तुम्हाला तुमचे खर्रे खुर्रे वय ठाऊक आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 January, 2015 - 15:30

..

बॉडी-मास-ईंडेक्स म्हणून एक प्रकार असतो बघा. म्हणजे आज तुमचे वय जन्मतारखेच्या कॅलेंडर गिणती नुसार वयवर्षे २०-२२ असले तरी, जर तुमचे शरीर त्या नुसार सुदृढ नसले, किंवा विविध आजारांनी पोखरले गेलेले असले, तर कदाचित तुमचे शारीरीक वय ३०-३२ वा अगदी ४०-५० देखील असू शकते. तसेच याउलट तुम्ही स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेतली असल्यास तुमचे शारीरीक वय कमी देखील भरू शकते. अर्थात याबाबत येथील डॉक्टरच जास्त प्रकाश टाकू शकतात वा आपणही सविस्तर गूगाळून माहीती गोळा करू शकता. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात.

असो,
पण आज मात्र आणखी एक गंमत पाहिली. त्यात शारीरीक वय नाही तर मानसिक वय शोधायचे होते.
(आता, आज जे आपले जन्मतारखेनुसार वय आहे त्यापेक्षा आपले मानसिक वय जास्त असणे चांगले, की कमी असणे चांगले, हा एक मस्त चर्चेचा विषय होऊ शकेल. यावर आपले मत जरूर व्यक्त करालच.)

पण त्याआधी, आपले खर्रे खुर्रे वय खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करा.

www.age-test.com

वरील लिंक वर जाऊन तुमच्या स्वत:बद्दल विचारलेल्या प्रश्नांची पर्याय निवडत पटापट उत्तरे द्या आणि जाणून घ्या आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या वयाचे जीवन जगत आहात.

फक्त २-३ मिनिट जातील, उत्तर इथे पोस्ट करायला विसरू नका.

आता हे कदाचित गंमत म्हणून असेल, पण बिनबुडाचे लॉजिक त्यात वापरलेले नाहीये. यात विचारलेले काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील याची खात्री बाळगा.

त्या प्रश्नांवर सविस्तर उद्या बोलूच, याच धाग्यावर!
तुर्तास शुभरात्री.

अरे हो, निरोप घेण्याआधी,
माझे खर्रे खुर्रे वय यात निघाले ते असे.

age test.png

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचं खरंखुरं मानसिक वय बघून मला अजिबातच आश्चर्य वाटलं नाही. धागे उघडून ज्या प्रकारे लिहिता त्यातून ते वेळोवेळी लक्षात आलेलंच आहे.

+१

सहमत आहे सायो,
मलाही 10-12 च्या रेंजचीच अपेक्षा होती आणि तसेच आले. म्हणून हि लिंक प्रॉमिसिंग वाटली आणि इथे शेअर केली. पण इतरांनीही ट्राय करा, जेणेकरून किती समाधानकारक उत्तरे मिळत आहेत हे देखील समजतील.

साती, हायला सगळाच चुकलाय.. म्हणजे बेसिक कन्सेप्टच चुकलेय तर प्लीज करेक्ट करा ना.. आमच्या ऑफिसमध्ये मेडिकल चेकींगला यानुसार वय काढून देत होते पण मी नेमका तेव्हा गैरहजर असल्याने हुकले.. म्हणून काही माहीत नाही ठाम..

२१

44--> 32

ऋन्मेष वय नाही , बी एम आय मध्ये शरीराच्या उंची आणि वजन या परिमाणांचे विशिष्टं गुणोत्तर येतं.
म्हणजे मीटरमध्ये उंची घेऊन तीचा वर्गं करायचा आणि त्या संख्येने किलोग्रॅममधल्या आकड्याला भागायचे.
उत्तर येईल ते तुमचं बीएमआय.
मग तुमचं वय, लिंग आणि शारिरीक ठेवण याच्या अनुशंगाने ते कमी , जास्तं, अतीजास्त, बरोबर असं असू शकतं.
अगदी सोप्प्या भाषेत तुम्ही उंचीच्या मानाने वजनात किती असायला पाहिजे नी किती आहात ते बघायला वापरतात.
गुगळा.

साती, हो हो, माझी गल्लत झाली. बॉडी मास ईडेन्क्स आणि बॉडी एज असे दोन वेगळे प्रकार होते. नंतर संपादतो, धन्यवाद Happy

मी पण १ वर्षाने लहान झालोय , आता पॅन कार्डवरची तारीख बदलतो ही लिंक देवून Happy

वय दाखव तू हवे ते जनाला
पांढरा केस तेवढा लपवून जा
मनाला वाटेलही लहान व्हावे
बाहेर कपडे मात्र घालून जा

6mdr6r.png

(माझ्या Wink ) शरिराचं वय ३८ आणि आत्म्याचं Wink ३२ Wink

http://www.age-test.com/p/6mc96l.png

असाच्च अर्थ निघतो ना हो ह्याचा???

सांगा बरं मला...आपला :-
अशिक्षित आत्मा!

ऋऽऽन्मेष,

अशी मानसशास्त्रीय चाचणी घेतांना जातकाला कधी सांगायचं नसतं की ही चाचणी आहे म्हणून! Wink

मी मला हवी ती उत्तरं देऊन माझं वय ५ वर्षांनी कमी करवून घेतलं! तसाही मी इझी गोइंग आहेच! Proud

आ.न.,
-गा.पै.

Pages