मृत्युपत्र कसे बनवायचे

Submitted by VB on 4 July, 2020 - 04:59

कधी काय होईल सांगता येत नाही, मृत्यू असाही कधीही येऊ शकतो अन ह्या कोरोनाकाळात तर सगळेच अनिश्चित झालेय.
सो, आपण जग सोडून जाण्यापूर्वी मृत्युपत्र केलेले बरे असे वाटते. ऑनलाईन खूप शोधले पण तरीही खूप शंका आहेत. इथे कोणी मदत करू शकले तर आभारी आहे.
कृपया मला मृत्युपत्र कसे करायचे, त्याची प्रोसेस काय असते म्हणजे ते कायद्याने valid असेल प्लिज सांगा. तसेच हे जर कुणाला कळू न देता करणे शक्य आहे की नाही हेही सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव , अगदी हाच विचार मलाही आला होता. पण नातलगांना आधी विचारून मगं Godmother or godfather करावे लागेल का ?

माझे तर एक मूल पूर्णपणे अधू आहे त्यांच्या सारख्यांनी काय करावे. माझ्या मुलाला माझ्या मुलीचे करावे लागू नये व सगळे न्याय्य व्हावे म्हणून काय करावे. Able bodied वरही अन्याय नको व्हायला !! कुणाला माहिती असेल तर सांगा.
धन्यवाद.

सगळ्यांचे आभार☺️

मृत्युपत्र बनविणे इतकेही सोपे वाटत नाहीये आता. देवकी ताईने लिहिलेले त्यातल्या त्यात थोडे बरे.
देवकी ताई नैराश्य वगैरे किंवा वाईट विचार नाहीत, उलट सध्या आयुष्याचा बेस्ट फेजमध्ये आहे अन आंनदी पण.☺️

अमा, मी ज्ये ना नाहीये, उलट याचवर्षी लग्न झालंय, नवीन आयुष्याची सुरुवात झालीये, पण सध्या अचानक थोडा हेल्थ इस्स्यु झालाय, त्यात कोरोना, जर पुढचे ६ महिने मी तगली तर काही होप्स आहेत.
असो

<<< मृत्युपत्र करणे म्हणजे जग सोडून जातानाही आपण जे काही कमावलेय त्याचे पुढे काय होईल वा कशी वाटणी व्हावी हा विचार करत जाणे. आध्यात्मिकदृष्ट्या विचार करता मला ते पटत नाही >>> ऋन्मेष, आपल्या मागे जे काही शिल्लक आहे ते योग्य व्यक्तीला मिळावे, त्यासाठी त्यांची ससेहोलपट होऊ नये हा ही विचार करून बघा. सुजा यांनी लिहिलेले उदाहरण पुरेसे बोलके आहे. कधी कधी व्यवहारी व्हावे हेच बरे.

बाकी, मी वारसा हक्काचे काहीच घेतले नाहीये, म्हणून वाटले की करावे मृत्युपत्र. दोन प्रॉपर्टी आहेत त्या गिफ्ट डीड करायचे होते पण पुरेशी माहिती काढायच्या आधी टाळे बंदी घातली सरकारने.

Lawyers are working. They will provide advice by Google meet and. You can pay by Google pay or online bank transter. You need not go to court. You can give power of attorney.

आम्ही केले लिव्हिंग विल काही वर्षांपूर्वी. आपल्याला कितके डीटेल मधे करायचे असेल तेवढे करता येते, एखादी प्रॉपर्टी, एखादे अकाउंट काही कारणाने नसेल इन्क्लुड करायचे तर नाही करायचे. आम्हीही मुख्यतः आम्ही दोघेही राहिलो नाही तर त्या सिनारिओ मधे मुलांच्या कस्टडी च्या आणि फ्युचर च्या सिक्युरिटीसाठी केले. आम्ही अ‍ॅटर्नी कडे केले पण ऑनलाइन पण करता येते.
अस्मिता - आपल्यानंतर मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणाही अ‍ॅडल्ट ला नॉमिनेट करता येते. मुलांच्या नावे इस्टेटीचा ट्रस्ट करून त्या व्यक्तीला त्याचा केअरटेकर नेमता येतो. त्या व्यक्तीने मुलांना नीट बघावे, त्याला तोशिस पडता कामा नये यासाठी त्या व्यक्तीला काहीतरी पगार सुद्धा ठरवण्याची सोय असते. अर्थात हे आपण करणार असल्यास त्या त्या व्यक्तीला ते माहित असलेले बरे Happy

उलट सध्या आयुष्याचा बेस्ट फेजमध्ये आहे अन आंनदी पण.>>>≥> माहीत आहे. टच wood !नुकतेच वर्ष झाले ना!

सर्व मंगल होईलच.तेव्हा प्रत्येक दिवस सुखाचा जावो.

Pages