आई वडील होतांना - भाग ४- निरीक्षण

Submitted by पूजा जोशी on 31 August, 2020 - 08:07

निरीक्षण

जबरदस्त निरीक्षण असत आजकालच्या मुलांच. आपापल्या परीने ऑबर्झवेशनचे निष्कर्ष काढून मोकळे होतात ते.

तर त्याच झाल असं की सासू सासरे बाहेर गावी गेल्यामुळे आठवडाभर मी नीलला माझ्या आई वडिलांकडे सोडत होते.

पावसाळ्याचे दिवस होते. रोज सकाळ संध्याकाळ रिक्षा पकडणे हा खूप मोठा त्रास होता. नील लहान होता आणि कमीत कमी दोन तीन बॅगा हातात असायच्या. भरीस भर म्हणून छत्री रेनकोट लॅपटॉप होतेच. तारेवरची कसरत करत आमची आई पिल्लाची(सर्कशीत शोभेल अशी जोडी) रोज रिक्षा चालकांची विनवणी करत रस्तात उभे असायचो.

एक दिवस रिक्षावाल्याशी रिक्षाच्या विमान वेगावरून माझी शाब्दिक चकमक झाली. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा रिक्षावाल्याने मी सांगितलेल्या रस्ताने रिक्षा न घेतल्यामुळे व ट्रॅफीक लागल्यामुळे मी तोंडसुख घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी रिक्षावाल्याच्या घुटका खावून रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीवरून मी त्याची कान उघाडणी केली.

चिरंजीव माझ्या वागणूकीचे अवलोकन करत होते. त्या दिवशी संध्याकाळी मात्र पहिल्या फटक्यात रिक्षा मिळाली. मी नीलला आणि सामानाला चढवून रिक्षात स्थिरस्थावर झाले. रिक्षा मार्गाला लागली. पाच एक मिनिटे झाली असतील पण काहीच sensational घडत नाहीये ह्याची नीलला जाणीव झाली.

नील सीट वरून उतरून रिक्षात उभा राहिला. माझ्याकडे आणि एकदा पाठमोर्‍या रिक्षावाल्या कडे आळीपाळीने बोट दाखवून आणि नजर टाकून चिरंजीव उद्गारले, "आज भांडण नाही?"

खाडकन माझे डोळे उघडले. मुलांसमोर कस वागावे /बोलावे rather वागू नये / बोलू नये ह्याचा आणखी एक धडा मला मिळाला. ....

आई वडील होतांना – प्रस्तावना
https://www.maayboli.com/node/76296
आई वडील होतांना - भाग १ - विश्वास
https://www.maayboli.com/node/76328
आई वडील होतांना - भाग २- प्रगती पुस्तक
https://www.maayboli.com/node/76354
आई वडील होतांना - भाग ३- जळजळीत अंजन
https://www.maayboli.com/node/76447

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहाहा. पण तुमचे चुकले नव्हते. तुम्ही योग्य मुद्द्यांवरच कानउघडणी करत होता. तेव्हा स्टँडिंग अप फॉर ओन बिलीफ्स हेही शिकवावेच लागते की.