अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<अहो ते रिटायर्ड किंवा फिक्स्द इनकम वर असतील. >>>LIC agnet since 30+ years. Monthly fd करत असतात. शिवाय सुनेला दिवाळीला नेकलेस केलं जो ती अमेरिकेत असल्याने वर्षातून एकदाच घालेल. मुलाने मागच्या वर्षी अमेरिकेत त्याच्या मांजराची surgery केली, मेल्यावर पोस्टमार्टम केलं 1000 डॉलर खर्च करून हे तेच सांगत असतात

Btw काल त्यांच्याघरी, 6kg मटार सोलून श्रीगणेशा झालाय. अजून 2kg आणणार आहेत म्हणाल्या.

३० किलो फारच जास्ती होईल!
मला वाटते की एका किलोत साधारण १२ माणसांचा मसालेभात होतो.
सो, १६ किलो तांदूळ व ६-७ किलो भाज्या पुरेश्या व्हाव्यात!

Monthly fd करत असतात. शिवाय सुनेला दिवाळीला नेकलेस केलं जो ती अमेरिकेत असल्याने वर्षातून एकदाच घालेल. मुलाने मागच्या वर्षी अमेरिकेत त्याच्या मांजराची surgery केली, मेल्यावर पोस्टमार्टम केलं 1000 डॉलर खर्च करून हे तेच सांगत असतात>> अहो पण ते मांजरावर मुलाने खर्च करणे त्याच्या इनकम मधून आहे. पेट वर खर्च हे एकदम सेपरेट मॅटर आहे.

मंथली एफ्डी करतात म्हणजे सॅलरी नाही. शिवाय कोणाला किती खायला घालायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रेरोगेटीव्ह ( प्रश्न ) आहे श्रीमंती नाही ही.

मसाले भातात भाज्या काय घाल णार? फ्लावर मटार तोंडली टोमाटो. मस्ट आहे. काजू मस्ट. शिवाय बरोबर मठ्ठा मस्त लागेल.
इथे सायो ह्यांनी लिहीलेला मसाले भात फार छान होतो तो जास्त क्वांटिटी साठी अपग्रेड करता येइल.

फंक्शन कोणत्या वेळी आहे यावर पण अंदाज बदलेल. संध्याकाळी पाच ते सात अशावेळी असेल तर लोक फार खातील असंही नाही. जरी फक्त मसालेभात असला तरी.

१ किलो तांदूळ आणि १ किलो चिकन वापरून बनवलेली बिर्याणी ८ ते १२ लोकं खाऊ शकतात. त्यामुळे
> मला वाटते की एका किलोत साधारण १२ माणसांचा मसालेभात होतो.
सो, १६ किलो तांदूळ व ६-७ किलो भाज्या पुरेश्या व्हाव्यात! > हे बरोबर वाटतंय.

काजू मस्ट. शिवाय बरोबर मठ्ठा मस्त लागेल. --- +1

 फ्लावर मटार तोंडली टोमाटो. --- इतक्या भाज्या! पुलाव आणि बिर्याणीच मधलं काहीतरी होईल.
माझ्यामते कोणतीतरी एकच भाजी आणि काजू. ओलं खोबरं आणि कोथींबीर, तूप पण हवंच.
पुण्याच्या लग्नाच्या जेवणातल्या मसालेभातात फक्त तोंडली (भाजी कॅटेगरी) असतात.

पुण्याच्या लग्नाच्या जेवणातल्या मसालेभातात फक्त तोंडली (भाजी कॅटेगरी) असतात.>>++हो जनसेवात पण मसालेभातात तोंडलीच घालतात. आत्ता दिवाळीतच खाल्ला जनसेवातला मसालेभात.
जरा तिखट वाटला आम्हा सगळ्यांना .

शीतलकृष्णा,
कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रमाण शेयर करा.बाकी काही नाही पण उगीच माहिती पाहिजे. Wink

वा ! पावभाजी प्रमाणे हे ही कार्य तडीस जाईल याची खात्री आहे.
कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रमाण शेयर करा.बाकी काही नाही पण उगीच माहिती पाहिजे >>> होना , सहज कुतूहल म्हणून आपलं.

<<<बापरे हॅट्स ऑफ तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात घाट घालायला हिम्मत हवी. गुड लक!>>> यावेळेस खुप लोकं आहेत मदतीला.. आणि पुढाकार मला नाही घ्यावा लागत आहे.

<<शीतलकृष्णा,
कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रमाण शेयर करा.बाकी काही नाही पण उगीच माहिती पाहिजे. >> नक्कीच Happy

फक्त तोंडली घालायची असतील तर फार नाही लागणार. एखाद दोन किलोच पुरतील. काजू पण असूद्या जरा . भरपूर ओलं खोबरं, साजूक तूप, लिंबू, कोथिंबीर आणि परफेक्ट चवीचा गोडा मसाला असेल तर भारीच होतो मसालेभात.

रुचिरा मध्ये १०० माणसांच्या जेवणाच्या अंदाजात ४ किलो तांदूळ + २ किलो भाज्या मसालेभाता करता दिलेल्या आहेत. अर्थात हा मसालेभाताचा अंदाज बाकी संपूर्णं जेवणाबरोबर चा आहे.
त्यानुसार २०० लोकांना बाकी जेवणासोबत जर मसालेभात असेल तर ८ किलो तांदूळ + ४ किलो भाज्या लागतील.

आता मसालेभात मुख्य असेल तर अंदाज घ्यायला हवा.
तर,
पूर्ण जेवण असेल तर मसालेभात १ च वाढप असतं. इथे साधारणपणे २ वाढप धरू (म्हणजे दुप्पट); सो, १६ किलो तांदूळ + ८ किलो भाज्या हा अंदाज होईल असं वाटतं आहे. तरीही बॅक-अप म्हणून ४ किलो तांदूळ + २ किलो चिरून तयार भाज्या बाजूला असाव्यात असं वाटतं.

टोटल २० किलो तांदूळ + १० किलो भाज्या = ३० किलो च्या रॉ मट्रेल चा मसालेभात २०० लोकांना पुरावा.

तोंडली नकोतच. त्यापेक्षा फ्लॉवर चे मोठे मोठे तुकडे, काजू, बटाटे, थोडे टोमॅटो, मटार व श्रावण घेवडा. बिर्याणी मसाला थोडा व गरम मसाला थोडा घालायचा. आल लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट, हळद, धणेपूड..मस्त भात होतो.

अप्रतीम मसालेभाताकरता काजू, फ्लॉवर, बटाटा, खडा मसाला, अगदी व्यवस्थित जमलेला गोडा मसाला, हळद, तिखट, मीठ, साखर आणि वरून भरपूर कोथिंबीर, खोबरं आणि साजुक तुपाची धार इतकंच.

योकु च्या मस्त सूचना सगळ्या.

दोन पैसे माझे ही. मसाले भात करताना त्यात थोडं सायीचं दही घातलं तर मस्त मोकळा मऊ होतो भात.

अरे मसाले भातात मटार, कॅप्सीकम व वांगे तर लिहीलेच नाही. ते पण एका बॅच मध्ये असूद्या. फीड बॅक बघा. आणी तांदूळ जुना चिन्नोर घ्या.
का बासमती. तूप हाताला राहिलं पाहिजे. खरेतर मसाले भाता बरोबर टोमाटो सार पण मस्त लागेल.

बेडेकरचा खास मसाला येतो तो ट्राय करो.

400gm set दही डब्याचे 3 ते चार वाट्या श्रीखंड होते, घरातील वाटीच्या प्रमाणानुसार.

सहा माणसांकरता आंबेडाळ करायची तर किती चणाडाळ भिजवायला हवी? प्रत्येकी किमान दोन मध्यम वाट्या भरून खायला मिळेल अशी..

1मध्यम वाटी हरभरा डाळ भिजत टाकली की 2 वाट्या आंबे डाळ तयार होते.
12 वाटी आंबे डाळ हवी असेल तर 6 वाट्या हरभरा डाळ भिजत घालावी लागेल असे मला वाटतेय.

12 वाट्या हवी तर 6 वाटी डाळ लागेलच कच्ची
कैरी तोतापुरी असेल तर किस जास्त लागेल आणि डाळ व्यवस्थित पुरेल
पण दुसरी वाली आंबट कैरी अगदी कमी पुरते, तर अर्धी वाटी डाळ जास्त लागेल

Pages