पाताल लोक

Submitted by सान्वी on 28 May, 2020 - 06:05

नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आत्ताच पाहून संपवली.. आवडली....जयदीप अहलावत जबरदस्त....तो राजी मध्ये पण आवडला होता...
शिव्या आणि काही दृश्य टाळली असती तर बरं झालं असतं.... ओलमोस्ट दर वाक्यामध्ये शिवी आहे...नको वाटतं ऐकायला....

मी पण आत्ताच बघून संपवली.

शेवटच्या काही एपिसोडसमधे जयदीप एकदम छा गया. सुपर्ब काम केलंय त्याने.

ग्वाला चौधरी आणि मेहरा चौधरी सीन्स जबरदस्त रंगतदार झाले. तसेच भगत चौधरी सीन पण एकदम भारी झाला.

शेवटी मेहराची ती गुर्मी, बातम्या देण्याचा जोश गायब होऊन एक हतबल मेहरा दिसतो. सारा आणि Dolly दोघी सरस ठरतात. सारा शेवटी मस्त हसते, मेहरा चौधरी सीननंतर. Dolly त्याला तुला माझ्यासाठी वेळ नसेल तर मलाही नाही दाखवते.

शिव्या आणि काही दृश्य टाळली असती तर बरं झालं असतं.... ओलमोस्ट दर वाक्यामध्ये शिवी आहे...नको वाटतं ऐकायला.... >>> अगदी अगदी. काही सिन्स मी पुढे ढकलले.

अतिक्रूर पद्धतीने खून करत असला तरी हातोडा शेवटी आतंकवादी ठरतो, ते जरा लागलं मनाला. त्या हातोडाने काम चांगलं केलंय अति थंड दाखवला आहे. त्याने केलेले खून आणि त्याची आत्महत्या दोन्ही बघवलं नाही.

मला एकदा तरी दुनालीयाचा चेहरा बघायचा होता, तो दाखवलाच नाही.

गुल पनाग शेवटी कसली गोड दिसते, तिच्या त्या खळ्या फार खुलून दिसतात.

Dolly, सारा पण आवडल्या. अमितोष कसली सही मदत करतो चौधरीला, सर्व बाजी हातात येते. अन्सारीचा मित्रपण खूप मोठी मदत करतो अर्थात अन्सारीमुळे. सारा चौधरीचा फायदा घेऊन सर्व क्रेडीट घेईल का असं वाटलेलं पण तिचीही फार मदत होते.

मला वाटलेलं सारा ती सर्व स्टोरी मिडियासमोर मांडेल जशीच्या तशी, हाथीसिंग चौधरीच्या साथीने पण तसं झालं नाही.

रात्री अपरात्री कधीही चौधरीसाठी रिक्षा काढणारा हकनाक मरतो, तेव्हा वाईट वाटतं.

मला कबीर आणि चीनीबद्दल जास्त वाईट वाटलं, एक चोर आणि दुसरा खोटं बोलणारा पण त्यांनी कधी कोणाचा खून केलेला नसतो. त्यागी आणि तपन हे खुनी असतात.

अजून एक...मला त्या साराचा आवाज आणि तिची बोलायची पद्धत फारच आवडली...छान आहे.
छोट्या छोट्या भूमिकेत असलेल्या लोकांनी सुद्धा छान अभिनय केला आहे...उदा. चित्रकूट चा पोलिस इन्स्पेक्टर, चित्रकूट मध्ये हाथी राम बरोबर फिरणारा रिक्षावाला...अस्सल तिथलीच वाटतात...

रात्री अपरात्री कधीही चौधरीसाठी रिक्षा काढणारा हकनाक मरतो >>> हाथीरामचा फोन येतो तेव्हां तो चार जणात बडबड करतो. तो गेल्यानंतर दोघांच्या चेह-यावरचे भावच पुढे काय होणार हे सांगणारे होते.

मी वरचे काही वाचले नाही कारण अजून ६व्या एपिसोडवरच आहे. कारण घरी उघडपणे बघता येत नाहीये.

नवर्‍याला तर कोणीतरी आधीच सांगितलेय की अँटी हिंदू सिरीज आहे त्यामुळे तो बघत नाहीच्चे आणि मला पण बघू देणार नाही. शिवाय त्यात एवढे हिंसक सीन असल्याने तो बघत नाही त्यामुळे मी लपून Proud

पाताललोक पाहून संपवली.
कथेचा प्लाॅट चांगला आहे. गुंतून जायला होतं. एकुण एक पात्राने मस्त अभिनय केलाय..
वर अनेकांनी म्हटलंय तसं, शिव्या आणि सेक्स सीन्सचा अतिरेक टाळला असता तरी चाललं असतं. मी बर्‍याच ठिकाणी फाॅ. केली.

अन्जू यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मम..
except सारा ती स्टोरी रीविल करण्याबद्दल. जर तिने व हाथीरामने तसं केलं असतं तर हाथीरामची प्रतिमा मलीन झाली असती का?
काय वाटतं?

प्रतिमा मलिन होण्यापेक्षा त्याला धोका जास्त होता त्यात असं वाटतं कारण सगळेच चहुबाजुंनी दुश्मन झाले असते. एकंदरीत सिस्टीममधे राहून त्याने आपली पोस्ट मिळवली पण सगळ्यांना सुनावून हे एकीकडे बरं वाटलं.

तो अगदी भगतलाही सुनावतो, गप्प बसण्याचं बक्षीस आहे का हे. एकीकडे तो हतबल असला तरी त्याने वास्तव स्वीकारलं आहे पण तो गप्प बसत नाही, किमान सर्व वरीष्ठांना आणि मेहराला तरी ताठ मानेने सुनावतो ते आवडलं. शेवटचे तीन किंवा किमान दोन भाग परत बघायला हवेत जयदीपसाठी असं मात्र वाटतंय.

मराठी आणि बंगाली दोन डायरेक्टर होते का याला. बंगाली कलाकार जास्त होते यात. मराठीपण हवे होते असं वाटलं. नो डाऊट सर्वांनी कामं छान केली आहेत.

येस तेच. पोस्ट परत मिळवली तेही सगळ्यांना सुनावून.मला खूप मस्त वाटलं तो सीन बघतांना.
मी पण शेवटचे ३ भाग डाऊनलोड केलेत. परत बघणार.

एक मला समजलं नाही की वाजपेयीना दलित नेता म्हणून मानत असतात आणि त्यांच्या आसपासच सतत कार्यकर्ते म्हणून वावरत असतात तर ते आपल्याघरी जेऊन गंगाजलाने आंघोळ करतात हे माहीती नसणार का, त्यात एवढं सिक्रेट कसं राहू शकतं, अमितोष ते शोधतो म्हणून त्याला मारतात , असं कुठला नेता डेरींग करेल असं वाटत नाही मला. तसं असेल तर ते त्यांना उगाच मानतात का. त्यांच्यासाठी काही ठोस करत असतील म्हणून मानत असतील ना.

हिन्दु, अस्पृश्यता, गंगाजल वगैरे सगळी ढोबळ प्रतिके ही हिंदू कसे वाईट्ट, जात्यंध हे लोकांना सांगायला आहेत. आझम खान, शहाबुद्दीन असले कुणीतरी नग गुंडशिरोमणी आहेत की. अशाच कुण्या पात्राने मुस्लिम, काफिर, हलाल, हराम वगैरे करताना दाखवता आले असते. पण नाही. फक्त हिंदूच वाईट दाखवायचे असा अजेंडा होता.
अत्यंत मूर्खपणाचे, उथळ आहे.
बाकी मालिका उत्तम असली तरी असला अजेंडा छाप घटना पाहिल्या की भातात खडा आल्यासारखा रसभंग होतो.

अजेंडा कसला ? सत्य आहे ते.
पण मनोरंजनाकडे हे असं पाहूच नये. अक्षयकुमारच्या प्रत्येक मूव्ही मधे आरएसएसचा अजेंडा असतो. ज्यांना बनवायचंय ते बनवतात, ज्यांना बघायचंय ते बघतात. अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर सारखा सिनेमा बनवला गेला होता. इंदू सरकार नावाचा मूव्ही आला. पण हे चालले नाहीत. मोदींचा सिनेमा आपटला.
सर्वांनी आपल्याला हवे तसेच मालिका . नाटकं, सिनेमे बनवावेत असं थोडीच असतं ? बाकी मराठी मालिकांमधे सगळे सणवार रीतसर असतात. म्हणजे तो नियम व्हावा का ?

असो सर्वच ठिकाणी चांगली वाईट ग्रे शेडवाली लोकं असतात, सर्वच प्रतिकात्मक दाखवली असती तरी चाललं असते.

मला वरचा प्रश्न पडला कारण वाजपेयी सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतो असं दाखवलं आहे त्यामुळे ती गोष्ट लपून राहणार नाही, मग ती माहिती असेल तरी त्यांनी त्या समाजासाठी केलेलं काम नक्की मोठं असेल ज्यामुळे ते दुर्लक्ष करू शकत असतील ह्या गोष्टीकडे. आजूबाजूला सतत एवढी लोकं असताना, असं गंगाजलाचं लपवून ठेवणे कठीण गोष्ट. मनात असलं कोणाच्या तरी कोणी इतकं डेरिंग करणार नाही असंही माझ्या मनात आलं.

>>अजेंडा कसला ? सत्य आहे ते.

मुस्लिम सर्वगुणसंपन्न असतात हे सत्य आणि हिंदू जात्यंध आणि क्रूर असतात हे सत्य? वा! बिन लादेन, हाफिज सैद, बगदादी वगैरे लोकांच्या कल्पनेचे खेळ आहेत तर! धन्य वाटले. असो.

आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवायला मुस्लिमांना थोर, पवित्र, शुचिर्भूत दाखवायचे आणि हिंदूंचे रितीरिवाज आणि वागणे अत्यंत वैगुण्यपूर्ण दाखवायचे ह्यात अजेंडा लपून रहात नाही. तो दिसतोच. आणि पैसे देऊन असले शो बघणारा प्रेक्षक म्हणून मी टीका करणारच. ज्यांना मालिकेत दाखवले गेले ते "सत्य" मानायचे असेल तर जरूर मानावे.

अक्षयकुमारच्या कुठल्या सिनेमात आर एस एस अजेंडा आहे म्हणे? मी तरी नाही पाहिला. त्याचे बेबी, स्पेशल २६, एअरलिफ्ट ह्यात आर एस एस अजेंडा मला तरी दिसला नाही.

सुलू तुम्ही दिलेली लिंक छान आहे, उद्या बघते.
सर्व भाग बघून झाले. शेवटचा भाग परत बघणार. चंदा आणि शुक्लाची गोष्ट कळली नाही. ग्वाला त्याच्या माणसाला मारताना शेवटी काय बोलतो ते नाही समजले. सारा शेवटी राजीनामा देते का.

चंदा आणि शुक्लाची गोष्ट कळली नाही. >>> मला जे समजलं ते असं, चंदा शुक्लाच्या प्रेमात पडते तो कवी असतो म्हणून असं ती सांगते पण हाथीसिंगच्या मते, पैसा आणि पॉवर त्याच्याकडे असते, वाजपेयीचा पी. ए. असतो, त्यामुळे संबंध जोडते. दुसरीकडे तपन म्हणजे टोपे तिच्या प्रेमात वेडा असतो, त्याला तिच्याशी लग्न करायचे असते, तो तिच्या आईवडिलांना भेटायल डेस्परेट असतो आता त्याचा त्रास होतो तिला (शुक्लाशी ओळख झाल्याने, तपन नकोसा होतो तिला) त्यामुळे ती त्या शुक्लाला सांगते, मग शुक्ला तो एनकाऊंटरमधे मारला जाईल ह्याचा प्लॅन करतो, तिच्या म्हणण्यानुसार तिला तपनला असं अडकवायचं नसत. फक्त त्याने तिच्या पाठीमागे लागू नये एवढंच हवं असतं. ती स्वार्थी असते आणि त्यासाठी काहीही करणारी हे शेवटी ती हाथीसिंगला जी ऑफर देते त्यावरून सिद्ध होतं.

ग्वाला त्याच्या माणसाला मारताना शेवटी काय बोलतो ते नाही समजले. >>> ग्वाला म्हणतो, दुनालिया मेलाय हे फक्त तो डॉक्टर आणि दाढीवाल्या दोन भावांना माहीती असतं. डॉक्टरला मारलं आहे, मोठा भाऊ loyal ग्वालाशी ही खात्री असते त्याला, त्यामुळे धाकट्या दाढीवाल्या भावाने ते वाजपेयीला सांगितलं.

सारा शेवटी राजीनामा देते का. >>> आधीच देते बहुतेक . मेहराने सही केल्यावर मग तो चौधरी एन्ट्री घेतो, ती तिथेच थांबते आणि सर्व ऐकते आणि शेवटी हसते आणि स्टोरी करते यावर असं घाबरवते त्याला.

अंजू...इतकं छान एक्स्प्लैन करता आहात तर माझ्याही काही शंका

शेवटी वाजपेयी व गवला एकत्र कसे येतात?
हाथी राम ला दूनालीया मेला आहे ही खबर जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातून मिळते..तर तिथल्या कर्मचाऱ्यांना वगैरे तर माहितीच असेल ना?
(बाय द वें, हाथी राम जेव्हा फोन वर बोलत बोलत रिक्षात बसतो व चलो जलदी असं त्याला म्हणती..तेव्हां तो रिक्षावाला अगदी हेल्पलेस ली मागे पाहतो..तेव्हा अंगावर अगदी कटा येतो!)
नुसतं ते कड का काय..दिल्याने त्यागी ला कळते का की मास्टर्जी मेले ते?
Happy

<<घरवापसीचा एक उल्लेख आहे, भगवे कपडे घातलेले अत्यंत हिंसक लोक काही मुसलमान लोकांना मारतात, शीख लोक खालच्या जातीच्या लोकांवर अत्याचार करतात, >> ह्या अशा भारतात कधीच न घडलेल्या काल्पनिक गोष्टी दाखवल्याने ही मालिका हिंदूविरोधी आहे हे सिद्ध होते.

शेवटी वाजपेयी व गवला एकत्र कसे येतात? >>> ह्याचे उत्तर वर अज्ञातवासी यांनी लिहिलं आहे ( बी. एस. यांनी असाच प्रश्न विचारला होता ) .

वाजपेयीला गुज्जरला तिकीट द्यायचं नसतं, म्हणून तो त्यागीला अडकवायच बघतो.
मात्र शेवटी ग्वाला गुज्जरला हा प्लॅन हाथीराम कडून कळतो, व तो गुज्जरला सांगतो.
याचा वापर गुज्जर वाजपेयीच्या विरुद्ध करू शकतो, त्याला खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी.
म्हणून नाईलाजाने तिकीट द्यावेच लागलं... >>> हे अज्ञातवासी ह्यांनी लिहिलंय, तसंच असावं असं वाटतं.

हाथी राम ला दूनालीया मेला आहे ही खबर जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातून मिळते..तर तिथल्या कर्मचाऱ्यांना वगैरे तर माहितीच असेल ना? >>> हे सिक्रेट कसं राहिलं ते समजलं नाही, ती नोंदणी वाजपेयीने तर केली नसेल असंहि वाटलं.

नुसतं ते कड का काय..दिल्याने त्यागी ला कळते का की मास्टर्जी मेले ते? >>> रुद्राक्ष, तो सतत दुनालीयाजवळ असतो बहुतेक.

>>ह्या अशा भारतात कधीच न घडलेल्या काल्पनिक गोष्टी दाखवल्याने ही मालिका हिंदूविरोधी आहे हे सिद्ध होते.

होय. ही खरी घटना होती. पण वाईट घटना काय फक्त हिंदूंच्या आहेत का? बाकी धर्म खूप सोवळे आहेत का? मालिका बनवणार्‍यांना हिंदू वाईट दाखवले जातील अशाच घटना का दिसल्या? २६/११ घडवणारे मुस्लिम अतिरेकी भगवे टिळे आणि भगव्या पट्ट्या हातावर बांधून आले होते ना?

हिंदू आणि मुस्लिम ह्यांचे लोकसंख्येतील प्रमाण आणि त्यांची दुष्कृत्ये ह्याचा ताळेबंद मांडायचा असेल तर माझी तयारी आहे.

बघून संपली काल फायनली. ओव्हरॉअल इंपॅक्ट जबरदस्त आहे मालिकेचा. हाथीराम इज बेस्ट. सुरवातीचा बुजलेला ते नंतरचा मुरलेला अभिनय फार मस्त केलाय. देहबोलीतून छान व्यक्त होता येतं त्याला. मेहेराचे एकच एक भाव आहेत पूर्ण सिरीजभर. बाकी सगळेच कॅरेक्टर्स मस्त घेतलेत. अनुप जलोटाला बघून एकदम ऑ झालं Happy तसं म्हटलं तर ज्या त्यागीसाठी एवढी सिरीज घडवली त्यालाच फारसं काम नाहीये. बाकी पॉलिटिक्स वगैरे खूप काही समजलं नाही.

काही सिन्स फार अंगावर येणारे आहेत . माझे सगळे सेन्सेस मरून जाणार आहे बहुतेक अशा सिरीज बघितल्या तरअसं वाटायला लागलंय.

धन्यवाद अंजू.
तो घरवापसीवाला प्रसंग कितव्या भागात आहे. सारा मेहराला धमकी देते पण तो तिला सांगतो की तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, प्रेमप्रकरण फसलं म्हणून ती बदनामी करतेय असे सर्व म्हणतील.
चित्रकूटमध्ये त्यांना आधीच धमकी मिळाली त्यामुळे तिकडे शूटिंग करता आले नाही. चित्रकूट मध्ये दुनळीया सारखा खरा कुणी आहे का.
जयदीपने या रोलसाठी पंचवीस किलो वजन वाढवले. अन्सारी खाण्याचा खूप शौकीन आहे. फिल्म सिटीमध्ये शूट करताना बिबटया आल्याची अफवा खूप वेळा पसरली होती. तोप ची भूमिका केलेला पंजाबचा आहे आणि बऱ्याच पंजाबी चित्रपटात त्याने काम केले आहे. हे सगळं प्राईमवर वाचलं.

राजकारण मलाही फारसं समजलं नाही. समजून घ्यावं असंही वाटलं नाही. हाथिराम जिवंत राहतो कि नाही याचीच मला धाकधुक होती.
नुकताच स्त्री बघितला होता आणि त्यात अगदी लल्लू दाखवलेला त्यागी यात एवढा हातोडा घेऊन खून करताना बघून ऑ झालं.
जयदीपचा साला जे सरबताचं मशीन आणतो ते अगदी जत्रेत असतं तसं होतं. घरात ठेवलेलं बघून मजा वाटली. तो राजू भय्यापण विनोदी होता. चमकोगिरी करत असतो.

हाथिराम जिवंत राहतो कि नाही याचीच मला धाकधुक होती.>>>>> अगदी अगदी. त्या जत्रेतल्या प्रसंगात तर वाटलंच होतं त्याचा शेवट झाला की काय.

हाथीराम इज बेस्ट. सुरवातीचा बुजलेला ते नंतरचा मुरलेला अभिनय फार मस्त केलाय. देहबोलीतून छान व्यक्त होता येतं त्याला. >>> अगदी अगदी. आधी मला अन्सारी best वाटला त्याच्यापुढे, केलंहि छान त्याने, एकदम कुल. पण शेवटचे तीन एपिसोड्स हाथीसिंगने बाजी मारली, तिथे अन्सारीला फार काम नव्हतं. त्यामुळे चौधरी छा गया असं झालं एकदम. एकंदरीत त्या दोघांची जोडी एकमेकांना पूरक आणि एकमेकांना अडीअडचणीत मदत करताना एक माणूस म्हणून रिस्पेक्ट देणारी वाटली. मस्त दोस्ती. दोघेही आपापल्या जागी मस्त पण सिरीयल हाथीसिंग चौधरीची आहे, जयदीपने त्याचा अभिनय एका उंचीवर नेऊन ठेवला.

शेवटी जेव्हा अन्सारीकडे मदत मागतो चौधरी तेव्हा अन्सारीला परत डेटा कसा मिळवायचा टेन्शन असते तेव्हा त्याला सांगतो, उगाच तुला त्रास दिला, मला तुला prblm मधे आणायचं नाहीये.

अंजू, मला
मात्र शेवटी ग्वाला गुज्जरला हा प्लॅन हाथीराम कडून कळतो, व तो गुज्जरला सांगतो........
हे वाक्य कळले नाही तुझ्या वरील उत्तरात!

Pages