माझा कोविड अनुभव

Submitted by मी_परी on 21 July, 2020 - 03:22

गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता.
गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो.
आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती.
डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता.

आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते.
मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे.
या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो.
या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो.
शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

परी, आभारी आहे.

लेख खूप डिटेल मध्ये लिहिला आहेस, सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगी आहे.

तुम्हाला दोघांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा !

सर्वप्रथम हा अनुभव शेअर केल्याबद्दल आपले मन:पूर्वक मन:पूर्वक आभार. आणि पूर्ण बरे होण्यासाठी लाख शुभेच्छा. प्रतिक्रियांवरून दिसून येते कि बऱ्याच जणांना याबाबत प्रश्न आहेत व प्रत्यक्ष अनुभवातून गेलेल्या व्यक्तीकडून त्यांची उत्तरे हवी आहेत. मलासुद्धा एक प्रश्न आहे. थोडा संवेदनशील आहे. त्यामुळे उत्तर दिले नाहीत तरी चालेल. पण विचारणे महत्वाचे वाटतेय म्हणून विचारतोय.

कोणत्या कारणांमुळे संसर्ग झाला असेल याबद्दल आपला काही अंदाज आहे का? (म्हणजे, कळल्यावर आपल्याला धक्का बसतो. पण कालांतराने आपण मागोवा घेतो तेंव्हा एखादी शक्यता दाट वाटू लागते)

सोयीकरिता पर्याय देत आहे:

१. वस्तूंद्वारे झाला असावा: बाहेरून आणलेल्या वस्तूंद्वारे (जसे कि दुधाची पिशवी इत्यादी) त्याचे निर्जंतुकीकरण/विलगीकरण कदाचित नीट झाले नसावे

२. संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून झाला असावा: उदाहरणार्थ, लॉकडाऊन काढल्यानंतर बाहेर (गर्दीत वगैरे) जाणे झाले असू शकते, किंवा बाहेरून घरी आलेल्या व्यक्तीकडून (मोलकरीण इत्यादी) शक्यता असू शकते

३. सर्व काळजी घेतली होती तरीही झाला: अजिबात बाहेर वगैरे जाणे झालेच नव्हते. संशय सारखे काहीच नाही. तरीही कशामुळे झाला कळत नाही. (माझ्या अप्रत्यक्ष ओळखीत अशी एक केस आहे)

४. वरीलपैकी काही नाही. अन्य काही कारणामुळे झाला असण्याची शक्यता वाटते.

५. शक्यता आहे(त) काही पण त्याबाबत काही सांगावयाचे नाही

आम्ही अजिबात बाहेर गेलो नाही अस नहिये पण गरजेसाठी. भाजी किंवा किराना घेण्यासाठी गलोच . दूध पैकेट शक्यता खुप कमी आहे. एकतर दूध माझे दिर घेऊन येतात अणि माझ्या आधी बाकि लोका पण हात लावतता . एक अनुभव आहे काहीतरी घेण्याकरीता मि शॉप मधे गेले होते अणि माझा नवरा गाडीवर बसला होता जाता जाता एक मानुस त्याला धक्का देऊन गेला. आम्हाला विचत्र वाटल. या काळात लोका २-४ फुट लांबून जातात अणि हा धक्का देऊन गेला आम्ही हात सनीटाइस केला होता. काही नसेल ही पण मला हे थोड़ा odd वाटत. आणि त्यात माझ्या नवऱ्याला आधी झाल अणि मग मला म्हणून जास्त

हा सगळा माझा गेस पण असू शकतो. कचरवाला गेट उघडून कचरा घेऊन जातो...त्यांचे हात लागतात आम्ही येता जाता त्याच गेट ला हात लावत असतो..तेहि असू शकत. आपण गाडी पार्क करतो तर लोका येऊन बसतात..हो आमच्या गाडीवर बसले आहेत येऊन. आपण तीच गाडी वापरतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मेडिकल मधे जातो तिकडे असू शकत

मी परी तुम्ही बऱ्या झालात याबद्दल शुभेच्छा, आणि अनुभव लिहिल्या बद्दल आभार.खूप छान काळजी घेतलीत तुम्ही .माझ्या बिल्डिंग मध्ये 1 करोना पेशंट सापडला.त्यांना asymptomatic corona झालाय.म्हणून होम qurantine केलं आहे.पण त्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आता त्यांच्या छोट्या मुलीला आणि पत्नी ला ही करोना ची लागण झाली आहे.अशा प्रकार च्या करोना मध्ये रुग्णात काहीच symptoms दिसत नाहीत म्हणून डॉक्टर ऍडमिट करून घेत नाहीत.एक होम qurantine किट देतात.यात योग्य ती काळजी नाही घेतली तर त्याचा फैलाव होतो.आता आमची बिल्डिंग सील केली आहे.

Kashvi
आम्ही पैन कदाचित asymptoatic होतो. या आधी पण जरा कधी डाउन वाटल की आम्ही स्वताला वेगळ करत असू

कन्सलटेशन मध्ये काही लेखी सूचना मिळाल्या असतील तर इथे शेयर करू शकाल का?
पूर्ण बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा!

मी_परी
तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही सजग राहून ज्या जबाबदारीने स्वतः ची व घरच्यांची काळजी घेतली व इतरांना कोरोना होऊ नये याची काळजी घेतली याबद्दल तुमचे खूप कौतुक वाटते.
त्या काळात आलेला ताण तुम्ही कसा manage केला, कामाव्यतिरीक्त काय केले?
तुमच्या अनुभवाचा खूप जणांना उपयोग होईल व त्यांना सकारात्मक रहाण्यासाठी मदत मिळेल. तुमचे आभार.

@मी_परी, उत्तर दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार. तुमचा हा धागा अनेकांना नक्कीच उपयोगाचा ठरेल. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

अस्मिता
सुरवातीचे काही दिवस खुप मानसिकरित्या खुप भयंकर होते. आम्ही टेस्ट देऊन आल्यापासून रिपोर्ट येई पर्यन्त फ़क्त कोविद बद्दल वाचत पाहत होतो. आम्ही बाकि लोकांसाठी खुप काळजी मधे होतो त्या नंतरचा दिवस पण आम्ही हेच केला. खुप सारे वीडियो बघितले त्यांचा सोबत तुलना करण्याचा प्रयन्त केला. प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता आणि बऱ्याच वेळा आम्ही ते आमच्यात शोधायचा प्रयन्त करायचो. पण मग तिसऱ्या दिवस नंतर आम्ही हे सगल बंद केल. आम्ही योग करायला स्टार्ट केला. फ्रेंड्स आणि रिलेटिवला वीडियो कॉल करायचो आणि आम्ही नेटफ्लिक्स वर परत फ्रेंड्स बघायला स्टार्ट केल. आम्हाला लाइट सीरीज पाहिजे होती आणि TV वर पाहत असल्यामुळे दोघे सेम टाइमला पाहु शकत होतो. मग आम्ही फ्रेंड्स रिलेटेड वीडियो पण बघायचो आणि मग ते डिसकस पण करायचो. परत ८ सीजन पाहून झाले आमचे.

@मी_परी, उत्तर दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार. तुमचा हा धागा अनेकांना नक्कीच उपयोगाचा ठरेल. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा....+1.

मी_परी,
तुमचा अनुभव इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पूर्ण रिकवरीसाठी शुभेच्छा! स्वतःची काळजी आणि कुटुंबियांची काळजी अशी दुहेरी तणावाची परीस्थिती असतानाही तुम्ही गोंधळून न जाता धीराने निर्णय घेतलेत ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरावे.

चांगली माहिती आणि अनुभव लेखनाबद्दल धन्यवाद.
तुम्हाला दोघांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा !

तुम्हाला शुभेच्छा. Happy
तुम्ही तेव्हाच्या मनस्थिती बद्दल आणि एकुणच अप्रोच बद्दल चांगलं लिहिलं आहे.

छान केलेत अनुभव लिहिलात
असे अनुभव वाचून कोरोना झालाच तर त्याच्याशी लढायसाठी मानसिक तयारी हळूहळू होतेय.

परी, तुमचा अनुभव इथे लिहून चांगलं केलंत. पूर्ण बर्‍या होण्यासाठी शुभेच्छा!

बदललेल्या प्रोसिजरप्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्यांना त्यांची लक्षणे दिसायचे बंद झाल्यावर क्युअर्ड घोषित करतात. त्यांची पुन्हा टेस्ट करत नाहीत. तुमच्या बाबतही तसेच झालेले दिसते. तुम्ही बरे झाल्याचे कोणी आणि कसे ठरवले? तुम्हांला फोन करणार्‍या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी की पुन्हा डॉक्टर व्हिजिट?

आम्ही गजानन महाराज विजय ग्रंथ मधील रोज एक अध्याय अस वाचण्यास पण सुरवात केली

नवीन Submitted by मी_परी on 21 July, 2020 - 19:08

बेस्ट! पण ते सुरुवात केली की 21 अध्याय पूर्ण करावे लागतात ना? माझ्याकडे पण आहे पण भारतातल्या घरी आहे.

चांगले सविस्तर लिहीले आहेत मी_परी. धन्यवाद.
तुम्ही खूपच शांतपणे हाताळलीत परिस्थिती. दोघांनाही पूर्वीसारखे निरोगी होण्यासाठी शुभेच्छा.

प्रत्येक केस वेगळीच ऐकायला मिळतेय. लक्षणे, उपचार, बरे होण्याचा प्रवास याबाबत. जितके वाचू तितके नवीन एकएक कळतेय.

लोकल डॉक्टरनी कुठले अँटीबायोटिक दिले? काय हेतूने, काही सांगितले का? कारण तेव्हा तुमच्या कुठल्याच तपसण्या / निदान झाले नव्हते.
पॅरॅसिटॅमॉल त्यांनी / दीनानाथ मधील डॉनेही ४-४ तासांनी घ्यायला सांगितले का? जसे तुम्ही आपल्या मनाने घेतले होते लोकल डॉ कडे जायच्या आधी?
खोली निर्जंतुक करायला काय वापरले? तेही दीनानाथच्य किटमध्ये होते का? की बाहेर मिळते आपले आपण आणू शकतो?
१५ दिवसाच्या आयसोलेशन नंतर पुन्हा तुमची तपासणी झाली की लक्षणे ओसरल्यावर आपणच वावरायचे?
मास्क निर्जंतुक करायच्या गोळ्यांचे नाव देऊ शकाल का इथे ?

अँटिबॉडीज ३ महिने टिकतात म्हणे. परत होऊ शकतो. >> हो. असंच ऐकलं हल्ली. त्यामुळे व्हॅक्सिनही कसं काम करेल (करेल का?)कोण जाणे!

Pages