आमचा बाप्पा

Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 10:07

नमस्कार मायबोलीकर,

प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
चला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनुडी, घरातील शुभ कार्यासाठी कर्त्या सवरत्या बायका सजून धजून पाहुण्यांचे स्वागत करायला उभ्या आहेत अशा वाटत आहेत गौरी. आत्ता या या म्हणतील असे वाटते. खूप सुंदर.

सर्वांच्या घरचे बाप्पा सुंदर आहेत.
आमच्या घरच्या बाप्पांचे फोटो पाठवत आहे.
दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव असतो आमचा, त्यामुळे शाडूचाच गणपती असणार, हे ओघानेच आले. पण यावर्षी आमच्या नऊ वर्षांच्या चिरंजीवाने घोटीव कागदापासून डेकोरेशन बनवले. मग आम्ही आमच्या टेरेस गार्डन मधील खऱ्या पानाफुलांचा वापर करून बाकीची सजावट बनवली.

ganpati bappa.jpgganpati bappa.jpg

सर्वांच्या घरचे बाप्पा सुंदर आहेत.
आमच्या घरच्या बाप्पांचे फोटो पाठवत आहे.
दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव असतो आमचा, त्यामुळे शाडूचाच गणपती असणार, हे ओघानेच आले. पण यावर्षी आमच्या नऊ वर्षांच्या चिरंजीवाने घोटीव कागदापासून डेकोरेशन बनवले. मग आम्ही आमच्या टेरेस गार्डन मधील खऱ्या पानाफुलांचा वापर करून बाकीची सजावट बनवली.
ganapati deco.jpg

माफ करा. मी edit करण्याचा प्रयत्न करत होते. तर चुकून तीच post दोन वेळा टाकली गेली. एक पूर्ण फोटो आणि एक फक्त बाप्पाचा फोटो टाकायचा होता मला. त्या प्रयत्नात पुन्हा खाली तोच मजकूर आला. मायबोलीवर नवीन आहे मी. क्षमस्व !

सगळ्यांचे बाप्पा सुंदर ..
धनुडी तुमच्या गौरी जास्त आवडल्या.. एकदम ऍक्टिव्ह वाटतायत .. गौराई नटल्यात पण मस्त. असे वाटतंय कि घरची करती सवरती बाई सजून धजून सगळ्याचे स्वागत करायला उभी आहे..

सगळे गणपतीबाप्पा, गौरी फार सुरेख अप्रतिम.

मी सासर माहेर दोन्ही गणुबाप्पा फोटो उपक्रमात ह्या त्या रंग कॉम्बोवर पोस्ट केलेत. गौरी खड्याच्या असतात दोन्हीकडे. माहेरच्या गौरींचा करेन तो आहे. यंदा गणपतीसाठी केलेली सजावट तशीच ठेऊन गौरी तिथेच ठेवल्या, एरवी देवघरात ठेवतात.

Pages