पाकातले आप्पे..

Submitted by सुलेखा on 27 November, 2012 - 10:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

गुलाबजाम,रसगुल्ले घरी केले,बाजारातुन तयार आणले किंवा हलदीराम चे टिन मधले आणले तर त्यातला पाक मात्र शिल्लक रहातो.तो "खपवायला"त्यात ब्रेड तळुन्/कुरकुरीत करुन टाकणे,पाकातल्या पुर्‍या करणे हे उपाय असतात्.पण बर्‍याचदा पुन्हा तळंणं नको वाटतं.तेव्हा हे आप्पे करता येतील.
Paapad chat.. 015_0.JPG
१ वाटी रवा..
३/४ वाटी दही..
चुटकीभर मीठ..
२ चमचे काजुतुकडे ..
३ चमचे तूप..
उरलेला पाक..
केशर सिरप..
केशरी रंग..
लिंबाचा रस..

क्रमवार पाककृती: 

रवा मीठ घालुन दह्यात भिजवुन २ तास झाकुन ठेवा..
२ तासानी त्यात काजु तुकडे व १ चमचा तूप घालुन चमच्याने रव्याचे मिश्रण हलके होईपर्यंत फेटा..
[२ तासानी हे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडे सैल झालेले दिसेल..]
आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवा..त्यात थोडे-थोडे तूप घालुन रव्याचे मिश्रण १-१ चमचा घाला.आप्पेपात्रावर झाकण ठेवुन गॅस कमी करुन आप्पे शिजु द्या..थोड्या वेळाने आप्पे चमच्याने उलटवुन त्यावर अगदी थोडे तूप सोडा व दुसरी बाजु शिजु द्या.
पाक गॅसवर गरम करायला ठेवा..२ तारी पाक तयार झाला कि त्यात केशर सिरप व केशरी रंग,व लिंबाचा रस घाला.
गरम पाकात आप्पे पात्रातले आप्पे सोडा..
छान मऊ,जिलबीच्या स्वादाचे पाकातले गोड आप्पे तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
आवडतील तितके..
अधिक टिपा: 

पाकात ऑरेंज इमल्शन/एसेन्स घातले तर संतरा स्वादाचे आप्पे तयार होतील..
मुद्दाम पाक तयार करुन जेवणात गोड डिश/पॉट लक साठी "हमखास जमणारी डिश !!!!

माहितीचा स्रोत: 
लोकप्रभा, मार्च-२००० चा अंक..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची रेसिपी म्हणजे चविष्ट असेल ह्यात शंका नाही पण मला पटत नाही ..

एकतर आप्पे, ब्रेड तळून वगैरेही तो पाक संपणार नाहीच .. आणि परत एकदा गोड खाऊन झालं की नुसता पाक संपवायचा म्हणून परत त्याचं काहितरी गोड करण्यापेक्षा तो टाकून देणं मला जास्ती बरं वाटतं ..

एकदम तोंपासु फोटो. वाटी-चमचा घेऊन खायला बसावं असं वाटलं Happy
मी सुद्धा आत्तापर्यंत उरलेला पाक कधीच वापरला नाहीये. आई / आजीची पिढी आणि आमची पिढी ह्यात अगदी ठळकपणे जाणवणारा फरक आहे हा. उरलेला पदार्थ वाया जाऊ देणे त्यांना पटत नाही, असे चविष्ट पर्याय शोधत राहतात. आम्ही मात्र अगदी सहजपणे उरलेलं टाकतो Happy

इन्टरेस्टिंग रेसिपी.

>>
मी सुद्धा आत्तापर्यंत उरलेला पाक कधीच वापरला नाहीये. आई / आजीची पिढी आणि आमची पिढी ह्यात अगदी ठळकपणे जाणवणारा फरक आहे हा. उरलेला पदार्थ वाया जाऊ देणे त्यांना पटत नाही, असे चविष्ट पर्याय शोधत राहतात. आम्ही मात्र अगदी सहजपणे उरलेलं टाकतो
<<
असली माहिती इथे नको, 'तिथे' द्या. Proud

आयडिया सह्ही Happy

मला आणि लेकीला उरलेला पाक नुसताच किंवा पोळीबरोबर खायला आवडतो Happy

गरम टोमॅटो सूप्,रस्सम किंवा वाटणाच्या /भाजीसाठी करतो तशा रश्शात <<< हे नक्की करुन बघेन Happy

स्वाती Lol

रेसिपी खरंच वेगळी, कधी न ऐकलेली आहे. पण फक्त तो पाक संपवायचा म्हणून मुद्दाम आप्प्यांचा खटाटोप करवणार नाही. माझ्याकडून बर्‍याचदा पाक फेकला जातो. किंवा क्वचित थोडा उरवून पटकन सुधारस केला जातो पोळीबरोबर.

लोकं उरलेल्या पाकाचं काहीतरी करतात बघून आपण मुळातला पाकच करत नाही हे जाणवलं. Uhoh
रेसिपी वेगळीच आहे मात्र आणि क्रिएटिव.

वॉव सुलेखा, तु कसली इनोवेटिव्ह आहेस ना?
गोड पदार्थासाठी आपण कधी पण तयार. Happy

मस्त दिसतायत आप्पे !
लोकं उरलेल्या पाकाचं काहीतरी करतात बघून आपण मुळातला पाकच करत नाही हे जाणवलं. > +१ Lol