माझा कोविड अनुभव

Submitted by मी_परी on 21 July, 2020 - 03:22

गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता.
गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो.
आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती.
डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता.

आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते.
मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे.
या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो.
या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो.
शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगलं लिहिलं आहेस परी.
तुम्हा दोघांना परत पूर्वी सारखं ठणठणीत होण्यासाठी शुभेच्छा!!
काही प्रश्न विचारायचे आहेत
1. सोसायटी चा रिस्पॉन्स काय?कोणी जजमेंटल बनलं का(अमुक केल्याने तुम्हाला झालं, तुम्ही सोसायटीला संकटात टाकलं इत्यादी.आमच्या सोसायटीत एक केस आहे.एका ग्रुपवर व्यवस्थित सपोर्ट,मदत पाहिजे का आणि दुसऱ्या ग्रुपवर दोषारोष असा प्रकार चालू आहे.अर्थात मनुष्य मास्क न लावता सगळीकडे फिरत होता हेही खरं.)
2. या काळात घरच्यांना जीवनावश्यक वस्तू(दूध वगैरे) मिळायला काही त्रास झाला का?बिग बास्केट, सुपरडेली वाले कंटेन्मेंट झोन वाल्या सोसायटीत येतात का?
3. ऑफिसने लो स्ट्रेस कामाऐवजी पूर्ण सुट्टी द्यायला हरकत नव्हती असे वाटून गेलं.अर्थात रिसोर्स कमी आणि काम तातडीचं असेल.
4. पल्स ऑक्सिमीटर विकत घेतला होता का?(किट मध्ये मीटर आहे आता वाचलं त्यामुळे प्रश्न रद्द)

काही प्रश्न विचारायचे आहेत
1. सोसायटी चा रिस्पॉन्स काय?कोणी जजमेंटल बनलं का(अमुक केल्याने तुम्हाला झालं, तुम्ही सोसायटीला संकटात टाकलं इत्यादी.आमच्या सोसायटीत एक केस आहे.एका ग्रुपवर व्यवस्थित सपोर्ट,मदत पाहिजे का आणि दुसऱ्या ग्रुपवर दोषारोष असा प्रकार चालू आहे.अर्थात मनुष्य मास्क न लावता सगळीकडे फिरत होता हेही खरं.) >> आमचे १२ रौ हाउस एवढीच सोसाइटी आहे. प्रत्येकाला वेगळे गेट आहे. कॉमन फैसिलिटी काही नाहीतच. एकमेकांशी बोलण म्हणजे गेट मधे उभे राहून आणि हे डिस्टन्स १२-१४ फुट असाव. बाकि कुणाला याची कल्पना आलीच नसावी.
2. या काळात घरच्यांना जीवनावश्यक वस्तू(दूध वगैरे) मिळायला काही त्रास झाला का?बिग बास्केट, सुपरडेली वाले कंटेन्मेंट झोन वाल्या सोसायटीत येतात का?- आमची लेन अशी कंटेन्मेंट झोन वैगरे डिक्लेअर झाली नाही. बिग बास्केट वाले एकदा आर्डर साठी आले होते
3. ऑफिसने लो स्ट्रेस कामाऐवजी पूर्ण सुट्टी द्यायला हरकत नव्हती असे वाटून गेलं.अर्थात रिसोर्स कमी आणि काम तातडीचं असेल.>> काम करने हा आमचा चॉइस होता. आम्ही एक दिवस सुट्टी घेऊन बघितली अणि यातला बराच वेळ आम्ही कोविद बद्दल वाचत होतो किंवा एकमेकांन सोबत तेच बोलत होतो. काम करत असताना दिवस पण लवकर संपायचा आणि मन थोड़ा डाइवर्ट राहत होत.
4. पल्स ऑक्सिमीटर विकत घेतला होता का?> आमच्याकडे आधी पासून DR TRUST चा एक होता. अणि जे किट घेतले २ दीनानाथ मधून या मधे अजुन २ मिळाले. आम्ही आमचे हे डिवाइस पण शेयर करत न्हवतो. आता आमच्याकडे ३ पल्स ऑक्सिमीटर आहेत.

काळजी घ्या आणि लौकरच १००% बरे व्हा.

तुमच्या घरातील इतर सदस्यांची तसेच तुमच्या मिस्टरांना ज्या डॉक्टरांनी सुरवातीची ट्रिटमेंट दिली त्यांची कोव्हिड टेस्ट नाही केली का?

तुम्हा दोघांना परत पूर्वी सारखं ठणठणीत होण्यासाठी शुभेच्छा!!>>>+१११

<<<आमची लेन अशी कंटेन्मेंट झोन वैगरे डिक्लेअर झाली नाही. बिग बास्केट वाले एकदा आर्डर साठी आले होते>>> मला हे कळले नाही. आमच्या विंग मध्ये दोन कुटुंब पॉझिटिव्ह आली तर सोसायटीचे दोन्ही गेट, इतर विंग नाही पण आमच्या विंगच्या इंट्रन्स ला बांबू बांधून लॉक केले होते आणि फक्त आमची विंग कंटेन्मेंट झोन मध्ये टाकली आहे

च्या घरातील इतर सदस्यांची तसेच तुमच्या मिस्टरांना ज्या डॉक्टरांनी सुरवातीची ट्रिटमेंट दिली त्यांची कोव्हिड टेस्ट नाही केली का?>> खर सांगयच त्या डॉक्टरशी नंतर काही कांटेक्ट नाही झाल आणि दीनानाथ मधून त्यांनी सांगितल होता की जो पर्यन्त लक्षण नाही येणार टेस्ट करू नका.

VB
आमच्या विंग मध्ये दोन कुटुंब पॉझिटिव्ह आली तर सोसायटीचे दोन्ही गेट, इतर विंग नाही पण आमच्या विंगच्या इंट्रन्स ला बांबू बांधून लॉक केले होते आणि फक्त आमची विंग कंटेन्मेंट झोन मध्ये टाकली आहे>>तुमची कदाचित क्लोज्ड सोसाइटी असावी. आमचे रौ हाउस आहेत. सगळ्यांना रोड टच अशी स्वतंत्र एंट्री आहे

पहिला प्रयत्न आहे लिहायचा असं काही वाटलं नाही. बरे झालेच आहात आता ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा! बाकी घरातील इतर लोकं इन्फेक्ट झाली नाही हे सुदैवच कारण इंफेक्ट झाले होते व लक्षण दिसायला लागले ह्या दरम्यान किती दिवस गेले कळायला काही मार्ग नाही.

या लेखाबद्दल खूप धन्यवाद!
असे काही झालेच तर काय करावे लागेल ही कल्पना आली.
तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. ..

तुम्ही जेवल्यावर ताटं डिस-इन्फेक्ट कसे करायचे? तुम्ही ताट तुमच्या खोलीतच ठेवून जेवायच्या वेळेला दारा बाहेर ठेवायचे आणि घरचे येऊन त्यात वाढायचे का? तुमच्या खोलीतील कचऱ्याची काय व्यवस्था केलीत?

मानव
तुम्ही जेवल्यावर ताटं डिस-इन्फेक्ट कसे करायचे? तुम्ही ताट तुमच्या खोलीतच ठेवून जेवायच्या वेळेला दारा बाहेर ठेवायचे आणि घरचे येऊन त्यात वाढायचे का? तुमच्या खोलीतील कचऱ्याची काय व्यवस्था केलीत? >> आमच्या जेवणानंतर आम्ही आमच ताट
घासून धुउन ठेवत असू आणि प्रत्येक वेळी आम्ही ताट बाहेर ठेवत असू आणि घरचे लोक वाढून गेल्यावर आत घेत असू. अणि आम्ही त्याना सांगितले होते की कांटेक्ट करू नका ताटाशी. आणि हे सगळ मास्क अणि ग्लोव्ज घालून करत होते
आम्हाला दर ८ तासाने मास्क बदलायचे होता. डॉक्टरने आम्हाला तो मास्क डिसइंफेक्ट करून गार्बेज बैग मधे टाकायला सांगितला होता. आम्ही ग्लोव्ज घालून ते करत असू अणि खुप मोठी गार्बेज बास्केट आहे. आम्ही ती झाडचा पाळपाचोळा ठेवण्यासाठी वापरतो. आम्ही ती बालकनी मधे ठेवली होती. आम्ही सगळे मास्क त्यामधे कलेक्ट केले होते. आम्हाला फ्रूट जे आले त्याचा आम्ही वेगळा कचरा साठउन ठेवला होता. आम्ही जास्तीत जास्त प्रयन्त केला की आमच्या रूम मधून काहीच बाहेर नाही गेला पाहिजे.

सर्वप्रथम तुम्हाला दोघांना ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा!
चांगली माहिती दिली आहे. तुमचा अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद!
दोन प्रश्न
1. Oxymeter share करू नका असं डॉक्टर म्हणाले म्हणून की दोन किट मध्ये होते म्हणून शेअर केले नाहीत?
2. काही sequelae दिसत आहेत का? म्हणजे बरे झाल्यावर देखील काही त्रास/वेगळेपण जाणवते आहे का?

सर्वप्रथम तुम्हाला दोघांना ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा! >> धन्यवाद !
चांगली माहिती दिली आहे. तुमचा अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद!
दोन प्रश्न
1. Oxymeter share करू नका असं डॉक्टर म्हणाले म्हणून की दोन किट मध्ये होते म्हणून शेअर केले नाहीत?>> डॉक्टरनी आम्हाला रूम शेयर करू नका अस सांगितला होता अणि हे त्या साथी होता की कुणी एक ठीक होता असेल तर दुसऱ्याने त्याला इन्फेक्ट करू नए. या नियमानुसार आम्ही वस्तु पण शेयर करायला नको होत्या. आम्ही ते डिसइंफेक्ट करून घेऊ शकत होतो पण आम्ही नविन खरेदी केले. आमच्या कड़े घरी होता ते आम्ही यूज़ केला अणि किट मधे नविन आलेला बाकि घरातल्या लोकना दिला यूज़ करायला.

2. काही sequelae दिसत आहेत का? म्हणजे बरे झाल्यावर देखील काही त्रास/वेगळेपण जाणवते आहे का? >> जास्त काही वेगळा नाही. पण आज पार्किंग मधे चालताना नेहमी पेक्षा लवकर दमले अस वाटल

चांगलं लिहिलं आहेस परी. तुम्हा दोघांना परत पूर्वी सारखं ठणठणीत होण्यासाठी शुभेच्छा!!>>> + १२३४५६७८९

पुर्वीसारखं ठणठणीत होण्यासाठी शुभेच्छा.
तुमचा अनुभव वाचुन, तुमचं धैर्य व केलेले प्रयत्न यांच कौतुक वाटत. एक सकारात्मक भावना येते मनात.

बरे तर झालात आहात पण ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा.
तुमचा अनुभव सर्वांसाठी नक्कीच मार्ग दर्शक आहे.
धीर न सोडता शांत पने तुम्ही जे निर्णय घेतले ते कौतुकासपदच आहेत.
योग्य काळजी आणि योग्य उपचार केले तर व्यक्ती covid 19 पासून लवकर बरा. होवू शकतो.
असा सकारात्मक संदेश मिळाला.

Hemant ३३
बरे तर झालात आहात पण ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा.>> धन्यवाद !!

बरे तर झालात आहात पण ठणठणीत बरे होण्यासाठी शुभेच्छा.
तुमचा अनुभव सर्वांसाठी नक्कीच मार्ग दर्शक आहे.
धीर न सोडता शांत पने तुम्ही जे निर्णय घेतले ते कौतुकासपदच आहेत.
योग्य काळजी आणि योग्य उपचार केले तर व्यक्ती covid 19 पासून लवकर बरा. होवू शकतो.
असा सकारात्मक संदेश मिळाला.+११११११

आमच्या बाकि फॅमिलीला खर तर जवळ(३ किमी) वर असलेल्या दुसऱ्या घरी शिफ्ट व्हा अस म्हटल होत पण मग जार कमी जास्त काही झाल तर आमच्या कड़े कोण बघणार? म्हणून ते आमच्या सोबतच राहिले. घरी राहण्याचा निर्णय घेण खुप अवघड होत. आमच्या दोघां पैकी कुणाला अचानक काही जास्त झाल तर या विचाराने पहिली पूर्ण रात्र झोप आली नाही. थोड्या थोड्या वेळाने एकमेकांना आवाज देत होतो. पण मग जसे जसे दिवस जाऊ लागले आमची चिंता थोड़ी कमी झाली.

डॉक्टरने आम्हाला तो मास्क डिसइंफेक्ट करून गार्बेज बैग मधे टाकायला सांगितला होता. आम्ही ग्लोव्ज घालून ते करत असू अणि खुप मोठी गार्बेज बास्केट आहे. आम्ही ती झाडचा पाळपाचोळा ठेवण्यासाठी वापरतो. आम्ही ती बालकनी मधे ठेवली होती. आम्ही सगळे मास्क त्यामधे कलेक्ट केले होते. आम्हाला फ्रूट जे आले त्याचा आम्ही वेगळा कचरा साठउन ठेवला होता. >>> हो पण मग तुमचं आयसोलेशन सम्पल्यावर त्या गार्बेजचं काय केलं? ते सगळं dispose off कोणी आणि कसं केलं? माझ्या सोसायटी मध्ये 3 दिवसात 7 केसेस डिटेक्ट झाल्या आहेत, म्हणून हा प्रश्न माहिती मिळवण्यासाठी विचारते आहे.

अनूभव चांगला आणी मार्गदर्शक लिहीलात. तुम्हा दोघांना पुढील निरोगी व सशक्त जीवनाकरता अनेक शुभेच्छा.

हो पण मग तुमचं आयसोलेशन सम्पल्यावर त्या गार्बेजचं काय केलं? ते सगळं dispose off कोणी आणि कसं केलं? माझ्या सोसायटी मध्ये 3 दिवसात 7 केसेस डिटेक्ट झाल्या आहेत, म्हणून हा प्रश्न माहिती मिळवण्यासाठी विचारते आहे.>>>>> +११११ या विषयी पण लिहा.

मीरा
आम्ही ते मास्क डिसइंफेक्ट करून कलेक्ट केले होते. आम्ही स्वता: कचरा नेणाऱ्या गाडित टाकून आलो. आमच्या घरातल्या दूसर कुणीही किंवा कचरावाल्या ताईने हात लावू नये अस वाटत होत.

हॉस्पिटल मधून किट मधे गोळ्या दिल्या होत्या त्या ५ लीटर पाण्यात टाकून कमित कमी ४५ मिन ठेवायच अणि मग गार्बेज बैग मधे टाकायच.
कंसलटेशन घेताना बऱ्याच गोष्टी या केयरटेकरसाठी आहेत म्हणजे डबल मास्क वापरून अणि ग्लोव्ज घालून हे मास्क डिसइंफेक्ट करायचे. पण आमच्या सिचुएशन मधे आम्ही दोघेही खुप ठीक होतो म्हणुन हे सगळ आम्हीच केल

धन्यवाद ! तुम्ही दोघे खंबीर मनाने या सर्वाला सामोरे गेलात आणी बाकीच्यांची पण काळजी घेतलीत हे खूप छान आणी महत्वाचे काम केलेत. कायम असेच आशावादी आणी खंबीर वृत्तीचे रहा.

परी, आभारी आहे.

लेख खूप डिटेल मध्ये लिहिला आहेस, सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगी आहे.

तुम्हाला दोघांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा !

Pages