मुलांच्या वर्तणूकीच्या समस्या आणि आपण-४

Submitted by मोहिनी१२३ on 8 July, 2020 - 11:49

भाग १: https://www.maayboli.com/node/75446
भाग २: https://www.maayboli.com/node/75447
भाग ३- https://www.maayboli.com/node/75462

यात आम्हाला लक्षात आले होते की त्याला लिखाणाची आणि वाचनाची फारशी आवड नाही. वरवर पाहता त्याला काही येत नाहीय असंही दिसत नव्हतं. पण तो मनापासून या गोष्टी करायला बसलाय आणि त्याने ते पूर्ण केलय हे क्वचितच व्हायचे.Attention Span कमी पडत होता.

आमच्या घरात सर्वांना वाचनाची आवड, मोठा पुस्तक संग्रह. मुलाची स्वत:ची जवळजवळ ३०० पुस्तके.त्याला लहानपणापासून चित्रे दाखवणे, पुस्तके वाचून दाखवणे, गोष्टी सांगणे ह्या normal गोष्टी करत होतो.मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काही शिबिरे घेतली.

या मध्ये त्याचे trekking, commando camps, small runs , श्रमदान शिबीर ,science camp वगैरे गोष्टी चालू होत्या. या activities मुळे तो शाळेतील ताण सहन करू शकला असं वाटतं.

माझ्या मुलाच्या वर्गात अजूनही काही अशा समस्या असलेली मुले होती.त्यामुळे आम्ही आया एकीमेकींशी या परिस्थितीशी deal करण्याकरिता काय काय करता येईल याबद्गल सतत बोलायचो/करून बघायचो. माझ्या मुलाच्या अशाच एका मित्राने इतकी प्रगती दाखवली की शाळेने त्याला वार्षिक निकालावेळी encouragement prize दिले.

आम्ही फेब्रु. २०१९ मध्ये शाळा थांबविली. त्यावेळी आम्ही मुलाशी सतत बोलत राहिलो. तो लहान असल्याने, त्याला काही गोष्टी जमत नसल्याने आपण शाळा बदलतोय आणि त्याच इयक्तेत परत बसवतोय हे त्याला सांगत राहिलो. त्याला ह्या बद्द्ल काय वाटतेय हे ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.त्या वेळी एकदा तो “मी नवीन शाळेत अभ्यास करायला लागलो तर माझ्या या teacher नां पण आनंद होईल” असं म्हणाला होता.

मी मुलाबद्दल माझ्या सोसायटी मैत्रींणीच्या नेहमी संपर्कात होते.त्यांनीही मला नेहमीच खूप सहकार्य केले.
माझा मुलगा अचानक घरी राहिला लागल्यामुळे बरेच लोक मला आणि माझ्या मुलाला जिव्हाळ्याच्या शंका-कुशंका विचारायला लागले, त्याचे काही मित्र चिडवायला लागले.

यात काही वेळा दुर्लक्ष करून,समजावून , त्यांनाच अवघड प्रश्न विचारून या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. यात काही काळ खूप अवघड गेला. मी स्वत:ला प्रचंड अपराधी समजत होते, जो दिसेल त्याच्याशी मुलाच्या समस्येबद्दल बोलत होते.त्याच्या सर्व activity teacher शी संपर्कात होते, अजून काही नवीन समस्या नाही ना! या दडपणाखाली.

आम्हाला दुसर्या शाळेत १ला लगेच प्रवेश मिळाला. हे ४ महिने त्याने थोडे वाचन-लिखाण,जास्त खेळणे, वेगवेगळ्या activities करणे यात व्यतित केले.
नवीन शाळेत काहीही समस्या वाटली तर तज्ञांचा सल्ला लगेच घ्यायचा हे पक्के ठरवले होते.
ही नवीन शाळा cbse board affiliated आहे. रोज ५:३० तास दुपारची शाळा,प्रत्येक तासानंतर वर्ग बदलणे ,रोज अर्धा तास खेळ, computer/reading/library/art & craft/ music/dance या पैकी रोज किमान २ विषय त्यामुळे आमचा मुलगा इथे लगेचच रूळला.

आधीच्या शाळेत इयक्ता १-१० करिता १ counsellor madam होत्या. त्यांना वेगळी प्रशस्त केबिन होती. त्यांचे calendar नेहमी भरलेले असायचे. त्या शिक्षकांकडून तक्रार आलेल्या मुलांना वर्गात जाउन observe करायच्या. काही वेळा केबिन मध्ये बोलावून त्यांना सांगायच्या. पालकांशी बोलायच्या.मात्र या सगळयात, काही मुलांसाठी वेगळे काही करून बघू हे वातावरण त्या शाळेत फार नव्हतं. कोणत्याही problem करिता मुलांना समजावून सांगणे-नाही ऐकले तर रागावणे-शिक्षा करणे-पालकांना बोलावणे- counsellor madam ना भेटून ते म्हणतील तसे पालकांनी/मुलांनी करणे ही process होती.
या counsellor madam ची आम्हाला orientation program मध्ये इतर शिक्षकांबरोबर ओळख करून दिली होती.
आम्ही counsellor madam ने सांगून सुध्दा psychologist कडे गेलो नाही (चूक ५) कारण आम्हाला शाळा बदलून आणि आमचे वागणे बदलून मुलाची समस्या सुटेल असं वाटत होतं.

आता शाळेत ठीक चाललं होतं . अभ्यास नीट होत होता.मुलगा सर्व गोष्टींत रस घेत होता.पण घरी वाढलेला mobile time, आक्रस्ताळेपणा, उलट बोलणे, शाळेची वेळ झाली असताना cycling करून गायब होणं अशा समस्या येत होत्या . आणि आम्ही डॅा. भूषण शुक्ला यांची appointment घेण्याचे ठरवले.

क्रमश:
https://www.maayboli.com/node/75475

Group content visibility: 
Use group defaults

नियमित खेळ, हालचालींचे स्वातंत्र्य, कमी वेळ, कमी लिखाण हे आमच्या नवीन शाळेकरिता प्रमुख निकष होते.(भाग-३).
धन्यवाद वावे. हा भाग अजून लिहीत आहे.

चांगले लिहिताय. भारतातल्या शाळांचा मला (स्वतःची शाळा संपल्यानंतर) काही अनुभव नाही. तुमच्या मुलाच्या शाळांमधे (जुन्या आणि नव्या दोन्ही) मुलांचे बिहेविअर इश्यूज आणि त्याची संभाव्य कारणे या गोष्टींचा अवेअरनेस किती होता आणि त्यांनी मुलाची समस्या समजून घेण्याचा किंवा त्यावर शिक्षा सोडून इतर काही पॉझिटिव बिहेविअर मॅनेज्मेन्ट प्लान इ. काही प्रयत्न केले का, मुळात अशी काही सपोर्ट सिस्टम शाळांमधे सहसा होती/असते का? हे जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद मैत्रेयी. तुमच्या प्रश्नांबद्दल मला असलेली महिती या व पुढच्या (शेवटच्या) धाग्यात समाविष्ट करतेय.

शाळेचा प्रचंड राग आला.
२५-३० वर्षांपूर्वी वर्गाबाहेर उभं करणे इ. शिक्षा करायचे. ते ही १-२ इयत्तेत नसावं असं आता वाटतं. हे असलं आजच्या काळात वाचून चीड आली.
तुम्हाला चांगली शाळा मिळाली आणि ती मुलाला आवडली वाचुन बरं वाटलं. शुभेच्छा!

धन्यवाद अमितव, ऋन्मेऽऽष.
चूका करत होता. अर्थात त्याही तुम्हाला नंतर रिअलाईज झाल्या. पण सतत प्रयत्न करत होतात तुम्ही. ग्रेट !—-प्रत्येक आई-बाबांची आपलं मूल आनंदी राहाणं ही इच्छा असते. त्यातून हे होत असेल.