..
बॉडी-मास-ईंडेक्स म्हणून एक प्रकार असतो बघा. म्हणजे आज तुमचे वय जन्मतारखेच्या कॅलेंडर गिणती नुसार वयवर्षे २०-२२ असले तरी, जर तुमचे शरीर त्या नुसार सुदृढ नसले, किंवा विविध आजारांनी पोखरले गेलेले असले, तर कदाचित तुमचे शारीरीक वय ३०-३२ वा अगदी ४०-५० देखील असू शकते. तसेच याउलट तुम्ही स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेतली असल्यास तुमचे शारीरीक वय कमी देखील भरू शकते. अर्थात याबाबत येथील डॉक्टरच जास्त प्रकाश टाकू शकतात वा आपणही सविस्तर गूगाळून माहीती गोळा करू शकता. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात.
असो,
पण आज मात्र आणखी एक गंमत पाहिली. त्यात शारीरीक वय नाही तर मानसिक वय शोधायचे होते.
(आता, आज जे आपले जन्मतारखेनुसार वय आहे त्यापेक्षा आपले मानसिक वय जास्त असणे चांगले, की कमी असणे चांगले, हा एक मस्त चर्चेचा विषय होऊ शकेल. यावर आपले मत जरूर व्यक्त करालच.)
पण त्याआधी, आपले खर्रे खुर्रे वय खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करा.
वरील लिंक वर जाऊन तुमच्या स्वत:बद्दल विचारलेल्या प्रश्नांची पर्याय निवडत पटापट उत्तरे द्या आणि जाणून घ्या आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या वयाचे जीवन जगत आहात.
फक्त २-३ मिनिट जातील, उत्तर इथे पोस्ट करायला विसरू नका.
आता हे कदाचित गंमत म्हणून असेल, पण बिनबुडाचे लॉजिक त्यात वापरलेले नाहीये. यात विचारलेले काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील याची खात्री बाळगा.
त्या प्रश्नांवर सविस्तर उद्या बोलूच, याच धाग्यावर!
तुर्तास शुभरात्री.
अरे हो, निरोप घेण्याआधी,
माझे खर्रे खुर्रे वय यात निघाले ते असे.
- ऋन्मेऽऽष
खरे वय ४५ वेबसाईटवर आले ३८
खरे वय ४५
वेबसाईटवर आले ३८
I m easy-going क्यालेंडर वय
I m easy-going
क्यालेंडर वय 25
खरे वय 24
माझं 31 दाखवलं
माझं 31 दाखवलं
सध्या रंगलेल्या "वरील आयडीचे
सध्या रंगलेल्या "वरील आयडीचे वय किती वाटते?" या खेळावरून हा धागा आठवला
नवीन सभासदांनी स्वतःच स्वताचे वय चेक करायला धागा वर काढतो
हे मस्तय.. अजून काॅलेज मोड
हे मस्तय.. अजून काॅलेज मोड मधेच आहे मी
३३
३३
अरे देवा.... माझे वाढतेय की
अरे देवा.... माझे वाढतेय की नाही
फक्त शेरा बदलला ...
Happy Happy
Happy Happy
(No subject)
समजुतदार उत्तरे दिली तर जास्त
समजुतदार उत्तरे दिली तर जास्त वय

चिल्लर पिल्लर उत्तरे दिली तर कमी वय
मी दणादण उत्तरे दिली फार
मी दणादण उत्तरे दिली फार विचार ना करता तरी ३० आले आणि लई विचारपूर्वक क्लिक करत गेलो तरी ३० आले.
नशीब कुणीतरी लहान समजतंय.
मी सगळी मुद्दाम लहान
मी सगळी मुद्दाम लहान मुलांसारखी उत्तरं दिली तर १३ आलं. (चॉकलेट आवडणे, रोज रडणे वगैरे). आणि मुद्दाम सगळी म्हाताऱ्या माणसासारखी उत्तरं दिली तरी ३५ आलं.
म्हणजे खूष करून प्रसिद्धी मिळवण्यास ते ऍप काहीही केलं तरी बरंच कमी वय दाखवतच असं दिसतंय.
माझे 10 आले ना
माझे 10 आले ना
मला बघा काय दाखवलं
मला बघा काय दाखवलं

(No subject)
तसं नसणार ते.
एप कनफ्यूजड झाले असणार नक्की किती सांगावे. मग हैंग होऊन असे दाखवले असणार.
@बोकलत
@बोकलत
(No subject)
Pages