पाककृती- फास्ट फूड स्पर्धा- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु

Submitted by जयु on 28 August, 2020 - 08:50

गट- अ गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु

लाकडाउन मधे लेकीने स्वयंस्फूर्तीने कुकींग शिकले. तुनळीवर videoबघून ती पदार्थ बनवते. पहिल्याच प्रयोगात 'पनीर टिक्का' अप्रतिम बनवल्यावर आत्मविश्वास खूपच वाढला आहे. आता ती पदार्थ बनवताना मला स्वयंपाकघरात प्रवेश बंद असतो(मी खूप सूचना देते म्हणून..). गणेश उत्सवात स्पर्धा पाहिल्यावर सर्वात आधी फास्ट फूड स्पर्धेत भाग घ्यायचाच सांगितले. संयोजकांनी परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.

हा पदार्थ लेकीने तयारी पासून सर्व्हीगपर्यत स्वता केला आहे. मी फक्त बाजारातून साहित्य आणून दिले आणि तिचा एक फोटो काढला. बाकीचे फोटोही तिनेच काढलेत.

चिलीगार्लिक नुडल्स
साहित्य-नुडल्स, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, रंगीत ढोबळी मिरची,बिन्स, गाजर, सोयासॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर,मीठ, साखर,तेल.
IMG-20200828-WA0009.jpgIMG-20200828-WA0010.jpgक्रृती- नुडल्स मीठ घातलेल्या पाण्यात शिजवून घेतले.नंतर निथळून तेल लावून ताटात पसरुन ठेवले. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. कढईत तेल तापवून त्यात कांदा, चिरलेला लसूण मिरची, लसूण पेस्ट, सर्व भाज्या घालून परतून घेतल्या. त्यात सोयासॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर,मीठ, साखर घालून परतले. नंतर नुडल्स घालून मिक्स केले.

IMG-20200828-WA0008.jpg

गरमागरम चिलीगार्लिक नुडल्स सर्व्ह केले. Happy

IMG-20200828-WA0003.jpg

टेस्ट खरंच खूप छान होती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! किती मस्त! शाब्बास प्रांजल (लहान आहे म्हणून शाब्बास! एवढं नीटनेटकेपणाने करणं मला कधीच जमत नाही. त्यामुळे खरं तर _/\_ )

अरे सही, सॉलिड आहे प्रांजल. रेसिपी करण्यात आणि तिच्या सादरीकरणात पैकी च्या पैकी गुण तुमच्या लेकीला.

धन्यवाद अमितव, shitalkrishna, विनिता.झक्कास,कविन आणि लंपन. Happy

लेक खूपच खुष झालेय सर्वांच्या कौतुकाने Happy

Mast

Pages