मुलांच्या वर्तणूकीच्या समस्या आणि आपण-३

Submitted by मोहिनी१२३ on 8 July, 2020 - 07:12

भाग १: https://www.maayboli.com/node/75446
भाग २: https://www.maayboli.com/node/75447

मुलाची ही शाळा S.S.C होती.त्या वेळच्या cut off date प्रमाणे जेमतेम ३ दिवस आधी तो त्या इयक्तेत बसत होता. त्यामुळे १ली त परत बसवायच्या उपायाचा आम्ही विचार करू लागलो.

मला स्वत:ला काही शाररिक आजारांमुळे शाररिक व मानसिक कष्ट करायला मर्यादा आहेत. Mostly pregnancy शरीराला झेपणार नाही असा वैदकीय तज्ञांनी सल्ला दिल्यामुळे आम्ही आमचे मुल दत्तक घेतले. मला मूल वाढीच्या सर्व टप्प्यात सहभागी व्हायचे असल्याने मी नोकरी सोडली. हे सर्व निर्णय आम्ही दोघांनी घेतले व त्याला दोन्ही घरच्या माणसांचा विनाशर्त सक्रिय पाठिंबा होता.

आम्ही मुलासाठी नेहमी उपलब्ध असायचो. तो वस्तुंचे हट्ट फारसे करतच नाही. पण त्याला आम्ही आमचा वेळ, आमचे शांतपणे ऐकणारे कान व सर्व काही करून बघण्याचे स्वातंत्र्य नेहमीच देण्याचा प्रयत्न करतो.
त्याचे screen time n junk food बरेच कमी असते.
त्याच्या जेवण्याच्या व झोपायच्या वेळा कसोशीने पाळतो.

शाळेची पहिली सत्र परीक्षा जवळ आली होती. शाळेत revision जोरात चालू होती.आमच्या मुलाने एखाद्या विषयाचे लिखाण पूर्ण केले नाही की त्याला पुढच्या तासभर मुख्याध्यापिकेंच्या office मध्ये बसविण्याचा सिलसिला सुरू झाला होता. त्यामुळे त्याला ज्या विषयांत गती होती ती ही कमी होत होती.या सगळ्यांत तो शाळेत जायचा कंटाळा करायचा नाही हे विशेष.

या काळात वेगवेगळे parents support group, नातेवाईक,मित्रमैत्रिणी या सर्वांशी बोलत राहिलो. त्यांनी आम्हाला मानसिक आधार तर दिलाच पण काही उपयुक्त सल्ले दिले,मदत केली.त्याप्रमाणे आम्ही आमच्या वागण्यात, शिस्तीत, आहारात काही बदल करून पाहिले.

मुलगा नाराज होता, त्याची चिडचिड होत होती . पण तो शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल चांगलच बोलत होता. जवळजवळ रोज होणार्या शिक्षेमुळे आम्ही परीक्षेआधीच शाळा बदलायचा निर्णय घेतला.
नियमित खेळ, हालचालींचे स्वातंत्र्य, कमी वेळ, कमी लिखाण हे आमच्या नवीन शाळेकरिता प्रमुख निकष होते. त्याप्रमाणे काही शाळा आम्ही निवडल्या होत्या.आता या शाळांत आम्ही धडकमोहिम सुरू केली. पहिल्याच शाळेत त्यांनी आमचे चांगले स्वागत केले. शाळा फिरून दाखवली. शंकानिरसन केले. मध्येच शाळा बदलणे शक्य नाही हे सांगून त्यांनी आमचे नाव waiting list मध्ये नोंदवले.

आम्ही अभ्यास, खेळ आणि सोसायटीतील कार्यक्रमात सहभाग या ३ गोष्टी सोडून कशाचीही सक्ती केली नाही, कोणताही class लावला नाही.
तो त्याच्या त्याच्या गोष्टी करत राहिला,शिकत राहिला.

“It takes village to bring up a kid” आणि आमचा मुलगा ही प्राथमिकरीत्या आमची जबाबदारी आहे या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवून आमची वाटचाल चालू होती.

यात आमचेही नैराश्य, चिडचिड, हतबलता याचे episodes अधूनमधून येत होते.

पहिली सत्रपरीक्षा पार पडली. ४० गुणांचा प्रत्येक पेपर. वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे १२ प्रश्न. पेपर सुरवातीपासूनच लिहायचा ही शिस्त .जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा ह्याची उत्तरे पण पूर्ण वाक्यात लिहायची.
या सगळ्यांत मराठी व गणित हेच पेपर पूर्ण होऊ शकले.
या परिक्षेत त्याला शिक्षकांच्या अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले. आणि शाळेने आम्हाला meeting ला बोलावले.

यात त्यांनी त्याला मिळालेल्या गुणांबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आमच्या मुलाचा त्यांना कंटाळा आला आहे आणि त्याला यापुढे शिक्षा होतच राहणार हे निक्षून सांगितले. याच काळात शाळेच्या kids sensitive डायरेक्टर सोडून गेल्या होत्या.
आम्ही त्यांना हे वर्ष पूर्ण होऊ दे, पुढच्या वर्षी त्याची शाळा बदलतो अशी विनंती केली.

तरीही त्याचा त्रास चालू राहिला. वार्षिक परीक्षा जवळ आली असताना त्याला मुख्याध्यापिकेंच्या office मध्ये पूर्ण दिवस बसवणे चालूच राहिले. त्याला वर्गातील कमी प्रगती असलेल्या मुलांचा office मध्ये बसून अभ्यास घेणे हे नवीन काम सोपवले.
हे अनेक दिवस चालू राहिले. त्यामुळे वर्ष संपण्यापूर्वीच त्याला त्या शाळेतून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला.

क्रमश:
भाग ४: https://www.maayboli.com/node/75469

Group content visibility: 
Use group defaults

पुन्हा एकदा सांगते की खरच धाडस आहे तुमचे.
असा विषय लिहायला, बोलायला आणि share करायला टाळला जातो.
लिहीत रहा. ..

तिन्ही भाग वाचले. तुम्ही खूप प्रांजळपणे लिहित आहात. नात्यात लेखनाची समस्या असलेले मुल असल्याने हे सगळे फारच रिलेट झाले.

सगळे प्रतिसाद एकत्र वाचायला मिळतील असा एक किंवा दोन धागे असावे कारण हे लेखन अतिशय उपयुक्त आहे आणि काही जण त्यावर आपले किंवा जवळच्यांचे प्रत्यक्ष अनुभव लिहीत आहेत ते वाचणे सुलभ होईल.

माझ्याच शाळेत शिकत असलेल्या मुलीची आठवण झाली.
तिला लिखाणाचा कंटाळा आहे असं वाटायचंं. पण प्रिंसिपल केबिनमधे पाठवली की बर्यापैकी लिहायची. इतर वेळी शिक्षक समोर शिकवत असतानाही जागेवरुन ऊठून वर्गात फिरायची. मुलांना मारायची. पण पाठांतर एक नंबर. सकाळी शाळेची प्रार्थनाही तिच्याइतकी स्पष्ट आणि खणखणीत आवाजात कुणी म्हणत नव्हतं.
शाळेत शिक्षकांसाठी सेमिनार झाला होता तेव्हा आलेल्या मानसोपचार तज्ञांनी सांगितलं होतं, या मुलांची लेखनक्षमता इतर मुलांपेक्षा वेगळी असते.पण म्हणून इतर activities मधे ती कमी पडतीलच असं नाही. यांना तेच तेच करायचा कंटाळा येतो. नवीन गोष्ट शिकवली तर तीही खूप लवकर बोअरींग वाटायला लागते. संयम हा एकमेव उपाय.

मला यात शाळेची बरीच चूक वाटतेय.पेपर चा पॅटर्न पण पहिली साठी कठीण आहे.शिवाय बसवून ठेवणे, बाहेर उभे करणे अश्या पंतोजी शिक्षा आहेत.
ही शाळा प्रसिद्ध असेल.त्यामुळे हे सर्व चालवून घेतले जात असेल ईतर पालकांकडून.एरवी ssc शाळा cbse पेक्षा जरा कमी जड आणि कडक असतात असे ऐकले आहे.
4 था भागही वाचला.

हीरा-क्षमस्व.माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असल्याने मला छोटे भाग(With logical end) करायला सोपे वाटतायत. ५ वा भाग शेवटचा असेल.