सांबार रेसिपी.

Submitted by mrunali.samad on 18 August, 2020 - 05:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माझ्या तामिळ मैत्रीणीकडून शिकलेली मुरूंगकाय(शेवग्याच्या शेंगा) सांबार रेसिपी.
साहित्य.
1. तुर डाळ 1 वाटी
2. 3 टोमॅटो
3. 8-9 सांबर ओनिअन्स(शेलोट्स) नसतील तर एक मिडीयम कांदा
४. 3 लसूण पाकळ्या
५. मिरची पावडर
६. सांबार पावडर
७. हळद
८. हिंग
9. चिंचेचा कोळ
१०. शेवगा
११. जिरे, मोहरी, मीठ
१२.कडीपत्ता

क्रमवार पाककृती: 

● कूकरमध्ये तूर डाळ,पाणी, 4-6 छोटे कांदे,3 टोमॅटो,3
लसूण पाकळ्या टाकून 3 शिट्ट्या करून घ्या.
● दुसरे भांडे गैस स्टोव्ह वर ठेवा. फोडणी ला तेल टाका, तेल
तापल्यावर मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, कांदा, हळद ,
शेवगा टाका. जरा परतून घ्या मग चिंचेचा कोळ,मिरची
पावडर, सांबार पावडर,मीठ टाकून उकळून घ्या, चिंचेचा रॉ
स्मेल जाईपर्यंत.
● मग हवे तितके पाणी टाकून उकळू द्या.
कोथिंबीर टाका.गैस बंद करा.
● हे मिश्रण कूकरमध्येच शिजवलेल्या डाळीत टाका.एक
शिटी करून घ्या.
सांबार तयार. गरम गरम भाताबरोबर खा.सोबत आप्पलम (पापड)असेल तरी बास.

अधिक टिपा: 

शेवग्याच्या शेंगा बरोबर आवडीच्या भाज्या पण घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

>सेम पाककृती लेखात एका पेक्षा जास्त रेसिपीज कशा टाकायच्या?
कृपया असे करू नका. नव्या रेसीपीसाठी नवीन पाककृतीचा धागा सुरु करा. आणि नंतर हवे असल्यास त्या पाककृतीची इथे लिंक द्या.

तुम्ही प्रतिसादात फोटो टाकला आहे त्याचा अ‍ॅड्रेस कॉपी करा.
मूळ धा ग्यात सं पादनवर क्लिक करा. जिथे फोटो हवा तिथे जाऊन अ‍ॅड्रेस पेस्ट करा.

कृपया असे करू नका. नव्या रेसीपीसाठी नवीन पाककृतीचा धागा सुरु करा. आणि नंतर हवे असल्यास त्या पाककृतीची इथे लिंक द्या......

ठिक आहे webmaster.
धन्यवाद.

रेसिपी मस्त.. मी पण चेन्नईत होते २ वर्षे.. जीथे पेईंग गेस्ट म्हणून रहायला होते तिथल्या मुत्थम्मा कडून तुटकं मुटकं तम्मिळ बोलून भेंडीचं सांबार शिकले होते.. छान बनवायची ती.. त्या सांबाराव्यतिरिक्त मुरूगन इडली वाल्याचं सांबारपण आवडायचं.

थँक्स म्हाळसा.
मी पण तुटकं मुटकं.तामिळ बोलू शकते. मेड आणि भाजीवाल्याशी बोलण्याइतकं.
आणि थोडे तेलूगु पण, म्हणजे नवर्याच्या आणि सासरच्यां मंडळी च्या गप्पा समजन्याइतकं.
Proud

आणि थोडे तेलूगु पण, म्हणजे नवर्याच्या आणि सासरच्यां मंडळी च्या गप्पा समजन्याइतकं.
Proud >>>>> आपल्या बद्दल काय बोलतात इतकं तरी समजायला पाहिजे Wink Lol

आणि हो मला रस्सम पण आवडतं. MTR चा रस्सम मसाला आणलाय मी. पण माझी कानडी जाऊ त्यापेक्षा भारी बनवते रस्सम.

पुण्यात मी पण MTR रस्सम पावडर वापरायचे.
आता घरीच बनवते पावडर.
घरी बनवलेल्या बनवलेल्या मसाला पावडरींची चव,विकतच्या मसाल्यांना येत नाही, हे माझं मत.

सांबार पावडर ही छानचं, मी पण असेच करते, त्यामध्ये सुका खोबरं टाकते, धने जास्त घेते. आणि दालचिनी टाकते थोडी.

थँक्स ShitalKrishna.
काही जण मिरे पण टाकतात. पण मुलांसाठी म्हणून मी कमी स्पायसी करते.

शनीवारी ईडलीचा बेत होता , म्ह्टल सांबार करूया , मग ही रेसीपी आठवली .
मग लगे हाथो सांबार मसालाही बनवूनच टाकला .
मस्त झालाय . थोडी धण्याची चव आणि वास जास्त वाटतोय . पण चालेल.
धन्यवाद मृणाली Happy

Pages