सुक्या मासळी साठवणूक बाबत मदत हवी आहे

Submitted by आदू on 14 September, 2020 - 03:40

गावाकडून सुका बाजार आला आहे,पण खारवलेल्या सुरमई ला मीठ सुटून त्यातले पाणी त्या सुरमई सकट अंबाडी सुकट आणि सोड्याला लागलेय आणि सगळं ओलं झालंय,सगळं वेगवेगळ्या कागदी पुड्यात एकाच मोठ्या पिशवीत बांधलं होतं म्हणून बहुतेक सगळं पाणी खेचून सगळेच भिजले Sad
आता सध्या पनवेल मध्ये ऊन पण नाहीये तर हे सगळं कसं सुकवू ???plz लवकर काही उपाय असेल तर सुचवा,सगळं गॅस वर भाजून घेऊ का??मावे नेमका बंद पडला आहे,पण सोडे आणि ती खारी सुरमई कशी भाजता येईल ,
अर्ध्या 1 किलोच्या रेंज मध्ये आहे सगळं

पैकी अंबाडी आताच नुसती गॅस वर पातेल्यात भाजून घेतली,छान खुटखुटीत झालीये,छोटी सुकट सुद्धा अशीच भाजून घेता येईल,
ते सोडे पणभीतभित भाजता येतील पण आता ती खारी सुरमई.....तीच काही सुचवता येईल का??तिला भाजले काय होईल Uhoh
ती सुकी सुरमई आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हेअर ड्रायर वापरून बघितला तर?
ऑर जाड लोखंडी कढईत मीठ घालून त्यात मासळी ठेऊन मोठ्या आचेवर परतणे?
नंतर पूर्ण गार झाल्यावर एअर टाईट डबा।
नंतर जेव्हा कालवण कराल मीठाचा अंदाज जपून

देशी उपाय आहे स्वयंपाकाच्या गॅसवर बांबुच्या कामट्यांची एक झालर बांधा व त्यावर सोडे किंवा इतर मासळी पसरुन ठेवा दोन स्वयंपाकामधे
मासळीची बाजु बदलत रहा.
शक्य असेल तर हेअर ड्रायर ने छोटे छोटे भाग वेळ मिळेल तसे सुकवत रहा पण हे काम खुप वेळकाढु नी कटकटीचे आहे.

* कोकणात, चुलीच्या वर जाळ डायरेक्ट लागणार नाही एवढ्या उंचीवर असते बांधलेले.

हे सोडे काय प्रकार आहे ? गुगलमध्ये फक्त काही पाककृती दिसतायेत. सोडा नावाचा मासा असतो का ? अस्सल सोडे कसे ओळखावे असा एक धागा दिसतोय आदू यांचाच.

मी शक्यतो सुकी मच्छी वाळवून पिशवी किंवा डब्यात घट्ट पॅक करून फ्रिजमध्ये ठेवते त्यामुळे ती चांगली टिकते. पुढच्या वेळेस जमल्यास तसे करा म्हणजे लवकर खराब नाही होणार.

सरळ कागदात बांधा आणि प्लॅस्टिकच्या बॅगेत घट्ट गुंडाळून फ्रीजमधे ठेवा.काही काळाने एआरटाईट डब्यात ठेवा.मला हा उपाय एका कोळणीनेच सांगितला होता.कसंतरी वाटले.प्रथम करताना कसेतरी वाटले.पण आता सोडे,करंदी तसेच ठेवते.
मागे एकदा सुकवलेला ,पण ओलसर असलेला बांगडा असाच पेपरमधे गुंडाळून्प्लॅ.पिशवीत ठेवला होता.अजून छान सुकला.

छान आयडिया,फ्रीज म्हणजे नेहमीचाच खालचा ना,फ्रीझर नाही न

फ्रीज च.
आपण भाजी ठेवतो त्या कप्यात तवा ते डबे.मी तिथे सोडे ठेवले तेच विसरले होते.तुझ्यामुळे लक्षात आले.

तुम्हाला हवे असेल तर नंबर देऊ शकते.लॉकडाऊनमधे फेबुवर एका मराठी सिरियल्मधील नटाचे सुकी मासळी घेण्याबाबत आवाहन वाचले.अप्रत्यक्षपणे मदत व्हावी म्हणून काही प्रकार मागवले.त्यांच्या मित्राने आणून दिले.अर्थात सध्यातरी हे मुंबईमधेच आहे/असावे.

>>>
काही प्रकार मागवले.त्यांच्या मित्राने आणून दिले.
>>>>
दर्जा कसा होता?
चांगला असेल तर इथे नंबर द्याल का?

@ देवकी, द्याना नंबर. मुंबईपुरतेच असेल तर मला उपयोग होणार नाही. मी अमेझॉन वर पाहिलं. बर्याच कंपन्या ते ओनलाईन देताना दिसल्यावर आश्चर्याला परावार उरला नाही. परंतु, त्याच्या दर्जाबद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया सांगावे. कोरोना संपेपर्यंत आठवड्यात एकदा सुकी मासळी खाल्ली तर निदान भाजीचा प्रश्न तरी सुटेल. करायला झटपट आणि टेस्टी प्रकार..! Bw

दर्जा कसा होता?>>>>> चांगला होता.फक्त करंदी हलकीशी पिवळी आहे.चवीत काही फरक नाही.मी ३ गोष्टी प्रत्येकी पाव किलो घेतल्या.तुम्हाला मनात संशय येत असेल तर आधी कमी मागवून पहा.
१.सेंट्रल /हार्बर लाईन.....र्‍श्री.धुमाळ..९९६७३६९५६७

२.वेस्टर्न लाईन(दहिसर ते प्रभादेवी)....... श्री. पेडणेकर..९८३३९५४५१४ आणि ९७६८५८१५७६

पेडणेकरांनी क्र.१ चा नंबर दिला.धुमाळनी ताजे मासेही आणून दिले.साफ केलेले.

आताशा झाली असेल सुकवून पण तरीही इथे काही मिळतंय का पाहा. रेस्प्या तर आहेतच. मुग्धा कर्णिक यांचा ब्लॉग आहे.
http://sukatayan.blogspot.in/ (बहुतेक गुगल ला लॉगीन लागेल)

यांचाच #thecookingwitchmugdhak हा टॅग वापरून थोपु सर्च करा बरीच माहीती; रेस्प्या आहेत.