Submitted by सान्वी on 28 May, 2020 - 06:05
नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ते उत्तर मी दिलंय, म्हणून मीच
ते उत्तर मी दिलंय, म्हणून मीच करेक्शन सांगतो.
शेवटी ग्वाला गुज्जरला हा प्लॅन हाथीराम कडून कळतो. कारण हाथीराम गुज्जरला सगळा प्लॅन सांगतो असा सिनही आहे.
(व तो गुज्जरला सांगतो हे नसतं तरी चाललं असतं वरच्या प्रतिसादात)
Thank u अज्ञातवासी.
Thank u अज्ञातवासी.
ग्रेट आंबटगोड, माझ्या नव्हतं लक्षात आलं वरचं.
अन्सारी या अगोदर वीरेदी
अन्सारी या अगोदर वीरेदी वेडींग , रांझणा आणि तमाशा मध्ये होता असं google सांगतय
बंगाली कलाकार बरेच आहेत,
बंगाली कलाकार बरेच आहेत, मराठी ओळखीचं कोणी नाही दिसलं यावेळेस. मेहराच्या ऑफिस मध्ये एक मुलगी मराठी होती, तिने कामही केलंय हिंदी आणि मराठीत असं दिलंय प्राईमवर.
वर कोणीतरी लिहिलंय कि चिनी खऱ्या आयुष्यात पण ट्रान्स आहे. खऱ्या आयुष्यात म्हणजे या सिरीजमध्येच ना.
ना .
ना .
the actor Mairemban, who plays a transgender woman on reel, in reality, is a transgender actress from Manipur.
वर कोणीतरी लिहिलंय कि चिनी
वर कोणीतरी लिहिलंय कि चिनी खऱ्या आयुष्यात पण ट्रान्स आहे. खऱ्या आयुष्यात म्हणजे या सिरीजमध्येच ना.
>>>
ते आय थिंक मीच लिहिलंय.
Mairemban ची कास्टिंग या सिरीज मधली सगळ्यात अवघड कास्टिंग होती. यासाठी दिगदर्शक आणि कास्टिंग डिरेक्टर (अभिषेक बॅनर्जी - हाथोडा त्यागी) यांना ट्रान्सजेंडर ऍक्टरेसच हवी होती, व जी स्त्रीसारखीच दिसेल. त्यांचा हा शोध मणिपूर मध्ये संपला.
तिला हिंदीचा आणि अभिनयाचा गंधही नव्हता, पण तिने खूप मेहनत घेतली. ती हिंदीसुद्धा शिकली, आणि तिच्या परफॉर्मन्सने सर्व लोक आश्चर्यचकित झाले.
छान माहिती मिळतेय. चिनी बद्दल
छान माहिती मिळतेय. चिनी बद्दल माहीत नव्हतं, मस्त acting केलीये मग तिने...
चंपा थँक्स, मराठी कलाकार
चंपा थँक्स, मराठी कलाकार माहितीबद्दल, नाव वगैरे माहिती आहे का.
हॅटस ऑफ टू चिनी.
ही ती अनुराधा आठलेकर
ही ती अनुराधा आठलेकर (सिरीजमध्ये कीर्ती) जिने मन उधाण वारा आणि तुमसे ना हो पायेगा मध्ये काम केले आहे.
ग्वाला त्याच्या माणसाला
ग्वाला त्याच्या माणसाला मारताना शेवटी काय बोलतो ते नाही समजले. >>> ग्वाला म्हणतो, दुनालिया मेलाय हे फक्त तो डॉक्टर आणि दाढीवाल्या दोन भावांना माहीती असतं. डॉक्टरला मारलं आहे, मोठा भाऊ loyal ग्वालाशी ही खात्री असते त्याला, त्यामुळे धाकट्या दाढीवाल्या भावाने ते वाजपेयीला सांगितलं.
अजुन एक अस्तो
एक डोळ्याचा
थँक्यू अज्ञातवासी. मला तेच
पण मग त्याने अर्थ लागत नव्हता....
अजुन एक अस्तो
अजुन एक अस्तो
एक डोळ्याचा >>> हा आठवत नाहीये मला, परत बघायला हवा सीन.
ही ती अनुराधा आठलेकर (सिरीजमध्ये कीर्ती) जिने मन उधाण वारा आणि तुमसे ना हो पायेगा मध्ये काम केले आहे. >>> थँक यु चंपा. हीच असावी असं वाटलं पण नाही ओळखत हीला किंवा आधी कुठे पाहीलं नाहीये. तिने आधी काम केलेलं बघितलं नाहीये.
https://ibb.co/Q99k5DS
https://ibb.co/Q99k5DS
एक डोळ्याचा
हस्तर thank u.
हस्तर thank u.
पण त्याचे पुढे काय झाले?
पण त्याचे पुढे काय झाले?
आठवत नाही, मीच विचारणार होते
आठवत नाही, मीच विचारणार होते तुम्हाला पण विचार केला की जाऊदे, शेवटचे दोन भाग बघुया परत, तेव्हा काही समजेल.
जयदीप अहलावत नाना पाटेकर
जयदीप अहलावत नाना पाटेकर बरोबर ' शागीर्द' मध्ये नायक होता. अतिशय सुन्दर सिनेमा आहे. नानाने नेहमीप्रमाने खाल्लाच आहे चित्रपट पन हाही कमी पडत नाही
तो मोहित अह्ललावत
तो मोहित अह्ललावत
मस्त सिरीयल. सर्वांनी मस्त
मस्त सिरीयल. सर्वांनी मस्त काम केले आहे. जयदिप अहलावत एक चांगला कलाकार आहे. त्याने जीव ओतून काम केले आहे.
मेहराचा जीव एका कुत्र्यामुळे वाचले हे त्याला कळल्यावर त्याचे भाव मस्त आहेत. डॉली, सारा, गुल पनांग यांनी चांगले काम केले आहे.
सर्वांत शेवटी चिनीचा मित्र तिला भेटतो व त्यावेळी हाथीरामकडे रागाने बघतो. त्यावेळी हाथीराम त्याच्याकडे बघून नंतर चिनीकडे हतबल नजरेने बघतो त्यावेळी चिनी विषयी खूप वाईट वाटते. हाथीराम पण शेवटी स्वतःचा जॉब मिळवण्यासाठीच गप्प बसतो हे त्याच्या नजरेतून जाणवते.
एक गोष्ट कळत नाही की असल्या सिरीज मधून प्रमुख अभिनेत्याच्या घरचे प्रॉब्लेम कशाला दाखवतात? गुल पनांग व त्याचा मुलगा यांचा भाग वगळून त्याऐवजी गावातले पॉलिटीक्स, पोलिस लोकांनी घेतलेला शोध किंवा मेहराच्या कंपनीतल्या घडामोडी ह्या गोष्टी दाखवत्या आल्या असत्या. उगाचच हाथीसिंगची बायको, डॉलीचे जीवन वगैरे दाखवले आहे असे वाटले.
काल पाहीली ही सिरीज...शेवट
काल पाहीली ही सिरीज...शेवट अगदीच गुंडाळल्यासारखा वाटला..
सगळ्यांनीच चांगला अभिनय केलाय पण पुरूषांचे ढुंगणाचे सिन उगाचच घुसडल्यासारखे वाटले..
डाॅलीला काय प्रोब्लेम असतो?? तिला सारखं पॅनिक होतानाच दाखवलं आहे...
तो मोहित अह्ललावत>>> होय ,
तो मोहित अह्ललावत>>> होय , तुमचे बरोबर आहे
डाॅलीला काय प्रोब्लेम असतो??
डाॅलीला काय प्रोब्लेम असतो?? तिला सारखं पॅनिक होतानाच दाखवलं आहे...>>>>>>>>>>> तिला अँक्सायटी किंवा डिप्रेशन असं काही तरी असतं. स्वतःचं मुल हवं असतं
१. ओळख परेड करताना मेहरा
१. ओळख परेड करताना मेहरा जेव्हा हथोडा त्यागीला बघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ओळखल्याचे भाव असतात.
२. चित्रकूटचा उल्लेख ऐकल्यावर सुद्धा मेहरा चमकतो.
हे दोन प्रसंग पुढे कुठेच क्लिअर होत नाहीत. मला तरी वाटतं की ऐनवेळी कथेत बराच मोठा बदल करण्यात आला असावा/ सिरीज आटोपती घेतली असावी.
माझ्या मते मूळ कथेत
हाथीरामचा मुलगा वाया जात जात हातोडाच्या वाटेवर जात असता,
हातोडाच्या गुन्हेगार होण्यामध्ये मेहराचा हात असावा/ हातोडा कडून त्याने काहीतरी काम करून घेतले असावे (अप्रत्यक्ष: कारण हथोडा मेहराला ओळखत नाही)
अवांतर- अजिंक्यराव तुम्ही
अवांतर- अजिंक्यराव तुम्ही इंजिनीरिंग केली आहे का?
१. ओळख परेड करताना मेहरा
१. ओळख परेड करताना मेहरा जेव्हा हथोडा त्यागीला बघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ओळखल्याचे भाव असतात.
२. चित्रकूटचा उल्लेख ऐकल्यावर सुद्धा मेहरा चमकतो.
हे दोन प्रसंग पुढे कुठेच क्लिअर होत नाहीत. मला तरी वाटतं की ऐनवेळी कथेत बराच मोठा बदल करण्यात आला असावा/ सिरीज आटोपती घेतली असावी.
कारण तो ओळखतो पण त्याला बाईट आपल्या news साठी ठेवायचा असतो
मेहरा कधी चित्रकुटला गेल्याचा उल्लेख नसतो
मेहराचे ग्वाला गुज्जर शी काहीच संबंध नसतो त्यामुळे त्यागी शी नसणार
४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा
४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाताल लोक पाहिली, तेव्हा इंप्रेस होऊन हा धागा काढला होता. त्यावेळी जैदीप अहलावत कोण हे माहीत पण नव्हतं. आता त्याच्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतील. मंडळी, वेबसिरीज च्या धाग्यावर पाताळ लोक ची चर्चा वाढलेली पाहून, नवीन सिझन ची चर्चा करायला हा हक्काचा धागा वर काढते आहे.
असा माणूस बापाच्या खूनाचा
.
त्या धाग्यावर बर्याच जणांनी
त्या धाग्यावर बर्याच जणांनी स्पॉयलर दिलेला आहे त्यामुळे थोडा संशय होता तेच पात्रं ...
तरीही धक्का बसला. आता थोडा वेळ थांबवली बघायची.
तिकडे स्पॉयलर वाचून काही काही
तिकडे स्पॉयलर वाचून काही काही गोष्टी क्लिक झालेल्या खऱ्या होतायेत वाटलं. मोठं नाव असलेला अॅक्टर असला की संशय येतोच तसं.
पाताल लोक १ मधे धाडसाने अनेक
पाताल लोक १ मधे धाडसाने अनेक इश्यूजना हात तरी घातला होता त्यामुळं पाताललोक कडून असलेल्या अपेक्षा उंचीवर गेलेल्या असतात. मध्यंतरी एका गोष्टीच्या निमित्ताने नागालँड बद्दल भरपूर वाचन झालं होतं. नागालँड मधल्या खर्या समस्यांवर कधीच काही बोलले जात नाही. पाताललोकची कथा या समस्यांना स्पर्श सुद्धा करत नाही. व्यावसायिक मालिका म्हणून जरी पाहिलं तरी सुद्धा नागालँडची पार्श्वभूमी जर घेतली असेल तर तिथल्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या राजकीय, सामाजिक स्थितीचा उल्लेख सुद्धा नाही हे खटकलं.
स्पॉयलर अॅलर्ट
मालिका ड्रग्ज माफिया त्याचा पैसा आणि त्यातून येऊ घातलेली डेव्हलपेंट आणि त्यातले बड्या धेंडांचे स्टेक्स या भोवती फिरते यासाठी कोणतेही अन्य राज्य चालले असते. निव्वळ वातावरणनिर्मिती म्हणून नॉर्थ इस्टचं स्टेट खटकलं. काही काही उल्लेख हे आसामच्या राजकीय परिस्थितीला लागू पडणारे आहेत. नागांचे २८ ग्रुप्स , त्यातले सरकारधार्जिणे ८ ग्रुप्स ज्यांनी शस्त्रसंधी केलेली आहे, नागालँडच्या अनेक मागण्यांपैकी त्यांचा ध्वज तिरंग्यात समाविष्ट करावा एव्हढ्या मागणीचा उल्लेख जरी झाला असता तरी तिथल्या परिस्थितीचा अंदाज आला असता.
The Indian journal of Political Science , Vol LXXXIII, No 2, April June 2012, pp 331 - 346 हा रिपोर्ट istore.org वर उपलब्ध होईल. असे संदर्भ माहिती नसले तरी तपासादरम्यान जो टेंपो ठेवला आहे, हाथीराम चे खासगी आयुष्य बेमालूम रित्या येते त्या पार्श्वभूमीवर शेवट अजून उंचीवर जायला पाहीजे तो जात नाही. मालिका अचानक संपल्यासारखी वाटते आणि मग सुरूवातीला जे बिंदू सोडून दिले होते ते जोडून घेण्यासाठी हाथीराम ऑर्डर्स नसतानाही नागालँडला जातो असे दाखवले आहे ते पटत नाही. एक तर सरकारी ड्युटीवर असतानाही त्याला इतके रिस्टॄक्शन्स होते , मग अधि़कृत मोहीमेवर नसताना तो इतक्या उघड कसा काय फिरू शकेल ?
ज्याच्या बेपत्ता होण्याच्या तपासातून तो या केस मधे येतो त्या रघू पासवानला नागालँड मधे शेवटी रोजला वाचवताना का दाखवले आहे ? तो तर आधीच मेलेला असतो ना ? कि तो सीन म्हणजे रोजचा भ्रम होता ?मग कारमधल्या त्या तिघांना तो कसा काय दिसला ? कि शेवट नंतर सुचला आणि हा सीन विसरून गेले?
सहाव्या भागाच्या शेवटापर्यंत उत्कंठा ताणून धरलेली मालिका सातव्या भागापासून विस्कळीत झाली आणि गुंडाळली सुद्धा आहे.
माधव यांचे परीक्षण हे लिहून झाल्यावर वाचले. छान आहे नेहमीप्रमाणेच.
Pages