तुम्हाला तुमचे खर्रे खुर्रे वय ठाऊक आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 January, 2015 - 15:30

..

बॉडी-मास-ईंडेक्स म्हणून एक प्रकार असतो बघा. म्हणजे आज तुमचे वय जन्मतारखेच्या कॅलेंडर गिणती नुसार वयवर्षे २०-२२ असले तरी, जर तुमचे शरीर त्या नुसार सुदृढ नसले, किंवा विविध आजारांनी पोखरले गेलेले असले, तर कदाचित तुमचे शारीरीक वय ३०-३२ वा अगदी ४०-५० देखील असू शकते. तसेच याउलट तुम्ही स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेतली असल्यास तुमचे शारीरीक वय कमी देखील भरू शकते. अर्थात याबाबत येथील डॉक्टरच जास्त प्रकाश टाकू शकतात वा आपणही सविस्तर गूगाळून माहीती गोळा करू शकता. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात.

असो,
पण आज मात्र आणखी एक गंमत पाहिली. त्यात शारीरीक वय नाही तर मानसिक वय शोधायचे होते.
(आता, आज जे आपले जन्मतारखेनुसार वय आहे त्यापेक्षा आपले मानसिक वय जास्त असणे चांगले, की कमी असणे चांगले, हा एक मस्त चर्चेचा विषय होऊ शकेल. यावर आपले मत जरूर व्यक्त करालच.)

पण त्याआधी, आपले खर्रे खुर्रे वय खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करा.

www.age-test.com

वरील लिंक वर जाऊन तुमच्या स्वत:बद्दल विचारलेल्या प्रश्नांची पर्याय निवडत पटापट उत्तरे द्या आणि जाणून घ्या आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या वयाचे जीवन जगत आहात.

फक्त २-३ मिनिट जातील, उत्तर इथे पोस्ट करायला विसरू नका.

आता हे कदाचित गंमत म्हणून असेल, पण बिनबुडाचे लॉजिक त्यात वापरलेले नाहीये. यात विचारलेले काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील याची खात्री बाळगा.

त्या प्रश्नांवर सविस्तर उद्या बोलूच, याच धाग्यावर!
तुर्तास शुभरात्री.

अरे हो, निरोप घेण्याआधी,
माझे खर्रे खुर्रे वय यात निघाले ते असे.

age test.png

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्याल्क्युलेत केल्यावर शारीरिक वयापेक्ष्या १३ वर्षाने लहान आले. मित्र मैत्रीणीना सुद्धा दिलि लिंक. Happy

गा.पै.
अशी मानसशास्त्रीय चाचणी घेतांना जातकाला कधी सांगायचं नसतं की ही चाचणी आहे म्हणून!
>>
सहमत आहे.

सुरुवातीला मी हे करताना मला काही प्रश्नानंतर अंदाज येऊन मी ऐनवेळेस काही उत्तरे प्रामाणिक न देता फिरवली होती. तेव्हा १६ आले होते. पण नंतरच्या ट्रायला त्यात सुद्धा जे आहे ते टाकले तर १० आले. तेच प्रामाणिकपणे इथे पोस्टले.

काही प्रश्नांवरून लहान मोठा अंदाज कसा बांधला हे समजले नाही मात्र.
उदा. - परदेशी जायचेय की नाही.. यावरून काय कसे लहान मोठे ठरते?

तर काही प्रश्न ईंटरेस्टींग वाटले,
उदा. - तुम्हाला दिवसाचा कोणता भाग आवडतो - सकाळ दुपार संध्याकाळ रात्र वगैरे
माझे उत्तर दुपार होते - सुट्टीची दुपार - लहानपणापासूनच आवडते. घरातली बोरींग मोठी माणसे झोपली कि दंगा करायची वेळ. Happy

अजून एक गंमत म्हणजे मी माझे खरे वय मुद्दाम वाढवून ३०+ टाकले. रिझल्ट अर्थातच १० वयच आले, पण रिमार्क आला "बिग किड!" म्हणजे मी अजून काही वर्षे सध्या आहे तसाच राहिलो तर लवकरच बिग किड बनत उर्वरीत आयुष्य तसेच असेन. प्रश्न फक्त इतकाच की ग'फ्रेंडची बायको झाल्यावर ती मला तसेच राहू देईल का Wink

प्रश्नच मुळात चुकीचे आहेत.
दुसरं, एका पेक्षा अधिक पर्याय निवडण्याची सोय नाही
लॉटरी लागली तर ठिकाय पण एक रक्कम सांगितली तर बरे झाले असते.
एकंदरित आचरटपणा आहे.

बहुतेक सर्वांचेच कमी आलेले दिसतेय. माझे एकट्याचेच २ वर्षे अधिक आले आहे. बाकीच्यांनी मेंदुला काय अ‍ॅन्टि एजिंग क्रीम फासलेय की काय?

छान, रुन्मेषदादा,माझे शारीरीक वय 29 व खर्रेखुर्रै वय सात आले आहे. बर इथे अनेकांच्या 'गुढघ्या'च्या तक्रारी आहेत Biggrin त्यांना या धाग्यावरुन त्यांच्या गुढघ्याचे वय समजेल तो सुदीन.

Lol मस्त आहे धागा आणि प्रतीसादही . सगळ्यांची वयं जाणुन घेण्याचा उद्देश नसावा.खरी तरी कीती जणं लिहिणार आहेत . Proud
ज्या पध्द्तीने तुम्ही विचार करता व ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात त्याप्रमाणे तुमचा रिपोर्ट अजुनही चुकीचा वाटतोय तुमचे खर्रे खुर्रे वय हे ५च्या आतच असावे. Proud Happy

<<परदेशी जायचेय की नाही.. यावरून काय कसे लहान मोठे ठरते?>> परदेशी जायचं उत्तर येस दिलं तर वय कमी येत असावं कारण तुमच्यात फिरायची आवड ,इच्छा ,उमेद अजुनही आहे .असं असेल.व त्यावरुन वय कमी जास्त ठरवत असतील.
पण "काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील " >> हे पटले.

माझं मानसिक वय इथे लिहीण्यात काही अर्थ नाही ,एकदा वय माझ्या वयापेक्षा बर्रर्रर्रयाच वर्षांनी जास्त दिसतय आणि दुसरयांदा तुमच्या सारखी खर्री उत्तरं दिली तेव्हा डायरेक्ट पाळण्यातच .पण दुसरचं खरं आहे . Happy

माझे वय १५ वर्षा ने कमी आले ...young at heart ... Happy
<<<<बाकीच्यांनी मेंदुला काय अ‍ॅन्टि एजिंग क्रीम फासलेय की काय?>>>>>> चे गु ....परत ट्राय करा ....नक्कि कमी येइल वय... Happy

प्रश्नावली मजेशीर आहे ....कीती सीरिअसली घ्यायच ते आपल्या आपण ठरवयाच... Happy

बाकीच्यांनी मेंदुला काय अ‍ॅन्टि एजिंग क्रीम फासलेय की काय?>> Lol
तसं नाही चेतनजी ,तुम्ही धागाकर्ताकडुन "विचार कसा करायचा "याचे क्लासेस घ्या म्हणजे तुमचे वय कमी होईल . हेच उलटही करु शकता म्हणजे धागाकर्त्याला मानसिक वय जास्त हवे असेल तर त्यांनी चेतनजींकडुन हेच क्लासेस घ्यावेत Proud

माझ २८ आले.:फिदी: काही प्रश्नाना एकतर हो म्हणा नाहीतर नाही म्हणा असे आहे, नो पर्याय. हे म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असे झाले.

कोकणस्थ,

>> लॉटरी लागली तर ठिकाय पण एक रक्कम सांगितली तर बरे झाले असते.

रकमेचा तपशील तुमचा तुम्ही ठरवायचा आहे! Proud त्यावरूनच तर तुमचं मानसिक वय कळणार आहे! Wink

आ.न.,
-गा.पै.

माझं १६ आलं. लॉजिक कळालं तर उत्तरं बदलून देता येतील.>>>
लॉजिकची काय गरज हे ह्यात आपल्यातल्या दडलेल्या छोट्या मुलाला/मुलीला उत्तरे द्यायला लावा अजुन कमी करता येइल ते वय Wink
मी एकदा ३ आणि एकदा १३ ने कमी केलंय ही उत्तरे देउन Proud

गामा Rofl

म्हणूनच म्हणालो एकापेक्षा अधिक पर्याय निवडण्याची सोय नाही ते वाईट आहे. मी सगळंच करेन Lol

माझ्या इथे लिंक बॅन्ड आहे. घरी जाऊन पाहिन हे मॅजिक
मला माझ्या आत्ताच्या वयापेक्शा कमी वय आलेलं नाही आवडणार. जास्त आलं तर चालेल एकवेळ.

BMI हा प्रकार पुर्णपणे योग्य नाही असे अनेक तज्ञांचे मत होते. आता WH ratio जास्त ग्राह्य धरले जाते. Happy

ह्यालिंकवर जाउन टेस्ट घेताना कोणकोणता डेटा आपल्याकडून घेतला जातो?

ऋन्मेऽऽष
>>> महिन्या अखेरीस कामाचे टारगेट्स असतात तसे माबोवर धागा काढण्याचे टारगेट्स तूम्ही ठरवून घेतले आहेत का? Wink

महिन्या अखेरीस कामाचे टारगेट्स असतात तसे माबोवर धागा काढण्याचे टारगेट्स तूम्ही ठरवून घेतले आहेत का?>>आता खरा विषय चालू झाला

महिन्या अखेरीस कामाचे टारगेट्स असतात तसे माबोवर धागा काढण्याचे टारगेट्स तूम्ही ठरवून घेतले आहेत का?>>

त्यांच्या एम.एन.सी.त फार काम नसल्याने गर्लफ्रेन्डच्या (जिच्याशीच ते लग्न करणार आहेत अशी जी ती) सल्ल्याने ते धागे काढतात असा कयास आहे. रविवारी आईच्या आग्रहाने त्यांना आंघोळ (संदर्भः आई-ने-आंघोळी) वगैरे त्रासदायक कामे पार पाडायची असल्याने ते विकेन्डास धागे विणू शकत नाहीत याचे त्यांना वैषम्य आहे असाही कयास आहे.

माझे वय १५ वर्षानी कमी आले. यंग अ‍ॅट हार्ट...:)
(ही टेस्ट एक गंमत आहे ही तशीच घ्यायची... त्याची चिरफाड कशाला करायची)

Pages