येतोय आपल्या मायबोलीचा बाप्पा

Submitted by संयोजक on 6 August, 2020 - 12:19

IMG-20200805-WA0028.jpg
नमस्कार मायबोलीकर.
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात आणि सर्वांची बाप्पाचे स्वागत करायची तयारी सुरू होते. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. संयोजक मंडळाची तयारी ही जोरात सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणपती साधेपणाने साजरा करावा लागणार असला तरी मायबोलीवर आपण दणक्यात साजरा करू. लवकरच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्पर्धा जाहीर करू.
आहात ना तय्यार! Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, अगदी शतशः धन्यवाद मायबोलीकरांनो.
अगदी घरचे कार्य आहे आपले आणि त्यासाठी सगळेच मायबोलीकर ह्या गणेशोत्सवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अशी शाबासकीची थाप असली की कार्य निम्मे साध्य झाल्यासारखे. आता ह्या गणेशोत्सवात सादर होणाऱ्या सर्व स्पर्धा आणि कार्यक्रमात असाच हिरीरीने सहभाग आपले माबोकर नोंदवणार ह्याची खात्री झाली आहे.
सर्व प्रतिसादकांचे आभार आणि गणेशोत्सवाचे प्रेमळ आमंत्रण.
या.... बाप्पा आपलाच आसा

संयोजकांना शुभेच्छा. मी पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहे.

बाप्पा मोरया !

खुप छान पोस्टर!
नावीन्यपूर्ण उपक्रमांची वाट बघत आहोत Happy

https://www.maayboli.com/node/75967 : स्पर्धांची माहिती देणार्‍या सर्व पेजेस ची लिंक असलेला धागा.

गणेशोत्सवाचे मुख्य पान शनीवारी प्रतिस्थापनेनंतर प्रसिद्ध होईल.

गणेशोत्सवाचे मुख्य पान शनीवारी प्रतिस्थापनेनंतर प्रसिद्ध होईल.>>> आतापर्यंत कायम प्रतिष्ठापना शब्द वापरलेला बघितला आहे. प्रतिस्थापना पहिल्यांदा ऐकलं.

Typo आहे असे वाटत नाही. संयोजक विपुमध्ये खुप आधीच ही गोष्ट लक्षात आणून दिली गेली आहे ,शिवाय एका धाग्यावर प्रतिसादातही आहे. तरी त्या शब्दरचनेत बदल केला न जाण्यामागे निश्चितच काही ठोस प्रयोजन असावे.

सर्व धाग्यांमध्ये प्रतिष्ठापना असा बदल करण्यात आला आहे. धन्यवाद.

केलायं न बदल , मीच दिला होता प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर (हस्तलेखन) संयोजकांनी बदल केला आहे असे सांगितले होते मला. आणि बदल सगळीकडे दिसतं आहे. इथे हा शब्दच नाही आता पण इतर गणेशोत्सवाच्या धाग्यावर योग्य म्हणजे 'प्रतिष्ठापना' हेच दिसते आहे.

होय अस्मिताने दिलेला तो प्रतिसाद. ज्यावर संयोजकांनीही उत्तर देउन, करेक्टिव्ह कृतीही केलेली.

होय अस्मिताने दिलेला तो प्रतिसाद. ज्यावर संयोजकांनीही उत्तर देउन, करेक्टिव्ह कृतीही केलेली.

गणपती बाप्पा मोरया !
मंगलमूर्ति मोरया !
संयोजकांना मनापासून शुभेच्छा! Happy

Pages