आई वडील होतांना - भाग १ - विश्वास

Submitted by पूजा जोशी on 28 August, 2020 - 04:36

विश्वास

माझ्या लहानपणी एक विषय हमखास वक्तृत्व किंवा निबंध स्पर्धेत असायचा 'दूरदर्शन शाप की वरदान '

आता technology बदलली आणि दूरदर्शनची जागा FACEBOOK, whats app, YouTube ने घेतली. प्रश्न तोच आहे आणि अजूनही योग्य उत्तर सापडत नाहीये.

जसे फायदे तसेच तोटे आहेत. आपला दृष्टीकोन काय? वापर किती आणि कसा? यावर बरेच काही अवलंबून असते. आपण जर योग्य कामासाठी वापर केला आणि मुलांना करायला शिकवला तर फायदाच होईल. मी माझा अनुभव सांगते.

नीलला रोज एक गोष्ट सांगावी लागते त्याशिवाय पठ्ठ्या झोपत नाही. जस जसे त्याचे वय वाढत आहे त्याच्या अभिरुची बदलत आहेत. पुर्वी पंचतंत्रातील गोष्टी आवडायच्या पण आता real life stories सांगाव्या लागतात. मी स्वानुभव कथन करते तर मनिष war stories, cricket चे किस्से, संगीत मैफिलीतले अनुभव सांगतो.

साधारण दोन वर्षेभरा पूर्वीची गोष्ट आहे. कोणीतरी whats app वर जुन्या क्रिकेट मॅचचि लिंक पाठवली. ती पाहताना मला साक्षात्कार झाला, ह्याच मॅचचा किस्सा परवा मनिष नीलला सांगत होता. मी मागचा पुढचा विचार न करता नीलला तो video दाखवला. मग काय साहेबांनी संधीचा फायदा घेतला आणि स्वतः YouTube वर surfing चालू केले. आता आपल्या पुढे काय काय वाढून ठेवले आहे ह्या विचाराने मला धस्स झाले. एकदा मनात विचार आला आपण चूक तर नाही ना केली YouTube त्याच्या हाती देवून. पण लगेच दुसरा विचार आला, किती दिवस आपण त्त्याला परावृत्त करणार.

मग काय 'आलिया भोगासी असावे सादर चित्ती असू द्यावे समाधानी' असा विचार करून मी माझ्या कामाला लागले. मुलावर कितीही विश्वास असला तरी आईचे मन ते स्वस्थ बसू देईना. माझा एक कान video च्या आवाजाचा अंदाज घेत होता. जरा शंका आली कि मी हळूच मागून जावून बघत होते. खात्री पटली की परत कामाला सुरुवात. हे नविन खेळण नीलला आवडल होत. त्याच्या आवडीच्या विषयावर म्हणजे क्रिकेट वर अधिका अधिक माहिती त्याला मिळत होती.

मी ह्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवल. ह्या दोन वर्षांत इतर अनेक विषयांवर चे videos मी स्वतः नीलला शोधून दिले आणि ते त्याने आवडीने पाहिले. बर्याचदा video पाहून झाल्यावर आमच्या चर्चा होतात. नीलच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. तू पु. ल. देशपांडयाना प्रत्यक्ष भेटली आहेस का? ते पार्ल्यात कुठे राहायचे? माझी मुंज झाली त्या सभागृहाला त्यांचे नाव कोणी दिले? कळत नकळत त्याला खूप माहीती मिळते. Ted -Talk , ink talk मधून शिकायला मिळत. भाषा समृद्ध होती आहे. वेळोवेळी त्याचा मला प्रत्यय येतो.

आज you tube मुळे पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, बाबा आमटे त्याला प्रत्यक्ष अनुभवता आले. नुसत्याच ऐकीव माहीती पेक्षा ह्या videos चा परिणाम खूप काळ राहील हयात दुमत नसावे.

आता नील वर लक्ष ठेवावे लागत नाही. तो स्वतः हून येवून कुठला video बघितला ते सांगतो.

Future guarantee कोणी देऊ शकत नाही पण मी नीलवर दाखवलेला विश्वास सध्या तरी सार्थकी लागला आहे असे मी छाती ठोकपणे सांगू शकते.

आई वडील होतांना – प्रस्तावना
https://www.maayboli.com/node/76296

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
प्रत्येक मुलाचा स्वभाव, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच त्यांना कसे समजावायचे, कसे शिकवायचे, हे ठरवावे लागते. त्यामुळे प्रत्येकाचे पालकत्वाचे अनुभव साहजिकच वेगवेगळे असणार. आपलेच मूल असले आणि त्याला आपण चांगले ओळखत असलो, तरी ते पण वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे वागते. मग पुन्हा त्याबरहुकूम आपल्यालाही बदलावे लागते.
एकाच वेळी खूप थकवणारी आणि खूप शिकवणारी कसरत असते सुजाण पालकत्व निभवायचे म्हणजे !

>>>>>>>>आज you tube मुळे पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, बाबा आमटे त्याला प्रत्यक्ष अनुभवता आले. >>>>>>>>वाह!!!