आई वडील होतांना - भाग ३- जळजळीत अंजन

Submitted by पूजा जोशी on 31 August, 2020 - 07:53

जळजळीत अंजन

पावसाळा सुरू झाला आणि खरेदीला उधाण आले. नविन छत्री, रेनकोट, चपला इत्यादी इत्यादी. .

हे काय कमी तर नीलने नवी टुम काढली, पावसाळ्यात मैदानावर जाता येत नाही. मग काय indoor गेम साठी टेबल टेनिसची बॅट , कॅरम ह्यांची खरेदी झाली.

मार्केट मध्ये गेलेच होते आणि गाडीवर शोभेची रोपं विकणारा दिसला. मोह आवरला नाही. मग नीलच्या पसंतीने तीन चार रोप घेतली. ४३० रूपये झाले. माझ्यातली स्त्री जागी झाली. ४०० रुपये देईन असे मी ठणकावून सांगितले आणि त्याने नाराजीने का होईना बोहनी होते आहे म्हणून मान्य केले. त्याला रोप एकत्र करून ठेव, मी येते भाजी घेऊन असे सांगितले.

आपले ३० रूपये वाचवले, आता रिक्षाने घरी जायला हरकत नाही -ह्या आनंदात होते मी. तेवढ्यात नील म्हणाला का bargain केले तू त्याच्याशी. तो पावसात गाडी ढकलून, दिवसभर उभे राहून मेहनत करतो आणि तू त्याला ३० रूपये कमी देणार. Sport's च्या दुकानात आणि छत्रीच्या दुकानात नाही केले तू bargain.

आपल्याच वागण्यातला फोलपणा मला कळला. परतीच्या वाटेवर रोपं घेताना त्याच्या हातात पूर्ण ४३० रूपये ठेवले. नीलचा चेहरा तर खूललाच पण भैय्या पण समाधानाने हसल्याचा भास झाला.

आई वडील होतांना – प्रस्तावना
https://www.maayboli.com/node/76296
आई वडील होतांना - भाग १ - विश्वास
https://www.maayboli.com/node/76328
आई वडील होतांना - भाग २- प्रगती पुस्तक
https://www.maayboli.com/node/76354

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सो स्वीट ऑफ नील. भैया तर्फे धन्यवाद. अग्गदी काटेरी मुकुट आहे पाल कत्व म्हणजे. मुलांची सदसद्विवेक बुद्धी जागृत असते नाही का.

हम्म.
लहान मुलं बरेचदा आपल्या वागण्यातली विसंगती दाखवून देतात.

लहान मुलं खरंच जास्त संवेदनशील असतात. नील , तू
तर भारी आहेस. मी पण लहानपणी ( म्हणजे आताही लहानच आहे. ) तुझ्याचसारखी होते. मला माझे घरचे तोत्तोचान part २ म्हणायचे. मला किनई कंडक्टर काकांच्या हातातल्या तिकिटांच भारी कौतुक..मुद्दाम जाऊन त्यांच्या शेजारीच बसायचे . आणि एके दिवशी काय झालं , त्यांच्या डूलक्यांचा कार्यक्रम चालू असताना नजर चुकवून मी एक तिकीट घेतलं ! जे अजूनही मी जपून ठेवलंय. ( त्या वेळी मी बहुतेक ५ वर्षाची होते. ) आता मी १६ वर्षाची आहे. म्हणजे तब्बल ११ वर्ष झाली. अर्थात आता कळतं की मी असं करायला नको होत. आता जेव्हा ही मी क्लास ला जाते , तेव्हा तेच मला देतात. आणि माझ्याकडे आता इतकी तिकीट आहेत की कदाचित कंडक्टर काकांकडे पण तेवढी नसतील Happy

आणि तुझ्या या सगळ्या करामतींच सुंदर वर्णन करणारी तुझी आई पण भारी !! पूजा काकू , तुम्ही यावर एक पुस्तक का नाही लिहीत ??

छान लिहिलेय. आपले सगळे वागणे बोलणे तपासणारा एक परीक्षक आपल्याबरोबर सतत आहे, याची जाणीव सतत मनात ठेवावीच लागते लहान मुलांना वाढवताना.