Evi's Umbrella

Submitted by एविता on 1 August, 2020 - 23:09

एविज अंब्रेला.

लग्न झाल्यानंतर एक दोन दिवसाच्या अंतराने कोणीतरी जेवायला बोलवायचंच. ह्याचे मित्र, माईंच्या बहिणीकडे किंवा ह्याच्या काकांकडे अथवा ऋषीच्या बाबांच्या मित्राकडे जेवायला जाण्याचे बरेच कार्यक्रम असायचे. एके दिवशी आम्ही दुपारी डायनिंग टेबलावर सगळे जेवत होतो तेंव्हा ऋषीचे बाबा म्हणाले, " ऋषी, तुम्हा दोघांना आज संध्याकाळी रंगे गौडाकडे जेवायला जायचय. सात वाजता निघालात तर आठपर्यंत पोहोचाल. तो मला पावणेसातला फोन करेल."

"ओके अप्पा. आम्ही सात वाजता निघतो."

"राईट, म्हणजे गप्पा टप्पा वगैरे होऊन यू विल बी बॅक बाय टेन, टेन थर्टी." इशान म्हणाला.

"आणि जाताना काहीतरी घेऊन जा रे त्यांच्या नातवासाठी," माई म्हणाल्या, "रिकाम्या हाताने जाऊ नकोस."

"हां माई, नेतो."

" ऋष, इप्सितको वो गिफ्ट मिला है देखो, वो वर्ल्ड मॅप पझल, वो लेकर जाइए आप. मै गिफ्ट पॅक कर देती हूं आपको." इराने सुचवलं, "उसने अभितक वो बक्सा खोलाही नहीं."

"लेकिन इप्सित...?" मी शंका उपस्थित केली.

" अरे भाई अब कहां जाओगी गिफ्ट लाने?" इरा म्हणाली, "तीन तो यहां ही बज गए है. आप जाओगे कब और आओगे कभी? आपको तय्यार भी होना है ना.. मै समझाऊंगी इप्सितको. डोन्ट वरी."

" हो ग इरा, तसच कर," माई म्हणाल्या, "एक काळजी मिटवलीस बघ बाई तू.."

एकेक करून सगळे उठले आणि मी ताटं वाट्या गोळा करायला लागले तसं, " हे यू, एवी, थालियां मत उठाओ. मै सब कर लूंगी, " इरा बोलली, "गो टेक रेस्ट. मै इंदोर जब तक वापस नहीं जाती तबतक तुझे कुछ नहीं करना है. जा तू बेडरूममें, ऋषकी आंखे मायूस लग रही है," माझ्याकडे बघत तिनं डोळे मिचकावले.

"आणि ते यली अडकी इशानने आणून ठेवलेत बघ फ्रिझरमध्ये, तुला आणि ऋषला, ते ही ने.." माईनीं सांगितलं.

खरं म्हणजे जेवणं इतकं जड झालं होतं की नंतरची आवराआवर करायचा कंटाळा आला होता. माईनीं कट्टीन सारु आणि होळगीचा बेत केला होता. होळगी अगदी मऊशार बनवली होती. त्यात जरासं जायफळ आणि वेलची घातल्यामुळे झोप येणार असं वाटत होतं, पण इराने प्रश्न सोडवला. मी फ्रिझर मधले विडे घेतले आणि बेडरूममध्ये आले.

इशान, ऋषीन् आणि त्यांचे अप्पा बाहेर बोलत बसले होते. इप्सित आजोबांच्या मांडीवर विराजमान होता. मी जेवण करून उठल्याची चाहूल त्यांना लागली असावी म्हणून बाबा आणि इशान दोघांनी ऋषिन् ला, 'जा आता, नव्या बायकोकडे लक्ष दे' असं म्हणून  आत जायला सांगितलं.

"ठहरिए, शिनअंकल, मै भी आता हूं." इप्सित म्हणाला तसं इशाननी त्याला दटावलं. " ए.. नई आंटी को आराम करने दे जरा.. डोन्ट ट्रबल देम."

ऋषी आत आला. "या शिनअंकल.." मी त्याला चिडवत म्हणाले. "मला वाटलं की तो तुला शिनच्यान अंकल म्हणेल. तुझं ते आवडतं कार्टून आहे असं माई सांगत होत्या.."मी त्याच्या हातात विडा देत हसत म्हणाले.

"आणि तुझं आवडतं अप्सीडेजि आणि इगल पिगल."

तेवढ्यात इप्सित आत आला.

"शिन अंकल," तो बोलला, "नई आंटी को  ब्रेकफास्ट बनाना आता है?" त्याने विचारले. मला हसू आले.

"अरे नई आंटी ढेर सारी नई डिशेस बनाती है.... क्या समझे तुम?" तो तोंडात विडा टाकत म्हणाला.

"हां आंटी?" त्याने अगदी निरागसपणे विचारले.

"येस डार्लिंग." मी त्याला जवळ घेत म्हणाले.

"मॅगी बनाने आती है आपको?"

मला हसू फुटले, "बहुत आसान है रे मॅगी.."

"मुझे अभी बनाके दोगी आप?"

"जी हुजूर,..... आपका हुक्म और हम ना माने? इप्सित के लिये कुछ भी... चलिए आपको मॅगीके कटलेटस् खिलाती हूं जब चाय बनाऊंगी तब. ओके?"

"ये ssss कटलेटस्, कटलेटस्,"असं ओरडत आणि उड्या मारत तो बाहेर गेला.

मी दार पुढे केलं आणि माझ्या तोंडातला विडा ऋषीन् च्या तोंडात ढकलण्यासाठी त्याला जवळ ओढलं इतक्यात दारावर टकटक झाली. "एवी,एक मिनट,अंदर आ सकती हूं क्या?"

मी दार उघडलं."अरे आइए ना भाभी, आइए.."

"ये शैतानने तुझे कामपे लगा ही दिया ना...? नई आंटी, मॅगीके कटलेटस् खिलाने वाली है मुझे अभी, ऐसे बोल रहा है..."

"हां भाभी, चाय बनाऊंगी तब बनाती हूं.."

"नो नो नो.. एवी, तुझे आराम करना है, मुझे रेसिपी बता दो मै बनाती हूं, और चाय भी बनाऊंगी। इंदौर जाऊंगी तो ये दो दो शैतान मेरे पीछे पड़ ही जाएंगे,  नई आंटी वाली डिश बनाव...नई आंटी वाली डिश बनाव... भई तू रेसिपी बता दे प्लीज।"

"भाभी आपके लिए बेहद आसान है. मॅगी बनाकर हल्कासा नमक, मिर्च ऊपर से मिलाना है. पानी कम रखना है, वो ज्यादा गीली ना हो. ब्रेड का चूरा बनाकर मॅगी की जितनी मात्रा हो उतना मॅगी में मिक्स कर लेना अच्छे से."

"फिर तलना है, है ना?"

"हां, पर इसमे धनिया, हरी मिर्च, पुदीना, करी पत्ता, भी मिला सकती हो चाहे तो. फिर टिक्कियाँ बनाकर नॉन-स्टिक पैन में कम तेल में तलना है. बस हो गया. सॉस के साथ खा सकते है."

" तू है ना, मुंह में पानी छुड़ाकर ही मानेगी.. और ये लो, ऋषने तो खर्राटें भी भरना शुरू किया.."  असं म्हणत दार ओढून घेत ती आत गेली. मी ऋषीन् कडे बघितलं. घोरत पडला होता. मी त्याच्या पावलाला खाजवलं, त्यानं पाय पटकन् वरती ओढून घेतला. दुसऱ्या पायालाही तसच केलं. "एवी, झोपू दे ना.. रात्री जागायचं आहे.." पाय वरती ओढत तो बोलला.

"मी पण जागते की रे तुझ्याबरोबर.. मी झोपलीय का..? चावटपणा कमी कर आणि उठून सांग मी कुठली साडी नेसू ते...."

" अगं नेस कुठली ही.. मस्त दिसतेस तू कुठल्याही साडीत आणि विदाऊट साडीत.."

" थांब तुला...विदाऊट साडीत काय? फार चाव..."

" काय चुकीचं आहे? विदाऊट साडीत म्हणजे ड्रेस मध्ये. तेरे ही मन मे शैतान है."

" आल्या नंतर सांगते तुला कोण शैतान आहे ते. सांग कुठली साडी नेसू?"

" अगं ती काय ते आहे ते बघ काय म्हणतात त्याला, कांची रे कांची रे ह्या गाण्यावर..."

"कांचीवरम? ती बॉटल ग्रीन? विणलेली बुट्टी वाली?"

"हां तीच तीच.. फार मस्त दिसते तुला."

"ओके. तू म्हणशील तसं. तू पण ग्रीन कुर्ता घाल."

"आंटी, मां चाय पीने बुला रही है." इप्सित निरोप सांगून परत पळाला.

"चला अंकल शिनच्यान. चहा पिऊन तयार होवूया" मी त्याचा हात ओढत बोलले.

डायनिंग टेबलवर चहा आणि मॅगीके कटलेटस् ठेवलेले होते."एवी, बढ़िया रेसिपी है बहुत टेस्टी हुए हैं," इरा म्हणाली,"और आसान भी है बनाना. इंदौर जानेके पहले मुझे रोज एक नई रेसिपी बता दिया कर."

"हां भाभी, दोनों मिलकर बनाएंगे कलसे." सगळ्यांनाच तो पदार्थ आवडला. इप्सित तर जाम खुश झाला होता.

आम्ही मग तयारीला लागलो. बरोबर पावणेसातला अप्पान्चा फोन वाजला.

" अरे ते आता निघतील. काय म्हणालास? हा हा हा . ---- होय ---- हो. बघ मजा येते का. हां बाय. ठेवतो."

आम्ही पोर्चमध्ये आलो. गॅरेज मधून ऋषिन् ने गाडी बाहेर काढली. मी दार उघडून बसल्यावर ऋषिन् रस्त्याला लागला.

"कोणाकडे चाललोय रे आपण?"

"अप्पांचे मित्र आहेत खास. स्ट्रेंज गौडा."

"अप्पा तर रंगे गौडा म्हणाले की रे दुपारी.."

सिदाप्पा थिम्मय्या रंगे गौडा. इंग्लिश स्पेलिंग एस टी आर ए एन जी इ म्हणजे स्ट्रेंज गौडा. अप्पागं गोत्त इल्ला. त्यांना सांगू नकोस त्यांच्या खास मित्राला मी  स्ट्रेंज गौडा म्हणतो ते."

"माईना माहित आहे?"

"अप्पाना सोडून सगळ्यांना..."

"लग्नाला आले होते?"

"ऑफ कोर्स. अगं तुला आठवतंय का आपण एकदा चारकोलला बसलो होतो जयनगरमध्ये, मी तुला अर्ध्या जेवणावरून उठवून हात धरून बाहेर आणलं आणि मग आपण धूम ठोकली.....हा हा हा ..."

"अरे हां.. तुला त्यांनी माझ्याबरोबर बघायला नको होतं, आपण त्यांची नजर चुकवून बाहेर पडलो, गल्ल्यावर पैसे देताना तुझी कसली तारांबळ उडाली आणि बाकीचे पैसे न घेताच आपण पळालो बाहेर ते हेच का..? हा s s  हा s s  हा s हा .. पण माझी छत्री तिथेच राहिली रे... माझं नाव पेंट केलेली... मामन नी घरी गेल्यावर विचारलंच, 'पुक्वा त्यू ए मुइये? उ ए तों पारापुइ?' सांगितलं मग तू घेऊन गेलास म्हणून. मग काही बोलली नाही.

"हो ना अगं.. त्यांना सकाळी भेटायला सांगितलं होतं अप्पानीं त्या दिवशी पण तुझ्याबरोबर माझी अपॉइंटमेंट फिक्स होती म्हणून मी त्यांना थाप मारली फोनवर की माझा पाय मुरगळलाय सो आय कान्ट वॉक... आणि तेच आपल्या शेजारच्या टेबलावर.. बाप रे.."

"आणि साहेब बाईकवर मागे मुलीला बसवून फिरवतायत मुरगाळलेला पाय घेऊन, हा s s  हा s s  हा ... त्या दिवशी तुला गाडीला नीट किक् पण मारता येत नव्हती. कसला थरथरत होतास तू.. इग्निशनमध्ये चावी घुसतच नव्हती..."

"अगं आपला सगळा चोरीचा मामला.. अप्पाना त्यांनी सांगितलं तर... ही भीती...मग दुसऱ्या दिवशी गेलो त्यांच्याकडे स्ट्रेचेबल बँडेज बांधून, खोटं खोटं लंगडलो.. हा हा हा...."

"पण नंतर सरावलास तू.. आपण मग ग्रीन थेअरी, लोकारूची,श्रावणा, ब्रिकलेन,लांटर्न,ग्रास हॉपर, किती हॉटेलं पालथी घातली रे... आणि साऊंड ऑफ म्युझिक लिडो की रेक्स थीएटरला ब्रिगेड रोड वर...
आणि ते यू आर सिक्सटीन गोईंग ऑन सेवंटीन गाणं सुरू झाल्यावर तू मला चिमटा काढलास...

"तुला सगळं आठवतंय..?"

"हो.. अगदी पहिलं किप इट सिंपल सिली पण..

"ते काय असतं?"

"ते असतं फर्स्ट लेटर ऑफ एवरी वर्ड.."

"अच्छा? कळलं नाही....रात्री सांग."

मी त्याच्या पाठीत एक धपाटा घातला.

"चला, आलं घर..." असं म्हणत त्याने गाडीचा वेग कमी केला आणि एका घरासमोर गाडी उभी केली. आम्ही उतरलो.

" बारो वळगं.." अप्पांच्या वयाच्या एका व्यक्तीने आमचे स्वागत केलं, "नोड यारू इद्दारे.." असं म्हणत त्यांनी सोफ्यावर बसायला सांगितलं. आतून एक वयस्कर बाई बाहेर आल्या. " ओ हो.. रंगाचारी आवरू मगा.. बारम्मा," त्या म्हणाल्या आणि माझा हात धरून मला सोफ्यावर बसवलं. मी पटकन उठले आणि त्या दोघांना पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांनी त्यांचा मुलाची, सुनेची आणि नातवाची मला ओळख करून दिली.

मग जरा गप्पा सुरू झाल्या. ऋषिन् आणि त्यांचा मुलगा बोलत बसले. नातू माझ्या भोवती घोटाळू लागला.

"तुझं नाव काय बेटा?" मी विचारलं.

"राघवेंद्र नागेश गौडा."

"छान नाव आहे रे.. आईचं नाव माहीत आहे?

" चित्रा."

"वाऊ. मस्त नाव आहे. तुझ्यासाठी एक सरप्राइज आणलय मी.."

तो हसायला लागला. मी त्याला त्याचं गिफ्ट दिलं. त्यानं लगेच गिफ्ट रॅप काढायला सुरुवात केली. त्याच्या आईनी आता काढू नको असा इशारा केला पण लहान मूल थोडच ऐकणार होतं? मीच त्याला उघडून दिलं आणि मग त्याच्या चेहऱ्यावर जे हसू फुललं ते बघून त्याची आईही आनंदली.

आम्ही मग जेवायला बसलो. कडबु केले होते जेवायला. गप्पा टप्पा मारत जेवण संपलं आणि मग आम्ही सगळे परत सोफ्यावर बसलो. जरा वेळाने निघुया या अर्थी ऋषिने मला खूण केली तसं थांबा जरा असं म्हणत रंगे गौडा आत गेले आणि एक गिफ्टची पिशवी आणि एक लांब अशी रॅप केलेली काठीसारखी वस्तू आणली आणि आमच्या हातात दिली.

ती लांब वस्तू बघून काय आहे ते कळेना. ऋषि न् चा प्रश्नार्थक चेहरा बघून रंगे गौडा हसले आणि म्हणाले, " अरे तू चारकोल मध्ये बसला होतास बघ तुझ्या बायको बरोबर.. आठवलं का?.. तेंव्हा ही छत्री विसरून गेला होतात तुम्ही. मी बाहेर येई पर्यंत तू गाडीवर हिला मागे बसवून गेलास पण.. कसली तुला घाई झाली होती काही कळलं नाही. आणि पाय मुरगाळलेला होता ना तुझा.. असो. मी तुझ्या अप्पाला दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये सांगितलं आणि छत्रीही दिली पण तो म्हणाला की आता देऊ नकोस. त्यांचं लग्न झालं की त्यांना तुझ्याकडे जेवायला पाठवतो तेंव्हाच दे. तो माझा बॉस मग मला त्याचं ऐकायलाच पाहिजे ना..!"

ऋषिन् ची काटो तो खून नहीं अशी स्थिति झाली. " त्या नंतर तुला मी लोकारुची आणि श्रावणा मध्ये पण बघितलं," ते पुढे बोलू लागले, " तुझ्याबरोबर नेहमी ही असायची रे.. छान आहे तुझी बायको. ज्या मुली वर प्रेम केलंस त्याच मुलीशी लग्न केलस हे फार छान केलंस. त्याबद्दल तुला शंभर टक्के मार्क्स. आता लग्न केलेल्या मुलीवर मनापासून कायम प्रेम कर हाच आशीर्वाद देतो मी तुला." असं म्हणून त्यांनी आम्हाला निरोप दिला.

आम्ही गाडीत बसलो घरी परतण्यासाठी पण आम्ही वेगळ्याच विश्वात होतो. आम्हाला हसू ही येत होतं आणि ज्या प्रकारे ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे आश्चर्याचे धक्केही बसत होते.

"माय गॉड," ऋषि बोलला. " म्हणजे अप्पाना हे सगळं माहीत होतं तर!... त्यांनी हे सगळं माईला  सांगितलं असणार, आणि माईनी इशानला आणि इशानने इराला... बाप रे... आणि मला असं वाटत राहिलं की इन लोगोंको पता ही नही..."

" अरे खरंच की," मी म्हणाले, "त्यांचा फोन आला तेंव्हा अप्पा म्हणाले बघ, बघ मजा येते का.. या सर्वांनी मिळून आपल्या दोघांना फूल्स पॅराडायिज मध्ये फ्लॅट घेऊन दिलाय का तिसऱ्या मजल्यावर बघायला पाहिजे.. हा हा हा.."

" चारकोलला आपण जुलै मध्ये गेलो होतो. मी तुला फक्त दोन महिन्यांपासून ओळखतो असं मी अप्पाना सांगितलं होतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात साखरपुडा उरकला सुद्धा. जानेवारीत लग्न.."

" हे म्हणजे आज मुंज, उद्या सोडमुंज आणि परवा लग्न.. हा हा हा.."

"आता गेल्यावर कळेलच सगळं.."

आम्ही घरी पोहोचलो तेंव्हा सगळे जण बाहेर हॉल मध्ये सोफ्यावर बसले होते. "या या या.." सगळे एकदमच म्हणाले.

"कसं होतं जेवण?" माईनी विचारलं.

" छान होतं माई. कडबू, तोक्का, रंजका, चित्रान्ना होतं."

" तुला रंगे गौडा नी काय दिलं रे?" आप्पांनी प्रश्न केला.

" छत्री दिली. पण अप्पा, तुम्हाला सगळं माहित होतं तर तुम्ही मला कधी काहीच कसं विचारलं नाही?"

"आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता तू हिला फसवणार नाहीस आणि तू स्वतःहून सांगितल्याशिवाय पुढे विचार करायचा नाही असं ही आम्ही सर्वांनी ठरवलं होतं. तू सांगितल्यावरच एविच्या आईकडे आम्ही गेलो आणि सगळं ठरवलं. एविनी मात्र आईला पहिल्यापासून सगळं सांगितलं होतं अगदी तुम्ही क्रॉसवर्डला पहिल्यांदा भेटला तिथपासून नंतरच्या सगळ्या गाठीभेटी. एविच्या आईनी तिला अगोदरच संमती दिली होती."

" मला एवीची आई आवडली. एविचा फोटो पण आवडला साडी नेसलेला.." माई म्हणाल्या.

" मी साखरपुड्याची बातमी कळली तेंव्हा ऋषिला फोन करून सांगितलं पण.. जो बडा भाई नहीं कर सका वो तूने कर दिखाया, ब्रावो! तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है!" इशानला चेष्टा सुचली.

" और मैंने जब इसका पूरा बायो पढ़ा फोटो के साथ तो मैंने कहा अब इसका छाता खोलकर इसके सिर के ऊपर पकड़ना ही पड़ेगा...." इरा जोरात हसत बोलली, "एविज अंब्रेला..."

" मां, नई आंटी की नई डिश है ना एविज अंब्रेला?" इप्सित ने विचारलं तसं सगळे सात मजली हास्यात बुडाले.

.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मैत्रीण अहो जाहो करते का मनी म्याऊ? मग मला अहो जाहो कशाला? तू मला अगदी एव्या, एवी एवडी म्हणालीस तरी चालेल..! आणि तुझे wishes are accepted heartily!

एविता, थोड्याच दिवसांत तुझं अख्खं घर ओळखीचं होणार आहे. किती छान लिहीलयस. खुप गोड Happy

(फक्त ते हा हा हा च्या ऐवजी काहीतरी वेगळं, स्मायली टाकली तर? )

मस्त!
तुम्ही कन्नडिगा आहात की मराठी?

एविता हे खरंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग आहेत की कथा आहे?, पण जे असेल ते फारच गोड आहे.
तुमची लेखनशैली खूप छान आहे. वाचायला सुरूवात केली की संपूर्ण वाचून संपेपर्यंत थांबताच येत नाही.

छान आहे कथा.

एविता हे खरंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग आहेत की कथा आहे?, >>>

कथा विभागात टाकलंय, कथा म्हणून घ्यायला हवे. खरे असेल किंवा स्वप्नरंजनही असेल. Happy Happy

एविता, काजळ असेल न तुमच्याकडे?
तीट लावून घ्या >>>>किल्ली, तिला ऑलरेडी एकाने लिंबु मिरची बांधून घ्यायला सांगितलीये, आणि तिने ती चांदीची करायचं मनावर ही घेतलय, हो ना गं एवि Happy

नेहमीप्रमाणे हलकी फुलकी.. गोड.. तुमच्या आयुष्यात असेच सगळे गोड गोड प्रसंग येऊ देत.. आणि आम्हाला ते वाचायला मिळू देत..

@ मानव पृथ्वीकर Thank you so very much. बाय द वे महामानव असेल तर कुठला ग्रह असेल.? महामानव गुरुकर?

धनुडी.. यू स्वीट गर्ल! अगं तू तर माझी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड! तू म्हंटल्यावर मी स्मायली टाकायचा प्रयत्न केला पण एरर येतोय. पुढच्या वेळी नक्की करते तसं...! Thank you.. आणि हो, मी लिंबू मिरची चांदीची करायला टाकली आहे खरंच. नंबर १ वाचक नी तसं करायला मला सल्ला दिला होता प्रेमापोटी! लव्ह हर अँड यू.

@वावे. Thank you so so much! मी कन्न डीगा शी लग्न केलंय. मला मराठी छान येतंय. या कथेत मी मामन ला जे म्हणाले ते फ्रेंच आहे, कानडी नाही. Pourquoi tu es mouillé ? où est ton parapluie ? म्हणजे Why you are wet? Where is your umbrella? मी आई बरोबर फ्रेंच का बोलते त्याचा संदर्भ केव्हातरी पुढच्या कथेत येईल.

किट्टू २१. साधना. Thank you so very much. Yes. They are all true events. तुम्ही मला मोटिवेट केलंय त्याबद्दल आभार.

कंसराज, तुम्ही आमच्या प्रेमात पडायच्या आधी मीच तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात पडली आहे. तुम्ही सगळे माझे एक्सटेंडेड फॅमिली च आहात की!

श्रवू.. आभारी आहे मी तुझी. नक्कीच लिहीन सगळ्या गोष्टी. अगं साध्या घरगुती आहेत या गोष्टी पण विनोद निर्माण होतो एवढं नक्की!

Pages