माझा कोविड अनुभव

Submitted by मी_परी on 21 July, 2020 - 03:22

गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता.
गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो.
आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती.
डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता.

आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते.
मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे.
या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो.
या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो.
शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अँटिबायोटिक का देतायत? व्हायरस साठी अँटिबायोटिक मी पहिल्यांदा ऐकतोय... >> Biggrin अगदी अगदी.
पण भारतातले डॉक्टर आणि रहाणारे सगळे सगळे घेतात. आपण बोललो की 'आलाय मोठा अमेरिकेहुन' लुक देतात. Light 1

तुम्ही ह्या चिनी वुहान विषाणूला मात दिलीत ह्या बद्दल अभिनंदन आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

अँटिबायोटिक चे प्रयोजन मात्र कळले नाही. अकारण किंवा सकारण जरी घेतले तरी गट बायोम वर विपरीत परिणाम होतो आणि परत तयार व्हायला खूप दिवस लागतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खावे लागते. आपल्या शरीरातील एकूण पेशींपेक्षा १० पट संख्येने चांगले, उपयोगी असे मायक्रोब्ज आपल्या पोटात असतात असे म्हणतात (एक ते अडीच किलो वजनाचे) तेव्हा अँटिबायोटिक तारतम्याने वापरलेले बरे.

अवांतरः एवढीही काही वाईट परिस्थिती नाही अँटीबायोटीकबाबत.
साध्या आजारपणात मी अनेकवेळा वेगवेगळ्या डॉना अँटीबायोटीक नका लिहु असे सांगितले व त्यांनीही अपमान न करता ऐकले.

मी जे वाचलं आहे त्यावरून जेव्हा antiviral सहज उपलब्ध नसतं तेव्हा symptomatic patient ची immune system virus वर मात करताना overwhelm होऊ शकते. अशावेळी दुसरी अनेक opportunistic bacterial infections होण्याचा धोका असतो. म्हणून antibiotics चा कोर्स prescribe करतात. अर्थात त्याच्या जोडीला probiotics, B complex च्या गोळ्या, लागली तर antacids असे जे आवश्यक असेल ते prescribe करतात डॉक्टर.

व्हायरस आधी इन्फेक्ट करून आतली त्वचा म्हणजे नाकातील फुफुसातील आवरण खराब करतात
मग बैक्ट्रियानाही प्रवेश करणे सोपे जाते, त्याला सेकंडरी इंफेक्शन म्हणतात

म्हणून एंटीबायोटिक देतात
शिवाय 3 महिन्यापूर्वी जेंव्हा आताचे इंटिव्हायरल उपलब्ध नव्हते तेंव्हा अजीथ्रोमायसिन हे एन्टीबॉयोटिक बापरत होते , जे तेंव्हा कोव्हीडवर थोड़े फार उपयोगी होते

भरत
परी, तुमचा अनुभव इथे लिहून चांगलं केलंत. पूर्ण बर्‍या होण्यासाठी शुभेच्छा! >> धन्यवाद

बदललेल्या प्रोसिजरप्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्यांना त्यांची लक्षणे दिसायचे बंद झाल्यावर क्युअर्ड घोषित करतात. त्यांची पुन्हा टेस्ट करत नाहीत. तुमच्या बाबतही तसेच झालेले दिसते. तुम्ही बरे झाल्याचे कोणी आणि कसे ठरवले? तुम्हांला फोन करणार्‍या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी की पुन्हा डॉक्टर व्हिजिट? >> आम्हाला आधीच दीनानाथ मधून सांगितले होते की का पीरियड संपला की परत टेस्ट ची गरज नाहीये अणि विजिट करायची पण

karavi
लोकल डॉक्टरनी कुठले अँटीबायोटिक दिले? काय हेतूने, काही सांगितले का? कारण तेव्हा तुमच्या कुठल्याच तपसण्या / निदान झाले नव्हते. >> २ दिवस ताप होता म्हणुन त्यांनी एक दिल होते. अणि दीनानाथ मधे हे दाखवल्यावर कंटिन्यू करा म्हणाले होते
पॅरॅसिटॅमॉल त्यांनी / दीनानाथ मधील डॉनेही ४-४ तासांनी घ्यायला सांगितले का? जसे तुम्ही आपल्या मनाने घेतले होते लोकल डॉ कडे जायच्या आधी? >> आमच्या आधीच्या डॉक्टर ने सांगितले होता एकदा की घ्या परसटोमोल. दीनानाथ मधील डॉक्टरनी मझया नवरायला ताप आला तर परसटॉल घ्या सांगितला होता.
खोली निर्जंतुक करायला काय वापरले? तेही दीनानाथच्य किटमध्ये होते का? की बाहेर मिळते आपले आपण आणू शकतो?
१५ दिवसाच्या आयसोलेशन नंतर पुन्हा तुमची तपासणी झाली की लक्षणे ओसरल्यावर आपणच वावरायचे?
मास्क निर्जंतुक करायच्या गोळ्यांचे नाव देऊ शकाल का इथे ? >> हो त्या किट मधेच त्या गोळ्या होत्या त्या ५ लीटर पाण्यात एक अशी सांगितली होती अणि आम्ही खोली निर्जंतुक करायला त्याचेच सोलुशन वापरत होतो. मला वाटत हे कोणालाही सहज मिळेल. आम्हाला किट घेताना फ़क्त एकच बाटली मिळाली. स्टॉक न्हवता त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन डिलीवर या गोळ्या अणि आम्ही अजुन मास्क ,ग्लोव्स मागवाले होते . ते डिलीवर केले. ISOCHORE अस नाव आहे त्याच. एक बाटली मधे २० गोळ्या आहेत. अणि त्याची कीमत ११० आहे. त्यांनी आम्हाला १७ दिवसच आइसोलेशन सांगितला होता अणि ते झाल की तुम्ही फ्री आहत म्हणाले

लवकर पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी खूप शुभेच्छा... सगळ्या प्रश्नांची आवर्जून उत्तरं देता आहात, त्याबद्दल खूप धन्यवाद...

मी कोरोणा टेस्ट केली तेव्हा मला पण खूप टेन्शन आलं होतं काय रिझल्ट येईल. तरी पोझीटीव्ह हे गृहीत धरलं होतं आई आणि मी दोघीच होतो आईला बहिणी कडे पाठवलं आणि माझा रिझल्ट पोझीटीव्ह आला तेव्हा सोबत कोणीच नव्हतं तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही रडून रडून खूप हाल झाले होते. ती अंबुलान्स येते तुम्हाला घ्यायला तेव्हा खूपच त्रास होतो परत बघणारांच्या नजरा खूप काही अनुभव देऊन जातात. कधीच विसरता न येणारा अनुभव आहे पण आता मी पण बरी आहे आणि सगळं व्यवस्थित आहे.

आम्हाला आधीच दीनानाथ मधून सांगितले होते की का पीरियड संपला की परत टेस्ट ची गरज नाहीये अणि विजिट करायची पण
>>>>
आणि पुन्हा टेस्ट करायची झाल्यास पुन्हा टेस्टचे पैसे द्यावे लागत असतील ना..

माझा रिझल्ट पोझीटीव्ह आला तेव्हा सोबत कोणीच नव्हतं तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही रडून रडून खूप हाल झाले होते. ती अंबुलान्स येते तुम्हाला घ्यायला तेव्हा खूपच त्रास होतो परत बघणारांच्या नजरा खूप काही अनुभव देऊन जातात.
>>>
Sad
खरंय, कोणी जवळ येऊ शकत नसेल. तसेच नजरेत सहानुभुतीसोबत अरे कुठे यांना कोरोना झाला आता आमच्याही डोक्यावर टांगती तलवार.. या नजरा या परीस्थितीत झेलणे खरेच अवघड.

याबाबतीत भारत सही आहे... कळते तरी कोणाला झालाय कोरोना... इथे अमेरिकेत तुमच्या शेजार्याला जरी झाला असेल तुम्हाला कळणार नाही- प्रोटेक्टड असते इन्फो...

सोनाली, अभिनंदन यातून बाहेर पडल्याबद्दल! तुझेही अनुभव सविस्तर लिही ना.... प्रेरणादायी अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत

सोनाली
व्यवस्थित सुखरूप बरं झाल्याबद्दल अभिनंदन. आता ओके आहात ना?
तुम्हाला चालणार असल्यास वेगळा अनुभव लिहा

<<< माझा रिझल्ट पोझीटीव्ह आला तेव्हा सोबत कोणीच नव्हतं तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही रडून रडून खूप हाल झाले होते. ती अंबुलान्स येते तुम्हाला घ्यायला तेव्हा खूपच त्रास होतो परत बघणारांच्या नजरा खूप काही अनुभव देऊन जातात>>> सोनाली, खरंच विचार करवत नाही किती त्रास झाला असेल तुम्हाला. त्यात एकटे असणे अजून त्रासदायक. आता बऱ्या आहात वाचून बरे वाटले. जमल्यास तुमचाही अनुभव लिहा. काळजी घ्या

सोनाली
यातून बाहेर पडल्या बद्दल अभिनंदन
मी तुमच्या भावना समजू शकते. आम्हाला या एम्बुलेंसच्या गोष्टी मधून नाही जाव लागल. आम्हाला पण खुप भीति वाटत होती की आजूबाजूला समजल तर?

आपण इथे हा अनुभव लिहून आणि प्रश्नांना तत्परतेने उत्तरे देऊन खूप मोठे सामाजिक मदतीचे कार्य करत आहात. याबद्दल सुरवातीलाच मी आपले आभार मानतो. आपल्या मिस्टरांना अचानक ताप आला व तो मागच्या महिन्यात सुद्धा आला होता असे आपण लिहिले आहे. यात कुठेही कोरडा खोकला असण्याचा उल्लेख नाही. थकवा नव्हता असे तर आपण स्पष्टच लिहिले आहेत. ताप, कोरडा खोकला आणि थकवा हि कोव्हीड ची प्रमुख लक्षणे आहेत असे WHO चे संकेतस्थळ सांगते. ते तर्कसंगत आहे कारण हा विषाणू श्वसनसंस्थेवर हल्ला करतो त्यामुळे खोकला हा यायलाच हवा.

पहिली गोष्ट म्हणजे सध्या कोविड विषयी बऱ्याच वदंता पसरल्या/पसरवल्या जात आहेत. आणि दुसरे म्हणजे जुलै ओगस्ट हे महिने तसेही दरवर्षी अनेकांना कॉमन फ्लू होत असतोच. या बाबींचा विचार करता मला एक प्रश्न पडला आहे कि आपल्या मिस्टरांना पूर्वी अधूनमधून वा किमानपक्षी पावसाळ्यात ताप येत होता का? मागच्या महिन्यात त्यांना ताप आला तेंव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेला नव्हतात. चार-पाच महिन्यापूर्वी फ्ल्यू झालेले लोक घरच्या घरी उपचार करून बरे होत होते. आता भीती पसरली आहे. हॉस्पिटलमध्ये जातात. मग कोव्हीड टेस्ट घ्यायचा निर्णय हॉस्पिटलतर्फे घेतला जातो. इथे सुद्धा तसेच घडले आहे.

आपण इथे हा अनुभव लिहून आणि प्रश्नांना तत्परतेने उत्तरे देऊन खूप मोठे सामाजिक मदतीचे कार्य करत आहात. याबद्दल सुरवातीलाच मी आपले आभार मानतो. >> धन्यवाद

आपल्या मिस्टरांना अचानक ताप आला व तो मागच्या महिन्यात सुद्धा आला होता असे आपण लिहिले आहे. यात कुठेही कोरडा खोकला असण्याचा उल्लेख नाही. थकवा नव्हता असे तर आपण स्पष्टच लिहिले आहेत. ताप, कोरडा खोकला आणि थकवा हि कोव्हीड ची प्रमुख लक्षणे आहेत असे WHO चे संकेतस्थळ सांगते. ते तर्कसंगत आहे कारण हा विषाणू श्वसनसंस्थेवर हल्ला करतो त्यामुळे खोकला हा यायलाच हवा. >> हो हे होईल आम्हाला पण वाटल होता. लोका संगता टेस्ट जाते, दम लागतो अस काही आमच्या दोघांना पण नाही झाले. माला थोड़ा खोकला आला तो अगदी १-२ दिवस अणि कफ होता त्यामधे.

पहिली गोष्ट म्हणजे सध्या कोविड विषयी बऱ्याच वदंता पसरल्या/पसरवल्या जात आहेत. आणि दुसरे म्हणजे जुलै ओगस्ट हे महिने तसेही दरवर्षी अनेकांना कॉमन फ्लू होत असतोच. या बाबींचा विचार करता मला एक प्रश्न पडला आहे कि आपल्या मिस्टरांना पूर्वी अधूनमधून वा किमानपक्षी पावसाळ्यात ताप येत होता का? मागच्या महिन्यात त्यांना ताप आला तेंव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेला नव्हतात. चार-पाच महिन्यापूर्वी फ्ल्यू झालेले लोक घरच्या घरी उपचार करून बरे होत होते. आता भीती पसरली आहे. हॉस्पिटलमध्ये जातात. मग कोव्हीड टेस्ट घ्यायचा निर्णय हॉस्पिटलतर्फे घेतला जातो. इथे सुद्धा तसेच घडले आहे. >>
खर तर नार्मल सिचुएशन असती तर थरमेटर घेऊन चेक पण केला नसता. अस हात लावून बघितला तर ताप जाणवत न्हवता. अस त्याला सर्दी ताप वैगरे नाही होत. मला होता ते बऱ्याच वेळा. पण या वेळेस मला अगदी एकच दिवस ताप आला. लोकांचे अनुभव आहेत तस काहीच नाही झाला. asymptomatic मधे अस होता म्हणे. आता एक १-२ लोकांचे ऐसे अनुभव आहेत की त्रास होतोय पण फॅमिली डॉक्टर नाही म्हणे टेस्टला. आइसोलेशन मधे राहण्याचा सल्ला देतायेत . आम्हाला दीनानाथच्या डॉक्टरने घरातील जे आमच्या कांटेक्ट मधे नेहमी आहेत त्या लोकांच्या टेस्ट पण नाही म्हटल्या होत्या.

धन्यवाद मी_परी, तुम्ही सगळ्या प्रश्नांची आवर्जून उत्तरे दिलीत. तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाचा सार्‍यांना फायदा करून देताय.

Pages