मृत्युपत्र कसे बनवायचे

Submitted by VB on 4 July, 2020 - 04:59

कधी काय होईल सांगता येत नाही, मृत्यू असाही कधीही येऊ शकतो अन ह्या कोरोनाकाळात तर सगळेच अनिश्चित झालेय.
सो, आपण जग सोडून जाण्यापूर्वी मृत्युपत्र केलेले बरे असे वाटते. ऑनलाईन खूप शोधले पण तरीही खूप शंका आहेत. इथे कोणी मदत करू शकले तर आभारी आहे.
कृपया मला मृत्युपत्र कसे करायचे, त्याची प्रोसेस काय असते म्हणजे ते कायद्याने valid असेल प्लिज सांगा. तसेच हे जर कुणाला कळू न देता करणे शक्य आहे की नाही हेही सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो, आपण जग सोडून जाण्यापूर्वी मृत्युपत्र केलेले बरे असे वाटते. >>>>> अरे काय चाललंय! बरेच काही आटोक्यात येत आहे.अशावेळी असं निराशजनक विचार का करतेस?
बरं ते राहू दे.तुला हवी ती माहिती देते.तुझ्या कडची सर्व संपत्ती(स्थावर जंगम)कोणाला देणार त्यांचे नावे स्पष्टपणे लिहून संपतीचे सर्व तपशील आणि त्याचा वारसांना देऊ इच्छित असलेला हिस्सा तपशीलवार लिहून काढावे.शेवटच्या पानावर डॉक्टरची सही
(की मी हिला ओळखत असून अमुक दिनांकापर्यंत हिची शरीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम आहे.) आणि अजून एका साक्षीदाराची सही लागते.वकीलाकडून हे सारे करवून घ्यायचे आणि रजिस्टर करावे. मधल्या काही वर्षांत एका लेखात वाचले होते की एखाद्या साध्या कागदावर आपण लिहिले तरी चालते.लेख एका वकिलाने लिहिला होता.

माझ्या आईचे मृत्यूपत्र रजिस्टर केले नाही.त्यानुसारच वरचे लिहिले आहे.

माझा फुकट सल्ला: या भानगडीत सध्या पडू नये.त्या ऐवजी नॉमिनेशन इ. आवश्यक गोष्टी करायच्या असतील त्या आधी कराव्या.बँक एफ.डी,म्यु.फंड्स्,डिमॅट,बँक खाते इथे सेकंड होल्डर जरूर समाविष्ट करावा.

मृत्युपत्र बनवावेसे वाटणे म्हणजे निराशाजनकच विचार असे नाही. लाईफ इन्शुरन्ससारखेच याला बघता येईल. पण येस्स, धाग्यात जे लिहिलेय त्याचा टोन तसा वाटतो.

बाकी मला पर्सनली मृत्युपत्र हा प्रकार काही पटत नाही. आपण आपले जगावे आणि निघून जावे. खाली हाथ आये थे हम खाली हाथ जायेंगे. मृत्युपत्र करणे म्हणजे जग सोडून जातानाही आपण जे काही कमावलेय त्याचे पुढे काय होईल वा कशी वाटणी व्हावी हा विचार करत जाणे. आध्यात्मिकदृष्ट्या विचार करता मला ते पटत नाही Happy

यावरून आठवले, ऑर्कुटला असताना माझे मित्र मला चिडवायचे की मी मृत्युपत्रात माझे फेक प्रोफाईल आणि त्यांचे पासवर्ड माझ्या वारसदारांना वाटून जाईल Happy

आपण आपले जगावे आणि निघून जावे. खाली हाथ आये थे हम खाली हाथ जायेंगे.
+१२३
मृत्युपत्र करणे म्हणजे जग सोडून जातानाही आपण जे काही कमावलेय त्याचे पुढे काय होईल वा कशी वाटणी >>> एकापेक्षा जास्त मुल ( मुलगा / मुलगी) असेल तर पुढील हेवेदावे टाळण्यास मृत्यपत्र हां उत्तम व्यवहारिक निर्णय ठरतो. पण हल्ली चौकोनी कुटुंब सुद्धा जिथे दुर्मिळ होत चालली आहेत आणि एक किंवा No अपत्य हां ट्रेंड आहे तिकडे खरेच मृत्युपत्र नक्की काय भूमिका पार पाडते हां संशोधनाचा विषय ठरेल !!
त्यापेक्षा <<एफ.डी,म्यु.फंड्स्,डिमॅट,बँक खाते इथे सेकंड होल्डर जरूर समाविष्ट करावा>>> हां सोप्पा पर्याय उपलब्ध आहे
-----------
काही विशेष कारण घडले असेल आणि आता जरी मृत्युपत्र करण्याची गरज वाटली आणि तसे केले तरी काही काल लोटल्यावर आपल्या निर्णयाची फेरतपासणी करून आधीच्या मृत्युपत्रास रद्द करत नवीन फेरबदल सुद्धा करता येतात त्यामुळे मानसिक समाधान आणि वैचारिक स्थैर्य लाभणार असेल तर वर दिलेल्या स्टेप्स पाळत वकिलाच्या सल्ल्यानेच पुढची कार्यवाही करणे इष्ट असेल.
https://drdcsanjayk.blogspot.com/2018/06/f.html?m=1

सध्याच्या काळात
1. आपले सर्व बँक अकाऊंट यूजरनेम, गुंतवणूक नंबर आणि पासवर्ड एका एक्सेल मध्ये ठेवून ती पार्टनर ला मेल करून ठेवावी
2. आपण नॉमिनी फॉर्म सगळीकडे भरला आहे याची खात्री पैश्याशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीत करावी(खूप गोष्टी असतात.)
बऱ्याच ठिकाणी आपण अकाऊंट लवकर उघडावा या लोभाने बिना नॉमिनी सर्व चालू केलेले असते आणि ते मध्ये मध्ये प्रेमळ विनंती करतात नॉमिनी फॉर्म ची.तर या प्रेमळ विनंती दुर्लक्षित न करता सगळीकडे नीट तपासून बघावे नॉमिनी नेमलाय हे.अकाउंट उघडताना वात्सल्याचे झरे असलेल्या या सर्व कंपनी नंतर बिना नॉमिनी क्लेम किंवा सपोर्ट देताना ज्ञानेश्वरांचा मख्ख रेडा बनतात.
इतके केल्यास मृत्यपत्राचे काम सोपेपणी होईल.

एकदम सोपे आहे. खालील प्रमाणे करा.

१) तुमच्या स्थावर व जंगम माल मत्तेची यादी बनवा.
२) घरे, जमिनी , गाळे, शेत जमिनी सेकंड होम ह्या प्रत्येक प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यवस्थित आहेत ना ते बघा . तुमच्या हयातीतच ह्याचे तुमच्या वारसदारांना गिफ्ट डीड करता येते. पण प्रत्येक प्रॉपर्टीची एक फाइल बनवा. व त्याचा वारसदार कोण ते तिथे नोटुन ठेवा.

३) तुमचा पॅन, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड व आधार कार्ड, जन्म दाखला / लग्न दाखला ह्यात जे नाव आहे ते. किंवा अनेक नावे असतील तर ती,
ही एकच व्यक्तीची आहेत. व दोन तीन प्रकारे सह्या केल्या असतील तर ह्या सर्व सह्या एकाच व्यक्तीच्या आहेत असे अ‍ॅफिडेव्हिट तयार करून घ्या नोटराइज करून घ्या.

४) इच्छा पत्र करणारा नोकरदार असेल तर पीएफ चा नंबर यु ए अन, व कंपनीती ल एंप्लॉई नंबर व इतर मॅपिन्ग .अपडेट करा. पी एफ असेल तर नॉमिनेशन फॉर्म डाउन लोड करून तो स्वहस्ते एचार मध्ये सबमिट करावा लागतो. हे काम ऑनलाइन होत नाही.
५) वैयक्ति क डीटेल्स जसे नाव कायमचा पत्ता. पर्मनं ट अ‍ॅड्रेस, वर जाणार तो स्वर्ग हा पत्ता नव्हे. पहिल्या पानावर एक अ‍ॅनेक्षर मध्ये जोडा
व सदर मृत्यु पत्र ह्या व्यक्तीचे आहे. पूर्ण शुद्धीवर असताना व कोणत्याही बळजबरी शिवाय करत आहोत असे स्वतंच्या नावानिशी लिहा.

ह्या नंतर खालील स्थावर प्रॉपर्टी ह्यांना द्या, त्यांना द्या हे क्लिअर करा. वारसदाराचे पूर्ण नाव जसे पॅण कार्ड वर आहे तसे लिहा. व त्याच्या कॉपी सहि नुसार एका फायलीत जोडून ठेवा. तुम्ही वारल्यानंतर प्रॉपर्टी मिळवायला जो धडपड करेल त्याला ही मदत होईल.

६) आता बँकेतील ठेवी, शेअर अकाउंट म्युचुअल फंड अकाउन्ट ह्याचा पूर्ण माहितीसकट विदा देउन हे पण ह्याला द्या त्याला द्या हे क्लीअर करा
७) मंदिराला किंवा संस्थांना देण गी द्याय्ची असल्यास ती कोणत्या नावाने द्यावी हे वारायच्या आधी विचारून त्या प्रमाणे त्या नावाला अमूक आमूक रक्कम द्या. जसे केळशी देवस्थान १००१ रु. असे चेक वर लिहायचे ते क्लीअर लिहा.

८) सर्व ऑनलाइन पासवर्ड तुमच्या विल च्या एक्सिक्युटर ला दाखवून द्या. व बदलल्यास कळवत राहा. वारसदार वेगळे एक्सिक्युटर वेगळे,
एक्सि क्युटर कोण ते नोंदवून ठेवा.

९) सोने चांदी चा नीट हिशेब लिहा. इतके हार दागिने बांगड्या वजनानिशी व त्या दिवशीच्या व्हॅलु नुसार लिस्ट करा. ते कोण कोणाला द्यायचे ते लिहा
१०) घरातील देव कोणाकडे द्यायचे ते लिहा.
११) बाकी कपडे साड्या लग्नातील शालू, सूट सेंतिमेंटल आयटेम जसे प्रेयसीची जुनी पत्रे व फोटो वा इतर वस्तू ह्यांची तुमच्या हयातीतच विसर्जन करून योग्य विल्हे वाट लावून टाका माघारी भांडान नको.
१२) तुमचा लिगल एअर. वारसदार एक किंवा अनेक कोण कोण ते विल मध्ये क्लिएअर करा म्हणजे कोण अनौर् स वारसदार क्लेम करू शकणार नाही.
१३) काही कर्जे लायाबिलि टी असल्यास ती कोणी फेडावीत व कशी ते लिहून ठेवा.

१४) आयुर्विमा व आरोग्य विम्याचे नॉमिनी कोण ते आताच क्लीअर करा. व विमा एजंटाचा नंबर घेउन वारसदाराला द्या. तुम्ही वारल्यावर तो संपर्क साधू शकेल.

१४) आता हे सर्व नीट वर्ड मध्ये टाइप करून पेन ड्राइव मध्ये घालोन नोटरी कडे न्या व प्रिन्ट घ्या. कोणता स्टँप पेपर ते त्यांना माहीत असते. व
तिथेच त्यांची सही व विटनेसांची सही घ्या. दोन विटनेस लागतात जे वारसदार व एक्सिक्युटर नसावेत.

ह्याची एक प्रत तुमच्या कडे व एक स्कॅन करून वकिला कडे किंवा तुमच्या विश्वासू लोकांकडे ठेवा. झाले काम . विल मुंबईत केल्यास ते कोर्टात जौन प्रोबेट पण करावे लागते. ते कसे करायचे व का ते वकील सांगतील.

Amaa, मस्त.
एवढे सगळे वाचून vb मृत्यूपत्र करायचे तहकूब करतील.

अमा, छान लिहिलेत.

प्रोबेट मेल्यावर ना? की आधीच?

वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा त्यात ला हिस्सा स्वतःच्या मर्जीने वाटता येतो का?

अमा, छान लिहिलेत. >+१

भारतात वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा त्यात ला हिस्सा स्वतःच्या मर्जीने वाटता येत नाही . स्वतः कमवलेली मालमत्ता /संपती मात्र हवी तशी वाटता येते.

प्रोबेट मेल्यावर. पण ते वारसांना माहीत असावे लागते. आता सध्या आपण इथे व मुले अमेरिकेत अस्ल्यावर मुलांना ते माहित नस्ते. म्हनून आधी सांगोन ठेवायचे. नवरा व बायको चे अलग विल असू शकते. बायकोचे स्त्रीधन ती आपल्या मर्जीने विल करू शकते. त्यावर नवर्‍याचा हक्क नाही. किंवा वडिलोपार्जित जमिनी व प्रॉपर्टीत काही हिस्सा बायकोचा असेल तर ती तिच्या मर्जिने अलग विल करू शकते. कोणी काका काकूवर जबरदस्ती करू शकत नाही. हे पण लक्षात ठेवा.

मुख्य म्हण जे सर्व फायली व महत्वाची कागद पत्रे लॅमिने ट करून प्लास्टिक फोल्डरवाल्या फायलीत ठेवा व किडे कुसर पासून दूर ठेवा. वाचवा. नाहीतर आधार कार्ड टर्माइटने खाल्ले अशी वेळ येउ शकते.

बँकेचे लॉकर असल्यास त्यांचे नॉमिनी बँकेत द्यावे लागतात नाहीतर तो तुमच्या वारसदाराला उघडता येत नाही.

जर स्वकष्टार्जीत पैशातून घेतलेली जमीन, बंगला, प्लॅट वगैरे असेल व अशी मालमत्ता जर मृत्यूपत्राद्वारे वारसाला दिल्यास, वारसाला त्यावर स्टँपड्युटी भरायला लागत नाही.

इतकेच नव्हे तर, वारसाला मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता मिळाली असल्यास स्वकष्टार्जितीत मालमत्तेचे फायदे वारसाला मिळतात व ही साखळी चालू राहू शकते.

पण वारसाहक्काने तीच मालमत्ता वारसाकडे आल्यास वारसाला त्यावर स्टँपड्युटी भरायला लागते. तसेच स्वकष्टार्जीित मालमत्तेचे फायदे मिळायचे बंद होते.

शेतजमीनीचे कायदे वेगळे असू शकतात.

बरेच दिवस हा प्रश्न माझ्या मनातही होता.
निराशाजनक विचार म्हणून नाही पण अचानक काही झाले तर आपल्यामागे सर्व व्यवस्था असावी म्हणून.
आता वाचते वरचे प्रतिसाद

तसेच तुम्ही जर ज्ये ना असाल व तुमचे सून मुलगे जावई मुली तुम्हाला पेपर्स बनवायला फोर्स करत असतील तर पोलिसात तक्रार करा ज्ये ना साठी हेल्प लाइन पण उपलब्ध असते. व वकिलाचा सल्ला घ्या. तुम्ही जिवंत असे परेन्त सर्व मालमत्ता देउन टाकू नका. प्रॉपर्टीचे रिवर्स मॉर्गेज कर्ता येते. आपण मेहनती ने जमवलेले पैसे जेव्हा म्हातार पणी गरज असते तेव्हा. हाताशी स्वयंपाकी/ डिलिव्हरी सर्विस/ वाहन चालक ऑन डिमांड. बँकेत किंवा डोंक्टर कडे जायला , इतर खरेद्या तुमच छंद ह्यावर खर्च करा.

देविका राणी व तिचा नवरा ह्यांची अभूत पूर्व इस्टेट होती पण तिची देख भाल करणार्‍या मोलक रणीने सर्व प्रॉपर्टी आपल्य नावावर करून खाल्ली. अतिशय उत्तम इस्टेट होती पण चोरापोरी गेली.

मी होतो साक्षीदार एका दूरच्या नातेवाइकाच्या मृत्युपत्राच्या नोंदणीला.
त्यांचं वय ८५ होतं. स्वत:च दोन फुल्स्केप कागदावर लिहून काढले होते. तेच कागद ( दोन प्रति केल्या होत्या) रेजिस्ट्रार कार्यालयात जाऊन रेजिस्टर केले. वकील बिकिल नाही. तिथे सांगतील ते कोर्ट फी स्ट्यांपस कागदावर लावायचे असतात. पाच रुपयेवाले स्ट्यांपस हाताशी ठेवायचे. ते स्वत:च हजर होते. ( पुढे ९७ वयाला वारले.)
सर्व नात्यांची नावे दिलेली पण मला माझे घर अमुक मुलाला द्यायचे आहे हे लिहिले होते.

ह्या बरोबरीनेच,

१) डु नॉट रिससिकेट म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेटर किंवा लाइफ सपोर्ट ची गरज भासल्यास काय करायचे तो सपोर्त देउ नये व प्लग काढावा ह्याचे हक्क कोनाकडे आहेत ते लिहून ठेवावे लागते म्हण जे व्हेंटिलेटर सिनेमासारखे घोळ होत नाहीत.

२) देह दान अव्यव दान नेत्र दान करायचे असल्यास त्याचे रजिस्ट्रेशन व तुमची इच्छा हे पण लिखित स्वरूपात नमूद करून ठेवावे.

३) वारल्यावर करायचे संस्कार जसे क्रिमेशन दिवस वार, अर्न कलेक्त करणे, अस्थि विसर्जन वगैरे मध्ये मदत करणार्‍या सर्विसेस आता उपलब्ध आहेत. ते ही नमूद करून तिथे एकदा बोलून ठेवावे. आजकाल तरुण लोकांना माहीती नसते व ते शॉक मधे असतात तेव्हा मदत होउ शकते.

४) फर्न्स अँड पेटल्स तर्फे तुम्ही वारल्याव्र किती ही वर्शे एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीला फुले पाठवू शकता जसे नवृयाला वाढदिवशी मुलांना वगैरे.

करोना परिस्थितीत पीपी इ किट चीफ मोर्नर साठी, मास्क्स व बॉडी बॅग ची व्यवस्था पण चीफ मोर्नर लाच करावी लागते असे वाचले आहे. वाइट वाचले वाटून . पण काय करणार. सर्व सिस्टिम ताणात आहेत.

>>>>तसेच तुम्ही जर ज्ये ना असाल व तुमचे सून मुलगे जावई मुली तुम्हाला पेपर्स बनवायला फोर्स करत असतील तर पोलिसात तक्रार करा ज्ये ना साठी हेल्प लाइन पण उपलब्ध असते. व वकिलाचा सल्ला घ्या.>>>> बाप रे असेही होउ शकते Sad Sad

चांगली माहिती
लॉकर चे लक्षात नव्हते.
मृत्युपत्र दोन जणांना एकत्र(म्हणजे नवरा बायको मिळून, त्यातला एक राहिला तर/दोघे गेले तर वगैरे युज केस नीट घेऊन) बनवता येते का?की एकट्या माणसालाच बनवावे लागते?

मृत्यूपत्र करावेच आणि ते रजिस्टर देखील करावे नाही तर त्याला कायद्याच्या दृष्टीने काही मूल्य रहात नाही. नॉमिनेशन वेगळे आणि मृत्यूपत्र वेगळे. दोन्ही गरजेचे. अगदी रक्ताची सख्खी नाती देखील इस्टेटीसाठी किती खालच्या पातळीवर जाऊन भांडू शकतात हे वडील वकील असल्याने पाहिलेले आहे. आपल्या पश्चात आपल्या व्यक्तीला त्रास होऊ नये असे वाटत असेल तर मृत्यूपत्र करावेच. आपल्या विश्वासातल्या दोन तरी व्यक्तींना आपल्या काही अंतिम इच्छा असतील तर त्या जरूर सांगा. अकस्मात मृत्यू झाला तर
इच्छा पूर्ण करून आजूबाजूच्या लोकांना क्लोजर मिळायला मदत होते. शक्य असेल तर वकीलाच्या मदतीने मृत्यूपत्र तयार करावे म्हणजे त्यात काही कायदेशीर त्रुटी राहणार नाहीत.

माझ्या आई -वडिलांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं . पण मी केलाय रजिस्टर्ड .
१ ) मुळात इच्छापत्रावर त्याच्या एक्झिक्युटर च नाव घालावं. तो एक्झिक्युटर नेमका त्याच वेळी उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या व्यक्तीचे पण एक्झिक्युटर म्हणून नाव घालावे . मी घातलाय तस .

२ ) आपण कमावलेल्या मालमत्तेची ( एका पेक्षा जास्त मालमत्ता असल्यास ) वाटणी करावी. त्याचे व्यवस्थित नॉमिनेशन करून ठेवावे. आपल्या नंतर कोणाला मिळावी / किती प्रमाणात ( काही वेळा अर्धा अर्धा अधिकार किव्वा एकट्या व्यक्तीचाच अधिकार ) मिळावी ते लिहून काढावे .

३ ) मृत्युपत्राच्या रजिस्ट्रेशन तारखेनंतर आपण काही एफडी घेतले तसेच . काही मालमत्ता घेतल्यास ते कोणाला आणि कसे (टक्केवारी ) मिळावे ते लिहून काढावे .तसे ते व्यवस्थित नमूद करावे . या रजिस्ट्रेशन च्या तारखेनंतर हि मालमत्ता घेतल्यास / असे असे एफडी घेतल्यास ते कोणाला मिळावे ते लिहून ठेवावे .

४ ) आपल्या एफडी/ आणखीन काही पैशाची गुंतवणूक / दागिने ( दागिन्यांची व्यवस्थित यादी करावी आणि जमल्यास त्याच वजन लिहून ठेवावं. . त्याची पावती तुमच्याकडे असतेच ) याचे पण व्यवस्थित वाटप करावे. बँकेत लॉकर घेतला असल्यास त्याचे पण नॉमिनेशन करावे . एफडीवर पण नॉमिनेशन करावे आणि मगच इच्छापत्राचं रजिस्ट्रेशन करावे.

५ ) जिथे मालमत्तेचं रजिस्ट्रेशन होत तिथेच याच हि रजिस्ट्रेशन होत. त्याची एक कॉपी आपल्याला मिळते . दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात प्रत्यक्ष इच्छा पत्रावर आणि आणि रजिस्टर्ड करतेवेळी

या निमित्ताने आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक किस्सा नमूद करते . एका मॅडम ना कॅन्सर डिटेकट झाला आणि लगेचच त्यांनी इच्छापत्र बनवलं. त्यांना दोन मुली होत्या . कॉलेज मध्ये जाणाऱ्या . तरी सुद्धा संपूर्ण ( १००% ) मालमत्ता / गुंतवणूक / दागिने सगळंच्या सगळं नवर्याच्या नावावर केल . त्यांच्या मुलींना काहीही दिल नाही . नवऱ्यावर प्रचंड विश्वास . त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नवऱ्याने दुसर लग्न केल आणि बायकोच्या आहारी जाऊन दोन्ही मुलींच ( कॉलेजात जाणाऱ्या ) शिक्षण थांबवलं . त्यांना देत असलेला पॉकेट मनी बंद केला . त्यांना नवीन कपडे घेणं बंद केलं ( म्हणजे कपडे घेण्यासाठी पैसे देणं ) आणि हे सुद्धा स्वतःच्या सख्या मुलींना अशी वागणूक . विचार करा. त्यांना कुठलेही पैसे द्यायला नकार दिला . शेवटी त्या मुली रडत रडत आमच्या ऑफिस मध्ये आल्या होत्या . वडील असे वागतात आम्ही काय करावं ? आईने काही पैसे आमच्या नावावर केलेच नव्हते का ? पण मॅडमनी सगळी नॉमिनेशन्स ( ऑफिस कडून मिळणाऱ्या पैशाची नॉमिनेशन १०० टक्के ) नवर्याच्या नावावर केली होती . ऑफिस काहीच करू शकल नाही . त्या दोघीना बिचार्यांना रडत रडत परत जावं लागलं . सगळं ऑफिस हळहळल चर्चा झाली . पण ऑफिस चा नाईलाज होता

हा किस्सा लाखात एक घडत असेल पण असही घडू शकत हि शक्यता लक्षात घेऊन इच्छापत्रात आपल्या मुलांच्या नावे पण मालमतेची / पैशाची टक्केवारी लिहून ठेवावी. हा धडा आम्हाला ऑफिस मधल्या सगळ्यांना मिळाला

मायबोलीवर या विषयावर दोनदा चर्चा झाली आहे . पहिला धागा माझ्या मते पूनम ने उघडला होता आणि दुसरा दक्षिणाने

मृत्युपत्रासारखं महत्त्वाचं डॉक्युमेंट एखादया चांगल्या वकिलाकडून बनवून घ्यावं. सक्सेशन बरोबरच त्यात कम्पनी कायदा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा इ अनेक कायदे बघावे लागतात.

सुजा, वाचून सुद्धा वाईट वाटलं तर मुलींना बघून कसं वाटलं असेल ऑफिसात याची कल्पना करवत नाही.
मुली अज्ञान असतील तर दुसर्‍या पालकाच्या नावेच सगळं ठेवावं लागेल ना? ह्या उदाहरणात मुली मोठ्या होत्या पण ज्यांची मुले लहान आहेत त्यांनी काय करावं? उदा: अज्ञान मुलींच्या नावे दागिने ठेवले पण मुलींनाच काही गरज पडली आणि त्या मुलींचा पालक म्हणून वडिलांनी दागिने विकले असं होवू शकतं का?

मुलांच्या कस्टडी विषयी नीट नमूद करावं. मी आणि बायको दोघे गचाकलो तर मुलांना आर्थिक तरतुदी बरोबर फॉस्टर होम मध्ये राहायला लागू नये हे विल करायचं सध्या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे.

Pages