श्री दत्त सोनार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2020 - 11:33

*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥

वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥

करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥

जगात विक्रांत
जरी मिरवितो
स्वरूप ठेवतो
परी ध्यानी ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!
>>>जगात विक्रांत
जरी मिरवितो
स्वरूप ठेवतो
परी ध्यानी ॥>>>> सुंदर

छान कविता!

(बारा बलुतेदार सगळेच जर घ्यायचे झाले तर लोक कसे स्वीकारतील अशी शंका आली मनात!

जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेंचि होये ।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥ ८२ ॥ज्ञाने. अ. सहावा.

सुंदर लिहिलंय Happy

Kya bat!
Can i share with ur name on it?