिश्राहारी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 September, 2020 - 11:32

शाकाहारी मांसाहारी जोडप्यांच्या धाग्यावर विषय निघाला. कुत्रे हे नैसर्गिकरीत्या मांसाहारी असतात तर माणसे नैसर्गिकरीत्या शाकाहारी. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेने तो धागा भरकटू नये शाकाहार-मांसाहार एकाच घरात करत सुखाने नांदत असलेल्या जोडप्यांमध्ये वादाची ठिणगी पडू नये म्हणून हा स्वतंत्र धागा.

सिंह हा शुद्ध मांसाहारी समजला जातो कारण तो फक्त आणि फक्त मांस खातो. घासफूस खात नाही.

गाय बकरी या शुद्ध शाकाहारी समजल्या जातात कारण त्या फक्त चरतात. मांसाहार कुठल्याही स्वरुपातला करत नाहीत.

माणूस हा शाकाहार मांसाहार दोन्ही करतो म्हणून मिश्राहारी समजला जातो. अर्थात काही लोकांच्या मते माणूस मांस शिजवून खातो म्हणून तो नकली मांसाहारी असल्याने त्याला मिश्राहारी म्हणू शकत नाही.
आता माणूस भाज्याही शिजवूनच खातो ती गोष्ट वेगळी. आणि काही लोकं अंडे कच्चेही खातात ती गोष्ट वेगळी.
पण एकूणातच माणूस नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा वाद आजही कायम आहे. सायन्स आजही याचे उत्तर शोधतेय.

कुत्र्याबाबत देखील तो नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा नवीन प्रश्न उद्भवलाय. वर्षानुवर्षे त्याला माणसांनी पाळलेलाच पाहिले आहे. बरेचदा जे मालक खातो तेच त्याला दिले जाते. मग मालक शाकाहारी तर कुत्रा शाकाहारी, मालक मांसाहारी वा मिश्राहारी तर कुत्र्याच्या नशिबी तेच खाणे. अगदी कुत्र्याला बिस्कीटेही खाऊ घालतो आपण. आमचे जुने शेजारी टमाटर कुस्करून खाऊ घालायचे.

निसर्गाने मूलत: कुत्र्याला काय खायला बनवले आहे हा प्रश्न पडावा ईतका गोंधळ आज लोकांमध्ये बघायला मिळतो.

म्हणजे समजा माणसे कुत्र्यांना पाळतच नसते तर त्यांनी आपले अन्न कसे मिळवले असते आणि काय खाल्ले असते? कधी केलाय असा विचार?
आज करून बघा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व भुभु समुदायाने त्यांच्याकडून धन्यवाद कळवले आहेत
एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल
लवकरच ते मुंबईतल्या घरी तुला भेटायला जातो असेही म्हणत आहेत

जे मॅमल्स तोंड लावून पाणी पितात ते शाकाहारी असतात. आणि जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी असतात. कुत्रा जिभेने पाणी पितो त्यामुळे तो मांसाहारी आहे. माणूस तोंड लावून पाणी पितो त्यामुळे तो बेसिकली शाकाहारी आहे.

श्वान शाकाहार, मांसाहार दोन्ही खातात पण त्यांना मांसाहार जास्त आवडतो.
जे खायला देतात त्यांना ते कधीच भुंकत नाहीत.
आम्ही आमच्या गल्लीतल्या श्वानांना खायला द्यायचो.आम्ही दिसलो कि ते फक्त खायला द्या म्हणायचे भुंकून.

जे मॅमल्स तोंड लावून पाणी पितात ते शाकाहारी असतात. आणि जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी असतात. कुत्रा जिभेने पाणी पितो त्यामुळे तो मांसाहारी आहे. माणूस तोंड लावून पाणी पितो त्यामुळे तो बेसिकली शाकाहारी आहे.>>> ?

सर्वसाधारणपणे खूर असलेले प्राणी शाकाहारी असतात तर नख्या असलेले प्राणी हे मांसाहारी असतात.

तसेच मांसाहारी प्राण्यांच्या आहारात पण खूर असलेले प्राणी असतात, नैसर्गिकरित्या नख्या असलेले प्राणी भक्ष म्हणून खाल्ले जात नाहीत (यात पक्षी धरलेले नाहीत).

माणूस पेल्याने / ओंजळीने पाणी पितो. प्राण्यांसारखा तोंडलावून / जिभेने पित नाही.
माणुस मूळ शाकाहारी आणि केव्हाच मिश्राहारी बनला. हिमयुगात शाकाहाराची कमतरता झाली तेव्हा मांसाहाराकडे वळला असावा आणि नंतर मुख्यत्वे मांसाहारी झाला. शेवटलं हिमयुग संपल्यावर शेतीचा शोध लावला आणि मिश्रहारावर स्थिर झाला.

लहान मुलांचे उदाहरण घ्या. एकदा पोट भरले की अजिबात काही खात नाहीत. खेळात मग्न असतील, विनाकारण भूक लागणार नाही. भूक लागते तेव्हा आधी हलकीशी जाणीव होते. मुलं कशात मग्न असतील तर ती भूक जांवणारही नाही.
हळू हळू ती भूक तीव्र होत असते. अशा वेळेला अन्न दिसले, अन्नाचा वास आला तर मग लक्षात येते की हो आपल्याला तर भूक लागलीय. अशा वेळेस त्या मुलांना कुठलं अन्न दिसलं म्हणजे आपल्याला भूक लागत आहे याची जणीव होईल? नैसर्गिक पदार्थ घ्या. फळ दिसले - होईल. काकडी, टोमॅटो अशा भाज्या दिसल्या - होईल.
बकरी दिसली होईल? कोंबडी दिसली होईल? बकरी , कोंबडी तर आधी पासून फिरत असेल पण भूक लागत असताना त्यांना पाहून भूक चाळवली गेली असे नाही होत, फळ, काकडी, टोमॅटो, रताळी पाहून चाळवेल . म्हणून माणूस मुळात शाकाहारी, पण हजारो वर्षांपासून बनलाय मिश्राहारी.
कुत्र्याची कोंबडी दिसली तरी भूक चाळवेल पकडून कच्ची खायला सुरवात करेल. कुत्रा मूळ मांसाहारी. पण पोळी भात दिला तरी खाईल. हजारो वर्षे माणसासोबत राहून तो झाला मिश्राहारी.

तर कुत्र्याचा प्रवास मांसाहारी ते मिश्राहारी आणि माणसाचा शाकाहारी ते जास्त मांसाहारी ते मिश्राहारी.

मांजर कट्टर मांसाहारी, कुत्रा तेवढा नाही. रानावनात तो शिकार करून ससा, घुस, कोंबडी वगेरे खातोच पण गवत, फळं पण खातो, वनस्पतीजन्य बिटाकॅरोटिन पासून कुत्रा शरीरात व्हिटामिन ए बनवतो. म्हणजे मुळात कुत्रा मांजरी एवढा कट्टर मांसाहारी नाही.
मुख्यतः मांसाहार पण थोडा शाकाहार हरकत नाही असा प्राणी आहे कुत्रा.

कुत्रा लांडग्यांच्या कुळातील आहे
त्यामुळे तो मूळचा मांसाहारी आहे
त्याचे सुळे, कमी दाढा, छोटी पचननलिका हे सगळे तो नैसर्गिकरित्या मांसाहारी असल्याचे दाखवतात
पण वर्षानुवर्षे शाकाहारी राहिलेली अनेक कुत्री आहेत त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेतले असावे
जसे माणसाची नैसर्गिकरित्या शाकाहारी शरीर रचना आहे
पण आदिमानवाने कच्चे मांस खाऊनही टिकाव धरला इतकेच नव्हे तर प्रगती पण केली
त्यामुळे परिस्थिती येईल त्या प्रमाणे खावे
जे मिळेल आणि पचेल आणि पटेल ते खावे ही समान भूमिका कुत्रा आणि माणूस यांची दिसून येते

{अशा वेळेस त्या मुलांना कुठलं अन्न दिसलं म्हणजे आपल्याला भूक लागत आहे याची जणीव होईल? नैसर्गिक पदार्थ घ्या. फळ दिसले - होईल. काकडी, टोमॅटो अशा भाज्या दिसल्या - होईल.
बकरी दिसली होईल? कोंबडी दिसली होईल?}

माझ्या मते याचं मुख्य कारण आपण मुलांवर करत असलेले संस्कार. अगदी लहान मुलं चप्पल पासुन चेंडु, कागद, कपडे इत्यादी काहीही खाउन बघतील. पण आपल्या शिकवण्यानुसार फार लवकर काय खायचं काय नाही हे ते शिकतात. त्यांना जर कोंबडीच्या आकारातला केक लहानपणापासुन दिला तर खरी कोंबडी बघितल्यावर त्यांना नक्की भुकेची भावना होणार. माणसाच्या माहीतीचा खुप मोठा हिस्सा आपल्या DNA मधुन न येता आपण जन्मल्यावर मिळणार्‍या अनुभवांतुन येतो. याउलट उदाहरणार्थ कासवाच्या पिल्लांना अंड्यातुन बाहेर आल्यावर कुठे जायचं काय खायचं याचं जन्मतः ज्ञान असतं. ते त्यांच्या DNA मध्येच असतं

जबरदस्त पॉईंट व्यत्यय...

माझे उदाहरण देतो.. मी लहानपणापासून शाकाहारी... 25 वर्षे ..
त्या काळात अंडे, चिकन दिसले मला भूक लागणे शक्यच नव्हते..
आता मात्र अंडे दिसले आणि पोट रिकामे असेल.. भूक लागते...

प्राण्याच्या दातांची रचना बघून मुख्य आहार समजतो.कुत्रे हे मुख्यत: मांसाहारी असावे.कुत्रा अग्रेसिव्ह आहे,मांसाहारी अग्रेसिव्ह असतात.

ऋन्मेस ला अजुन पण हा प्रश्न पडतोय ह्या
विषयी सखेद आश्चर्य वाटत आहे.
कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे .
जसे मानव ह्यांनी वर सांगितले आहे कोंबडी ,शेळी बघून कुत्र्या ची भूक चाळवते पण माणसाच्या भीती मुळे ते हल्ला करत नाहीत

तान्ही मुलं तोंडात चप्पल , चेंडू काहीही घालतात याचा भूकेशी संबंध नाही. पोट भरल्यावरही ते दिसेल ते तोंडात घालतील. लागत असणारी भूक चप्पल किंवा चेंडु पाहून जाणवली, चाळवली गेली असे नाही.
लहान मुले वस्तू तोंडात का घालतात याचे कारण प्रतिकात शक्ती विकसीत करणे आहे असेही मानतात. जमिनीवर / इतरस्त्र पडलेली वस्तू तोंडात घालून त्यासोबत जिवाणू तोंडात जातात आणि त्यांच्याशी लढण्यास प्रतिकारशक्ती विकसित होते.

आणि जर कोंबडीच्या आकाराचा केक खायची सवय लागली, आणि मग कोंबडी बघून लागत असलेल्या भुकेची जाणीव होत असेल ते ती सुद्धा कोंबडीला केक समजून झालेली असेल कोंबडी - म्हणजे चिकन हे खाद्य म्हणुन नव्हे.
मुलांचे उदाहरण यासाठी घेतले आहे की खाद्यपदार्थांवरील संस्कार अजून कमी झालेले आहेत.
कोंबडी, बकरी पाहून मांसाहारी प्राण्याला लागत असलेल्या भूकेची जाणीव होईल ते कोंबडी, बकरी हे खाद्य ओळखून. हा फरक आहे.

>> कोंबडीला केक समजून झालेली असेल कोंबडी - म्हणजे चिकन हे खाद्य म्हणुन नव्हे.

ते फक्त उदाहरण दिले हो. जर अगदी लहानपणापासुन मुलांसमोर कोंबडी कापुन त्यांना खाऊ घातली तर कोंबडी == खाद्य हे समीकरण त्यांना कळेल. मुद्दा हा आहे की काय खावं हे माणसांमध्ये जन्मानंतरच्या अनुभवाने समजतं जन्मतः नाही.
मोगली, जो लांडग्यांबरोबर लहानाचा मोठा झाला, तो ससा बघुन खुश होइल की भोपळा बघुन?

याउलट ज्या मुलांनी काकडी, टोमॅटो अशा भाज्या आयुष्यात बघितल्या नाहीत, त्यांनाही या भाज्या बघुन भुकेची जाणीव होईल का?
एस्किमो लोकांच्या मुलांना काय बघुन भुक लागेल?

व्यत्यय तुमचा मुद्दा कळला. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या अवस्थेत आपण खाऊ शकणाऱ्या पदार्थात आपला मांसाहार मोडत नाही. तेव्हा आपण मांसाहारी असलो तरीही कोंबडी, बकरी, ससा बघून भूकेची जाणीव होणार नाही, त्याच प्रमाणे रॉ तांदूळ, गहू पाहूनही होणार नाही, त्यासाठी तो पदार्थ खाण्या योग्य असावा लागेल. शिजेलेले अन्न पाहून, वासाने होईल पण हे आपल्या मेंदुवर झालेल्या संस्कारांमुळे.
असे संस्कार (फारसे) होण्याआधी बाल्यावस्थेतील मुलांवर केलेल्या एका एक्सपरीमेंट बद्दल वाचले आहे, त्याचे डिटेल्स सापडतात का बघतो.

कुत्रा मूळ मांसाहारी. पण पोळी भात दिला तरी खाईल>>
मानव काका, आमचे कुत्रे भाजलेली वांगी, मक्याचे भाजलेले कणीस, आंबे , हरभरे ,पपई ,आमटी पोळी हे पदार्थ बघून वेडपिस व्हायचं. कधी एकदा खाईन असं व्हायचं तिला.
आम्हाला पाळलेल्या एका मांजराला चिरमुरे भयंकर आवडायचे.

नानबा आमचा पोपट श्रीखंड आणि साबुदाणा खिचडी साठी येडा व्हायचा. आणि नंतर तो मिरची खाईना. पण हे चटक दाखवून लावलेल्या सवयी झाले, निसर्गतः भूक कशाने चाळवते, पक्षी कोणते अन्न नैसर्गिक आहे हा विषय आहे.

नैसर्गिक भूक हा फार अक्राळविक्राळ प्रकार आहे...
पाडस मधल्या भावनाप्रधान ज्योडीला समजलेली भूक, लाईफ ऑफ पाय मधे अथांग महासागरात बोटीवर अडकलेलं असताना लागलेली शाकाहारी भूक, बूट खाताना चार्ली चॅप्लिन ने दाखवलेली भूक, व्हाईट फॅन्ग च्या सुरुवातीला वर्णन केलेली बर्फाळ प्रदेशातल्या लांडग्यांची भूक.....

ही नैसर्गिक भूक समजुन घेतली की शाकाहार/मांसाहार या भिंती नाहीश्या होतात आणि रहाते ती उपलब्ध गोष्टींनी पोटाची खळगी भरायची आदीम उर्मी.

इथे होसुर मधे, कुत्रे चपाती दिली तर खात नाहीत पण भात खातात..
बहुतेक प्रांतानुसार त्यांचा आहार पण बदलत असावा..

बहुतेक प्रांतानुसार त्यांचा आहार पण बदलत असावा..
>>>>>>
शक्य आहे. माणसांतही हे आढळते. ज्या देशात वातावरणामुळे शेती जास्त होत नाही वा फारसे पिकत नाही तिथले लोकं मुख्यत्वे मांसाहारी असतात. आपला देश शेतीप्रधान आहे तर आपल्याकडे बहुसंख्य जनता शुद्ध शाकाहारी होणे अ‍ॅफोर्ड करू शकते.

आणि प्रांतानुसार कुत्र्यांच्या प्रजातीही बदलत असतीलच.

बाकी वाचतोय धागा. छान चर्चा होतेय. छान माहिती मिळतेय. कसलेही वाद न होता ज्ञानात भर पडतेय.

हो मृणाली, हैद्राबादला आम्ही पण आधी पोळ्या उरल्या म्हणुन गाईंना आ आ करून हाक मारून दिल्या, गाई आल्या तर खरं पण पोळ्या नुसत्या हुंगून निघून गेल्या. तेच भात मात्र खातात. कुत्रा अगदीच भुकेला असेल तर पोळी खाताना बघितला आहे, पण तोच कुत्रा नंतर चॉईस असेल तर भात खाईल पोळी नाही.

उपासमारीत प्राणी इतर अन्नाकडे वळतात पण पुढे नेहमीचे अन्न उपलब्ध झाले तर परत तिकडे वळतात. अर्थात नवे चटक लागणारे अन्न नसेल तर.

व्यत्यय खरं आहे, जो पर्यंत पर्याय आहे तो पर्यंत चोचले, उपासमारीची वेळ आली की कसे ही करून खळगी भरणे.

कुत्रा हा एक मूलतः शाकाहारी असलेला प्राणी आहे. कोवळे गवत, गाजरे, नवलकोल ची पाने, लेट्युस हा त्याचा नैसर्गिक आहार आहे. काही लोक उगाच त्यांना सवय लावतात मांसाहार करायची.

एका देवस्थानी कुत्रा होता तो फक्त पेढे खायचा.त्याला बिस्कीट दिले तर त्याने अत्यंत तुच्छतेने भू करून निघून गेला.मग आजूबाजूच्या लोकांनी तो फक्त पेढेच खातो सांगितलं.त्याला जवळचे पेढे पण दिले थोडे.
भुभू ला बहुतेक ससा मांस(लहानपणी पुस्तकात वाचलं) आणि चिकन नैसर्गिक पणे आवडत असेल.बाकी पोळी दूध वगैरे नाईलाजाने खात असेल.

Pages