येतोय आपल्या मायबोलीचा बाप्पा

Submitted by संयोजक on 6 August, 2020 - 12:19

IMG-20200805-WA0028.jpg
नमस्कार मायबोलीकर.
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात आणि सर्वांची बाप्पाचे स्वागत करायची तयारी सुरू होते. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. संयोजक मंडळाची तयारी ही जोरात सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणपती साधेपणाने साजरा करावा लागणार असला तरी मायबोलीवर आपण दणक्यात साजरा करू. लवकरच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्पर्धा जाहीर करू.
आहात ना तय्यार! Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पा मोरया!
संयोजकांना शुभेच्छा. दणक्यात होऊदेत गणेशोत्सव!

गणपती बाप्पा मोरया!
संयोजकांना शुभेच्छा. दणक्यात होऊदेत गणेशोत्सव!

छान आहे पोस्टर!
संयोजकांना शुभेच्छा!
यंदाचा गणेशोत्सव खूप दणक्यात होणार बहुतेक! कारण बहुतांशी मायबोलीकर सकुसप घरी आहेत. Bw

गणपतीबाप्पा मोरया!

Pages